अक्षदांना पर्याय

Submitted by भगवती on 25 May, 2014 - 22:54

लग्न किंवा मुंजीत अक्षदांना पर्याय काय आहे. तांदुळाची नासाडी वाचवण्यासाठी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कागदी फुले वापरली तर कीती कागदाची नासाडी होईल. त्यासाठी कीती झाडे तोडायला लागतील.
कागद रंगीत पाहीजेत म्हणजे कीती रंग वाया जाईल. आणि रंग तयार करताना प्रचंड प्रदुषण होते त्याचे काय करायचे?

काय करायचे, जगायचे तरी कसे?

ते तीन वेळा काहीतरी बोलल्यावर लग्न मोडतं त्या प्रथेविषयी लिहा ना गडे : ..................
..
.

मायाबॉलीवर अशी प्रथा नाही, हे तुमचे नशीब. तीन वेळा डिलिट करुनही तुम्ही अजुन आहातच जोशीबुवा!

आणि उगाच कुणा वाटेल त्याला जामोप्या बनवु नकआ.

लक्ष्मी गोडबोले तुम्ही पन कुणालाही जोशीबुआ बनवू नका कळ्ळ का भगवती उर्फ गजानन कागलकर कौंपाउण्डर

आणि उगाच कुणा वाटेल त्याला जामोप्या बनवु नकआ.>>> Biggrin

सही...सर्व पोस्ट्ला अनुमोद्न,गोडबोले साहेब.मला वाटतं थोडं इग्नोरास्त्र बरं पडेल 'विचापंतां'साठी.

>>> अक्षता ही तर फार फार छोटी गोष्ट आहे. <<<<< छोटी असली तरी "हिन्दू धर्मियान्चे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी उगाळण्याकरता" फारच मोठी व न झिजणारी आहे. तेव्हा यास अन्त नाही. Proud Lol
यावर पूर्वीही बरेच चर्वितचरण होऊन गेलय माबोवर.

विचारवंतांनी बरीच विचारवांती केलेली आहे ऑल्रेडी.
तिकडे दुर्लक्ष करू या.
*
'अक्षता' या कन्सेप्टबद्दल.

दिनेशदा म्हणतात, आरपार भोक पाडणारे किडे नसतात म्हणून तांदूळ = अक्षता.
किरणकुमार यांनी दोनदा लावणी करावी लागते म्हणून दुहितेचे प्रतिक ते अक्षता.

किरणकुमार, तुमचे लॉजिक चुकीचे वाटते. मुलीचे प्रतिक सगळ्यांनी मिळून फेकायचे/उधळायचे का? Proud

दिनेशदा,
हळद लावलेल्या पिवळ्या ज्वारीच्या 'अक्षता' पाहिल्यात का?

'अक्षत' धान्य, unblemished. तसाच तुमचा संसार होवो, किंवा फारतर तुम्ही आता नवे घर बनवत आहात, नव्या शेतजमीनीसाठी बियाणे म्हणून रुजवता येईल अशा धान्याची भेट निमंत्रितांनी द्यावी, वै.. अशी ती कन्सेप्ट असावी बहुदा.
*
यापलिकडे,

>>>आणि वधु / वर सोडुन दुसर्‍यांना अक्षता मारण्यात जी मजा आहे, त्याचे काय? +१<<

टोच्या, किरणकुमार,
कुणालाही अक्षता फेकून मारू नका. मारहाणच करायचीय तर थोडे दगड भरून आणा खिशात अन उघडपणे मारा ज्याला मारायचेत त्याला.
लग्न लावणारा पुरोहित, is doing his JOB. त्यात खोडा घालण्यासाठी अक्षता वापरणे = विकृती. त्यात काडीचीही मजा नाही.
*
शेवटी,
खाऊन माता. फेकून मातू नका. Happy

>>>कुणालाही अक्षता फेकून मारू नका. मारहाणच करायचीय तर थोडे दगड भरून आणा खिशात अन उघडपणे मारा ज्याला मारायचेत त्याला.>>

आता असे काही झाले तर ह्या पोस्टकडे बोट दाखवायला हरकत नाही Proud

>>>तिकडे दुर्लक्ष करू या.>>

काय रेSSSS देवा. अरे दुर्लक्ष उल्लेख न करता करायचे असते. पराभवाने काय हाल झालेत बिच्चार्‍याचे Lol

कुणालाही अक्षता फेकून मारू नका. मारहाणच करायचीय तर थोडे दगड भरून आणा खिशात अन उघडपणे मारा ज्याला मारायचेत त्याला.

मग दगड वाया जातील त्यावर धागा काढावा लागेल. Happy

मी अक्षता मारणे सोडून दिले आहे , कोण्या एके काळी आम्ही लहान असताना त्या गोष्टी करायचो.

मी प्रथम या धाग्याचे शिर्षक वाचले ,तेव्हा माझ्या मनात असा विचार आला कि,
कोणाच्यातरी पत्नीचे नाव अ़क्षदा आहे आणि तिच्या त्रासाला कंटाळून त्याने अक्षदाला पर्याय असा धागा काढून प्रतिक्रिया मागाविल्या असाव्या......... Rofl

मुळात लग्नात हे असे काहीतरी डोक्यावर टाकणे ही कल्पनाच रद्द केली जावी असे का नाही वाटत कुणाला (मला तरी वाटते)
आधीच एकतर एका लग्नामुळे अनेकांच्या डोक्यावर जबाबदार्‍या उधळल्या गेलेल्या असतात त्यात अजुन अक्षतांची भर कशाला ? Wink
पुर्वी जेव्हा ही कल्पना निघाली तेव्हा काही तरी लॉजिक असेल, पण आता सुद्धा जसेच्या तसे चालू ठेवणे खरेच योग्य आहे का याचा विचार व्हावा असे वाटते.

कोणाच्यातरी पत्नीचे नाव अ़क्षदा आहे आणि तिच्या त्रासाला कंटाळून त्याने अक्षदाला पर्याय असा धागा काढून प्रतिक्रिया मागाविल्या असाव्या>>> Rofl तेवढेच आता बाकि आहे. येतील आता असे बाफ ही.

निवांत, लक्ष्मी गोडबोले यांचा पहिला आयडी जामोप्या यांच्या पोष्टी वाचा जुन्या. पत्नीची तक्रार इथे करुन झालेली आहे Happy

Pages