मायबोलीच्या दृष्यभागाचे नवीन सर्वरवर स्थलांतर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

काही मिनिटांपूर्वी मायबोलीच्या दृष्यभागाचे (Frontend) नवीन सर्वरवर स्थलांतर झाले आहे.
(मायबोलीच्या डाटाबेसचे स्थलांतर काही महिन्यांपूर्वी झाल्याचे चाणाक्ष मायबोलीकरांच्या लक्षात असेलच) Happy

मायबोली नीट दिसत नसेल तर कृपया आपल्या ब्राऊझरला ताजेतवाने करा (Refresh)

बहुतेक मायबोलीकरांना काहीच फरक जाणवणार नाही. जाणवलाच तर मायबोली जास्त वेगवान झाल्यासारखे वाटेल. नवीन SSD तंत्रज्ञान असलेल्या या सर्वरमधे काहीच फिरते भाग नाहीत. आपल्यासाठी जास्तीची जागा, नविन सुविधा आणि भविष्यातील काही योजनांसाठी नवीन तंत्रज्ञान आणि जास्तीचा वेग यातून मिळेल अशी आशा आहे.

नवीन हार्डवेअर/सॉफ्टवेअर असल्यामुळे काही अडचण आली तर कृपया याच धाग्यावर सांगा.

विषय: 
प्रकार: 

>ज्यांना हे नकोय त्यांच्या माथी मारण्यात येउ नये..
ही सोय आताही आहेच. तुम्ही ज्या ग्रूपचे सभासद आहात त्याच ग्रूपमधे नवीन काय आहे हे वाचायची सोय आहे. इतकेच नाही तर तुमच्या आवडीच्या ग्रूपमधे , तुम्ही अजून वाचायचं राहिलेलं तितकंच फक्त वाचायची सोय आहे.
>परंतु "नविन लेखन" या पानावर असलेले धाग्यांमधे ७०% धागे कविता आणि गझलेचे असल्या कारणाने मला हवे असलेले धागे इतर पानांवर नाईलाजाने शोधावे लागतात ..
का बुवा? माझ्यासाठी नवीन आणि ग्रूपमधे नवीन तुम्हाला माहिती नाही का?

या इतक्या सोयी असतांना , फक्त तुम्हाला न आवडणार्‍या ग्रूपमधे सार्वजनिक लिहायची सोय करू नका हे म्हणणे योग्य होणार नाही. कारण तुम्हाला आवडणारे ग्रूप दुसर्‍या कुणाच्या नावडीचे असू शकतील आणि त्यांनी हा सल्ला तुम्हाला दिला तर तो तुम्हाला पटणार नाही. मग अ‍ॅडमीन टीम ने कुठल्या ग्रूपला सार्वजनिक करायचे आणि कुठल्या नाही?
त्यापेक्षा वाचकांना जे ग्रूप आवडत नाहीत ते त्यांनी वाचू नये हा पर्याय जास्त व्यावहारिक ठरतो आणि ते सोपे करण्यासाठी सुविधा आधीच दिल्या आहेत.

सुंदर....मायबोली जास्त वेगवान झाल्यासारखे वाटते हे बरोबर आहे. अर्थात तांत्रिक बाबीबाबतीत असलेल्या ज्ञानाची मला काहीच माहिती नसल्याने हे गती प्रकरण मला लागलीच जाणवले नव्हते. मात्र सुधारणेबाबतचा हा लेख वाचल्यानंतर तिकडे लक्ष गेल्यावर समजले की इकडून तिकडे वा तिकडून इकडे येणे हा प्रकार चटदिशी होत आहे.

बाकी इथली या क्षेत्रातील मंडळी आपापल्या प्रतिसादातून ज्या काही सूचना करत आहेत तिकडे अ‍ॅडमिन लक्ष देईल याचीही खात्री आहे. ज्या गोष्टी करता येणार नाहीत त्याचा स्पष्ट खुलासाही लागलीच होत आहे ही देखील स्वागतार्ह बाब आहे.

<<< IE वर प्रतिसादामध्ये मराठी लिहिता येत नाहीये. प्रतिसाद देऊन , नंतर Edit comment मध्ये जाऊन परत मराठी लिहावं लागतं , हा द्राविडी प्राणायम बंद करता येईल का ? >>> मास्तर आमचा बी प्रश्न सोडवा की.

कोणत्याही धाग्यावर प्रतिसाद जेव्हा जास्त होतात तेव्हा नविन प्रतिसाद पहिल्या पानावर आणि जुने शेवटच्या पानांवर (लेटेस्ट कमेन्ट फर्स्ट) असे करता येईल का ?

<<< IE वर प्रतिसादामध्ये मराठी लिहिता येत नाहीये. प्रतिसाद देऊन , नंतर Edit comment मध्ये जाऊन परत मराठी लिहावं लागतं , हा द्राविडी प्राणायम बंद करता येईल का ? >>> मास्तर आमचा बी प्रश्न सोडवा की.

सध्यातरी नुसताच प्राणायाम करता येईल. प्रतिसाद नेहमीच्या खिडकीत टाईप न करता आधी 'प्रतिसाद तपासा' बटणावर क्लिक करायचे, आणि उघडणार्‍या खिडकीत प्रतिसाद लिहायचा, शुद्ध स्वच्छ मराठीत प्रतिसाद लिहिता येतो.

सध्यातरी नुसताच प्राणायाम करता येईल. प्रतिसाद नेहमीच्या खिडकीत टाईप न करता आधी 'प्रतिसाद तपासा' बटणावर क्लिक करायचे, आणि उघडणार्‍या खिडकीत प्रतिसाद लिहायचा, शुद्ध स्वच्छ मराठीत प्रतिसाद लिहिता येतो. >>> हायला खरचं की ! धन्यवाद मंजुडी !

अजय IE 9 वर मराठी लिहायला अडचण येतेय. पण मी हल्ली मंजुडीने सांगितलेला प्राणायाम करतोय.

गझल बरोबर राजकिय याचा देखील एक गृप बनवावा आणि त्यात धाग्यांना "सार्वजनिक" हा ऑप्शन देउ नका...

ज्यांना गझलेचे प्रेम आहे ते तो गृप जॉईन करतील........आणि ज्यांना राजकिय चर्चा करायचे असतील ते तो गृप जॉईन करतील...

ज्यांना हे नकोय त्यांच्या माथी मारण्यात येउ नये..

-----------------------------------------

मला गझल कवितेतले काहीच कळत नाही आणि मी कधीही त्या धाग्यांवर जात नाही ( जे कळतच नाही तिथे जाउन उगाच खरडत बसणे चुकिचे) परंतु "नविन लेखन" या पानावर असलेले धाग्यांमधे ७०% धागे कविता आणि गझलेचे असल्या कारणाने मला हवे असलेले धागे इतर पानांवर नाईलाजाने शोधावे लागतात ..

===+++१०००००

Pages