अक्षदांना पर्याय

Submitted by भगवती on 25 May, 2014 - 22:54

लग्न किंवा मुंजीत अक्षदांना पर्याय काय आहे. तांदुळाची नासाडी वाचवण्यासाठी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

confetti. नाहि चालणार का? छान दिसतात, स्वस्त, मस्त. अन्न वाया गेल्याच दु:ख पण नाहि आणि खालि पडल्यावर एक रंगीबेरंगी नक्षी पण दिसते.

मुळात लग्नात हे असे काहीतरी डोक्यावर टाकणे ही कल्पनाच रद्द केली जावी असे का नाही वाटत कुणाला (मला तरी वाटते)
आधीच एकतर एका लग्नामुळे अनेकांच्या डोक्यावर जबाबदार्‍या उधळल्या गेलेल्या असतात त्यात अजुन अक्षतांची भर कशाला ? Wink
पुर्वी जेव्हा ही कल्पना निघाली तेव्हा काही तरी लॉजिक असेल, पण आता सुद्धा जसेच्या तसे चालू ठेवणे खरेच योग्य आहे का याचा विचार व्हावा असे वाटते.

अन्न्सुरक्षा योजनेतील तांदूळ घ्या अक्षतासाठी नाहीतरी कोणी खात नाही ..........................
अर्थात तेही तुम्हाला काळ्या बाजारानेच घ्यावे लागेल.

सुरेख चर्चा...लोकांचे बरेच कंगोरे कळून येतायत...काहींची तळमळ..काहीना बदलाची गरज....
ध. भगवती ह्या धाग्याबद्दल...
चालू दे...चालू दे...

१. सरळ अक्षता वापरा. त्या स्टेजवर जातानाच द्या व वधुवरांना शुभाशीर्वाद देताना टाका.

किंवा

२. कँसल करा व ते ४-५ किलो तांदुळ. (एवढे नसतात खरेतत) कुठल्यातरी गरीबाला देऊन टाका.

आम्ही आमच्या लग्नात अवलंबलेला मार्ग. अक्षता जश्या वापरल्या जातात तश्या वापरल्या (कुठलाही रंग न लावलेले तांदूळ. फक्त मूठभर अक्षता कुंकवात भिजवल्या). दुसर्या दिवशी लग्नाचा हॉल साफ केल्यावर जमा झालेला कचरा (ज्यात फुले अक्षता पानाचे विडे वगैरे सर्व बायोडिग्रेडेबल वस्तू) वेगळ्या केल्या आणि प्लास्टिकचा कचरा वेगळा केला. बायोडिग्रेडेबल कचरा पूर्णपणे स्वच्छ करून आमच्याच बागेतल्या झाडांना खत म्हणून वापरला. हे सर्व काम आमच्या धाकट्या बंधुराजांनी केले. घरामधल्या प्रत्येक पूजेला आम्ही असंच करतो. झाडांना चांगले नैसर्गिक खत मिळत असल्याने वाया काहीही जात नाही.

तांदूळ वाया गेले तरी किमान प्राणी पक्षी खाऊ शकतात. र्तांदळाइअवजी फुलांच्या पाकळ्या हा ऑप्शन परवडण्यासारखा नाही. जेवढ्या फुलांच्या पाकळ्यांचा खर्च होतो तेवढ्यात एका पंगतीचा भात शिजेल.. प्लास्टिकच्या अक्षता पर्यात वाचायला छान आहे. पण पर्यावरणासाठी तेवढाच हानीकारक. एकतर अक्षता फेकण्याइतक्या हलक्या हव्यात आणि खाली पडलेल्या अक्षता पाय देऊन चेपल्यावर कोण परत वापरणारे? म्हणजे त्यांची रवानगी होणार कचर्यामध्येच. दर लग्नाला दोन ते तीन किलो प्लास्टिकचा कचरा!!!! हे म्हणजे प्रॉब्लेमपेक्षा उपाय भयकर.

नंदिनीशी सहमत
महेश यांच्याशी जास्तच सहमत

हे काही तरी उधळणं हा प्रकारच बंद करुन फक्त टाळ्या वाजवल्या की झालं असं करायला हवं. शास्त्र म्हणून नवरा नवरीच्या आई वडीलांनी आणि बहिण भावानेच फक्त थोडेसे तांदुळ उधळावेत.

उपस्थिताना आधी वाटलेल्या अक्षता मंगालाष्टकं सुरूं होताना त्यांचाकडून ताटांत परत गोळा कराव्या व लग्न लावणार्‍या गुरूंजींच्या शुभहस्ते त्यांतील थोड्या नवदांपत्यावर उधळाव्या;>> माझ्या लग्नात असंच केलं होतं. अर्थात हॉलचे मालक (कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथील ओंकार मंगल कर्यालयाचे श्री. बापु नाईक) यांचीच ही कल्पना.

पुन्ह्हा पुन्ह्हा तेच तेच विषय....
मागे पण मी एकदा सान्गितल होत.
वधुवर वा मुन्जमुलगा यान्ना छान सजवुन धजवुन धोतर/कापडावर बसवावे.
शेजारी एक पोतेभर अस्सल घमघमाटी आम्बेमोहोर किन्वा दिल्ली बासमती तान्दुळ ठेवावा अक्षता म्हणून.
आमन्त्रितान्ना त्या पोत्यातून मुठमुठभर / ओन्जळभर तान्दुळ वधुवर/मुन्जामुलग्याच्या डोक्यावर शिवामुठीसारखे वहायला सान्गावेत.
आमन्त्रित सम्पले की नन्तर ते सर्व तान्दुळ गोळा करुन त्याची खिचडी करुन लग्नाचे जेवणात वाढावी! Proud
हाय काय अन नाय काय.......
यामुळे माझा काय फायदा? तर मन्गलाष्टके म्हणताना काही नतद्रष्ट कार्टे व हिन्दु धर्माला दूषण असलेले नालायक लोक नेम धरुन मन्गलाष्टके म्हणणार्‍या भटजीच्या तोन्डात तान्दुळ फेकुन मारतात, अन जमलेल्यातील कोणीही त्यास मनाई करत नाही! (मी एकदा झापला होता एकाला हाताला धरुन...फक्त कानफडवायचा शिल्लक ठेवला! मी अनुभव/अनुभुती अन प्रत्यक्ष कृतीशिवाय काहीच लिहित्/बोलत नाही Wink )

अक्षता हा एक संस्काराचा भाग आहे.त्याला पर्याय काढावा असे वाटत नाही.

अक्षता म्हणजे तांदूळ हे धान्य /रोपटे पिकविण्यासाठी ते दोन ठिकाणी रुजवावे लागते हे आपणास माहितीच आहे,लग्नातील वधूचे प्रतिक म्हणून आपण तांदूळ अक्षता म्हणून वापरतो वधूलाही तिच्या परिपक्वतेसाठी माहेर सासर असा प्रवास करावा लागतो हे त्यातून सुचवायचे आहे.
लग्नामध्ये अक्षतांसाठी होणारा खर्च इतर खर्चाच्या तुलनेत कमीच असतो, एकूणच जेवणाचा अंदाज चूकल्याने वाया गेलेले अन्न,दाग दागिन्यांचा भार,कपडे लग्ते,मंडप व्यवस्था किंवा कार्यालय यांचा विचार केला तर ...........

तसे अन्न किंवा तांदूळ वाया जाऊ नये म्हणून त्यांच्या लाह्या कराव्या आणि त्या अक्षदा म्हणून द्याव्या, यात केवळ आठ मंगलाष्टकांचे आठ लाह्या अक्षदा म्हणून टाकण्यास सांगावे आणि उरलेल्या खायला सांगा, मंदिरातल्या प्रसादाप्रमाणे त्याला लोक नक्की खातील.

अवांतर :
फक्त वधूनेच परिपक्व व्हायचं असतं का? वर माहेरीच राहत असल्याने त्याने परिपक्व होण्याची गरज नसते काय? :व्हॉट्सअ‍ॅपवरची डोळा मारून जीभ बाहेर काढणारी स्मायली:
:अवांतराबद्दल माफी द्यावी आणि ह्या पोस्टीचा अनुल्लेख करून बाफ पुढे चालवावा Proud

(facepalm)

ए लाह्या नको हा! त्या हलक्या असल्याने लांबवर उडणार नाहीत. त्यातून वर पंखा चालू असेल तर वधुवरांच्या दिशेने न जाता इकडे तिकडे कुठेही भिरभिरतील.

फक्त वधूनेच परिपक्व व्हायचं असतं का? वर माहेरीच राहत असल्याने त्याने परिपक्व होण्याची गरज नसते काय?

बहुतेक वेळा वर आधीच परिपक्व झालेला असतो Rofl
जसा वधूचा माहेर-सासर हा प्रवास अस्तो तसा वराचाही मूलगा ते नवरा हा प्रवास असतोच कि,

ए लाह्या नको हा! त्या हलक्या असल्याने लांबवर उडणार नाहीत

खर तर स्टेज सोडले तर कोणाच्याच अक्षता वधू वरापर्येंत पोहचत नाही. फक्त त्या दिशेने सोडले तरी आपण समाधान मानतोच न तसेच लाह्याचेही करायचे आणि खायचेही.

अक्षतांसाठी फेकणे, उधळणे इत्यादी वाक्प्रचार वापरलेले वाचून कीव आली.

>>>
इतरांचं माहीत नाही पण मी तरी अक्षरशः, शब्दशः 'उधळणे' या क्रियेबद्दल बोलतेय.
मी कित्येक लग्नात नवरा/नवरीला त्यांचे मित्रं, करवल्यांना कोण कोण, मित्रं एकमेकांना, स्टेजवरचे नातेवाईक एकमेकांना (यात कधी कधी नवरा नवरीचे आई- मावशी वगैरे ही होते) अक्षता शब्दशः मुठीमुठीने फेकुन मारताना पाहिल्यात. नवरा नवरीच्या अंगावर अक्षता न टाकता छताकडे 'उधळलेल्या' पाहिल्यात.

तू बहुदा पाहिल्या नसशील. आणि हा प्रकार पाहिला असशील तरी 'उधळणं' हा शब्द वाचुन किव आली असेल तर मग मात्रं Uhoh

फक्त त्या दिशेने सोडले तरी आपण समाधान मानतोच न तसेच लाह्याचेही करायचे आणि खायचेही. >>> मग आपल्याच ओंजळीतून पाखडल्यासारख्या उडवून झेलायच्या आणि खायच्या Proud

रिया, अगं पण ह्याचा अर्थ तसं करणं बरोबर आहे असा होत नाही Happy

४-५ किलोंच्या तांदुळांच्या नासाडी साठी फार च नाटक चालु आहे. लग्ना च्या जेवणातच कित्येक किलो अन्नाची नासाडी होते, त्या बद्दल काय?

तसे आपण प्रत्येक जण दिवसभरात कीतीतरी नासाडी करत असतो.

प्रत्येक गोष्टीचा बाऊ करण्यात काय अर्थ आहे. अक्षता ही तर फार फार छोटी गोष्ट आहे.

आणि वधु / वर सोडुन दुसर्‍यांना अक्षता मारण्यात जी मजा आहे, त्याचे काय?

येस अश्विनी Happy

मंजुडी, मी स्वतःवर ओढावून घेतलेलं नाही Happy

मी फक्त माझ्यापुर्त सांगितलं Happy

अक्षदा मारण्याचा प्रकार सर्रास चालतो,मी स्वतः कितीतरी वेळा मारल्यात आणि माझ्याबरोबरच्या लोकांनी भटजीच्या तोंडात नेम धरुन टाकल्यात मग फू फू करत मंगलाष्टके म्हणण्याची वेळ आली.

आणि वधु / वर सोडुन दुसर्‍यांना अक्षता मारण्यात जी मजा आहे, त्याचे काय?
+१

काल एका लग्नात गुरुजींने मंगलाष्टक सुरुहोण्यीपुर्वी विनंति केली की अक्शता मंगलाष्टक संपल्यावर वधुवर तमच्यापाशी ताट घेऊन येतील तेव्हा ताटात टाकायच्या व दुसरी सूचना - मंगलाष्टक चालू असताना गप्पा मारण्याएवजी नामस्मरण करावे किंवा श्लोक म्हणावे (अर्थात मनातल्या मनात . मंगलाष्टक सुरु झाल्यावर अक्शता टाकणारी एकच होती पण गप्पा मारणारे बरेच:)

अक्षदा मारण्याचा प्रकार सर्रास चालतो,मी स्वतः कितीतरी वेळा मारल्यात आणि माझ्याबरोबरच्या लोकांनी भटजीच्या तोंडात नेम धरुन टाकल्यात मग फू फू करत मंगलाष्टके म्हणण्याची वेळ आली.>>> Sad जे पौरोहित्य करणार त्यांचंच असं केलंत? कुणी भटजी लूट करत असेल तर ठामपणे विरोध करा, पण हे काय! तांदूळ हा खाद्यपदार्थ आहे म्हणून ही टवाळी जिवावर बेतणार नाही. उद्या प्लॅस्टिकचे तुकडे अक्षता म्हणून मंगलाष्टकं म्हणण्यासाठी उघडलेल्या तोंडात फेकून मारु लागलात तर काय होईल?

अक्षता ही तर फार फार छोटी गोष्ट आहे.>>> ते कसं काय? वाया जाणार्‍या अन्न घटकाचा विचार केल्यास(Quantitatively) ती मोठीच गोष्ट आहे.परंपरा मीही मानतो.पण म्हणून काहीपण मानायचं? Uhoh

आणि वधु / वर सोडुन दुसर्‍यांना अक्षता मारण्यात जी मजा आहे, त्याचे काय?>>> जुनं झालं की ते...कूठ्ल्या जगात आहात.

शहरी भागात सोडा.तिथे थोडासा तरी अवेअरनेस आला आहे.पण ग्रामिण ठिकाणी हे असं वाया जाणं,'उधळणं'अजूनही होतं.४-५ किलो जरी नसला तरी सरासरी दोन किलो तांदूळ आणि वर्षाला असा अक्षतांचा वापर होणारी कमीतकमी हजार लग्नं धरली(जास्तच असतात) तर दोन ट्न तांदूळ मातीत जात असेल. Sad

अन्न वाया जातं म्हणून तांदूळही वाया जाऊ द्यायचे??? काय तर्कशास्त्र आहे राव.

लग्नावर होतो ना खर्च्,अ़क्षतांवर होऊ दे थोडासा>>> प्रश्न खर्चाचा नाहीये मला वाटतं.मुद्दा अन्न वाया जाण्याचा आहे.

सगळ्याय सुंदर उपाय पाऊच करून अक्षता देणे आणि वधू-वरांना स्टेजवर भेटताना ते पाऊच आहेत तसे बाजूला ताटात ठेवणे.त्यातल्या काहीच्या नैसर्गिक(हळद आणि कुंकू लावून) अक्षता करून नंतरच्या विधींमध्ये वापरणे. फक्त लोकाना सांगायचेच कष्ट घ्यावे लागतील्,त्या अक्षतांचे काय करायचे.

उरलेल्या,बाकी अक्षतांचा वापर करणे तुमच्यावर.मग त्याची खिचडी करा,पुलाव करा,बिर्याणी करा नायतर परत विकायला ठेवा. :प
बाकी बहुतांश लोक अक्षता न वापराच्या बाजूने आहेत्,ते बरं वाटलं.

Pages