देवळांच्या देशा - "संगमेश्वर आणि चांग वटेश्वर मंदिर (सासवड)"

Submitted by जिप्सी on 30 June, 2014 - 00:40

१. देवळांच्या देशा – "अंबरनाथचे शिवमंदिर"
२. देवळांच्या देशा - "मानस मंदिर"
३. देवळांच्या देशा - "शहाडचे बिर्ला मंदिर"
४. देवळांच्या देशा - "गोंदेश्वर मंदिर (सिन्नर)"

==============================================================================
==============================================================================
आषाढी वारीनिमित्त सासवडला भेट देण्याचा योग आला. कर्‍हा नदीच्या तीरावर वसलेल्या सासवड परीसरात भटकंतीसाठी मल्हारगड (सोनोरीचा किल्ला), पुरंदर-वज्रगड, परीसरातील पुरातन देवालय, पक्षीनिरीक्षणासाठी वीर धरण आणि परीसर, केतकावळीचे प्रति बालाजी मंदिर, साधारण १७ किमी अंतरावर वसलेली "जेजुरी", पुरातन वाडे, भुलेश्वर असा बराच खजिना आहे. सासवडवरून दरवर्षी जाणे येणे होते पण निवांत अशी भटकंती झाली नव्हती. वारीच्या निमित्ताने एक दिवस मुक्काम असल्याने जास्त भटकंती करता आली नाही. मात्र "संगमेश्वर" मंदिराबद्दल मायबोलीकर हर्पेन यांनी इथे फोटो प्रदर्शित केले होतेच तेंव्हा हे मंदिर आणि प्रतिसादात वरदा व गिरीकंद यांनी उल्लेख केलेला वटेश्वर अशी दोन ठिकाणे आवर्जुन पाहण्याचे ठरवले होते. वारीनिमित्त प्रचंड गर्दी असल्याने सोपानकाका समाधीमंदिर बाहेरूनच पाहिले.

श्री संगमेशवर मंदिर
सासवड एसटी स्थानकापासून साधारण १-१.५ किमी अंतरावर कर्‍हा आणि चांबळी (भोगावती) नदीच्या संगमावर हे मंदिर वसले आहे. दगडी बांधकामाचे हे मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिरात दोन नंदी असुन एक मुख्य मंदिराच्या थोड्या बाहेर आहे. आतील नंदीला रंगकाम केलंय. Sad मंदीर परीसरात दिपमाळा, तुळशी वृंदावन आहेत. मंदिराबद्दल जास्त माहिती मिळाली नाही.
प्रचि ०१
जवळच असलेल्या कर्‍हाबाई मंदिरातील कर्‍हाबाईची मूर्ती
प्रचि ०२
मंदिरातील श्री गणेशमूर्ती
प्रचि ०३

प्रचि ०४
मंदिरातील पहिला नंदी
प्रचि ०५

प्रचि ०६
रंगवलेला नंदी

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
श्री चांग वटेश्वर मंदिर (चांगावटेश्वर)
सासवड एसटी स्थानकापासून साधारण ४-५ किमी अंतरावर सासवड-कापूरहोळ रस्त्यावर अतिशय निसर्गरम्य आणि शांत परीसरात चांगावटेश्वर मंदिर आहे.
या मंदिराची आख्यायिका:
चांगदेव पावसाळ्यातील चातुर्मासातले ४ महिने मौनव्रताने व अंधत्व धारण करून म्हणजेच डोळे मिटुनच सर्व व्यवहार करीत. त्यांचे नित्य पार्थिव लिंग पुजेचे असे. त्यांचा शिष्य काळ्या मातीने मळुन केलेले लिंग डाव्या हातावर घेऊन त्याची विधीयुक्त पुजा करीत असे. एक दिवशी सारख्या कोसळत असलेल्या पावसामुळे शिष्याने कंटाळुन एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातीचे लिंपन तयार करून तेच पार्थिक लिंग म्हणुन तयार करून ठेवले. चांगदेवाने नित्यनियमाने स्नान उरकुन पार्थिव लिंगास आव्हानात्म मंत्रोक्षता वाहून ते उचलून हातावर घेण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला. ते हलविले न जाणारे स्वयंभू लिंगच चांगदेवास दिसुन आले. त्याने छोटेसे मंदीर बांधून त्या स्वयंभू लिंगाची उपासना कायम ठेवली. यावरूनच या मंदिरास चांगावटेश्वर असे नाव पडले.
या मंदिराचा जिर्णोद्धार सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी सन १७०० मध्ये केला. सध्या देवस्थान मालकी हक्क सरदार जयसाहेब राघवेंद्र पुरंदरे यांच्याकडे आहे.
(वरील माहिती मंदिरात असलेल्या माहिती फलकाच्या आधारे)

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
सोपानकाका समाधी मंदिर
प्रचि ३१

जुन महिना अर्धा संपला तरी पावसाने पाठ फिरवल्याने नदीपात्रात पाणी नव्हते. Sad पावसाळ्यात हा सारा परीसर अजुनच देखणा असेल यात शंका नाही. येथील शांतता आणि निसर्ग अनुभवायचा असेल तर हाताशी थोडा वेळ राखुनच या. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच अप्रतिम फोटोज. सासवडला खुप वेळा गेलो आहे पण ह्या मंदीरांबद्दल माहिती नव्हती आता मात्र गेलो तर आवर्जुन जाईन.

मस्त Happy
मागच्याच महिन्यात सोपानकाका समाधी मंदीर पाहिले..पुढच्या वेळी आता ही दोन मंदीरे पाहणार.

मस्त.. या परिसरात पावसाळ्यात भटकंती करायला मस्त वाटतं..

चांग वटेश्वर मंदिर >>> हे मंदिर हिवरे गावात आहे का?

सुरेख, जिप्सी.
वटेश्वर आणि सोपानकाकांची समाधी ही माझी अत्यंत आवडती ठिकाणं आहेत. तिथे फार छान मनःशांती मिळते असा (निदान माझ्यापुरता) अनुभव आहे. अतिशय निवांत परिसर..
वटेश्वराच्या शिखरालापण रंगकाम केलेलं पाहून वाईट वाटलं

काय सुंदर मंदिरं आहेत. (जिप्स्या सारखं सारखं सांगणार नाही, तू फोटो सुंदर काढलेस, त्यामुळेच ही सुंदर मंदिरं आम्हाला दिसलीत.)

वटेश्वराच्या शिखरालापण रंगकाम केलेलं पाहून वाईट वाटलं >>> +१

रंगकाम केल्यावर एखाद्या वास्तुची रया गेलेली पहिल्यांदाच पहातोय. पण पावसाळ्यात वटेश्वर मंदिर आणी आजुबाजुचा परीसर खुपच मस्त वाटतो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!

हे मंदिर हिवरे गावात आहे का?>>>>>बहुतेक नाही, इंद्रा.

तिथे फार छान मनःशांती मिळते असा (निदान माझ्यापुरता) अनुभव आहे. अतिशय निवांत परिसर..>>>वरदा, मलाही पहिल्या भेटीत अगदी हेच जाणवलं. Happy पावसाळ्यात जेंव्हा नदी भरून वाहत असेल तर या परीसराचे सौंदर्य अजुनच खुलुन दिसत असेल ना?

वटेश्वराच्या शिखरालापण रंगकाम केलेलं पाहून वाईट वाटलं>>>>अगदी अगदी. खरंतर पुरातन कोणत्याही मंदीराला रंगकाम करण्यास मनाई केली पाहिजे. पाली येथील बल्लाळेश्वर मंदीराच रंगही आता काढुन टाकला आहे.

वेल Happy

हे मंदिर हिवरे गावात आहे का? - नाही सासवड मधे कचेरिच्या जवळ आहे.

हिवरे गावात आहे का? या गावात असेच एक शिव्मन्दिर आहे.

फोटो छान आहेत....

सासवड एसटी स्थानकापासून साधारण ४-५ किमी अंतरावर सासवड-कापूरहोळ रस्त्यावर>>>>>>
वटेश्वर मंदिर हे सासवड एस टी स्थानकापासून ३ किमी आहे.

शेवटचा फोटो हा सासवडचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा बाहेरचा परिसर आहे

शेवटचा फोटो हा सासवडचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा बाहेरचा परिसर आहे>>>>नाही राणी_३. शेवटचा फोटो हा सोपानकाका समाधी मंदिराचाच आहे. Happy

लै भारी जिप्शा! संगमेश्वराच्या देवळातला रंगीत नंदी नवीन आहे का? आणि प्र चि ३० मधे २ समाध्या आहेत का, आणि असतील तर कोणाच्या?

पहिलाच फोटो काय खल्लास आहे. वेगळाच कोन त्या तीरावर गेलास तरी कसा, पार त्या रस्त्यावरच्या पुलावरूनच का?

चांगवटेश्वर अजूनही राहिलेच आहे जायचे, आता पुढच्या खेपेस सासवडला गेलो की नक्की जाणार

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!

आणि प्र चि ३० मधे २ समाध्या आहेत का, आणि असतील तर कोणाच्या?>>>>ज्योतिताई, हे माहित नाही. Sad

पार त्या रस्त्यावरच्या पुलावरूनच का?>>>>हो हर्पेन तेथुनच. आणि तोच रस्ता पुढे वटेश्वर मंदिराकडे जातो. (अंतर अंदाजे १.५ ते २ किमी असेल).

केपी कधी जायच ते जिप्सीला विचार...>>>> ऑगस्टमध्ये कधीही. Wink वीर धरण आणि परीसरही पहायचा आहे.

Pages