अक्षदांना पर्याय

Submitted by भगवती on 25 May, 2014 - 22:54

लग्न किंवा मुंजीत अक्षदांना पर्याय काय आहे. तांदुळाची नासाडी वाचवण्यासाठी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षदाऐवजी अक्षता हवं होतं.(अक्षदा म्हणतात कां?)

त्याला पर्याय-
एक तर वर दिलेला आहे. फूलांच्या पाकळ्या.

दुसरं स्टेजवर असणार्‍या लोकांनाच फक्त अक्षता देणे.त्याही मोजक्याच.

तांदूळ,हळद आणि कुंकू तेही कोरडे लावलेल्या ठेवायला हव्यात.No Artificial/Unnatural Colors.धुतल्यावर पुनर्वापर शक्य होऊ शकतो.पण ही स्टेजपुरती मर्यादा.

अगदीच तांदूळ द्यावा वाटत असेल तर त्याच्या बॅग्स करून व वधू-वरांना स्टेजवर भेटायला गेल्यानंतर त्याच्या हाती द्यायला हव्यात.(अर्थात ते पाऊच देताना सांगायला हवं...हे टाकण्यासाठी नसून स्टेजवर हातात देण्यासाठी आहे.) थोडासा विचित्र प्रकार वाटेल.पण पहील्यांदा सगळ्या नवीन गोष्टीत असच वाटत असतं.

वरील प्रकारात तांद्ळाची प्रत्/प्रकारही बदललात तरी चालेल.थोडा वाया जाईल या हेतूने इनएक्सपेंसिव्ह प्रकार निवडावा.

ध.

पर्याय-
१] " आपली उपस्थिती हाच अहेर व अक्षताही " , अशी टीप पत्रिकेत छापून लग्नात अक्षता वाटूंच नयेत;
२] उपस्थिताना आधी वाटलेल्या अक्षता मंगालाष्टकं सुरूं होताना त्यांचाकडून ताटांत परत गोळा कराव्या व लग्न लावणार्‍या गुरूंजींच्या शुभहस्ते त्यांतील थोड्या नवदांपत्यावर उधळाव्या;
३] कुटूंबातील अगदीं मोजक्या लोकांनाच लग्नविधींसाठी बोलावून [ किंवा नोंदणी पद्धतिने विवाह करून ] वेगळा स्वागत समारंभ ठेवावा.
[ प्लास्टीकच्या तांदूळांची कल्पना अजून कशी नाही निघाली ! Wink ]

अक्षदा सर् ळ स्टेजवर ठेवाव्या . पाहुणे वधू-वरांना स्टेजवर भेटायला गेल्यानंतर त्याच्या डोक्यावर टाकु द्याव्यात थोड्याश्याच.

आपल्याकडुन होणार्या मुठभर नासाडीची आपण चिंता करणे चांगली गोष्ट आहे. सरकार दरबारी होणार्‍या नासाडीचीही चिंता करा.

एवढीही असेल तर फुलांच्या पाकळ्या हाच पर्याय होतो., मग पुन्हा म्हणु नका अशी फुले कुस्करण्याला पर्याय??

अक्षता ह्या मंगल मानल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यांचा वापर केला जातोच.. लग्न कार्यात मंगलअष्टकांच्या वेळेस आलेल्या निमंत्रितांकडे अक्षत न देता ते जेव्हा वधू-वरांना भेटायला येतात तिथे एका तबकात अक्षता ठेवाव्यात त्या फक्त स्टेज वरच पडतील.. आणि अत्यंत कमी प्रमाणात लागतील.

बर्ड सीड चा वाप र केला जाऊ शकेल. शिरिष कणेकर ह्यांच्या अमेरिका प्रवास वर्णनात अमेरिके तील एका लग्न समारंभाचे वर्णन आहे त्यात बर्ड सीड्चा वापर केला आहे. सरकार मान्य बर्ड सीड घ्या. तो ओपन एअर व्हेन्यू होता. म्हणून चालले असेल कदाचित सरकारी नि यमांनुसारच काय ते वापरा. तुमच्या शहरातील रूल्स वाचले तर बरे पडेल.

ब र्ड सीड मुळे पक्षी येऊन घाण होण्याची शक्यता आहे. फुलांच्या पाकळ्या योग्य वाटतात.

उपस्थिताना आधी वाटलेल्या अक्षता मंगालाष्टकं सुरूं होताना त्यांचाकडून ताटांत परत गोळा कराव्या व लग्न लावणार्‍या गुरूंजींच्या शुभहस्ते त्यांतील थोड्या नवदांपत्यावर उधळाव्या;>>> मस्त ऑप्शन आहे हा!फक्त या वाटताना हातात न देता पॅकेट्मध्ये द्याव्या लागतील.

प्लास्टीकच्या तांदूळांची कल्पना अजून कशी नाही निघाली >>> लवकरच बघायला मिळणारेत त्यापण...हा ऑप्शन टाकणार होतो...

बेस्ट इलाज, रजिस्टर लग्न करून रिकाम्या खर्चांना फाटा द्यावा. पण तो सगळ्यांनाच मान्य होतो असे नाही.
पण, अक्षतांपायी धान्य वाया जाते हे बरोबर आहे. स्टेजवर नसलेल्या कुणाच्याही हातून तितक्या दूर अक्षता फेकल्या जात नाहीत. नंतर पायदळी तुडविले जाणारे धान्य पाहूनही वाईट वाटते.
तेव्हा,
रीतीप्रमाणे विधी करून लग्न करायचेच असेल, तर स्टेजपुरत्याच अक्षता वाटणे, पाहुण्यांनी त्या घेणे/उधळणे ऐच्छिक असणे, इ. पर्याय चांगले वाटतात.

अक्षदा नाही अक्षता...सॉरी गलती से मिस्टेक रेहनेका.

प्लॉस्टीकच्या अक्षता चालतील पण मेड इन चाईना नको Happy

प्लास्टीकच्या तांदूळांची कल्पना अजून कशी नाही निघाली >>> लवकरच बघायला मिळणारेत त्यापण...हा ऑप्शन टाकणार होतो...>>>>>

कशाला राव अजुन प्लॅस्टीक. त्या २० मायक्रॉन्च्या पिशव्या वापरायच्या सोडा म्हटलं तर अजुन चालुच आहे. त्या अक्षता कुणी रिसायकल करणार नाही. मग गटारी पॅक. त्यापेक्षा तांदुळ परवडला. बायोडिग्रेडेबल तर आहे , महाग असेना, कोणाच्या ताटातला का असेना. फुलं पयदळी गेली तरी वाईट का वाटतयं.... त्यांच लाइफ तेवढेच असते. तेपण बायोडिग्रेडेबल आहे.

तेंव्हा प्लिज प्लॅस्टीक सोडुन काहीही चालेल असे करा.

अक्षतांना पर्याय शोधण्यात अर्थ नाही. पर्यायी अक्षता शोधा. कागद वा इतर बायोडिग्रेडेबल पदार्थांपासुन बनवलेल्या, कमी खर्चात, सुबक आणि इन्नोवेटीव अक्षता बाजारात आल्यास त्याचे नक्कीच स्वागत होइल.

निवांतजी,त्या अक्षता टाकून झाल्या की पून्हा गोळा करून पुन्हा वापरता येतील हो. अशा कितीही वेळा वापरा ना हो त्याच त्याच. आणि एकदम कलरफूल...म्हणून म्हटले. बाकी प्लास्टीकचा मुद्दा पटला.

अहो लोक नारळ वापरत नाहीत परत ओटीत घालायला मग, टाकलेल्या अक्षता परत ते पण लग्नात आहात कुठे?

लोकं सर्टीफिकेट मागतील अक्षता व्हर्जिन आहेत त्याचं.

अक्षता म्हणजे काहीतरी वधुवरांवर फेकायचं म्हणून निर्माण झालेली वस्तू नाही. प्लॅस्टिकचे तुकडे फेकून मारण्यापेक्षा नुसते लग्नाला हजर राहून शुभाशिर्वाद दिलेले बरे.

१) अक्षतांची पुरचुंडी प्रत्येकाला द्यावी आणि मंगलाष्टक झाल्यावर त्या पुरचुंड्या गोळा करुन वधुवरांना द्याव्यात. त्याच परत पुढच्या कार्यासाठी कार्यालयाने वाटण्यासाठी वापराव्यात. वधुवर म्हणजे काही देव नाहीत त्याच अक्षता न वापरायला. देव/देवीसाठी नारळ अर्पण केला जातो त्याचा प्रसाद होतो. अर्पण केलेला प्रसादच (देवाचे उच्छिष्ट) परत त्यालाच नव्याने भोजन्/नाश्ता Proud म्हणून अर्पण करणे टाळण्यासाठी तोच नारळ परत वापरला जात नाही.

२) फक्त स्टेजवर जमा झालेल्या मोजक्याच मंडळींनी अक्षता टाकाव्यात. बाकिच्यांना देऊच नयेत. फारतर पाव-अर्धा किलो तांदुळ लागतील. पायी तुडवले जाणार नाहीत.

अश्विनीताई काहीतरी नवं सांगा की.

लोकं सर्टीफिकेट मागतील अक्षता व्हर्जिन आहेत त्याचं.>>> निवांतजी कूल घ्या. अजून नवा पर्याय सुचतो का बघुया...

बाकी भगवतीना पटलेलं आहे.चायनामेड नसतील याची गॅरंटी...पण उद्या चायनावाल्यांनी त्याची कॉपी केली तर? Proud

आजकाल बरेचदा आमंत्रित स्टेजवर जाऊन वधू-वरांच्या / बटूच्या डोक्यावर वर्षाव करताना बघितलेले आहे, तशीच मुळात पद्धत असावी असे वाटते. थोडीफार लहान मुलं खेळू शकतात अक्षतांशी. कार्य म्हंटल की थोडंफार इकडे-तिकडे होतातच गोष्टी, अशी किती नासाडी होणार आहे तांदळाची? अक्षता-वर्षावाच्या मागचे कारण पटत नसेल किंवा इतर काही कायदेशीर अडचण असेल तांदूळ वापरायला तर मग वेगळी गोष्ट.

पोस्ट विषयाला धरून नाही ह्याची जाणीव आहे.

अक्षतानाच वाटाण्याच्या अक्षता लावणं >>>+१००.वर एकानी(इब्लीस यांनी) सांगितलेय तो पर्यायही चांगला आहे.रजिस्टर लग्न करा,अक्षता,अन्न भरपूर वाचवा.

अशी किती नासाडी होणार आहे तांदळाची?>>>अहो नुसत्या एका लग्नामध्ये चार-पाच किलो तांदूळ सहज जातात.करा हिशेब.परवा एका लग्नात आमच्या समोर पंधरा कि.चं पॅक फोडलं अक्षतांसाठी.बोला...

आयुष्यात एकदाच लग्न करायचे असेल तर चारपाच किलो तांदूळ वाया घालवायला हरकत नाही.
वरचेवर लग्न करणार्‍यांनी प्लास्टिकच्या अक्षता वापराव्यात.

कुठलाही किडा तांदळाला आरपार भोक पाडू शकत नाही, म्हणून त्या अ-क्षता.
अक्षरशः किलोकिलोने नाश होतो तांदळाचा. शकुनापुरत्या टाकून बाकिच्यांनी टाळ्या वाजवल्या तर काय बिघडते ?

काही नुकसान न करणार्‍या पण अर्थपूर्ण प्रथा मात्र नजरेआड केल्या जातात. उदाहरणार्थ जन्मदिवसाच्या आरतीत गवत आणि कापूस ठेवायचा असतो. हरळीसारखा वंश वाढू दे आणि कापसासारखे म्हातारपण येऊ दे, असा त्याचा अर्थ. ते सोडून... जौ द्या.

छोट्या पिशवीत आक्षता द्या पण त्या वधु वरांवर उधळण्या ऐवजी स्टेज वर वधु वराच्या कपाळा लावा आणि एका भांड्यात गोळा करा आणि कुणा गरीबाला द्या... दुवा मिळेल Happy अर्थात या अक्षतांना कुठलेही घातक केमिकल्स (रंग) लावलेले नसावेत.

चांगला चर्चा विषय..कार्यात नतर कुठेही पायात येणाऱ्या अक्षता पाहून वाईट वाटते! सुट्या अक्षतांऐवजी छान आकर्षक प्लास्टिकच्या balls मध्ये भरून किंवा तत्सम स्वरूपाचे काही तयार केले (काहीतरी पारदर्शक, नेमके कसे ते सुचत नाहीये ह्या क्षणी) जे पुन्हा गोळा करता येतील तर चांगले होईल. बऱ्याच लग्नात फक्त स्टेजवरच्या लोकांना अक्षता असेही पाहिले आहे.

< अर्पण केलेला प्रसादच (देवाचे उच्छिष्ट) परत त्यालाच नव्याने भोजन्/नाश्ता फिदीफिदी म्हणून अर्पण करणे टाळण्यासाठी तोच नारळ परत वापरला जात नाही.>
असे होतच नसेल याची खात्री आहे का? वाहिलेले नारळ मागील दाराने बाहेर जाऊन पुन्हा देवळापुढल्या दुकानात येत नसतीलच का? सगळे नारळ वाहताच देवाच्या पायाशी फोडले जातात का?

अक्षता प्लास्टिकच्या एखाद्या आवरणात भरून द्यायच्या म्हणजे पुन्हा प्लास्टिक आले.

यापेक्षा आजकाल लग्न आणि स्वागतसमारंभाची वेगवेगळी आमंत्रणे निवडायची पद्धत रूढ होते आहे त्यात आणखी एक भर घालून अक्षता (हव्याच असतील तर) त्यासाठी आणखी एक वेगळा पंक्तिप्रपंच करावा. अशा खास आमंत्रितांना मोजक्या अक्षता द्याव्यात आणि कार्यभाग साधावा. फक्त स्टेजवरच्याच लोकांना अक्षता देण्यात कोणाला काही खटकण्यासारखे नाही.

Pages