खजुर लोफ - अंडे घालुन

Submitted by लाजो on 6 July, 2009 - 22:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

लोफः
१ १/२ कप तुकडे केलेले खजुर;
१/२ कप साखर (ब्राउन घेतल्यास उत्तम);
२ टेबलस्पून बटर्/मार्गरीन;
१ कप पाणी;
१ अंडे - हलके फेसुन;
१ कप सेल्फ रेसिंग फ्लावर (१/२ कप होलमिल से. रे. + १/२ कप साधे से. रे. सुद्धा चालेले)

कॅरॅमल टॉपिंगः
हेवी (ड्बल क्रीम) - १ कप
ब्राऊन शुगर - २ १/२ टेबल स्पून
पाणी - साखर विरघळण्या इतपत - साधारण पाव कप

क्रमवार पाककृती: 

लोफः
१. खजुर, साखर आणि बटर/मार्गरीन पॅन मधे घालुन त्यात पाणी घालावे. साखर नीट विरघळावी.
२. आता ह्या मिश्रणाला एकदा उकळी आणावी आणि मग आचं मंद करुन दोन मिनीटे गरम (सिमर) करावे.
३. मिश्रण थंड होऊ द्यावे मग त्यात फेसलेले अंडे घालावे. नीट ढवळुन घ्यावे.
४. आता हळु हळु से. रे. फ्लावर घालावे. गुठळ्या होऊ देऊ नये.
५. बटर लावलेल्या (ग्रीज्ड) लोफ टीन मधे (केक टीन चालेल) घालुन १८० डिग्री से ला साधारण ४०-४५ मिनीटे बेक करावे.

कॅरॅमल टॉपिंगः
साखर आणि पाणी पॅन मधे घालुन कॅरॅमल बनवुन घ्यावे.
त्यात क्रीम घालुन एक उकळी आणावी.
वाढायच्या आधी गार होऊ द्यावे

सर्व्ह करायला - लोफ चा पावाच्या स्लाइस पेक्षा थोडा जाड स्लाइस कापावा. त्यावर टॉपिंग घालावे. आवडत असेल तर व्हॅनिला आइस्क्रिम आणि टॉपिंग घालावे... Happy

वाढणी/प्रमाण: 
२-३ व्यक्ती एका झटक्यात संपवतात... :)
अधिक टिपा: 

-स्टेप २. मायक्रो मधे ही करता येइल - वेळ आणि पॉवर अंदाजाने बघावा लागेल - मी ट्राय केलेले नाही.
-स्टेप ३. मिश्रण बर्‍यापैकी थंड होऊ द्यावे नाहीतर गोड -मिट्ट ऑमलेट खायला लागेल... Wink
- ब्राऊन शुगर, होलमिल फ्लावर वपरल्यामुळे पौष्टिक आहे.
- हवे असल्यास यात चिमुटभर दालचिनी पुड घालावी - स्वाद चंगला येतो (मला आवदत नाही त्यामुळे मी घालत नाही)
- आवडत असल्यास सर्व्ह करताना बटर, क्रीम, आइस्क्रिम घ्यावे.
- या सोबत कॅरॅमल टॉपिंग मस्त लागते.
- १ १/२ कप खजुरा ऐवजी - १ कप खजुर आणि १/२ कप अक्रोड घालु शकता.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाव, मस्तच. छान वाटतेय कृती.. करुन पाहायला हवी.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

दोन्ही कृती मस्त आहेत- ही अन् बिना अंड्याची- कोणतातरी एक नक्की करून बघणार.. Happy
-------------------------
God knows! (I hope..)

लाजो, मस्त आहे क्रुती. करुन कळ्वते नक्की.

काल रात्री केला. मस्तच झाला अगदी.

भरपुर हादडता यावा म्हणुन मी बटरच्या जागी ऑऑ आणि सेल्फ रेसिंग फ्लावर च्या जागी आपली साधी कणिक वापरली. त्यात एक चमचा बे.सोडा + एक चमचा बे. पावडर (बरोबर आहे ना? एकदोन तडे गेले लोफला वरुन. इथेच कुठेतरी वाचले होते की बे. पावडर जास्त झाली तर असे तडे जातात म्हणुन)

अर्थात कणीक दोन कप घेतली होती आणि बाकिचे पदार्थ त्या प्रमाणे वाढवले होते. मजा आली आणि अजुनही येतेय अर्थात.. ऑफिसातही आणुन इतरांना आनंदात सहभागी करुन् घेतले.

परत एकदा धन्यवाद.

(ब्राऊन शुगर मुंबईत कुठे मिळेल?? मला डिमार्ट वगैरे ठिकाणी कधी दिसली नाही)

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

ब्राऊन शुगर मुंबईत कुठे मिळेल??

>>>
अन्डर वर्ल्ड वाल्यांकडे मिळेल Proud

आणि साधना , तू सुद्धा.? शो. ना. हो.

आणि साधना , तू सुद्धा.? शो. ना. हो.
काय करणार?? माबोचे व्यसन लागलेयच.. मग काय एक खुन केला तरी फाशी, दहा खुन केले तरी एकच फाशी... असा विचार करुन लावुन घेतली इतर व्यसने....

दुकानात विचारायचा धीर होत नाही, 'ब्राऊन शुगर ठेवता का हो तुम्ही' म्हणुन, म्हणुन इथे विचारले.. Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

अरे व्वा, साधना, तुझे चेंजेस एकदमच हेल्दी आहेत. मी पण करुन बघिन पुढच्या वेळेस.

मुंबईत ब्राऊन शुगर कुठे मिळेल माहित नाही, पण ब्राऊन शुगर च्या ऐवजी रॉ शुगर शोधुन्/विचारुन बघ. ब्राऊन शुगर विचारलेस तर उगाचच गैरसमज होतिल.. हुडा सारख्यांचे... Happy

हुडा, दीवे घे रे बाबा.... Happy

खान्डसरी साखर म्हणतात ती हीच काय?

ही खांडसरी नक्की कशी दिसते हुडा? आमच्याकडे गुळाच्या पावडरी सारखी दिसणारा एक पदार्थ मिळतो, (चव पण गुळासारखीच असते) त्याला इथे शक्कर म्हणतात. (साखरेला मात्र चिनी म्हणतात).. आईला जेंव्हा शक्करचे वर्णन करुन सांगितले तेंव्हा ती म्हणाली बहुतेक खांडसरी असेल..
सासरी बर्‍याचदा लग्नाकार्यानंतर किंवा मुलाच्या जन्मानंतर वैगरे जेंव्हा गीत गाण्याचा कार्यक्रम होतो तेंव्हा येणार्‍या बायकांना लड्डुऐवजी पाव-पाव किलो शक्कर वाटतात.

पिवळट तपकिरी रंगाची साखर असते. स्फटिक ठिसूळ असतात . गोडीला कमीच असते.

images_2__6.jpg

बहुधा पलिकडची...

लाजो, आज केला हा लोफ. एकदम मस्त होतो..मी देखील कणीक घालुनच केला, बटरच्या जागी अगदी १/२ टे. स्पुन घरातले तुप घातले. धन्यवाद एवढी छान पा क्रु दील्याबद्दल Happy