स्कूल चले हम

Submitted by dreamgirl on 11 June, 2014 - 07:07

(थोपू वर पूर्वप्रकाशित Happy )

चला, अ‍ॅडमिशनचा कार्यक्रम एकदाचा पार पडला...
एका महीन्याच्या फरकासाठी म्हणे अख्खं वर्ष लहान गटात काढावं लागतंय... छ्या!! आजकाल काय हे पहीलीला जाण्यापूर्वी हजारो प्रकार असतात- प्ले ग्रूप, नर्सरी मग ज्युनियर केजी मग सिनीयर केजी.... आम्ही डायरेक्ट पहीलीत गेलो सहा वर्षांचे झाल्यावर. (म्हणजे घोडनवर्‍यांसारखा आमचा घोडविद्यार्थी प्रकार असावा!!) त्या आधी घरातली लुडबूड कमी व्हावी म्हणून आजूबाजूच्या बालवाड्यांमध्ये काही काळ सोडले जात असे अस्मादिकांना. दुपार तेव्हढीच टेन्शनफ्री आणि तेवढाच आपल्या डोक्याचा त्रास दुसर्‍यांच्या डोक्याला Proud

इथे म्हणे पाल्यासोबत पालकांचे पण इंटर्व्ह्यूज!!! म्हटलं पोराला लाज नको आईबापापायी...! दोघं फुल्ल टेन्शनमध्ये!! आधीच इंग्रजीची बोंब त्यातून हिंदीतर विचारायलाच नको... पोरगं मात्र मजेत! (आणि कॉन्फीडेंट!) प्रिन्सीपललाच विचारून आलं "व्हॉट इज युवर नेम"!! Uhoh (ओव्हरकॉन्फीडन्स आणि काय!!) आम्ही ओशाळं हसलो!!! बाकी स्वत:हून नवीन शूज बिज दाखवून झाले! अस्खलित हिंदीत! (थॅंक्स टू बॉलीवूड)
प्रश्न वाढल्यावर बाहेरचे डेरेदार झाड नी त्या झाडाची सळसळती पाने, त्यावर बसलेले "पिजन्स" पाहून झाले... (कठीणे!! आम्ही कबूतर म्हणायला गेलो की दुरूस्ती शिकवली जाते - कबुतर नहीं पिजन्स!!) "पिजन्स देखोSSS" असे चित्कारूनही झाले. (नावडत्या किंवा अडचणीत आणणार्‍या प्रश्नांना बगल द्यायची पण आत्तापासूनच सवय लागतेय!! छान!! थॅंक्स टू पॉलीटिक्स)

अ‍ॅक्टीव्हिटीज, पिकनिक, गॅदरिंगचा आल्बम बघून "यात अनया (बेबीसिटींग मधली खास मैत्रीण) आहे का?" असे विचारूनही झाले. "नाही" असे उत्तर आल्यावर त्यात फार रस दाखवला नाही. Proud
"स्कूल" फिरून बघीतले... बरीच खेळणी... चित्रांचे भलेमोठे तक्ते, भिंतीवर रेखाटलेले प्राणी, पक्षी, पर्‍या, कार्टून्स पाहून स्वारी खुश झाली. एकदोन चित्रे ओळखून त्या टिचरच्या ज्ञानात भर घालण्यात आली. वाढत्या उन्हाळ्यामुळे तुळतुळीत केलेला गोटा गदागदा हलवत खुशीत "स्कूल अच्छा है" असा रिमार्कही नोंदवायला विसरले नाहीत. मॅडम तेव्हढीच हॅप्पी हॅप्पी!! Happy

पिढी बदललेय, जबाबदार्‍या वाढल्यात, म्हटल्यावर पटलं बुवा - पहीलीच्या आधी येवढे हजारो का प्रकार असतात ते...!! आमची गाडी मात्र पाचवीपर्यंत "धिस इज बॉय, दॅट इज गर्ल... धिस इज राम, दॅट इज सीता" वरच अडकलेली!! आताच्या पिढीकडून मात्र हिंदी, मराठी, इंग्रजी तिन्ही भाषा नेटाने शिकल्या जाताहेत, (स्वतःला) सोयिस्करपणे वापरल्या जाताहेत!! (पुढेमागे परदेशगमनाची इच्छा आणि योग यांचा समसमासंयोग साधण्यासाठी एखाददुसरी परदेशी भाषासुद्धा टप्पे पार करत शिकली जातेय.) चला! शाळा, कॉलेज, नोकरी, प्रेम, लग्न, घर, मुलं, मुलांचं शिक्षण... वर्तुळ पुढे सरकलंय... अहं! आमची सुटका नाहीच!! त्यामुळे वर्तुळ रूंदावलेय फक्त!! Happy

तळटिप : आता या प्रोग्रॅममध्ये थोड्डासा अभिमान, थोड्डंसं गोंधळलेपण, थोड्डसं थकलेपण, थोड्डसं अरे देवा!!, थोडीशी मजा, थोडंसं धास्तावलेपण, थोडंसं कुतुहल आणि बराचसा उत्साह अशा संमिश्र भावना आहेत पण झुकरबर्गांनी एका वेळी एक हाच व्यवहार्य पर्याय समोर ठेवल्याने भावना समजून घ्या मंडळी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्ले ग्रूप, नर्सरी मग ज्युनियर केजी मग सिनीयर केजी.... आम्ही डायरेक्ट पहीलीत गेलो सहा वर्षांचे झाल्यावर. >>>>अरे वा बऱ्याच कटकटीतून मुक्तता मिळालेय अभिनंदन

अनया (बेबीसिटींग मधली खास मैत्रीण)...... यीईंव, अगैन थँक्स टू बॉलीवूड .. एण्ड शाहरूख Wink
मस्त लिहिलेय Happy

धन्स लोक्स Happy

हो खरंय केदार बर्‍याच कटकटीतून सुटलो आम्ही Wink
वेल, हो गं तो फारच हुशार आहे म्हणून कधी कधी धास्तावते... चुकून काहीतरी ऐकायचा आणि नको तेव्हा बरोब्बर वापर करायचा... एकपाठी आहे Happy
अभिषेक, बापावर गेलेय पोरगं Proud
लक्ष्मी, ऑल द बेस्ट!! पिल्लूला नव्हे तुम्हाला Happy

आजच त्याच्या शाळेतल्या ऑफीसात वाचलं मुलांचे कुतुहल दाबून टाकू नका... शक्यतो त्यांची योग्य आणि संयमाने उत्तरे द्या. अरे देवा!! त्याच्या हज्जारो चिवित्र शंकांनी दे माय धरणी ठाय होऊन जातं कधी कधी!