जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय ते ध्रुव तार्‍याचं नाटक सुरू होतं काल Sad अतिच जरा.

आणि चित्रकला, भूगोल.. या सर्वां विषयी जे काही ज्ञान आहे ते फक्त या मेघनीला. बाकी सगळे आडाणी ढेंगेच जणू Angry

बाप रे एव्हढ्या मोठ्या देशात निवडणुका होऊन अभूतपूर्व असे सत्तांतर झाले तरी मेघनाला आदे की आन यातील एकाची निवड करता येवू नये? कठीण आहे!

बाप रे एव्हढ्या मोठ्या देशात निवडणुका होऊन अभूतपूर्व असे सत्तांतर झाले तरी मेघनाला आदे की आन यातील एकाची निवड करता येवू नये? कठीण आहे! >>>>> अहो सत्तांतर करायला भारतातले काही कोटी लोक एकत्र होते हो! इथे ही एकटीच...

दक्षे आणि ते ध्रुवताऱ्याचे नाटक मेघनाची सासू आणि नवरा किती कौतुकाने बघत होते मी channel बदलले पार डोक्यात गेले आमची मेघना कित्ती हुश्शार.

सुजा लगोरीमध्ये चैताली गुप्ते आहे.

बाप रे एव्हढ्या मोठ्या देशात निवडणुका होऊन अभूतपूर्व असे सत्तांतर झाले तरी मेघनाला आदे की आन यातील एकाची निवड करता येवू नये? कठीण आहे!>>>>>> हे पण "तू तिथे मी " च्या वळणावरच आहे… दोन वर्षानंतर अचानक जाग येईल आणि दोघांना महाबळेश्वर ला हनिमून ला पाठवतील.
तू बघत राहा …। हि हि हि

तु तिथे मी सारखी इथेदेखिल काही वर्षांची लिप घेतली तरी मेघना आदित्य देसाईच्या घरी राहुनच आदु आदु करत बसलेली दिसेल.

हा बाफ उघडला की सानीचा पहिलाच प्रतीसाद लगेच वाचायला मिळतो, पण आता जाणवत की मेघना नावाच भेदरलेले कोकरु मोठी बकरी बनलय, तरी बे बे नीट करत नाहीये.
>>>
Rofl

रच्याकने मला असं वाटतय की फायनली आदे आणि मेदे नीट रहातील आणि आदुचं लग्न त्यी शेजारणीशी (जिचा नवरा सैन्यात आहे. तो मरेल... मग या मेदेला 'नवरा' असणं किती गरजेचं असतं याची (:अओ: ) जाणीव होईल आणि मग ती आदेवर प्रेम आहे हे कबुल करुन टाकेल) होईल आणि मग आदे, आन, मेदे तिघं मिळून देसाईवाडीत सुखाने संसार करतील Proud

सत्यजित मुधोळकर, मी नीट ऐकलं, ते झिंगल तानानीनी रे ताना नाना ना असं आहे Proud

तिला आदे आवडत आहे तसेच तिला आदु कोठे आहे-काय करतो याचे काहीही पडलेले नाही...तरीही वेळ घेतेय....

तु तिथे मी सारखी इथेदेखिल काही वर्षांची लिप घेतली तरी मेघना आदित्य देसाईच्या घरी राहुनच आदु आदु करत बसलेली दिसेल.>>> Proud आणि मग त्यांची मुलं तिला विचारतील....'कधी निर्णय घेणार?'

रिया, कशाला गं मारतेस त्या सैन्यातल्या माणसाला? पुन्हा तिच्या पुनर्वसनाची (?) जबाबदारी देसाई वाडीवर येऊन मालिका आणखी लांबेल ना!
सोनाली, तिला आदे आवडत आहे तसेच तिला आदु कोठे आहे-काय करतो याचे काहीही पडलेले नाही...तरीही वेळ घेतेय....
असं नाही म्हणायचं गं, लेखक मालिकेत पाणी घालतो आहे असे म्हणायचं!
जर ती मेघना आदे कि आन हेच ठरवु शकत नाही तर मुलांचा प्रश्नच येत नाही. आदे सदैव रडका चेहरा घेऊन बसणार आहे. Sad
जर आदे मेघनाच्या आईवडिलांचा सांभाळ करायला तयार आहे तर मेघनाने सरळ त्याला सांगायचं ना कि मी तर तुला सोडुन माझ्या आदुकडे जाणार आहे. मग तु कशाला माझ्या आईवडिलांची काळजी करतोस, माझा आदु घेईल ना माझ्या आईवडिलांची काळजी. तु जर माझ्या आईवडिलांची काळजी घेणार असशिल तर आत्ता जाते मी माझ्या आदुकडे. मी माझ्या आदुकडे गेल्यावर दुसरे लग्न करायला तु तुझ्यासाठी दुसरी मुलगी शोध. Happy

बाबाजी फोटोत गेल्याशिवाय हि मालिका पुढे सरकणे अशक्य आहे. Sad

Lol बेफिकीर....
ताणत राहू रेशीमगाठी >>>>
ना तोडू ना जोडू ना संपवू ,
त्रिशंकू अवस्थेत टांगून ठेऊ,
झी मालिकांची परंपरा चालवू,
मा.बो. धाग्यावरी गंमत पाहू,
अखंड अनंत....ताणत राहू रेशीमगाठी

रच्याकने....आदे-मेदेंची घिसीपिटी कोर्टशिप पाहता 'यादें' मधल्या सुभाष घईंसारखं दिग्दर्शकाने दर्शन देऊन ' ये तो होगा जी, ये तो होगा ' असं म्हणायचं राहिलं आहे फक्त....

ताणत राहू रेशीमगाठी>> Rofl

हम दिल दे चुके सनम कसा २ तासात संपवला होता. त्याचे काहीशे भाग करायचे म्हणजे येर्‍यागबाळ्याचे काम नाही. Proud

रच्याकने मला असं वाटतय की फायनली आदे आणि मेदे नीट रहातील आणि आदुचं लग्न त्यी शेजारणीशी (जिचा नवरा सैन्यात आहे. तो मरेल... मग या मेदेला 'नवरा' असणं किती गरजेचं असतं याची (अ ओ, आता काय करायचं ) जाणीव होईल आणि मग ती आदेवर प्रेम आहे हे कबुल करुन टाकेल) होईल आणि मग आदे, आन, मेदे तिघं मिळून देसाईवाडीत सुखाने संसार करतील फिदीफिदी

सत्यजित मुधोळकर, मी नीट ऐकलं, ते झिंगल तानानीनी रे ताना नाना ना असं आहे फिदीफिदी

हे वाक्य वाचून डोळ्यापुढे चित्र उभ राहील
एका बाजूला आदे एका बाजूला आन आणि मधे मेघना दोघांचा हात धरून त्यांच्या मधे उभी आहे।
आणि माई अतिशय कौतुकाने त्या तिघांकडे बघतायेत Biggrin Biggrin Biggrin Biggrin Biggrin :खोखो::D Lol Lol

आज काय ती झुरळ बघून आरडाओरड ! तो सीन कशाबद्दल होता काहीच कळलं नाही.>>>>>>>>>>> फुग्याचा सीन आणि रॉकेट प्रकरण का घुसवलेलं ते ही कळलं नाही....वेळ काढायला होते हे दोन्ही सीन्स

आज मेघनाने नवीन(असावा कदाचित) टॉप घातला होता.आगदि बेड्शीट च शिवल्यसारखा वाटत होता.त्या पेक्षा तिचा आइ चा साड्या बर्‍या वाटतात.

Pages