"सीरिया" प्रश्न

Submitted by उदयन.. on 1 September, 2013 - 04:31

सीरिया छोटासा देश.. दक्षिण - पश्चिम आशिया खंडाचा एक भाग... एका बाजुला समुद्र तर बाकिच्या बाजुंनी रशिया, इस्त्राईल, जॉर्डन, इराक, तुर्की..यांनी विढलेला आहे...म्हणजेच..चोहीबाजुंनी खदखदणार्या भुभागांमधे मधे सँडविच झालेला देश..आधी हा देश फ्रांस च्या ताब्यात होता... १९४६ साली स्वतंत्र झाला आणि नंतर बशर अल हसन यांच्या नेतृत्वाखाली. आला.. परंतु .....देशाची वाटचाल यथातथाच आहे...
मुख्य उत्पादन स्त्रोत तेल.. त्यामुळे देशाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले.. देशाचे ९०% लोक मुस्लिम सामुदायाचे आहेत......

ही झाली या देशाची थोड्क्यात माहीती..:)

SYRIA.jpg

वर दिलेल्या नकाशा मधे सीरीयाची भौगोलिक स्थिती कळुन येईल..सीरीया च्या खालच्या बाजुला "इस्त्राईल" नावाचा देश आहे.. या देशाशी सीमारेषेवरुन युध्द सुध्दा झालेले आहे....
मुख्य म्हणजे ...इराक, इराण आणि इस्त्राईल यांच्या बरोबर मधे.......सीरिया देश आहे.. हाच एक महत्वाचा मुद्दा आहे..
अल बशर च्या नेतृत्वाखाली असणार्या सरकार ने देशाची परिस्थिती प्रचंड खराब झाली.. १९६३ पासुनच इथे आपातकाल लागु केले आहे... अश्या मुळे काही विशिष्ठ लोकांच्या हातातच सरकार आहे... तेव्हापासुनच सीरिया मधे गृहयुध्द पेटण्यास सुरुवात झाली...

आता काही महिन्यांपुर्वी सैन्याने उठाव करुन...लष्करशाही स्थापन केली..आणि अल बशर ला बाजुला सारले...
यामुळे गृहयुध्द मोठ्याप्रमाणात देशात पसरले गेले.. अल बशर चे समर्थक आणि सैन्य यांच्यात युध्द पेटले गेले..
हजारो माणसे ठार होत आहेत.. अशातच ..."रशिया" ने आपले लढाउ विमाने "सिरिया" देण्याचा करार जो आधी केला होता....तो कायम ठेवुन विमाने देण्यात आली... याचा आंतराष्ट्रीय पातळीवर विरोध झाला..कारण सैन्य त्याचा वापर आपल्याच देशाच्या नागरीकांवर करणार होते...परंतु..."एडवन स्नोडेन" या प्रकरणामुळे रशिया अमेरिकेच्या विरोधात उभी राहिली...

"एडवन स्नोडेन" हे प्रकरण होते छोटेसे.. परंतु ते संपुर्ण जगावर प्रभाव पाडणारे ठरले.. घडामोडी अत्यंत वेगवान घडु लागल्या.. स्नोडेन ने अमेरिका इतर देशांच्या दुतवासांवर आणि त्यांच्या महत्वाच्या कामावर गुप्तपणे पाळत ठेवुन आहे.. आणि इतरदेशांच्या फार महत्वाची माहीती ही अमेरिकेला माहीत झाली आहे.. या गौप्यस्फोटामुळे.. अमेरिकेवरचा विश्वास त्याच्या मित्रदेशांमधे सुध्दा कमी होउ लागला... विरोधक तर आधीपासुनच दुर होते आता मैत्रदेश दुध्दा अविश्वास दाखवु लागले... यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेची नाचक्की होउ लागली... त्यातच ज्याने ही माहीती फोडली "एडवन स्नोडेन" हा देशाबाहेर पळला......अमेरिकेच्या दबावामुळे इतर देशांनी त्याला शरण दिली नाही परंतु....."रशियाने" ही संधी घेतली...आणि आपल्या देशात त्याला अधिकृत राजकिय शरण दिली.. काही अटी त्यावर लावलेल्या होत्या.. पण त्या..आंतरराष्ट्रीय पातळीवर मित्रत्वाचा मुखवटा कायम राहावा या करिताच होत्या या आता स्पष्ट झाले....

आता यामुळे अमेरिका ..रशियावर नाराज झाली..म्हणुन "युनो" मधे रशियाला "सीरिया" ला लढाउ विमाने न देण्याकरिता दबाव आणायला सुरुवात केला.
कारण काहीही असो... मुख्य हेतु रशियाला विरोध. हाच आहे... परंतु रशियाने सर्व विरोध धुडकावुन सिरियाला आपली विमाने देउ केली..

अश्या परिस्थितीत... एक बातमी प्रसिध्द झाली की सिरिया मधे रासायनिक हल्ला सैन्यातर्फे केला गेला...
१५०० च्यावर लोक मृत्युमुखी पडलीत आणि हजारो जण जखमी झालेत.. याने एक स्पष्ट झाले की सिरिया कडे रासायनिक हत्यार आहेत... जर सिरिया कडे आहेत याचा अर्थ त्याच्या मित्रराष्ट्रांकडे देखील आहेत ..जसे की इराण, सारखे देश.... या बातमी मुळे अमेरिकेला यात तोंड खुपसायला मदत मिळाली ... तातडीने युनो ने आपले अधिकारी मंडळ सिरिया मधे पाठवले...( जसे की इराक आणि इराण मधे पाठवले गेलेले) तपासणी चालु आहे...

त्यांचा अहवाल यायच्या अधिच अमेरिके ने युध्द जाहीर केले.. फ्रांस इंग्लंड जर्मनी इस्त्राईल यांनी पाठिंबा दिला ( इंग्लंड च्या संसदेने युध्दाचा प्रस्ताव फेटाळुन लावल्यामुळे इंग्लंड ने माघार घेतली) पण दुसर्याबाजुने रशिया, चीन, इराण ऑस्ट्रेलिया यांनी विरोध केला .....

आता युध्द जाहिर झाल्यावर सिरियाने देखील जाहीर केले की आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही इस्त्राईल वर हमला करु ( हमला करणार अमेरिका...पण प्रतियुत्तर देणार इस्त्राईल ला ) इस्त्राईल ने देखील तेच उत्तर दिले...अमच्यावर हल्ला झाला तर आम्ही प्रतियुत्तर देणार मग तो कोणताही देश का असेना.. (याचाच अर्थ इराण आणि पॅलेस्टिनिअन देश होउ शकतो) रशियाने देखिल जाहीर केले... युध्दात सिरियाला मदत करणार..

या प्रमाणे ध्रुवीकरण होण्यास सुरुवात झाली आहे... अमेरिकेच्या "स्नोडेन पॉलिसी" मुळे अनेक देशांची मन दुखावली आहे.. पण जाहिर रित्या अमेरिकेच्या विरोधात जाणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही... असे देश छुप्यामार्गाने रशियाला पाठिंबा देउ शकतात...

रशिया आणि अमेरिका या दोघांमधे भारताचे मात्र "सँडविच" होणार आहे...त्याला नाईलाज आहे.. आपण उघड पणे अमेरिकेला विरोध करु शकत नाही कारण आपली आर्थिक नाड्या त्याच्या हातात आहे... तसेच रशियाला देखिल विरोध करु शकत नाही... आपल्या लष्करी नाड्या त्यांच्या हातात आहे.. रशिया हा एकमेव देश आहे ज्याने आपल्याला शस्त्रास्त्रे देताना त्याच्या टेक्निकल बाबी सुध्दा दिल्यात.. त्यामुळेच आपल्याला परत त्यावर अवलंबुन राहावे लागले नाही...

भारताने बाजु घेउच नये कुणाची ही...कारण आपण उगाच पुढे पुढे केले तर आपल्यावर बाजु घेण्यास दबाव वाढला जाईल...मुख्यतः चीन कोणत्याबाजुला किती सक्रिय पाठिंबा देतोय यावर आपले अवलंबुन आहे... कारण युध्द दुसर्याच्या भुमीवर करणे एक बाजुला आणि युध्द स्वतःच्या भुमीवर करने एका बाजुला .. अमेरिकाची आर्थिक बाजु शाबुत आहे ती याच कारणामुळे पहिल्या महायुध्दापासुन ते आज पर्यंत एकही युध्द त्यांच्या भुमीवर झाले नाही... जी काही युध्द होतात ती त्यांच्या हॉलिवुड चित्रपटाच्या भुमीवरच होतात Wink

आता प्रोब्लेम असा झाला आहे.. काही गोष्टी स्पष्ट झाल्यात ज्या मारक ठरत आहे

१) रशिया आणि अमेरिका "स्नोडेन प्रकरण" आणि "सिरिया प्रकरण" यांच्यामुळे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहे
२) जगात अणुबाँब या हुन अतिघातक रासायनिक आणि जैविक हत्यारे अस्तित्वात आहेत.. आणि ती युध्दखोर देशांकडे मुबलक आहे... ज्यांचा वापर कोणत्याही देशाच्या विरुध्द करण्यास तयार आहेत.. (इस्त्राईल सरकार ने आपल्या नागरिकंना "गॅस मास्क" घेण्यास सुचना दिली आहे..यावरुनच परिस्थिती समजुन येते)
३) युध्द जर झालेच तर त्याचा जगावर परिणाम होईल... बाजुलाच कुवेत, सौदी अरेबिया, सारखे खनिज तेल उत्पादक देश आहे.. त्यामुळे त्यांच्या उत्पादनावर प्रचंड परिणाम होतील.. आधिच सर्व देशात आर्थिक मंदी चालु आहे ..त्यात याची भर.... भारतासारख्या विकसनशील देशात याचे जास्त परिणाम दिसुन येतील..
४) इंग्लंड जरी प्रत्यक्ष युध्दात उतरणार नाही पण पडद्यामागे सुत्र तर हलवणारच .

या वरिल चार बाबी तर आताच स्पष्ट झाल्या आहेत.. काही दिवसांमधे युनो चा अहवाल येईल.. आता अहवाल काहीही का असेना... हल्ला होणार हे स्पष्टच आहे... ( कारण अमेरिकेच्या मनात एकच भिती... हे रासायनिक व जैविक हत्यारे आपल्याविरुध्द वापरलीत तर ? )

अमेरिका कितीही बोलली कि हल्ले हे मर्यादित स्वरुपाचे असतील. तरी जगाला माहीत आहे की त्यांच्या हल्ल्यांना मर्यादा नावाची गोष्ट माहीत नाही..
सिरिया विरुध्द आघाडी उघडण्याचे अजुन एक कारण दिसुन येते की इराक आणि अफगाणिस्तान यातुन या वर्षअखेरीस सैन्य मागे बोलवणार आहे.. त्यामुळे इराक आणि अफगाणिस्तान मधिल असणारे तालिबान आणि इतर कट्टरपंथिय यांना मोकळीक मिळणार आहे.. सिरियात चालु असणार्या गृहयुध्दाचा फायदा हे लोक नक्कीच घेतील.. आणि या लोकांनी सिरिया मधे प्रवेश मिळवणे ही इस्त्राईल आणि तुर्कस्तान या अमेरिकन धार्जिन देशांना निश्चितच धोक्याची घंटा आहे...

यावर थोडाफार उपाय म्हणुन सुध्दा एक अमेरिका आणि इस्त्राईल ची ही खेळी असु शकते..
सिरियात असे काहीही महत्वाची बाब नाही आहे जी अमेरिकेला अत्यंत आवश्यक अथ्वा महत्वाची आहे.. उदा. इराक इराण सारख्या देशांमधे तेलाचे अगणित साठे... या कुवेत ला संरक्षण या नावाखाली इराक वर हल्ला...
अशी कोणतीच गोष्ट दिसुन येत नाही....
राहिला इस्त्राईल चा प्रश्न ... तो देश स्वतःच एक प्रश्न आहे दुसर्यांसाठी...वेळ पडल्यास तो एकटाच सिरिया , इराण पॅलेस्टिनी या देशांबरोबर लढु शकतो...त्यामुळे त्याला सरंक्षण देण्याची गोष्ट म्हणजे हास्यास्पद वाटेल...

ही तर जर तर ची भाषा आहे... कारण चुकुन युध्द पेटले.. आणि त्यात चीन सामिल झाला.. जागतिक स्तरावर प्रचंड मंदी आहे..आणि हीच वेळ योग्य आहे जगावर प्रभुत्व मिळवण्याची...चीन मधे मंदी आहे परंतु संपुर्ण जगाच्या स्वरुपात ती अल्प ठरेल.. अश्यावेळी चीन ला पुढाकार मिळाला तर वेगळे वाटणार नाही

पहिल्या जागतिक युध्दानंतर जगात आर्थिक मंदी १९२९ ते ३९ पर्यंत आली त्यानंतर लगेच दुसरे जागतिक युध्द सुरु झाले जे १९४५ ला संपले... युध्द संपल्यानंतर आर्थिक मंदीतुन अमेरिका आणि रशिया दोघेही सावरले गेले.. परंतु अमेरिकाचे आर्थिक वर्चस्व जगावर प्रस्थापित झाले....... रशियाचे काय बिनसले देवाला माहिती.. पण त्यांची संधी हुकली गेली..

भारतावर याचा प्रतिकुल परिणाम होणार हे जगजाहीर आहे... भारताचे परराष्ट्रीय धोरण कधीच स्पष्ट आणि ठाम राहु शकले नाही... इंदिरागांधी नंतर आपले परराष्ट्रीय धोरण हे रशिया व नंतर अमेरिका च्या धोरणांवर अवलंबुन राहिले .. आपण साधे "श्रीलंका" बरोबर काय धोरण ठेवावे हे अजुन ही ठरवु शकलो नाही.. १९८० पासुन बर्याच पक्षांची सरकारे आलीत. परंतु सगळ्याचीच धोरणे एकसारखीच होती..

अश्यावेळी भारताचे सिरिया आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी बद्दल चे धोरण लेचेपेचे ठरले कदाचित तर त्याचे दिर्घकालिन परिणाम भारताला भोगावे लागणार आहे..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल आमच्या इथे वॉर नको म्हणून डेमॉस्ट्रेशन्स होती. बजेट कट म्हणून एकीकडे हेड स्टार्ट प्रोग्रॅम मधे कपात चाललेय अणि वॉर साठी पैसे कुठून आणणार आहेत?

१ शनिवारी युनोच पथक सिरीयातुन बाहेर पडलय. ते शेजारच्या लेबनान मधे गेले आहेत. पहील्या दिवशी या पथकावरपण गोळीबार केला गेलाय. त्यांचा अहवाल यायला काही आठवडे लागतील.
२ जर्मनीने पण मिलिटरी हल्ल्यात सहभाग घेणार नसल्याच सांगितले आहे.
३ ब्रिटनप्रमाणे ओबामानी पण कॉग्रेसची परवानगी घेण्याच ठरवल आहे. त्याला अजुन येक आठवडा तरी लागेल अस दिसतय, कारण अमेरीकन काँग्रेसची बैठक पुढच्या आठवड्यात आहे.
मी तरी सिरीयाने ईस्रायलवर हल्ला करु अस कुठल्याही न्युज वर ऐकल नाहीये. तरी ईस्त्रायलने बंदोबस्त केलाय.

वरच्या माहितीत बरीच गल्लत आहे. स्नोडेन प्रकरण आणि अमेरिका-रशिया ह्यांचे सिरीयाबाबतचे धोरण तसेच त्यामुळे अमिरेकेने युद्धात उतरणे/रशियाने विरोध करणे झाले नाहिये.

सिरीयाच्या गृहयुद्धाची पाळे-मुळे बरीच जुनी मुख्यतः शिया-सुन्नी वादात आहेत तसेच सिरीयन साम्राज्याची पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या तुकड्यात आहेत. सिरीयात लष्करशाही नसून बशर अल असद ह्यांची दमास्कस व बहुतेक सिरीयावर सत्ता अजूनही पक्की आहे. लष्कर असदच्या बाथ पार्टीच्या (हो तीच जी सद्दामची होती, वा तिची बहीण पार्टी म्हणा) नेतृत्वाखाली आहे. बशर विरोधी 'सिरीयन रेबेल्स' (सिरीयान फ्री आर्मी वगैरे) ही मुख्यत: लष्करातून फुटलेल्या सुन्नी मुसलमान अधिकारी/रिकृटांनी व सामान्य नागरिकांनी भरलेली आहे.

जी सर्व सुन्नी मुस्लिम राष्ट्रे (मुख्यतः ह्या राष्ट्रातले नागरीक) अमेरिकेला आपला शत्रु नं १ म्हणतात तेच आज अमेरिका सिरियावर कधी हल्ला करते ह्याकडे डोळे लावून बसलेत. इस्रायल जो अमेरिकेचा नं१ च्या मित्र देश, तो अमेरिकेने हल्ला करू नये म्हणुन बहुतेक छुपी डिप्लोमसी आत्ता युद्धपातळीवर करत असेल. बहुसंख्य माध्यमे (टीव्ही, वर्तमानपत्रे) वगैरे असद विरोधी लाइन पकडून गेले वर्षभर चालत आहेत. पण ही माहिती नक्कीच अर्धवट आहे. सिरीयन रेबेल्स काही खूप नैतिक, सहृदय, स्वातंत्र्यसेनानी आहेत अश्यातला भाग नाहिये.

लिबिया नंतर सिरियन रेबेल्सना वाटले की त्याच तत्परतेने आपल्यालाही मदत मिळून क्रांति यशस्वी होईल. इथे सद्य राजकारणाचा प्रभाव पडलेला आहे. दोन-तीन दिवसामागे आलेले हरदीप सिंग ह्यांचा इन्डियन एक्स्प्रेसमधील मधील लेख: http://www.indianexpress.com/news/nowin-in-syria/1161972/

अधिक विस्तृत माहितीसाठी एशिया टाइम्स नेहेमीप्रमाणे उत्तमः http://www.atimes.com/

सिरीयाच्या गृहयुद्धाची पाळे-मुळे बरीच जुनी मुख्यतः शिया-सुन्नी वादात आहेत तसेच सिरीयन साम्राज्याची पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या तुकड्यात आहेत. >>> सिरियाच्या गृहयुध्दाचा संबंध वेगळा आहे... आणि अमेरिका - रशिया युध्दात उतरण्याचा संबंध वेगळा आहे... यात सरमिसळ नाही आहे...

अजुन क्रमशः आहे... वेळ मिळत नाही ... थोडा थोडा लिहित आहे...

इथल्या सिरियासंबधीच्या अनेक वाद विवादात कुठेहि स्नोडेन चे नाव आले नाही.

इथले मुख्य प्रश्न :

सर्व जगाचे आपण बाप आहोत, कुठेहि काही खुट्ट झाले तरी त्यात अमेरिकेने नाक खुपसलेच पाहिजे असे कित्येकांना वाटते.

ओबामा ने गतवर्षी रासायनिक शस्त्रात्रांचा वापर ही लक्ष्मण रेषा समजू असे म्हंटले होते. आता आसादने उघड उघड आव्हान दिले आहे. आता हल्ला केला नाही तर ओबामाची इज्जत नि पर्यायाने डेमोक्रॅटिक पक्षाची नि अमेरिकेची इज्जत काय राहिली? एकदम फालुदा? आधीच गेल्या दहा वर्षात अमेरिकेने त्या भागात जे घोळ घातले त्यामुळे तिथल्या देशांचा अमेरिकेवरील विश्वास उडाला आहे. असे स्नोडेन प्रकरण होण्या आधीच अमेरिकनांना कळले आहे.

काही लोकांच्या मते हा प्रश्न मानवतावादाचा आहे. इतके लोक मरत असताना आपण स्वस्थ कसे बसायचे?

काही जणांच्या मते आपल्याला काय करायचे आहे सिरियाशी? आपण काही तिथून तेल घेत नाही.

बरेच लोक म्हणतात इराक नि अफगाणीस्तानात गेल्यामुळे आपल्या देशाचे जे हाल झाले तसे आणखी का करून घ्या?

नि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांपैकी कुणाचीहि तिथे जायची इच्छा नाही. पूर्वी ब्रिटन तरी होते. आता तेहि नाही.

समजा जरी काँग्रेसने ओबामाला परवानगी दिली तरी पुढे काय? फक्त ड्रोन नि विमानांनी हल्ले करून काम होईल का? होईलच याबद्दल दुमत नाही, पण नाही जमले तर पुनः अमेरिकन लोकांनी तिथे जाऊन मरायचे?

नि ती रासायनिक शस्त्रात्रे नष्ट करायची तर आधी शोधली पाहिजेत. नि तिथली नष्ट केली तरी इराण मधे असतील तर? आणि नंतर?

आसाद गेल्यावर जो कुणि तिथे येईल तो तरी आसादहून भयंकर नसेल याची काय शाश्वति? मुबारक गेल्यावर इजिप्त मधे म्हणे काही दिवस लोकशाही सरकार होते! आता काय? लोक मरतातच आहेत!!

पुनः इराक नि अफगाणीस्तान प्रमाणे तिथे लोकशाही(??!!) स्थापन करायला अमेरिकेची पुरती वाट लावायची का?

मुख्य मुद्दा हा आहे की असाद हा एक क्रूरकर्मा, हुकुमशहा आहे पण त्याला विरोध करणारे जास्त क्रूर, जास्त कडवे धर्मांध असले तर ते तीच रासायनिक अस्त्रे अन्य देशांवर झाडतील आणि परिस्थिती आहे त्यापेक्षा वाईट होईल. सद्दाम गेल्यावर हेच झाले. तो क्रूर होता पण त्या देशापुरता. कुवेतचा अपवाद सोडल्यास.
असाद हा अलावी पंथाचा आहे. त्याला शिया लोकांचा आणि अन्य अल्पसंख्यांकांचा पाठिंबा आहे.

अमेरिका हस्तक्षेप करते तेव्हा आपले उद्दिष्ट काय आहे, आपल्याला काय हवे आहे ह्याचा विचार न करता युद्धात उतरते असा इतिहास आहे. बहुधा शस्त्रास्त्रे पुरवणारी लॉबी ह्यामागे असावे. युद्धे चालू राहिली तर शस्त्र व अन्य तंत्रज्ञान विक्री बिनबोभाट चालू रहाते. नाही तर काय करणारे ते? त्यामुळे घाईघाईने, आततायीपणा करून, अपुरे पुरावे पुढे करुन, सोयिस्कर पुरावे पुढे करुन अमेरिकन लोकांना पटवायचे. सुरवातीला म्हणायचे की फक्त दोन तीन दिवस, वा आठवडे युद्ध चालेल आणि प्रत्यक्षात अनेक वर्षे ते चालू ठेवायचे. व्हिएटनाम, इराक, अफगाणिस्तान आणि आता सिरिया.

नोबेलचे शांतता पारितोषिक मिळालेल्या राष्ट्राध्यक्षाने थोडी जनाची वा मनाची लाज बाळगून ह्या घातक पायंड्याला आळा घालायला हवा होता पण तसे होताना दिसत नाही आहे.

शेंडेनक्षत्र.
तुमच्याशी सहमत. या लॉबीवाल्यांना राष्ट्राध्यक्षांच्या लाजेशी काही देणे घेणे नाही. नि या राष्ट्राध्यक्षात त्यांच्या विरुद्ध किंवा कुणाच्याहि विरुद्ध जाण्याची हिंमत नाही. हा अगदीच गांधीबाबा आहे. कुठेहि खंबीरपणा नाही. नुसतीच मोठमोठी भाषणे.

मी वर जे प्रश्न लिहीले ते, ज्यांचा निर्णय घेण्यात काहीहि हात नाही अश्या विद्वानांचे (?) आहेत. सेवानिवृत्त झालेले मुन्शिपल्टीचे कारकून जसे पर्वतीच्या पायथ्याशी बसून जगातल्या राजकारणावर बौद्धिक नि विचारप्रवर्तक (?) चर्चा करतात तसे.

निर्णय कदाचित आधीच घेतल्या गेला आहे - जसे इराकच्या बाबतीत. मग खोटे पुरावे यूनोत दा़खवून जगाला बनवले तसे काहीतरी समर्थन मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे.

कुठेहि खंबीरपणा नाही. नुसतीच मोठमोठी भाषणे. >>> सध्या हेच चालले आहे हे खरं आहे पण ते स्वभाव म्हणून नसावं, तर वैयक्तिक धोरण म्हणून असणार. नोबेल मिळालं. सेकंड टर्म मिळाली. त्यातलं दुसरं वर्षदेखील संपत आलं. सेकंड टर्मसाठी गरज होती म्हणून 'ओसामा मिशन' धडाडीनी पार पाडलं. आता देशापुढे काहीच सिद्ध करायचं नाहीये. सध्याचं एकच ध्येय - पुढची दोन वर्ष कशी बशी ढकलायची. म्हणूनच हा गुळमुळीतपणा चालला असावा असा माझा अंदाज.

वा उदयन, छान लिहिलेत आणि बाकीच्यांच्या प्रतिक्रियापण माहितीपूर्ण आहेत, सखोल वाचायला आवडेल अजून.

स्नोडेन प्रकरण, सिरीया आणि रशियाचे विमान प्रकरण व अमेरिकेसोबतचा वाद एकत्र सांगड घालणारा कदाचित आंतरजालावर हा पहिलाच लेख असेल. आंतरराष्ट्रीय राजकारण इतके उथळ असेल असे वाटत नाही.

बातमी मुळे अमेरिकेला यात तोंड खुपसायला मदत मिळाली ... तातडीने युनो ने आपले अधिकारी मंडळ सइंट्रे मधे पाठवले...( जसे की इराक आणि इराण मधे पाठवले गेलेले) तपासणी चालु आहे. >> अजून एक इंट्रेस्टिंग माहिती. ही नुसती बातमी नाही. ते खरे आहे. १५०० लोक मेले आहेत. यु ट्यूब वर व्हिडिओ बघायला मीळतील. त्यामुळेच युनो ने मंडळ पाठवले ते वापसही आले आणि तीन आठवड्यात अहवाल सादर करणार आहेत.

मला वाटतं उदयन तू सिरिया प्रकरणाची पूर्ण माहिती करून घेऊन मग लिहावेस. प्रस्तूत लेखातील माहिती आणि वस्तूस्थिती ह्यात खूप तफावत आहे.

ही स्ट्राईक ( युद्ध नव्हे) झालीच तर ह्युमॅनिटेरियन ग्राउंडस वर असणार आहे. तीन दिवसांपूर्वीच ओबामाने नो बुट्स ऑन सिरियन ग्राउंड असे सांगीतले देखील आहे.

कालचे त्याचे भाषण ऐक (उदयन) म्हणजे अमेरिका तोंड खूपसतेय की काय करतेय ते कळेल. इराक युद्धासारखे हे युद्ध नाही.

सध्या रशीया आणि चायना हे दोन्ही देश युद्धविरोधी आहेत. आणि खुद्द अमेरिकेत देखील चर्चा चालू आहेत. आणि अरब लिग (इजिप्त सोडून) हल्ला करा असे सांगत आहे. ( The league called for the "international community represented by the (United Nations) Security Council to assume its responsibility and take all the deterrent and needed measures against this crime and all crimes of genocide" in Syria, Arab League Secretary General Nabil el-Araby said in a Twitter post )

त्यामुळे स्नोडेन, रशीया इ इ मुळे जसे वर लिहिले आहे तसे हे प्रकरण नाही.

मित्र कोण आणि शत्रू कोण हे नीट कळल्याशिवाय युद्ध करणे कितपत योग्य आहे? एखाद्या देशावर डझनभर मिसाईल्स सोडणे हे युद्धाइतकेच घातक, खर्चिक आहे.

समजा ह्या मिसाईलफेकीमुळे निर्णायक काहीतरी घडले, असाद मेला तर त्या देशात यादवी माजेल. तमाम अल्पसंख्यांकांची कत्तल होईल आणि इस्लामिक ब्रदरहूड छापाचे कुणीतरी डोकेफिरू सत्तेवर येण्याची शक्यता आहे. इजिप्तमधे हेच झाले. मग पुढे काय करणार?

रासायनिक अस्त्रांविरुद्ध इतका गाजावाजा होतो पण अमेरिका हजारो मैलावरून ड्रोन पाठवून लोक मारते त्याचे काय? कित्येकदा हेरखात्याची माहिती चुकीची असते आणि अनेक निरपराध लोक ड्रोनकरवी मारले जातात आणि त्याकरता फारतर माफी मागितली जाते आणि पुन्हा नवे हल्ले होतात. ड्रोन हे रासायनिक अस्त्रांइतकेच विध्वंसक आणि वादग्रस्त आहेत पण त्याकरता अमेरिकेला कुणी काही बोलत नाही. हा दुटप्पीपणा का?
असाद आपल्या विरोधकांची गळचेपी करतो. मग अमेरिकेने ग्वांटानामो बे मधे हजारो लोक अनेक वर्षे कुठल्याही न्याय प्रक्रियेविना, पुराव्याविना डांबून ठेवले आहेत. वेळोवेळी त्यांचे हाल केले जातात. त्याचे काय?
खरोखर अमेरिकेला असादविषयी काही करण्याचा अधिकार आहे का?

शस्त्रांच्या कंपन्या चालवणासाठी युद्ध करणे गरजेचे आहे, हे कारण आहे का? अमेरिका किती वर्ष युद्ध न करता राहिलाय, हे एकदा बघायलाच हवं. Sad

कालचे त्याचे भाषण ऐक (उदयन) म्हणजे अमेरिका तोंड खूपसतेय की काय करतेय ते कळेल. इराक युद्धासारखे हे युद्ध नाही. >>>>

केदार...अमेरिकेचा इतिहास साक्ष आहे...त्यांचे युध्द कसे असते...स्वतःची भुमी वाचवुन इतरांच्य भुमीवर जास्तित्जास्त कसे युध्द चालेल..याची काळजी जास्त घेतात.. ते अश्याच देशांची निवड करतात जे अमेरिकेच्या भुमीवर प्रतियुत्तर देउ शकत नाही....

उदयन +१.

आता तर ते रासायनिक शस्त्रे खरी का खोटी ही सुद्धा शंकाच आहे. युद्धाला कारण म्हणुन त्यांनीच केले असेलही. Sad

माझातर अमेरिकेवर विश्वास उरला नाही. ते स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करु शकतात.

<<<<ते अश्याच देशांची निवड करतात जे अमेरिकेच्या भुमीवर प्रतियुत्तर देउ शकत नाही..>>>>>>>> दुर्दैव ... पण बर्‍याचदा काळ उत्तर देतो. :|

गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय राजकारणात हा अलिखित (कदाचित अधिकृतही असेल, जीनीव्हा कन्व्हेन्शन वगैरे) नियम झालेला आहे की रासायनिक अस्त्रे वापरायची नाहीत. असाद ने तो तोडल्यावर खरे म्हणजे युनोनेच थोडी अर्जन्सी दाखवायची गरज होती. पण ते आरामशीर लोक आहेत. सीरियात जाऊन पोहोचल्यावर सुद्धा मागच्या शनिवारपर्यंत पाहणी करायची परवानगीच मागितलेली नव्हती त्यांनी. आता एकदा नमुने गोळा केल्यावर तीन आठवडे लागले तर ठीक आहे, कारण तोपर्यंत डिप्लोमसी वाले पर्याय शोधता येतील.

रशिया व चीन हे त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधांमुळे गप्प आहेत.

स्नोडेन मुळे रशियाला राग वगैरे आला असेल तर त्यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही. चीन तर त्याहून. अमेरिका, ब्रिटन हे लोकशाही देश आहेत. तेथे असले प्रकार उघडकीला तरी येतात, चर्चा होते, सरकारला जाब विचारला जातो. रशिया, चीन सुद्धा हे नक्कीच करतात, पण तेथे कोणाला पत्ता लागणे शक्यच नसते. याबाबतीत कोणताच देश सोवळा नाही. त्यातल्या त्यात लोकशाही देशांमधे यावर उपाय तरी केला जाईल.

आणखी एक मुद्दा म्हणजे सीरियाचे तेलः जगाच्या मार्केट मधे सीरियाचा वाटा नगण्य आहे. त्यामुळे अमेरिकेला तसला काही इंटरेस्ट नसेल तेथे.

फारेंड/केदारः रासायनिक अस्त्रांचे ट्रेसेस शोधण्याची प्रक्रिया आता खूप विकसित झाल्याने जर युनोच्या मंडळाला हवे तिथे जाण्याची मुभा मिळाली असेल तर रासायनिक हल्ला खरेच झाला होता का नाही ते कळून येईल. पण तो हल्ला कुणी केला हे शोधण्याची जबाबदारी ह्या मंडळाची आहे का? माझ्या वाचनात आलेल्या माहितीनुसार 'नाहीये'. गेल्या काही महिन्यातले सामान्य नागरिकांवरील हल्ले हे फ्री सिरीयन आर्मीनेच घडवून आणले असावेत असाही कयास काही पत्रकार/तज्ज्ञ करत आहेत.
मुळात लिबियामध्ये जी झटकन आंतरराष्ट्रीय कारवाई झाली तशी सिरीयात झाली नाही. अमेरिका व नाटो सिरीयन फ्री आर्मीला जड शस्त्रास्त्रे पुरवत नाहियेत. रशिया सिरीयाला (आसदला) शस्त्रास्त्रे विमाने पुरवत आहे. ह्या पार्श्वभुमीवर अमेरिकेला हल्ला करण्यास मजबूर करण्याशिवाय सिरीयन फ्री आर्मीला दुसरा पर्याय नाहिये. ओबामानेच स्वतः 'रासायनिक हल्ल्याची' सीमारेखा आखून ती जगजाहीर केली होती.
सिरीयन फ्री आर्मीचा पाडाव होत असताना असाद रासायनिक हल्ले करेल हे मला तरी अशक्य वाटते. अर्थात हे सर्व तर्क/जर-तरच्या गोष्टी आहेत.

टण्या तो मुद्दा योग्य आहे. मलाही फारशी माहिती नाही. पण जर असादने स्वतः केले नसते तर युनोला पाहू द्यायला एवढी खळखळ केली नसती आधी.

चांगला धागा काढलास. सध्यातरी सर्व जगा, थांबा आणि वाट बघा या भुमिकेत दिसतेय. आपल्यालाही तेच करावे लागेल. नाहीतरी काही करण्याबाबत आपली ख्याती नाहीच.

थांबलेले आहे तेच बरोबर आहे..

किमान आपल्याइथल्या निवडणुका झाल्यानंतर ज्या घडामोडी घडायच्या आहेत त्या घडाव्यात.... आणि जर परत त्रिशंकु सरकार आपल्याअ इथे आले (शंका जास्तच आहे येण्याची) तर मग आपण कोणताही ठाम निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नसणार...

तीन आठवडे रवंथ झाल्यावर युनोच्या लोकांनी घोषित केले की रासायनिक अस्त्रे वापरली गेली होती. कोणी वापरली होती? काय माहीत नाही बुवा - ते शोधायचे काम या पथकाचे नव्हते. म्हणजे तीन आठवड्यांपूर्वी हे पथक तिकडे गेले तेव्हा त्यांचे ध्येय फक्त तशी अस्त्रे वापरली गेली होती की नाही ते पाहायचे होते. म्हणजे सुरूवातीपासूनच युनो ला ज्या गोष्टीबद्दल शंका नव्हती, ती सिद्ध करायला गेले होते.

मग पुतिन साहेब कशाच्या जोरावर म्हणत होते की हा रिपोर्ट येइपर्यंत थांबा? भारीच ऑनेस्ट, लोकशाहीवादी आणि जागतिक नियम पाळणारा माणूस. काय खेचलीये ओबामाची न्यू यॉर्क टाईम्स मधे. तरी लोक म्हणत होते ओबामाला की रशियातील अशा एखाद्या फ्री पेपर मधे किंवा चीनमधे जे संपूर्ण स्वातंत्र्य असलेले पेपर्स आहेत त्यात स्वतःची भूमिका मांड. काय? असे काही आस्तित्वातच नाही म्हणता? तीही अमेरिकेचीच चाल असावी. असादने अस्त्रे वापरली नाहीत, बंडखोरांनी वापरली. म्हणजे बंडखोरांकडे आहेत, पण अमेरिकेच्या आग्रहामुळे बंडखोरांकडे तशी अस्त्रे असूनही असाद त्याच्या स्वतःकडे नसलेली रासायनिक अस्त्रे युनोकडे द्यायला तयार आहे. पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत. जमल्यास. त्याच्याकडे नसलेल्या अस्त्रांचा कॅटेलॉग युनोकडे तयार असणार, त्यामुळे एकदम फूलप्रूफ योजना आहे.

अनेक प्राचीन वाद सोडवायला जगातील अनेक देश युनोपुढे आता रांग लावून उभे असतील.

इथुन सिरीयातुनच इराककडे वळले नसतील ? सीरीयावर ताबा मिळाला नाही मग इराक कडे जिथे अमेरिकन सैन्य माघार घेत आहे आणि प्रबळ सरकार अजुन स्थापन झालेले नाही अश्या योग्यवेळेस डाव साधला तर नसेल ?

इराक/ सिरीया मधिल परिस्थिती गम्भिर आहे... क्रूर प्रकारे माणसाना मारत आहेत Sad त्यान्च्या तावडी मधुन सुटलेल्या भारतीय माणसाचे मत रेडिफ वर प्रसिद्ध झाले आहे. व्हिडीओ पण धक्कादायक आहेत.
अगदी लहान लहान मुले हाता मधे गन घेतलेले आणि लढायला सज्ज असे चित्र दिसत आहे.

बुश प्रशासनाने रिपब्लिकन गार्ड बरखास्त केले ते चुकीचे होते असे वरकरणी दिसत आहे, पण सद्दामच्या काळातही सुन्नी लोकच प्रभावी होते त्यामुळे रिपब्लिकन गार्डस ने आज आय एस आय एस ला पठिम्बा दिला असता...

भारतावर काय परिणाम होणार आहे, भारत पण त्यान्च्या रडार वर आहे का ?

उदयन..,

१.
>> इथुन सिरीयातुनच इराककडे वळले नसतील ?

यू आर राईट सर! हे ISIS वाले लोकं सीरीयातून इराकात वळलेले आहेत.

२.
>> सीरीयावर ताबा मिळाला नाही मग इराक कडे जिथे अमेरिकन सैन्य माघार घेत आहे आणि प्रबळ सरकार अजुन
>> स्थापन झालेले नाही अश्या योग्यवेळेस डाव साधला तर नसेल ?

नॉट सो राईट सर! कारण की ISIS ही अमेरिकेची पैदास आहे. यांचे गणवेश व शस्त्रे अमेरिकी आहेत. त्यांची पलटणरचना (कमांड स्ट्रक्चर) अद्ययावत आहे. ते लोकं सरकारी सेवा देखील चालवू शकतात. उदा. : करवसुली, वीजपुरवठा, आरोग्यसेवा, इत्यादि. नेहमीचे मुजाहिदीन नुसते लढाऊ दल असते. हे त्याहून बरीच अधिक कार्ये करणारे आहेत.

असाच प्रकार अमेरिकेने अफगाणिस्थानात १९९४/९५ साली केला होता. तालिबान त्यातूनच जन्मास आले. पैदा झाले नाहीत तोच तालिबानी 'विद्यार्थी' विमाने उडवायला शिकले. मदत अमेरिकेची होती हे उघड आहे. असाच प्रकार इराकात चालला आहे.

आ.न.,
-गा.पै.

यांचे गणवेश व शस्त्रे अमेरिकी आहेत.
मी ऐकले की भीतीने इराकी सरकारचे सैन्य अमेरिकेने दिलेली शस्त्रात्रे टाकून व गणवेषहि टाकून पळून गेले. ते सर्व आयतेच आयसिस च्या लोकांना मिळाले. आता या आयसिस ला अमेरिकेने जन्म दिला हे काही मी ऐकले नाही कधी.

Pages