गुरुदक्षिणा :- पियानो

Submitted by pinkswan on 10 May, 2014 - 00:07

गेले काही महिने मी हौस म्हणून पियानो चा क्लास करत होते... काही कारणास्तव मला तो बंद करावा लागला. Sad
मग टिचर चा निरोप घेताना तिला आपली आठवण म्हणुन काहितरी गिफ्ट द्यावे असे मनात आले. शिवाय ५मे ते ९ मे 'टिचर्स अ‍ॅप्रिसिएशन वीक ' ...त्या करता सुधा पियानो टिचर ला काहितरी द्यावे लागणारच होते . काय द्यावे हे सुचत नव्हते ,टिचर इजिप्शियन ..मग काय द्यावे म्हणून गुगल फिरले...तर त्यावर पियानो टिचरला काय देता येईल याची भरमसाठ चित्रे आली..त्यातलेच एक आवड्ले आणि माझी 'गुरुदक्षिणा ' बनली. Happy

खुप विचार करुन आणि बर्‍याचदा चित्र पाहुन एके दिवशी पियानो करायला सुरुवात केली. साधारण १० -१२ सेमी इतके माप ठरवुन अंदाजे विणायला सुरुवात केली. २ दिवसात २-४ दा उसवाउसवी करुन पियानो चा बेस बनला....
हा असा...

IMG-20140510-WA0004.jpg
पण पाय कसे विणावे ते सुचेना..मग काय एका गुरुला दक्षिणा देण्याकरता दुसर्‍या गुरुचा धावा केला Happy आरतीताई (अवल) ने सांगितले तसे प्रयत्न करुन पियानो चे पाय विणले आणि तयार झाला माझा क्रोचेट पियानो..
अगदी परफेक्ट नाही ..पण ज्या टिचरला तो दिला तिला तो आवडला Happy
आणि माबोकराना? Happy

IMG-20140510-WA0003.jpgIMG-20140510-WA0001_0.jpgIMG-20140510-WA0002.jpgIMG-20140510-WA0006.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या माझ्या विद्यार्थिनीचे मला फार फार कौतुक वाटते. खरेतर कला ही शिकवून येणारी नाहीच. त्याचे तंत्र शिकवता येते. ते फक्त मी शिकवले. पण कला मात्र तिची स्वतःचीच.
मी जे आणि जसे शिकवले, ते आणि तसे ती शिकली. इतकेच नव्हे तर स्वतंत्र पणे स्वतः काही करायला पाहिले. हे असे बोट सोडणे खरे सगळ्यात अवघड. पण तिला ते पण जमले याचा मला सगळ्यात आनंद आहे Happy त्याशिवाय खरा कलाकार समोर येत नाही ( उभरके नहीं आता )
खूप खूप अभिमान आहे मला तुझा वंदना Happy अशी विद्यार्थिनी मिळाली हे माझे भाग्यच ! तू दिलेला आनंद मला कायम बळ देत राहील नवीन काही करायला !
अनेक छान आणि कष्टाळू विद्यार्थिनी मिळण्यात मी नशीबवान खरीच. आणि मायबोलीने असे कितीतरी विद्यार्थी मला मिळवून दिले , धन्यवाद मायबोली Happy

किती सुरेख आणि कल्पक! pinkswan तुझं खरंच कौतुक.

अवल, तू एक उत्कृष्ट शिक्षिका आहेस याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. तुझं मनोगत आवडलं.

वा, काय सुंदर चीज केली आहेस गं Happy मूळ कल्पना आणि तिचं प्रत्यक्ष रूप, दोन्ही अवघड..

अवल, क्या बात है.. गुरू आणि विद्यार्थिनीचा समसमा योग ! आम्हाला मेजवानीबद्दल तुम्हा दोघींनाही धन्यवाद Happy

साष्टांग लोटांगण या अर्थाची स्मायली मायबोलीने लवकरच आणावी अशी आग्रहाची विनंती आहे....

सुंदर हा शब्द थिटा आहे पण काय करु सुचतच नाहीये दुसर काही छानस...

मस्त मस्त मस्त आहे पियानो...

अशी कल्पना डोक्यात येण आणि नंतर ती इतक्या अप्रतिम रित्या प्रत्यक्षात येणं सगळच ग्रेट. आणि अवलही ग्रेट मार्गदर्शनासाठी.

काय सुंदर आणि पर्फेक्ट बनवला आहेस!! तुझं कौतुक करावं तितकं थोडंच आहे!! ..:स्मित:

>>>>या माझ्या विद्यार्थिनीचे मला फार फार कौतुक वाटते. खरेतर कला ही शिकवून येणारी नाहीच. त्याचे तंत्र शिकवता येते. ते फक्त मी शिकवले. पण कला मात्र तिची स्वतःचीच.
मी जे आणि जसे शिकवले, ते आणि तसे ती शिकली. इतकेच नव्हे तर स्वतंत्र पणे स्वतः काही करायला पाहिले. हे असे बोट सोडणे खरे सगळ्यात अवघड. पण तिला ते पण जमले याचा मला सगळ्यात आनंद आहे स्मित त्याशिवाय खरा कलाकार समोर येत नाही ( उभरके नहीं आता )
खूप खूप अभिमान आहे मला तुझा वंदना स्मित अशी विद्यार्थिनी मिळाली हे माझे भाग्यच ! तू दिलेला आनंद मला कायम बळ देत राहील नवीन काही करायला !>>>> अवल, तुझं हे मनोगत मला खूप आवडलं! Happy तू वंदनाचं अगदी नेमक्या शब्दांत वर्णन केलंस!!

_____________/\___________________ दुसर काही नाही...

ते पाय फक्त विणुन त्यात इतकी स्ट्रेन्थ आली आहे कि त्यात सपोर्ट्ला काही आहे?

<< साष्टांग लोटांगण या अर्थाची स्मायली मायबोलीने लवकरच आणावी अशी आग्रहाची विनंती आहे....>> जोरदार अनुमोदन ! पियानो टीचर हें बघून एव्हाना बहुतेक यासाठी तुमचे शिष्य/शिष्या झाल्याच असतील !!

मस्त !
गुरू आणि विद्यार्थिनीचा समसमा योग ! आम्हाला मेजवानीबद्दल तुम्हा दोघींनाही धन्यवाद >>> + १ Happy

Pages