पुनश्च उद्योग ....

Submitted by विनार्च on 19 June, 2014 - 08:18

आजवर इतके उद्योग माझ्या लेकीने केले आहेत की ही खरं तर उसका "उद्योगपती ऑफ द डिकेड " अ‍ॅवॉर्ड तो बनता है ... Wink (नुकतीच दहा पुर्ण केलीत ना आम्ही Proud )
तर अशाह्या उद्योगांसाठी दरवेळी नविन धागे माबोवर काढून भरपूर सर्व्हर स्पेस अडवण्यापेक्षा आम्ही सुट्टीतील उद्योगांचा एकच धागा काढत आहोत....
ही उन्हाळी सुट्टी आम्ही भरपूर उनाडक्या करण्यात घालवली पण दुपारच्या वेळात घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने तो वे़ळ असा सत्कारणी लावला.....

सुरुवात करुया चित्रकलेपासून....
वारली पेंटिंग

20140615_193328.jpg20140615_193518.jpg20140615_193450.jpg

ह्या लोकांच्या बाबतीत आमच म्हणण अस आहे की "व्हेरी स्वीट पीपल.... कुण्णाच काहीही चालेलं असुदे सारखे नाचत असतात" Happy

हा आम्ही बर्‍याच दिवसांनी वॉटर कलरवर हात आजमावला....भरुन आलेलं आभाळ

20140615_192820.jpg

हे आमच आवडत कार्टुन कॅरेक्टर .. " चिप "

20140615_192701.jpg

(चिपेनडेल हे जोडनाव नसून दोन वेगवेगळ्या खारींची ही नाव आहेत अशी बहूमोल माहीती मला हे चित्र पाहूनच कळली. आता ही गोष्ट वेगळी आहे की सोबत एक तुक ही मिळाला Wink पण महत्वाच काय तर....ह्या दोन खारींमध्ये ज्याचे दात चिकटलेले अन नाक डार्क चॉकलेटी तो चिप आणि नाक रेड दातात फट तो डेल....संपल बाबा एकदाच, केवढ ते ज्ञान... आम्ही मेलं नुसत कार्टुन पहायचो Proud )

ह्याच दरम्यान आमच्याकडे माझी भाची रहायला आली. ती ह्यावर्षी चित्रकलेची दुसरी परीक्षा देतेय...तिच्या सोबत आमच्या मॅडमपण बसल्या चित्र काढायला...(हि सगळी चित्र तिने पहिल्यांदाच काढली आहेत फक्त पुस्तक वाचून)

स्मरणचित्र
20140615_192937.jpg20140615_193006.jpg

रंगवायचा आम्हाला भारी कंटाळा आला.... Happy

निसर्गचित्र
20140615_193159.jpg2013-09-17 17.46.41.jpg

संकल्पचित्र
20140615_192602.jpg20140615_193228.jpg

मुक्तहस्त चित्र
20140615_192912.jpg

ह्यात हात इतका बांधावा लागतो तरी ह्याला मुक्तहस्तचित्र का म्हणतात ,आई ?? ह्या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही देता आलेले नाही Uhoh

अक्षर लेखनाचा कन्सेप्ट भाचीला समजावे पर्यंत आमची चित्र तयार ही झाली.... Happy
20140615_193041.jpg20140615_193108_0.jpg

हे आमचं ठसेकाम... खर तर हे भेंडीच्या ठश्यांच चित्र असणार होत पण भेंडी रंगवताना रंगलेले आमचे हात मस्त आयडिया देऊन गेले ...यातल आकाश नी जमीनच ब्रशने रंगवलीय.

20140615_193135.jpg

आता आमची दुसरी आवड ... माती काम (चिकन माती ) Happy
कॅट
IMG-20140611-WA0060.jpg

डॉग
IMG-20140611-WA0055.jpg

राक्षस
IMG-20140611-WA0069.jpg

हत्ती
IMG-20140611-WA0075.jpgIMG-20140611-WA0082.jpg

बॅलेरीना (काय बाई नाव तरी..... )
IMG-20140604-WA0026.jpg

बॅलेरीना पासून गणपती न पणती (रुपांतरण Wink )
IMG-20140604-WA0032.jpg

टॉकन पक्षी (उच्चार तपासून घ्यावा )
20140611_154029.jpg
रिफर करायला हा फोटो

20140612_104905.jpg

ट्वीटी
20140611_145811.jpg

शेपूट पहा आमच
20140611_145853.jpg

इस्टर बनी
20140602_180151-002.jpg

स्नो मॅन... (पांढरा रंग संपल्याने व सप्लायरने हात वर केल्याने कलरफुल वेशात Proud )
20140613_230040.jpg

मॅलीफिसन्ट - स्लिपींग ब्युटीची व्हीलन
20140614_170109.jpg

इतक करुनही एक दुपार फारच डोक्यात गेली...तेंव्हा केलेला उपाय ... Rofl )
20140609_184242.jpg

या नंतर आम्ही भिंती रंगवण्याच काम काढल....खर तर हॉलची भिंत रंगवायची होती पण खूप बार्गेन करुन गॅलरीवर मांडवली झाली.....
20140610_183032.jpg

पर्सनल हाईट चार्ट...
20140613_194448.jpg

(काढायच्या आधी माहित नव्हत की इतक चांगल काढेल म्हणून वॉटर कलर वापरू दिले..आता हे चित्र प्रिझव्ह कसं कराव? असा प्रश्न पडलाय ...)

तर हे व असे बरेच उद्योग करुन ही सुट्टी आम्ही संपवली.... पण सुट्टी संपली म्हणजे उद्योग संपले असं नाही....
वी विल बी बॅक सुन Wink Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या पिढीचं जाऊ देच.. एकेक छान कलाकार आहेतच.. पण माबो वरचा कला हा धागा पुढेही कधीच रिकामा रहाणार नाही ह्याची खात्री झाली ही कलाकुसर पहाता Happy ! लेकीला खूप खूप शुभेच्छा Happy

जबरी! अर्चना अनन्याचे कोणत्या शब्दात कौतुक करावे हेच समजत नाहीये.:स्मित:

कलागुण उपजत असणे हेच भाग्य. माझ्या लेकीला आता हे दाखवणार आहे.

अनन्या ने हीच आवड पुढे जोपासली तर तिला फाईन आर्ट चे शिक्षण घ्यायला सान्ग. सगळीच चित्रे, पण स्पेशली चिपमन्क आणी ट्विटी खूप आवडले. वारली तर नजर लागेल असे. मातीकाम पण मस्त.

स्नोव्हाईटच्या हातात सफरचंद आहे बरं का Wink
ह्या सगळ्या कलाकृती टिकून रहातील अशा मटेरीयल मध्ये बनवण्याचा विचार चालू आहे... वापरण्यास सोपे असे कोणते मटेरीयल माहित असल्यास प्लीज सांगा.... तसेच तिला फिशटँक मधे ठेवता येतील अशा वस्तू बनवायच्या आहेत त्यासाठी काय मटेरीयल वापरावे लागेल?

वाहवा मस्त!!

मातीकाम मस्तच झालं आहे. ट्विटी मस्त आहे.

ह्या दोन खारींमध्ये ज्याचे दात चिकटलेले अन नाक डार्क चॉकलेटी तो चिप आणि नाक रेड दातात फट तो डेल>> हे मला नव्यानेच कळालं Happy

अनन्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अर्चना मी हे बघीतलेच न्हवते . त्यादिवशी भेटले तेव्हा हे माहीत न्हवते ग. खरच गुणी आणि गोड आहे लेक . आपण च सगळ्या पहिल्यांदा भेटलो त्यामुळे मुलांची माहीतीच न्हवती. Happy
तिला खूप खूप शुभेच्छा.

विनार्च टिकून राहणारे मटेरियल म्हणून पॉलीमर क्ले चा वापर करू शकतेस. त्यावर अ‍ॅक्रीलीक पेंट प्रोटेक्टर म्हणून वापरतात बहुदा... हे सध्या कसलं मटेरियल वापरलंय? तयार कलर्ड क्ले मिळते ती? पण ती रि यूझ करू शकतो ना... Happy

खरच अनन्या एक कलाकार आहे. परवा भेटले तेव्हा मोबाईलवरती कॅसिओ काय सुरेख वाजवला, तेही नुसते ऐकून आपले आपण. जन्मजात कलावंत म्हणतात तो हा !
खूप खूप मोठी हो आणि असे भरपूर उद्योग करत रहा बायो Happy

Pages