जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्याचार तर आहे ना.....
आणी प्यार म्हणाल तर आदित्यचे मेघनावर आहे ते काय आहे???
जलवा मात्र मिसीन्ग आहे...

इथे लेखक नीट मांडणी करत नाहीये, ह्या दोघांमधले प्रॉब्लेम्स बाकीच्यांना सहज कळत आहेत. sorry दुसऱ्या मालिकेची तुलना करतेय मी पण 'माझे मन तुझे झाले' मध्ये सहा महिने नायक-नायिकेत खूप प्रॉब्लेम्स होते पण ते त्यांच्या चार भिंतीच्या बाहेर कधीच आले नाही, तिथेपण एकत्र कुटुंब आहे आणि इतरांसमोर दोघेही एकमेकांचा रिस्पेक्ट करून सांभाळून घ्यायचे एकमेकांना, हे कौशल्य त्या मालिकेतील लेखक आणि दिग्दर्शक यांचे नक्कीच आहे, अगेन sorry अवांतर लिहिले म्हणून पण लिहावेसे वाटले.

इथे लेखक नीट मांडणी करत नाहीये, ह्या दोघांमधले प्रॉब्लेम्स बाकीच्यांना सहज कळत आहेत. >>>>>>.. तो आदित्य नीट वावरतो ( अपवाद फोटो प्रकरणाचा ) पण प्रत्येक वेळेला मेघनाच थोबाड पाडुन असते

अवांतर : 'माझे मन तुझे झाले' मधील जोडी आवडतेय मला. तो शेखर (सर) तर क्युट आहे अजून मिस कुलकर्णीच म्हणतोय बायकोला. Happy
शुभ्राची आज्जी तर क्युटेस्ट!!

अन्जू कोणाची विपू बघू? माझी? पण त्यात तर काहीच अपडेट्स नाहीयेत Uhoh
विपू पण आपोआप एडीट / डीलीट होऊ लागल्या की क्कॉय!!

हरे रामा, आज मेदे रडायला अंगणात जौन बसते आणि सुमो तिची समजूत घालतात. आणि विशेष म्हणजे त्या भोचक शेजारणी येत नाहीत ही का रडतेय ते बघायला.

आज दोन्ही आदित्य समोरासमोर येऊन मेघनाबद्दल गप्पा मारत होते. मला वाटलं आदे फाच ला कन्यादान करणार म्हणून.

आज मेदे रडायला अंगणात जौन बसते <<< Lol

म्हणजे ती अशी रोज वेगवेगळ्या जागा शोधते का त्या त्या दिवशीचं रडायला? Proud

कन्यादान<<< Lol

म्हणजे ती अशी रोज ...>>> Lol
तसेही तिचे सगळीकडे रडून झाले आहे. कालच अर्चना तिला बोलली तेव्हा लगेच रडत गेली.

मेघना माईला विचारते,"आपल्याला काही मिळालेलं असतं आणि आपण ते स्विकारलेलं नसतं...इन फॅक्ट नाकारलेलंच असतं. मग ते आपल्यापासून दूर जातंय अस कळल्यावर भिती वाटायला लागते. ह्याचा अर्थ कसा लावायचा?"
हिला सगळे बाकिच्यांनी सांगायला पाहिजे. स्वतःचे डोके वापरायचेच नाही असे ठरवून टाकल्याचे दिसते.

कन्यादान >> Lol

मेघना माईला विचारते,"आपल्याला काही मिळालेलं असतं ... >> ह्यांना सरळ स्वच्छ शब्दात सांगता येत नाही का? सारखं तेच तेच

म्हणजे ही बया अजूनी १०० वर्ष घेणार<<<

त्या मेघनाला ती हल्ली कुठली जाहिरात लागते टीव्हीवर, तिथे पाठवून द्या.

इन्डियन मेन वॉन्टेड! कम टू माय बोट पार्टी वाली!

चनस,

ते नाही का? बोटीवर बसलेली एक मुलगी म्हणते?

'इन्दियन मेन! सो स्वीत! बट दे लिव वित देअर मामा! इव्हन दे वॉच तीवी सोप अ‍ॅन्ड क्राय वित देअर मामा! कम तू माय बोत पार्ती'

बहुतेक हीच लिंक असावी.

'इन्दियन मेन! सो स्वीत! बट दे लिव वित देअर मामा! इव्हन दे वॉच तीवी सोप अ‍ॅन्ड क्राय वित देअर मामा! कम तू माय बोत पार्ती बत दोन्त कम विथ यूवर ममा'

>> बेफी आणि दक्षा कसलं क्युट लिहिलंय. म्हणजे ती अ‍ॅड हजार वेळा पाहिलीये पण तुम्ही फुल्टू तिच्या अ‍ॅक्सेंट मध्ये लिहिलंय ते एकदम गोग्गोड वाटतंय (ते बोलणार्‍या जाहिरातीतल्या मुलीसारखं). Lol

(अवांतरः या जाहिरातीवरुन एक जोक पण आहे 'रागां'वर. त्याला बोट पार्टीत घेत नाहीत कारण तो त्याच्या 'मामा' (ममा) बरोबर जातो म्हणुन.. Happy

(अवांतरः या जाहिरातीवरुन एक जोक पण आहे 'रागां'वर. त्याला बोट पार्टीत घेत नाहीत कारण तो त्याच्या 'मामा' (ममा) बरोबर जातो म्हणुन<<<

असंय होय? मला वाटले 'इन्डियन' किंवा 'मेन' ह्यातील कोणतीतरी एक अट पाळण्यास तो असमर्थ ठरल्यामुळे की काय!

मला त्या addमध्ये ती काय बोलते ते आज इथे कळलं, इतके दिवस ती काय बोलते ते कळतच नव्हतं.

Pages