Submitted by profspd on 4 June, 2014 - 02:44
माझे हवाल पुसण्या येऊन लोक गेले!
आहे जिवंत की, ना पाहून लोक गेले!!
मी एकटाच उरलो रानातल्या तरूसम....
माझे बहर फुलांचे वेचून लोक गेले!
ही बातमी कुणाची आली उडत कळेना....
ते काम हातचेही टाकून लोक गेले!
माझ्या विटंबनेची आली वरात तेव्हा....
दारापुढेच माझ्या नाचून लोक गेले!
वाली न ज्यास कोणी ऐसे पडून होते.....
माझ्या कलेवराला सोडून लोक गेले!
तो एक गझलउत्सव चालू कधीच झाला....
बोलावले तुम्हाला सांगून लोक गेले!
माझ्या अनेक गझला आहेत नेटवर त्या....
बघ, चोरपावलांनी वाचून लोक गेले!
झालो कृतार्थ मी अन् ही शायरीच माझी....
घटकाभरी तरी हे हासून लोक गेले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जमीन आवडली रदीफेला चांगला वाव
जमीन आवडली रदीफेला चांगला वाव दिलात असे वाटले
अनेक शेर छानच पण शेवटचा जास्त आवडला जास्त प्रामाणिक वाटला
धन्यवाद
धन्यवाद
पण शेवटचा जास्त आवडला जास्त
पण शेवटचा जास्त आवडला जास्त प्रामाणिक वाटला<<<
पण शेवटचा जास्त आवडला जास्त
पण शेवटचा जास्त आवडला जास्त प्रामाणिक वाटला<<<
प्रामाणिक/अप्रमाणिक खुद्द
प्रामाणिक/अप्रमाणिक खुद्द शायर जाणत असतो!
आपण केलेली शेरातील तडजोड/बदमाशी प्रत्येक शायराला माहीत असते, काही कबूल करतात काही नाही कबूल करत इतकेच काय ते!
एकुणच गझल छान माझ्या अनेक
एकुणच गझल छान
माझ्या अनेक गझला आहेत नेटवर त्या....
बघ, चोरपावलांनी वाचून लोक गेले!
झालो कृतार्थ मी अन् ही शायरीच माझी....
घटकाभरी तरी हे हासून लोक गेले!
दोन्ही अगदी अप्रतीम...
एकदम आवडली!
एकदम आवडली!
धन्यवाद
धन्यवाद