मायबोलीच्या दृष्यभागाचे नवीन सर्वरवर स्थलांतर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

काही मिनिटांपूर्वी मायबोलीच्या दृष्यभागाचे (Frontend) नवीन सर्वरवर स्थलांतर झाले आहे.
(मायबोलीच्या डाटाबेसचे स्थलांतर काही महिन्यांपूर्वी झाल्याचे चाणाक्ष मायबोलीकरांच्या लक्षात असेलच) Happy

मायबोली नीट दिसत नसेल तर कृपया आपल्या ब्राऊझरला ताजेतवाने करा (Refresh)

बहुतेक मायबोलीकरांना काहीच फरक जाणवणार नाही. जाणवलाच तर मायबोली जास्त वेगवान झाल्यासारखे वाटेल. नवीन SSD तंत्रज्ञान असलेल्या या सर्वरमधे काहीच फिरते भाग नाहीत. आपल्यासाठी जास्तीची जागा, नविन सुविधा आणि भविष्यातील काही योजनांसाठी नवीन तंत्रज्ञान आणि जास्तीचा वेग यातून मिळेल अशी आशा आहे.

नवीन हार्डवेअर/सॉफ्टवेअर असल्यामुळे काही अडचण आली तर कृपया याच धाग्यावर सांगा.

विषय: 
प्रकार: 

छान

अ‍ॅडमीन टिम .. .. अहो खरच ...मायबोली जास्त वेगवान झाल्यासारखे वाटत होते पण कारण कळत नव्हते .... मस्त मस्त .... आपल्या मा बो च्या प्रगती पथावर ज्या ज्या गोष्टी घडतात त्याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो ..... ...... Happy Happy

विपु आलेली कळु शकेल का........ ? ही विनंती अनेकदा केलेली आहे Sad
बाहेरच्या पानांवर असताना विपु आलेली आपल्याला कळत नाही..... त्यामुळे बर्याचदा कित्येक दिवसांनी ती उघडली जाते .... कृपया या गोष्टींवर लक्ष द्यावे

तसेच मोबाईल वरुन मायबोली ऑपरेट करण्याकरीता अधिक सुटसुटीत बनवता येईल का ?

डावी कडील लोगो वर घेउन वरच्या लाईन्स "नविन लेखन..हितगुज" खाली घेता येईल का . म्हणजे मोबाईल्वरुन क्लिक करताना सारखा लोगो वर हात लागुन मुख्य पान वारंवार उघडण्याच्या घटना कमी होतील

तुमच्या सदस्यत्वामध्ये संपादन टॅबवर "कुणी माझी विचारपूस केल्यास, ई-मेल पत्त्यावर निरोप द्या" हा पर्याय निवडल्यास विपू आली की ईमेल येतो.

उदयन
विपु आल्यावर ईमेलने कळवायची सुविधा फार अगोदरपासूनच मायबोलीवर आहे, तुम्ही तुमच्या व्यक्तिरेखेत ती बंद करून ठेवली आहे. प्रत्येक पानावर ती द्यायची सोय मुद्दाम काढावी लागली कारण त्यामुळे प्रत्येक पान ह्ळु होतं. ईमेलची सोय असताना प्रत्येक पान हळु होणारा तुम्ही सुचवलेला बदल करणे योग्य होणार नाही.

मोबाईलवरून सुटसुटीत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

धन्यवाद... ईमेल वरची सुविधा ती माहीत आहे..

प्रत्येक पानावर नाही म्हणत .... अर्ध्याहुन अधिक मायबोलीकर "नविन लेखन" या पानावर असते ( http://www.maayboli.com/new4me_all ) त्याच पानावर खाली दाखवल्या प्रमाने तरी नोटीफिकेशन आली तरी चालु शकते बहुतेक. अर्थात सर्वर वर ताण न पडताच .. हे प्रत्येक पानावर येणार नाही बहुदा...

Follow Maayboli
on Google+
छोट्या जाहिराती
कानोकानी
उदयन..
नवीन लेखन करा
माझे सदस्यत्व (१)
जाण्याची नोंद

-------------------------------------------------

अश्या प्रकारचे नोटीफिकेशन Happy

अभिनंदन. नव्या सर्वर वर गो लाइव झाल्याबद्दल. पहाटे उठून कुत्रे फिरवून आल्यावर चहा घेउन मायबोली वाचत बसायचे हा नित्यक्रम आहे. आज माबो न्यू फॉर मी असे क्लिक केल्यावर नॉट फाउंड आले. तर काय करावे तेच समजेना. How can there be Internet withou t Maayboli? असे क्षण भर वाटून गेले. Happy

Admin-team, chhaan !!! abhinandan.

Mala marthitun lihita yet nahiye. ata ata paryant lihita yet hota. pan achanak kahi divasanpurvipasun ha problem suru zala aahe. mala vatata paan purn load hoat nahiye.

Abhinandan Admin-Team,
IE वर प्रतिसादामध्ये मराठी लिहिता येत नाहीये. प्रतिसाद देऊन , नंतर Edit comment मध्ये जाऊन परत मराठी लिहावं लागतं , हा द्राविडी प्राणायम बंद करता येईल का ?

हार्दिक अभिनंदन मायबोली! Happy

(मला तर लॉग इनच होता येत नव्हते. Uhoh मला वाटले नवीन सर्व्हरवर मला जागाच ठेवली नाही बहुधा)

छान .
हा धागा नवीन सर्वरबद्दल असला तरी उदयन म्हटतो तशी सुचना "विशेष(१)" आल्यास अधिप्रवेश (LOG IN) असल्यामुळे वाचून लगेच उत्तर देता येईल .इमेल मध्ये कळल्यावर पुन्हा पान उघडून पाहावे लागते .
प्रचि चिकटवण्याचा प्रश्न मी फोटोबकेट'च्या अॅल्बमची लिँक देऊन सोडवला आहे .बदल करायचे असल्यास तिकडे करतो ,लिंक तिच राहते .फोटो साठवण क्षमता भरपूर मिळते .एचटिएमएल कोडचेही जंजाळ येत नाही .शिवाय प्रचि एका वेगळ्याच साईटवर असल्यामुळे कॉपिराईटच्या अनुषंगाने उदभवणाऱ्या प्रश्नांतून मायबोली मुक्त राहील असे वाटते .

फ्रंट पेज फास्ट झालंय खरं. पण ते g+ चं विजेट काढून टाकल्याने झालं असावं असं मला वाटलं होतं आधी.

रच्याकने:
>>
मला वाटले नवीन सर्व्हरवर मला जागाच ठेवली नाही बहुधा
<<
कित्ती बरं झालं असतं... Wink

गझलमुक्त मायबोली by 2015 असा कार्यक्रम जाहिर करा ब्वा अ‍ॅडमिन टीमकडून.

"प्रोसेस्ड" गझल - मुक्त मायबोली by 2015 असा कार्यक्रम जाहिर करा ब्वा अ‍ॅडमिन टीमकडून.....>> असे म्हणा इब्लिस, सर्व गझल बॅड नसतात हो!

@महेश
पाऊलखुणा ही सोय पुन्हा सुरु करण्याचा अजिबात विचार नाही. या सोयीमुळे सर्वरवर खूप जास्त ताण येत असे. त्या सोयीच्या जवळ जाणारी "लेखन" हि सुविधा प्रत्येकाच्या व्यक्तिरेखेतून पाहता येते.
पाऊलखुणांमुळे कुणिही केलेल्या सगळ्या प्रतिक्रिया एकत्र वाचता येत असत, पण मायबोलीवरचा वाढता वावर (वाढत्या प्रतिक्रिया) पाहता ती सोय दिवसेंदिवस इतर सुविधांना हळू करणारी ठरायला लागली. याच कारणामुळे जुन्या मायबोलीवरचा ट्री व्हू बंद करावा लागला आणि तोही परत आणला जाणार नाही.
@उदयन
सर्वरच्या ताणामुळे तुम्ही मागितलेली सुविधा देता येणार नाही. प्रश्न एका पानाचा नसून जर हे पान जास्त वेळा उघडलं जातं त्याच पानावर अधिक ताण आणणार्‍या सुविधा दिल्या तरी त्याचा संपूर्ण सर्वरवर परिणाम होतो.

ओह, माहितीबद्दल धन्यवाद.
मला ती सोय फार छान वाटत होती, कारण ज्या ज्या धाग्यांवर प्रतिक्रिया लिहित आहे त्याची यादी एके ठिकाणी मिळत असे.
आता लेखन मधे पाहिल्यास जे धागे निर्मांण केलेले आहेत तेच दिसू शकतात.

कोणत्याही धाग्यावर प्रतिसाद जेव्हा जास्त होतात तेव्हा नविन प्रतिसाद पहिल्या पानावर आणि जुने शेवटच्या पानांवर (लेटेस्ट कमेन्ट फर्स्ट) असे करता येईल का ?

गझल बरोबर राजकिय याचा देखील एक गृप बनवावा आणि त्यात धाग्यांना "सार्वजनिक" हा ऑप्शन देउ नका...

ज्यांना गझलेचे प्रेम आहे ते तो गृप जॉईन करतील........आणि ज्यांना राजकिय चर्चा करायचे असतील ते तो गृप जॉईन करतील...

ज्यांना हे नकोय त्यांच्या माथी मारण्यात येउ नये..

-----------------------------------------

मला गझल कवितेतले काहीच कळत नाही आणि मी कधीही त्या धाग्यांवर जात नाही ( जे कळतच नाही तिथे जाउन उगाच खरडत बसणे चुकिचे) परंतु "नविन लेखन" या पानावर असलेले धाग्यांमधे ७०% धागे कविता आणि गझलेचे असल्या कारणाने मला हवे असलेले धागे इतर पानांवर नाईलाजाने शोधावे लागतात ..

Pages