"दिवसा तु रात्री मी" : ४ जुलै सुयो्गचं नाटक

Submitted by Admin-team on 8 July, 2009 - 13:31

"दिवसा तु रात्री मी" नाटकावरच्या प्रतिक्रिया.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवसा तु रात्री मी नावाचे नाटक चालु आहे. ऑल दी बेस्ट नाटकासारखी संकल्पना आहे. एकुण नाटक जरा पकाउ झाले आहे.

फालतु होतं. शेवटी कंटाळून बंद केलं. ह्या नाटकाला कुठच्या मोजणीने विनोदी म्हणावं हे समजल नाही.

मला वाटतं की निर्मात्या दिग्दर्शकानी 'सही रे सही' ची Popularity Cash करण्याच्या इराद्याने हे नाटक सादर केलं असावं. पहीली १०/१५ मिनीटं बरं वाटलं, नंतर तोचतोचपणाचा इतका कंटाळा आला की पुढे पहावलं नाही...

मी पण १५ मिनिटात उठून गेलो. तेच तेच बघून उबग आलाय मला.

रटाळ नाटक. पहिल्यांदा थोडावेळ चांगले वाटले नंतर बोर झाले. या नाटकामुळेच (तिथुन निघुन गेल्यामुळे) मला राहुल देशपांडेचा अत्यंत सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला.

रावल्या सुरत पियाकी फार मस्त गातो. Happy

हे नाटक दाखवायच्या आधी झगमगवर एल ए मंडळाचा छोटा व्हिडीओ दाखवला. मी पाहायला येईपर्यंत नाटक सुरु झाले म्हणून नाव कळलेच नाही. भरीस भर म्हणून तो अर्धवट मुक्याचा अभिनय करणारा नट समीरसारखा वाटला मला. मी आपलं त्याला नाटक आवडलं म्हणून लिहील. (पहिल्या १५ मिनीटांनंतर) (माझा वेंधळेपणा Happy ) सॉरी रे समीर, माझा तसा ग्रह व्हायला तो एल ए चा व्हिडीओ कारणीभूत ठरला. Happy

नंतर ते लोक आचरटपणा करु लागले. सरळ मित्रांना फोन लावले अन कॅरमचा डाव मांडला.

दिवसा तू रात्रि मी,नाटक खूप विनोदि आहे.वहिनिचे काम ज्यामुलिने केले ते खूपच अप्रतीम झाले आहे.
नन्तर तेच्,तेच सन्वाद आणी प्रसन्गाचेहि रिपिटे शन झाल्या मुले मग मात्र नाटक खूप कन्टाळ वाणे झाले.
सुरुवातिला मात्र आम्ही खूप आस्वाद घेतला,खूप पोट धरु-धरु हन्सलो.नाटक लवकर सम्पवाय्ला पाहिजे होत्,काम् सर्वानची चान्गलि झालि. आभिनन्दन.
आपला डाक्टर विजय दामोदर पान्गरेकर...
सध्ध्या बोस्टन जवळ मुलान्कडे,
नेहमी साथी,भारतात,औरन्गाबाद ला...