जनरल व्ही के सींग यांचे सरकार बरोबर दोन हात

Submitted by विवेक नाईक on 10 February, 2012 - 06:11

सध्या जोरात चर्चेत असलेल्या जनरल व्ही के सींग विरुद्ध भारत सरकार यांच्या
तील वादाने सरकार, लष्कर, लष्कराची यंत्रणा व त्या वरील सरकार चे नियंत्रण या सर्वांवर प्रश्न चींन्ह लावलय.

वरकरणी सर्व साधारण दिसणार्या या वादाच्या मागची पार्श्वभुमी समजून घेणे महत्वाचे आहे.

जनरल व्ही के सींग हे स्वता: ची जन्म तारीख १० मे १९५१ अशी सांगतात, त्यासाठी त्यांच्याकडे स्वता:चे
पुरावे ( जन्म दाखला, SSC Certificate, NDA certificates etc) आहेत. फक्त सरकारी कागद पत्रात त्याची
जन्म तारीख १० मे १९५० दाखवली आहे.

जनरल व्ही के सींग यांचे वडील सुद्धा लष्करी अधिकारी होते, व व्ही के सींग यांचा जन्म लष्करी
ईस्पितळातच झाला होता. तेथील जन्म दाखला व व्ही के सींग यांच्या वडीला ची साक्ष या सगळ्याकडे
दुर्लक्ष करून सरकारने हा वाद गेली ३६ वर्षे चालू ठेवला आहे.

व्ही के सींग यानी वेळो वेळी त्यांच्या वरीष्ठ लष्कर अधिकारी यांना पत्रा द्वारे या बद्दल सुचीत केले होते, पण
त्या सर्वानी याकडे दुर्लक्ष केले. या वा दा मूळे ५ व्या व ६ व्या वेतन आयोगा च्या वेतन सुधारणे मध्ये
सुद्धा व्ही के सींग यांच्या वेतनामध्ये तफावत आली. व्ही के सींग यानी वेळो वेळी पत्रा द्वारे लिहिल्या मूळे
त्यांच्या सैन्यातील वयक्तीक फाईल मध्ये, हा अधिकारी वरीष्ठ अधिका र्याच ऐ क त नाही त्या मूळे बढ ती
साठी पात्र नाही असे शेरे मारले आहेत. ह्या सर्व प्रतिकूल स्थिती मध्ये ही जनरल व्ही के सींग यांनी लष्कर
प्रमूख पदा पर्यंत मजल मारली . आता जर सरकारने जन्म तारीख १० मे १९५० च मानली तर
जनरल व्ही के सींग यानां दोन महीन्यात रि टायर व्हायला लागेल. जर सरकारने १९५१ ही तारीख ग्राह्य
धरली तरीही जनरल व्ही के सींग यांना एक वर्षाचा Extension द्यायच का नाही हा सरकारचा प्रश्न
राहील.

दिल्ली स्थीत सुरक्षा मंत्रालय व लष्कर मुलकी कचेरी दोन्ही अगदी जवळ जवळ आहेत, पण गेल्या ३६
वर्षांत त्यातल्या अधिकार्यांना ईतक्या छोट्या गोष्ठीचा निकाल लावता आला नाही. निकाल लावता आला
नाही का, हा प्रश्न त्यांच्या साठी ईतका महत्वाचा नव्हता? मुळात ईतका वरीष्ठ अधिकारी सांगत
असतानाही सुरक्षा मंत्रालयाला त्यांच्या केस मध्ये काहीच रस का नव्ह्ता ? का ईतक्या वरीष्ठ अधिकार्याला
उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला ?

जनरल व्ही के सींग यांनी सुरक्षा मंत्रालयाला दिलेल्या जन्मतारीख बदलाचा अर्ज सुरक्षा मंत्रालयाला ने
३० डिसेंबर २०११ ला फेटाळला होता, आणी तो अर्ज फेटाळण्याचा निर्णय सुरक्षा मंत्रालयालाने आज रद्द केला
व उच्च न्यायालया पूढे होणार्या नाचक्की पासुन वाचण्याचा प्रयत्न केला.

जर सुरक्षा मंत्रालयालाच जर वरीष्ठ अधिकार्यावर विश्वास नसेल तर देशाची सुरक्षा मंत्रालय करेल असा
विश्वास जनतेने का दाखवावा ?

गेल्या काही वर्षात लष्करी प्रमूख पदावर आलेल्या प्रत्येक अधिकार्या वर कसले ना कसले आरोप झाले
आहेत.

आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पत अजून घालवण्यात सरकारला यश आले आहे.

स्त्रोतः झी न्युज, आजतक न्युज,
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11834688.cms

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदी यान्ची निवड चुकली आहे...

रक्षा मन्त्रालयाने सर्वोच्च न्यायालयास दिलेल्या शपथपत्रात (affidavit) माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान केन्द्रिय राज्यमन्त्री व्हि के सिन्ग यान्ची ले. जन. सुहाग यान्च्या विरुद्धची कृती बेकायदेशीर, पूर्वनियोजित आणि अनावश्यक होती. पत्रात illegal, extraneous, and premeditated असे शब्दप्रयोग केले आहेत.

केन्द्रिय रक्षा मन्त्री जेटली यान्नी सुहाग यान्च्या लष्करप्रमुख पदासाठीचे मार्ग मोकळा केला आहे. येथे आधिचे सरकार आणि विद्यमान सरकार यान्नी सुहाग यान्ची पाठराखण केली आहे.

इथपर्यन्त ठिक आहे... पण शपथपत्र सादर केल्यानन्तरचे व्हि के सिन्ग यान्नी केलेले ट्विट बघुन मला चिड Angry आली. येथे प्रश्न मनमोहन सरकार, आणि मोदी सरकार यान्च्या निर्णयाचा नाही. पण केन्द्रात राज्यमन्त्री असलेली जबाबदार व्यक्ती देशाच्या भावी लष्करप्रमुखा बद्दल एव्हढे खालच्या दर्जाचे ट्विट कसे करु शकते?

माजी लष्करप्रमुखान्चे डोके ठिकाणावर आहे का असे विचारायची वेळ आली आहे... Angry थोडाफार जरी स्वाभिमान असेल तर या मन्त्र्याने स्वत: राजिनामा द्यावा (तुमच्या सरकारने दिलेले प्रतिज्ञापत्र आणि तुमचे मत इतके भिन्न असेल पण त्याचे जनसामान्या समोर ट्विटद्वारे प्रधर्शन कशाला... ?) .

मोदी यान्नी या मत्र्याचा त्वरित राजिनामा घ्यावा... किमान अशा प्रकारान्ना आळा घालावा अन्यथा डोक्याला बोजड होणार आहे.

दुसरा मुद्दा असा आहे जेटली यान्ना या प्रतिज्ञापत्राबद्दल काहीच कल्पना नव्हती? जेटली स्वत: विधिज्ञ आहेत... आता त्यानी रक्षा सचिवा कडे विचारणा केली आहे 'सिन्ग यान्च्यावर ताशेरे का आहेत म्हणुन'. बालीशपणा आहे.

सरकार बदलले, माजी लष्करप्रमुख नव्या सरकारात मंत्री झाले तरी धाग्याचे शीर्षक बदललेल्या परिस्थितीला लागू पडते आहे.

<दुसरा मुद्दा असा आहे जेटली यान्ना या प्रतिज्ञापत्राबद्दल काहीच कल्पना नव्हती?>

त्यात काय बिघडलं? सध्या ते अर्थखात्यात बिझी आहेत. २००१ साली (अर्थमंत्रालयातले एक सचिव युटीआयच्या बोर्डावर असूनही) त्यावेळच्या अर्थमंत्र्यांना युनिट स्कीम १९६४ ची खरेदी विक्री बंद होणार आहे हे माहीत नव्हते.

या गोष्टीवर सध्या फार काही संभाषण करणे ठीक होणार नाही. जनरल व्ही.के. मूर्ख खचितच नाही. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टसुद्धा विचार न करता कुठलाही निर्णय देत नाही. त्यामुळे दोन निष्कर्ष काढता येतात. जनरल व्ही.के. ची जन्मतारीख (किमान आर्मीच्या नोकरीसाठी तरी) १९५०च आहे. त्याचा दुसर्‍या जनरलवरील आरोपांशी काही संबंध नाही.

जेटलींनी केले ते योग्य केले.

फक्त सरकारची बर्‍यापैकी नाचक्की झाली. Sad व्ही.के. यांना मोदींकडून समज मिळालीच असणार !

जनरल व्ही.के. मूर्ख खचितच नाही.
----- शरदसाहेब तुम्ही माजी प्रमुखान्चे ट्विट बघितले का? येथे पहायला मिळेल, हे ट्विट त्यान्नी राज्यमन्त्री असताना आणि सरकारने सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र दिल्यानन्तर केले आहे. ते आपल्या भावी लष्कर प्रमुखाबद्दल (?) ते बोलत आहेत तसे असेल तर कोण चुकतो आहे?
https://twitter.com/Gen_VKSingh/status/476377064417656832

उदय,

तुमचा राग मी समजू शकतो. मात्र एक गोष्ट इथे आपण लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे निवृत्त सैन्यप्रमुख विजयकुमार सिंग यांची सचोटी (इंटेग्रिटी) वादातीत आहे.

अशा माणसाला जनरल सुहाग यांच्यावर आरोप का करावेसे वाटले? पुरावा तर असेलंच ना? हे आरोप अतिशय गंभीर आहेत. जगात सर्वत्र सैन्य स्वबांधवांवर अत्याचार करते. केवळ भारतीय सैन्यात असे प्रकार घाऊक प्रमाणावर होत नाहीत. किंवा खपवून घेतले जात नाहीत. कारण भारतात राष्ट्रीय मानवाधिकार समितीस सैन्यदल उत्तरदायी आहे. अशी पद्धती जगात इतरत्र कुठेही नाही.

या पार्श्वभूमीवर विजयकुमार सिंग यांचे आरोप गांभीर्याने घ्यायला हवेत. या आरोपांत तथ्य असल्यास जनरल सुहाग यांना प्रमुखपदी नेमू नये. अर्थात निर्णय यथोचित चर्चेद्वारे घेण्यात यावा.

आ.न.,
-गा.पै.

या आरोपांत तथ्य असल्यास जनरल सुहाग यांना प्रमुखपदी नेमू नये
----- पन मग रक्षा मन्त्रालयाचे प्रतिज्ञापत्र... आणि जेटली यान्चा सुहाग यान्च्या नावासाठी पाठिम्बा हे पण लक्षात घ्यायला हवे.

आरोप एखाद्या सोम्यागोम्यावर झाले असते तर मला काही घेणे देणे नाही, कोण विचार करतोय... पण येथे ले जन सुहाग हे भावी लष्करप्रमुख आहेत. म्हणुन हा मोठा धक्का आहे.

ती म्हणजे निवृत्त सैन्यप्रमुख विजयकुमार सिंग यांची सचोटी (इंटेग्रिटी) वादातीत आहे. >> नवीन लष्करप्रमुख सुहाग यांची सचोटी कशी आहे मग? सिंग केवळ भाजपाचे आहेत (किंवा काँग्रेसच्या विरूध्द आहेत) म्हणून जर तुम्ही त्यांची सचोटी वादातीत आहे असं म्हणत असाल तर धन्य आहे.

शिवाय ते आता लष्करप्रमूख नाहित. केंद्र सरकारमधले एक जबाबदार मंत्री आहेत. त्यांनी जरा विचार करून बोलावं अशी एक बेसिक अपेक्षा आहे.

निवृत्त होईपर्यंत झोपले होते का हे जनरल ? कारण आधी प्रमोशन घेताना १९५० ला कबूल झाले होते . नंतर म्हणतात १९५१ हीच जन्मतारीख ..

जन्मतारीख प्रकरणी व्ही.के. सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर टीका केली होती. त्यांच्या हेतूबद्दल शंका घेतली होती. त्याबद्दल नंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागावी लागली होती/

निवृत्त होईपर्यंत झोपले होते का हे जनरल ? कारण आधी प्रमोशन घेताना १९५० ला कबूल झाले होते . नंतर म्हणतात १९५१ हीच जन्मतारीख .. >>>>

म्हणून तर सु.को. ने विरुद्ध निर्णय दिला. पण तो इतिहास झाला. आता त्यावर चर्चा कशाला?

उदय,

<<<हे ट्विट त्यान्नी राज्यमन्त्री असताना आणि सरकारने सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र दिल्यानन्तर केले आहे.>>

माझ्या कॉम्प्युटरवर उघडत नाही. कृपया मला मेल करणार का? प्लीज!

मनीष,

>> सिंग केवळ भाजपाचे आहेत (किंवा काँग्रेसच्या विरूध्द आहेत) म्हणून जर तुम्ही त्यांची सचोटी वादातीत आहे असं
>> म्हणत असाल तर धन्य आहे.

निवृत्त सैन्यप्रमुख विजयकुमार सिंगांबद्दल पूर्ण सैन्यात आदराची भावना आहे. इथे एक विधान आहे :

>> There are no two views in the army about General Singh's integrity and capability

तसेच अण्णा हजाऱ्यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात विजयकुमार सिंग सामील होते. त्यामुळे सिंगांच्या सचोटीवर शंका घेतली जाऊ नये. ते कोण्या राजकारण्यासारखे नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

Sharad, it may not be a good idea to publish your email address here. In any case others can send you email without knowing your email address.

इतिहासावर झाडू फिरून गेलाय वाट्ट्ं इथे?
'विशिष्ट' शब्द गाळून परत लिहितो.

>>
पण तो इतिहास झाला. आता त्यावर चर्चा कशाला?
<<

काही दिवसांपूर्वी यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने काही म्हटले हा 'इतिहास'!! अन त्यावर चर्चा कशाला???
कमालेय!
त्यांच्या विश्वासार्हतेला तडा जात नाही का या घटनेने? इंटेग्रिटी कशी जज करायची असते कुणा माणसाची? उदा. तुमच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले याचा अर्थ तुम्ही धुतले तांदूळ असता, असा होतो की काय?

अण्णा हजाऱ्यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात विजयकुमार सिंग सामील होते. त्यामुळे सिंगांच्या सचोटीवर शंका घेतली जाऊ नये. ते कोण्या राजकारण्यासारखे नाहीत.
<<
हसू की रडू?

अहो केजरीवाल अण्णांसोबत लऽऽऽई दिवसांपासून होते. त्यांच्या कशा कशावर शंका घेतात लोक.
ओरिजिनल गांधींवर शंका घ्यायच्या सोडल्या नाहियेत. थोरल्या ठाकरे साहेबांनी गांधी म्हणून गौरविलेल्या अण्णांना सोडलंय असं म्हणायचंय का तुम्हाला?

<<उदा. तुमच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले याचा अर्थ तुम्ही धुतले तांदूळ असता, असा होतो की काय?>>

इब्लिस, माझ्या म्हणण्याचा विपर्यास होतोय असे मला वाटते. एक म्हणजे मी दोन्ही जनरलना ओळखत नाही. त्यामुळे मी कुठलीही बाजू घेतलेली नाही. दुसरे म्हणजे मला इतकेच म्हणायचे होते की कोर्टाने निर्णय दिलाच आहे; त्यामुळे त्या गोष्टीला पूर्णविराम मिळाला आहे. होऊ घातलेल्या आर्मी चीफ विषयी काही कॉमेन्ट असेल, किंवा व्ही.के. च्या मंत्रीपदाला शोभा न देणार्‍या ट्वीट विषयी काही म्हणायचे असेल तर ते म्हणू.

तसेच अण्णा हजाऱ्यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात विजयकुमार सिंग सामील होते. त्यामुळे सिंगांच्या सचोटीवर शंका घेतली जाऊ नये. ते कोण्या राजकारण्यासारखे नाहीत.
----- अण्णा हजारेन्च्या आन्दोलनात सामील होते म्हणजे सिन्ग यान्नी तेथे केले काय? अण्णा अनेक वर्षापसुन लढत आहेत हे सिन्ग महाशय काही आठवड्यासाठी अण्णान्च्या सोबत होते मग आपने आमन्त्रण नाही दिले असे तेच म्हणतात दिले आणि वार्‍याची दिशा मोदीकन्डे होती म्हणुन भाजपा, असो.
निव्वळ अण्णान्चे नाव आले म्हणजे माणुस स्वच्छ असतो असे नाही. उदा: अण्णान्च्या पुण्याच्या सभेत स्टेज बान्धुन देणारा पक्का चोर असण्याची शक्यता पण असतेच. येथे कुणी दान करत नाही, अमक्याने माझ्या सभेसाठी स्टेज का बान्धुन दिला, मला गाडी का पाठवली असे प्रश्न अण्णा स्वत:ला विचारत असतीलच. तो वेगळा विषय.

२ गोष्टी खटकल्या आहेत,
१) दोन उच्च पदस्थ व्यक्ती, माजी आणि भावी लष्कर प्रमुख, यान्च्या मधे अत्यन्त टोकाची मतभिन्नता दिसते आहे आणि हे चिन्ताजनक आहे.
२) एव्हढ्या महत्वाच्या प्रतिज्ञापत्राबाबत रक्षा मन्त्री जेटली अन्धारात रहातात हे पचायला कठिण आहे. सचिवाने पत्र दाखवले नाही अशी शक्यता आहे का अजुन काही?
३) ट्विट.. मधे वादग्रस्त मत. जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा ?

लष्करी सामग्री खरेदीत हजारो लाखो कोटीन्चे व्यावहार असतात त्यामुळे टक्केवारी चा खेळ आहे का? अशी एक शन्का.

उदय,

>> ट्विट.. मधे वादग्रस्त मत. जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा ?

कोणावरही विश्वास ठेवू नका. विजयकुमार सिंगांचे वक्तव्य आहे. त्याचे पुरावे त्यांना सादर करायला सांगा (म्हणजे सांगायला हवेत). नीरक्षीरन्याय तिथेच होईल.

विजयकुमारसिंगांनी सांगितलेले सैन्याच्या गैरवर्तनाचे प्रकार काँगोमधल्या बिक्रम सिंगांच्या (चालू सैन्यप्रमुख) हाताखालील सैन्यातही झाले होते.

पुढे हा भारतीय सैन्याच्या प्रतिमेचा प्रश्न होऊ शकतो.

आ.न.,
-गा.पै.

<<<लष्करी सामग्री खरेदीत हजारो लाखो कोटीन्चे व्यावहार असतात त्यामुळे टक्केवारी चा खेळ आहे का? अशी एक शन्का.>>> १................+ १

<<< दोन उच्च पदस्थ व्यक्ती, माजी आणि भावी लष्कर प्रमुख, यान्च्या मधे अत्यन्त टोकाची मतभिन्नता दिसते आहे आणि हे चिन्ताजनक आहे. >>>

याचा लष्करावर काहीच परिणाम होणार नाही. कुठल्याही सैनिकाचे मनोधैर्य खच्चीकरण होणार नाही. "मनोधैर्य खच्चीकरण " हे फक्त मेडियात वापरण्या चे एक्स्प्रेशन आहे.

शिवाय माजी ल.प्र. यांना सरकारने संरक्षणाच्या बाबतीत शून्य किंमत दिली आहे. सरकारला भविष्याकडे पहायचे आहे भूतकाळाकडे नव्हे.

आता माजी ल.प्र. यांनी नवा वाद उकरून काढू नये इतकीच अपेक्षा! Happy

डाळ शिजली तर शिजली आपला स्वार्थ पाहायचा हे करताहेत सिंग .त्यापेक्षा लोकसभेची जागा लढवली असती तर मुंबईच्या पो० क०सारखे पाच वर्षे भले झाले असते .

गो रा खैरनार यांना पाठिंबा देणे आणि सत्तेत आल्यानंतर हा माणूस नाकापेक्षा जड आहे याचा साक्षात्कार होणे यातून काहीच शिकता आलेले नाही का ?