श्रीलंकन किरी बाथ. अर्थात नारळाच्या दूधातला भात.

Submitted by दिनेश. on 18 April, 2014 - 05:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष्क्ष

अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
माझ्या श्रीलंकन मित्राची बायको.
आहार: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय दिसतोय!!! सुंदरच... केशर ही अगदी मस्त सढळ शिवरलंय...!!!

मला वाटतं की साध्या तांदूळाचाही करता येईल, फारतर टेक्श्रर चा फरक पडेल...

वॉव दिनेश दा...काय भारि दिसतय.नक्कि करून बघणार
अहो पण शिर्षक वाचुन मला वाटले कि तुम्हि श्रिलंकन स्पा बद्दल वगरे काहि म्हणताय का Proud

ह्म्म्म्म....

नुसता नारळाच्या दुधात शिजवाल्याने कितपत चांगला लागेल हे लक्षात येत नाहीये. श्रीलंकन जेवण मला तरी अजिबात आवडलं नव्हतं. सर्व भारतीय मसाले वापरून ते बेचव जेवण करून दाखवतात असं माझं मत आहे.

हा भात आम्ही विशू (केरळ मधील सण ) ला करतो . ह्याला vishukatta म्हणतात .ह्याच्या वड्या पाडून ह्यावर मध घालून खातात खूप छान लगतो.
आत्ताच १५ तारखेला विशू होता तेंव्हाच झाला करून हा भात .

वॉव.. मस्त दिस्तोय.. Happy

अरे स्पॅनिश मधे सेम स्पेलिंग असुन आर्रोझ असा उच्चार करतात तर गोडाला ,'दुलसे' सो सिमिलर ना..

पण खोबरेल तेलाच्या फोडणी ची कोशिंबिर खाणे मेरे लिये ,'नो' नो Happy

मस्त! इथे होलफूड्स मधून "जस्मिन" राइस आणला होता. हे कंपनीचे नाव असू शकते.
पण चव गोड आणि थोडासा चिकट ही. एका थाय रेस्टॉ. मधे स्टिकी राइस विथ मॅन्गो खाल्ला होता.
मस्त होता.
तसा हा जस्मिन राइस वाट्ला. पण याचाच हा श्रीलंकन बाथ मस्त होईल.

गोपिका Happy

मामी, नॉन व्हेज बद्दल नाही सांगता येणार मला पण हा चांगला लागतो. ( यात मसाले नाहीत ना )

राखी, असा प्रकार मी कुर्गी लोकांकडे पण खाल्लाय. त्यांचा खास तांदूळ असतो. वर मध, खोबरे आणि वेलचीपूड घालतात.

बर्षू.. पोर्तूगीज ही स्पॅनिशची बोबडी बहिण आहे. भयंकर उच्चार करतात एकेक.

मानुषी... तो चालेल पण आधी दोन तीन वेळा धुवून स्टार्च कमी करावा लागेल.

त्यांच्याकडे भरपूर पिकतात कि मसाले. एवढ्याश्या देशात १०० च्या वर नद्या आणि चारशेच्या वर धबधबे आहेत.
( सौजन्य श्रीलंकन एअरलाइन्सचे इन फ्लाईट मॅगझिन )

दिनेशदा, भारतीय म्हणजे भारतातून तिथे गेलेले नव्हतं म्हणायचं मला. जे भारतीय जेवणात वापरतात तेच असं आहे ते.

मामी, मी त्यांचे फार नाही पदार्थ खाल्ले. पण तिथून दालचिनी आणली होती ती मात्र मस्तच आहे.
इथे मुद्दाम लिहायला पाहिजे. त्यांच्या इन फ्लाईट मॅगझिन मधे एक छान चित्र होते. आपल्या समोश्याचा खालचा त्रिकोणी भाग (दक्षिण भारताच्या आकाराचा ) आणि श्रीलंकेच्या आकारातले केचप.. अर्थ असा कि दोघांना एकमेकांशिवाय पर्याय नाही.

आपले मसाले नेले पण आपल्या रेसिपी नेल्या नाहीत असे वाटते. ते जेवताना मात्र आपल्या एका विशिष्ठ राज्यातील लोकांसारखेच जेवतात. ( भातावर चिकनचा रस्सा आणि त्यावर श्रीखंड Sad )

त्यांचे ग्राऊंड हँडलिंग एजंट म्हणून काम बघणार्‍या एका संस्थेशी मी काही काळ संलग्न होतो.

ह्याप्रकारे थोडा गुळ घालून केला तर नारळीपौर्णिमेला, नेहेमीच्या नारळीभाताऐवजी वेगळी डिश होईल.

आंबेमोहोराचा करून बघेन.

हो मस्त असतो.मी मागच्या म्हैन्यात श्रीलंकेस गेलो होतो तेवा बर्‍याचदा खाल्ला . दिसतो तो बर्फीच्या वडीसारखा पण गोड नसतो. नारळाच्या चवीचा लागतो

थाई रेस्टॉरंट मध्ये अस्साच गोड भात + आंब्याच्या फोडी घालून देतात. वरून नारळाचे जाड दूध + किंचीत काळे तीळ / भाजलेले सुके खोबरे / दाण्याचे भरड कूट असे डेझर्ट मिळते. मस्त असते ती डिश.

वॉव दिनेश, आहा आहा दिसतोय प्रकार Happy
सोप्पं प्रकरण आहे. आंबेमोहोराचा छान होईल. मुसळधार पावसात किंवा हुडहुड्या थंडीत नक्की करणार.. विथ लिट्ल मॉडिफिकेशन्स अर्थात.

रॉबिनहूड, फोटो मस्तच!

Pages