देवळांच्या देशा - "संगमेश्वर आणि चांग वटेश्वर मंदिर (सासवड)"

Submitted by जिप्सी on 30 June, 2014 - 00:40

१. देवळांच्या देशा – "अंबरनाथचे शिवमंदिर"
२. देवळांच्या देशा - "मानस मंदिर"
३. देवळांच्या देशा - "शहाडचे बिर्ला मंदिर"
४. देवळांच्या देशा - "गोंदेश्वर मंदिर (सिन्नर)"

==============================================================================
==============================================================================
आषाढी वारीनिमित्त सासवडला भेट देण्याचा योग आला. कर्‍हा नदीच्या तीरावर वसलेल्या सासवड परीसरात भटकंतीसाठी मल्हारगड (सोनोरीचा किल्ला), पुरंदर-वज्रगड, परीसरातील पुरातन देवालय, पक्षीनिरीक्षणासाठी वीर धरण आणि परीसर, केतकावळीचे प्रति बालाजी मंदिर, साधारण १७ किमी अंतरावर वसलेली "जेजुरी", पुरातन वाडे, भुलेश्वर असा बराच खजिना आहे. सासवडवरून दरवर्षी जाणे येणे होते पण निवांत अशी भटकंती झाली नव्हती. वारीच्या निमित्ताने एक दिवस मुक्काम असल्याने जास्त भटकंती करता आली नाही. मात्र "संगमेश्वर" मंदिराबद्दल मायबोलीकर हर्पेन यांनी इथे फोटो प्रदर्शित केले होतेच तेंव्हा हे मंदिर आणि प्रतिसादात वरदा व गिरीकंद यांनी उल्लेख केलेला वटेश्वर अशी दोन ठिकाणे आवर्जुन पाहण्याचे ठरवले होते. वारीनिमित्त प्रचंड गर्दी असल्याने सोपानकाका समाधीमंदिर बाहेरूनच पाहिले.

श्री संगमेशवर मंदिर
सासवड एसटी स्थानकापासून साधारण १-१.५ किमी अंतरावर कर्‍हा आणि चांबळी (भोगावती) नदीच्या संगमावर हे मंदिर वसले आहे. दगडी बांधकामाचे हे मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिरात दोन नंदी असुन एक मुख्य मंदिराच्या थोड्या बाहेर आहे. आतील नंदीला रंगकाम केलंय. Sad मंदीर परीसरात दिपमाळा, तुळशी वृंदावन आहेत. मंदिराबद्दल जास्त माहिती मिळाली नाही.
प्रचि ०१
जवळच असलेल्या कर्‍हाबाई मंदिरातील कर्‍हाबाईची मूर्ती
प्रचि ०२
मंदिरातील श्री गणेशमूर्ती
प्रचि ०३

प्रचि ०४
मंदिरातील पहिला नंदी
प्रचि ०५

प्रचि ०६
रंगवलेला नंदी

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
श्री चांग वटेश्वर मंदिर (चांगावटेश्वर)
सासवड एसटी स्थानकापासून साधारण ४-५ किमी अंतरावर सासवड-कापूरहोळ रस्त्यावर अतिशय निसर्गरम्य आणि शांत परीसरात चांगावटेश्वर मंदिर आहे.
या मंदिराची आख्यायिका:
चांगदेव पावसाळ्यातील चातुर्मासातले ४ महिने मौनव्रताने व अंधत्व धारण करून म्हणजेच डोळे मिटुनच सर्व व्यवहार करीत. त्यांचे नित्य पार्थिव लिंग पुजेचे असे. त्यांचा शिष्य काळ्या मातीने मळुन केलेले लिंग डाव्या हातावर घेऊन त्याची विधीयुक्त पुजा करीत असे. एक दिवशी सारख्या कोसळत असलेल्या पावसामुळे शिष्याने कंटाळुन एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातीचे लिंपन तयार करून तेच पार्थिक लिंग म्हणुन तयार करून ठेवले. चांगदेवाने नित्यनियमाने स्नान उरकुन पार्थिव लिंगास आव्हानात्म मंत्रोक्षता वाहून ते उचलून हातावर घेण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला. ते हलविले न जाणारे स्वयंभू लिंगच चांगदेवास दिसुन आले. त्याने छोटेसे मंदीर बांधून त्या स्वयंभू लिंगाची उपासना कायम ठेवली. यावरूनच या मंदिरास चांगावटेश्वर असे नाव पडले.
या मंदिराचा जिर्णोद्धार सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी सन १७०० मध्ये केला. सध्या देवस्थान मालकी हक्क सरदार जयसाहेब राघवेंद्र पुरंदरे यांच्याकडे आहे.
(वरील माहिती मंदिरात असलेल्या माहिती फलकाच्या आधारे)

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
सोपानकाका समाधी मंदिर
प्रचि ३१

जुन महिना अर्धा संपला तरी पावसाने पाठ फिरवल्याने नदीपात्रात पाणी नव्हते. Sad पावसाळ्यात हा सारा परीसर अजुनच देखणा असेल यात शंका नाही. येथील शांतता आणि निसर्ग अनुभवायचा असेल तर हाताशी थोडा वेळ राखुनच या. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

मस्तच Happy

थिम सहि आहे...

हे मंदिर उगाच रंगवलय....आधि काळ्या पाशाणाच्या रंगातल फारच सुंदर दिसत होतं.....पण अ‍ॅतलिस्ट चूना नाही मारलाय...

केपी कधी जायच ते जिप्सीला विचार...>>>> ऑगस्टमध्ये कधीही. वीर धरण आणि परीसरही पहायचा आहे. >> १० ऑगस्ट नंतर असेल तर मलापण आपले म्हणा Happy

झकास रे. १४ वा जाम आवडला.
शेवटच्या फोटोशिवाय चिट-पाखरु पण दिसत नाहिये. फारच शांत जागा दिसतेय.

Pages