सवय

Submitted by विजय देशमुख on 19 February, 2014 - 00:06

"काय घाणेरडी असतात ना माणसं?"
"अं"
"तुझं लक्ष कुठे आहे? बघितलस ना कसे केळाचे सालं फेकले त्या बाईने. काहीच कसं वाटत नाही या लोकांना"
"हम्म"
"आणि आपले घरचे तर अजुनच महान. मी म्हटलं की कचरा वेगवेगळा करुन पॉलिथिन बॅगमध्ये फेका, तर मलाच वेड्यात काढलं. आणि वरुन डोस... तुमचे परदेशातले नियम तुमच्याजवळ ठेवा."
"हं"
"हं, काय? तु का नाही सांगत त्यांना? मीही शेवटी कंटाळून कचर्‍याच्या ढिगातच फेकले रॅपर्स"
"हे मात्र तू बरोबर केलं नाहीस."
"अच्छा, मी केलं ते चुकलं अन ते करत आहेत त्याचं काय?"
"तुला लहानपणी आपल्याला एक गोष्ट होती ती आठवते?"
"कोणती गोष्ट?"
"साधू आणि विंचवाची. त्यात तो साधू पाण्यात पडलेल्या विंचवाला वाचवायचा प्रयत्न करतो, तर विंचू त्याच्या हाताला दंश करतो."
"त्याचं काय?"
"हेच की विंचवाने दंश केला म्हणुन साधुचं त्याला वाचवणं, थांबवत नाही."
"तुला म्हणायचय काय?"
"त्यांनी कुठे कचरा फेकावा, कसा फेकावा, हे सवयीने त्यांच्यात मुरलय, तसच कचरा कचराकुंडीतच फेकावा, हे तुझ्या. ते त्यांची सवय बदलायला तयार नाही, तर तू का स्वतःच्या सवयी बदलतेस?"
"हम्म... प्रयत्न करते."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पटलं.
पण सवय लोकेशन स्पेसिफिक पण असते. अगदी नुवर्कलासुद्धा (!) नीट वागणारा माणूस मुंबईच्या बेगेज कॅरोसल वर चढून धक्काबुक्की करतो तेव्हा गंमत वाटते.