माझे हवाल पुसण्या येऊन लोक गेले!

Submitted by profspd on 4 June, 2014 - 02:44

माझे हवाल पुसण्या येऊन लोक गेले!
आहे जिवंत की, ना पाहून लोक गेले!!

मी एकटाच उरलो रानातल्या तरूसम....
माझे बहर फुलांचे वेचून लोक गेले!

ही बातमी कुणाची आली उडत कळेना....
ते काम हातचेही टाकून लोक गेले!

माझ्या विटंबनेची आली वरात तेव्हा....
दारापुढेच माझ्या नाचून लोक गेले!

वाली न ज्यास कोणी ऐसे पडून होते.....
माझ्या कलेवराला सोडून लोक गेले!

तो एक गझलउत्सव चालू कधीच झाला....
बोलावले तुम्हाला सांगून लोक गेले!

माझ्या अनेक गझला आहेत नेटवर त्या....
बघ, चोरपावलांनी वाचून लोक गेले!

झालो कृतार्थ मी अन् ही शायरीच माझी....
घटकाभरी तरी हे हासून लोक गेले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रामाणिक/अप्रमाणिक खुद्द शायर जाणत असतो!

आपण केलेली शेरातील तडजोड/बदमाशी प्रत्येक शायराला माहीत असते, काही कबूल करतात काही नाही कबूल करत इतकेच काय ते!

एकुणच गझल छान

माझ्या अनेक गझला आहेत नेटवर त्या....
बघ, चोरपावलांनी वाचून लोक गेले!

झालो कृतार्थ मी अन् ही शायरीच माझी....
घटकाभरी तरी हे हासून लोक गेले!

दोन्ही अगदी अप्रतीम...