खिमा-पाव

Submitted by डीडी on 5 May, 2014 - 01:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२५० ग्रॅम मटण खिमा
१ मोठा कांदा
१ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
२ हिरव्या मिरच्या
२ टोमॅटो
१ दालचिन काडी
१ काळी वेलची
२ हिरवी वेलची
१ तमालपत्र
१ चक्रफुल
१/२ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
१ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून जिरं पावडर
२ टीस्पून धणे पावडर
३ टेबलस्पून तेल
१/२ लिंबाचा रस
मीठ
मुठभर कोथंबिर
५-६ पाव

क्रमवार पाककृती: 

खिमा पाव करायला खूप दिवस टाळाटाळ करत होतो. पण कालचा रविवार सत्कारणी लावला. खूप सोपी आणि झटपट होणारी पाकृ असल्याने मध्येच करायला हरकत नाही असं ठरवलं. Happy

चला, लागुया कामाला...

खिमा एका चाळणीत घ्यावा. चाळणीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात चाळण बुडवून खिमा हलक्या हाताने धुवून चाळण बाहेर काढावी. अशाप्रकारे २-३ वेळा खिमा धुवावा, जेणेकरून लालसरपणा आणि वासाची उग्रता कमी होईल. खिमा साधारण १० मिनिटं चाळणीत निथळत ठेवावा.

----

जाड बुडाच्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात दालचिन, वेलची, तमालपत्र आणि चक्रीफुल परतून घ्यावं. त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची बारीक चिरून घालावी. मंद आचेवर कांदा गुलाबी होईपर्यंत परतावे. आता त्यात धुवून निथळत ठेवलेला खिमा घालून ५ मिनिटे परतावा.

आता त्यात बारीक चिरलेले टोमॅटो, गरम मसाला, हळद , जिरं पावडर, धणे पावडर, तिखट आणि मीठ घालून परतून घ्यावे. साधारण १०-१२ मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावे. गरज लागल्यास अगदी थोडं पाणी शिंपडावे. खिमा तेल सोडू लागल्यावर लिंबाचा रस घालावा. आच बंद करून वरून बारीक चिरलेली कोथंबिर घालावी.

पाव दोन्ही बाजूने ओव्हनमध्ये किंवा तव्यावर थोडे भाजून घ्यावेत आणि मध्ये कापून त्यात खिमा घालून, आवडत असल्यास थोडा कांदा घालावा.

Happy

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी
अधिक टिपा: 

खिमा कोवळ्या मटणाचा असावा. वासही कमी येतो आणि शिजतोही लवकर.

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करणे वर्ज्य असल्याने नुसता खाण्यात येईल.>>>:फिदी:

खाणे पण वर्ज्य असल्याने नुसताच फोटो बघण्यात येईल.:फिदी:

अदिति, आभार! कुठलाच अख्खा मसाला चटकन न दिसण्यासारखा नाही आहे.. त्यामुळे जे काही आहेत ते पावात भरण्यापूर्वी सहज काढता येऊ शकतात.. Happy चिकनचा अजून करून नाही पहिला, पण मसल्यांचं हेच प्रमाण ठेवलं तर चिकन खिम्याचं प्रमाण अजून थोडं वाढवता येऊ शकतं.. अर्थात ते शिजेलाही लवकर.

मटण वर्ज्य असल्याने चिकनचा करण्यात येईल!
>>>>>>>>>>> चिकन पेक्षा मटन ची चव भारी असते.....पक्के मांसाहारी हेच सांगतील... Wink

छान रेसिपी आणि फोटो. कॉलेज कँटीनला प्रचंड स्वादिष्ट खिमा पाव मिळायचा. त्यामुळे खिमा म्हंटलं की त्याच आठवणी येतात.

फोटो प्रचंड तोंपासु !
मटण खिमा चिकन खिम्यापेक्षा चविष्ट लागतो हे खरेच ! साधारण तुम्ही केलाय तसाच करते. फक्त कांदा टोमॅटोबरोबर मटार आणि नंतर सुकं-ओलं जे घरात असेल ते खोबरं दोन चमचे घालते. लिंबाच्या रसाने चव खुलते खिम्याची Happy
क्वचित कधी भोपळी मिरची घालते थोडी बारीक चिरुन पण नेहेमी नाही.

फोटो प्रचंड तोंपासु !>>>+१

फोटो पाहुन हिल रोड, बांद्रा येथील Hearsch Bakery मधील व्हेज/नॉनव्हेज रोल आठवला आणि नॉस्टेल्जिक झालो. Happy

फोटो पाहुन हिल रोड, बांद्रा येथील Hearsch Bakery मधील व्हेज/नॉनव्हेज रोल आठवला आणि नॉस्टेल्जिक झालो>>>>>>>>>>>.. बर्गर पण

करणे वर्ज्य असल्याने नुसता खाण्यात येईल.>>>:P Proud Proud

खाणे पण वर्ज्य असल्याने नुसताच फोटो बघण्यात येईल.:P Proud :फिदी:>>>>

करणे व खाणे दोन्हीही वर्ज्य नसल्याने करुन खाण्यात येईल.....:D Lol Lol

मटण आणि चिकन असे दोन ऑप्शन ठेवले तर आपली पसंती मटणच ! खीमापाव लै भारी ! फोटो पण मस्त.. लौकरच उन्हाळी संडे सत्कारणी लावणार !

सहीच, आज घरी खिमापावच आहे आणि माझी नजर नेमकी या धाग्यावर.

आमच्याकडे देखील नेहमीच चिकनपेक्षा मटणलाच जास्त पसंती.
तसेच चिकन म्हटले की गावठी कोंबडीच हवी, ब्रॉयलर आजवर नाही आणली.

बाकी माझ्यासाठी रविवारचा मांसाहार न करणे हे वर्ज्य असल्याने मजबूत ताव मारण्यात येईल.

वजन आटोक्यात ठेवायचे आहे, कोलेस्टेरॉल इ. कंट्रोल करीत आहात, बीपी वाले इ. लोकांनी रेड मीट उर्फ मटन टाळलेले बरे असते. आपल्याकडे लीन मीटचा खिमा सहसा करून आणला जात नाही. जो खिमा आपण आणतो त्यात काय असते, ते आपणा सगळ्या कार्निव्होर्सना ठाऊक आहे.

अर्थात, या सर्व प्रकारामुळे मी चिकन प्रीफर्ड असे म्हटले होते, बाकी काही नाही.

मटनाची चव चिकनला येत नाही, हे सांगावे लागावे असा नवखा नॉनव्हेजिटेरियन मी नाही, याची कृप्या नोंद घ्यावी Happy

-(रविवारी पोटभर खिमापोळी नाश्त्याला हाणलेला) इब्लिस.

Pages