आधुनिक सीता - २८

Submitted by वेल on 23 April, 2014 - 07:26

भाग २७ - http://www.maayboli.com/node/47410

************************************************************************************

आता दर दोन दिवसांनी मला आजी सोबत बोलता येऊ लागलं. अर्थात रफिक पुढ्यात असतानाच.
दोन वेळा आजीशी बोलल्यानंतर आईसुद्धा फोनवर बोलली माझ्याशी. तिच्या बोलणं जरी आजीसारखच मोजून मापून असलं तरीसुद्धा तिच्या बोलण्यात मला खूप चिंता जाणवत होती. मला तर आईशी बोलताना आता रडू येणार असंच वाटत होतं. पण मी सावरलं स्वतःला. 'तू कशी आहेस, व्यवस्थित जेव, स्वतःला आनंदी ठेव, व्यायाम वाचन कर, मनावर संयम ठेव, मन ताब्यात ठेव. उगाच विचार करू नकोस' आई आणि आजी हे एवढच बोलत होत्या. मला सुद्धा 'मी कशी आहे, मला काही शारिरिक त्रास होत आहे की नाही, व्यायाम वाचन कसे चालू आहे' हे एवढेच बोलू शकत होते. पण तेवढ्या बोलण्यानेही मला खूप बरं वाटत होतं. पण एवढे असूनही माझ्या पोटातलं बाळ मला नको आहे ही भावना प्रत्येक क्षणाला वाढीला लागत होती. काय केलं की हे बाळ जन्माला येणार नाही ह्याच भोवती माझे विचार सतत घुटमळत होते. आता मला घरात कुठेही फिरता येत होतं. तेव्हा किचनमधला एखादा सुरा घेऊन स्वत:चाच अंत करावा असे वाटत असे. कधी कधी मॉल मधून फिरताना मुद्दाम एस्कलेटरने जावे आणि स्वतःला खाली झोकून द्यावे असे वाटे. पण मग मनात असाही विचार येई की ह्या नको असलेल्या बाळासाठी मी स्वतःचा जीव का धोक्यात घालायचा? स्वतःचा जीव घ्यायचाच होता तर तो इथे या तुरुंगात आल्या आल्या घ्यायला हवा होता, आता स्वतःची अशी विटंबना करून झाल्यानंतर मग जीव देण्यात काय अर्थ होता. आता इथून सुटायचं होतं. काय करू की माझी सुटका होईल ह्या बाळापासून आणि ह्या तुरुंगातून हाच प्रश्न स्वतःला पडत असे.

प्रेग्नन्सीचे बावीस आठवडे असेच निघून गेले.
"उद्या हॉस्पीटलमध्ये जायचय. चेकप आणि अ‍ॅनोमली स्कॅन करायचय. अल्ला रहम कर. बेबी निरोगी असू दे." प्रथमच मी रफिकच्या तोंडून अल्लाची प्रार्थना ऐकली.
"बेबी निरोगी असू दे अशी प्रार्थना का करतो आहेस? तुला काही डाऊट आहे का?"
"उगाच काहीतरी बोलू नकोस. कसला डाऊट. तुझ्या डोक्यात नको ते विचार आणू नकोस." रफिक चिडून म्हणाला.
आता एवढ्याश्या प्रश्नाला चिडण्यासारखं काय होतं. मी गप्पच बसले.

स्कॅन करून झाल्यावर तिथल्या डॉक्टरने आम्हाला गायनॅककडे जायला सांगितलं आणि आमच्या मागोमाग ती स्वत: असिस्टंटला घेऊन आमच्यासोबत गायनॅक कडे आली. गायनॅकने तिला आलेले रिपोर्ट पाहिले. मग गायनॅकने रफिकशी बोलायला सुरुवात केली.
"सर, आय अ‍ॅम अफ्रेड बट देअर इज अ बॅड न्युज. फ्रॉम द स्कॅन वुई सस्पेक्ट द बेबी इज नॉट ग्रोइंग प्रॉपरली. ऑल्सो वुई सस्पेक्ट थे बेबी इस डेन्जर फॉर मदर्स लाईफ. वुई शुड डू सम मोर टेस्ट्स. अ‍ॅण्ड आफ्टर दॅट इफ वुई गेट बॅड रिझल्टस वुई विल हॅव टू थिंक व्हॉट टू डू. व्हेदर यु शुड कन्टिन्यु द बेबी ऑर यु शुड टर्मिनेट द बेबी"
रफिकने माझ्याकडे रागाने बघितलं.
"मी तुला सांगितलं होतं बेबीची काळजी घे. व्हाय डिड यु नॉट लिसन टू मी. आय अलॉऊड यु टू टॉक टू युअर फॅमिली ऑल्सो. व्हाय डिड यु नॉट टेक केअर ऑफ बेबी. डिड यु ईट अ‍ॅण्ड डिड यु टेक मल्टिव्हिटॅमिन्स प्रॉपरली."
माझ्या डोळ्यातलं पाणी बघून त्या गायनॅकलाच माझी दया आली.
"सर, सच प्रॉब्लेम्स कॅन बी जेनेटीक. अ‍ॅण्ड वुई आर ओनली सस्पेक्टिंग. आफ्टर अदर टेस्टस वुई मे फाईंड दॅट देअर वॉ़ज नो प्रॉब्लेम अ‍ॅट ऑल. अ‍ॅण्द इफ मदर गेटस इमोशनली डिस्टर्ब्ड द बेबी विल गेट डिस्टर्ब्ड टू."
हे ऐकल्यावर रफिक दोन्ही डॉक्टरांसोबत बोलू लागला. स्कॅनमधल्या कोणत्या भागात त्यांना अ‍ॅबनॉर्मॅलिटि वाटत होती. काय अ‍ॅबनॉर्मॅलिटि होती हे त्या रफिकला समजावून सांगत होत्या. मला खरंतर तिथे बसण्याचा कंटाळा अला होता. शिवाय त्या डिस्कशन मध्ये मला इंटरेस्टदेखील नव्हता. मला ह्यातच आनंद होता की माझी ह्यातून सुटका होण्याची शक्यता वाढली आहे. मी रफिकला सांगितले की मला थकल्यासारखे वाटत आहे. त्याने मला लगेचच हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्याचे ठरवले.

डॉक्टरांनी आणि रफिकने ठरवल्याप्रमाणे माझ्या बर्‍याच टेस्टस झाल्या. अल्ट्रासाऊंड स्कॅनसुद्धा पुन्हा केला गेला. रफिकला नको असलेला रिझल्ट डॉक्टरने आम्हाला सांगितला. बाळाच्या मेंदूची वाढ व्यावस्थित होत नव्हती. त्यामुळे बाळाचा जन्म झाल्यास ते बाळ मतिमंद जन्मले असते. रफिक विचारात पडला. मतिमंद मूल जन्माला येऊ द्यायचे का डॉक्टरांचा सल्ला मानून बाळ अ‍ॅबॉर्ट करायचे? बाळ अ‍ॅबॉर्ट करायचे ह्या डॉक्टरांच्या सल्ल्याचा मला मनोमन आनंद झाला. पण झालेला आनंद मी चेहर्‍यावर दाखवू शकत नव्हते. माझी अभिनयक्षमता पणाला लागली होती. मला दु:ख झालेलं दाखवणं खूप गरजेचं होतं. माझ्या पुढ्यात डॉक्टरांनी जेव्हा हा सल्ला दिला तेव्हा मी रफिककडे पाहात राहिले. स्वतःच्या मनाला सांगत राहिले. चेहर्‍यावर दु:ख वेदना एवढंच दिसलं पाहिजे. मला वाटतं तेवढं जमलं मला. रफिक माझ्याजवळ आला आणि त्याने माझे हात आपल्या हातात घट्ट पकडले. त्याच्या स्पर्शामुळे असेल किंवा मनाला दिलेल्या सूचनांमुळे असेल. पण माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि काही सेकंदांनी मला हुंदका फुटला. थोड्या वेळाने स्वतःलाच असा प्रश्न पडला की हे अश्रू खरे तर नाहीत ना? रफिकचं मूल म्हणून मला हे मूल नको होतं. पण एक स्त्री म्हणून माझा ह्या पोटातल्या बाळावर जीव जडला होता की काय?

प्रेग्नन्सीच्या बावीस आठवड्यात मी मुळातच अशक्त झाले होते. अ‍ॅबॉर्शन झाल्यावर माझा अशक्तपणा वाढला आहे असे गायनॅकला वाटल्यामुळे मला तीन दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवण्याचा निर्णय तिने घेतला. एक नर्स पूर्ण वेळ माझ्या दिमतीला होती. शिवाय फातिमा माझ्या सोबतीला होतीच. रफिक जाऊन येऊन होता आणि हॉस्पिटलच्या रूमबाहेर रफिकचा खास बॉडीगार्ड सतत बसलेला होता. कधी कधी वाटायचं संधी शोधून पळून जावं इथून. इथून पळून जाणं जास्त सोपं असेल. पण जाणार कुठे? मी इथे कोणालाच ओळखत नव्हते. इथले रस्तेही मला माहित नव्हती. इंडीयन एम्बसी इथे आहे की नाही, कुठे आहे, तिथे माझं काम होईल की नाही ह्या कसल्याच गोष्टीची मला कल्पना नव्हती. शिवाय माझा पासपोर्ट रफिकच्याच ताब्यात होता. त्यामुळे मनात अधेमधे उफाळून येणारा पळून जायचा विचार मी बाजूला सारत होते.

मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तिनही दिवस रफिक दिवसातून चार वेळा तिथे येत होता पण तरीही तो माझ्याशी व्यवस्थित बोलत नव्हता. कदाचित हे मूल अपंग निघालं असतं ह्याला कारणीभूत तो मला धरत होता. मला मनासारखं झालं म्हणून आनंदही होत होता आणि रफिक माझ्याशी बोलत नाही म्हणून वाईटही वाटत होतं. ज्याच्यासाठी स्वतःच्या मनाला मारून आनंदी राहायचा प्रयत्न केला, ज्याच्यावर प्रेम करता नाही आलं तरी त्याला प्रेम द्यायाचा प्रयत्न केला तोच माझ्याशी बोलत नव्हता. मी रफिकला विचारलंदेखील ह्याबद्दल तर त्याने मला आपण नंतर बोलू असे उत्तर दिले.

मी हॉस्पिटलमधून निघणार त्या दिवशी रफिक खूप टेन्शनमध्ये होता. गायनॅकशी बोलता बोलता त्याला कोणीतरी व्हीआयपी भेटायला आलं म्हणून बोलणं थांबवून तो स्वतःच्या ऑफिसकडे गेला. थोड्या वेळाने त्याने डॉक्टरांनाही बोलावून घेतलं. गायनॅक आणि रफिक रफिकच्या ऑफिसमध्ये व्हीआयपीना भेटण्यात व्यस्त असताना गायनॅकची नवीन असिस्टंट नर्स मला भेटायला आली. आल्या आल्या तिने फातिमाला मला खायला काय दिले असे विचारले. त्यावेळी योगायोगाने मी काहीही खाल्ले नव्हते. त्यामुळे माझ्यासाठी खायला किंवा प्यायला ज्युस मागवण्याचा सल्ला फातिमाला दिला. अर्थात त्या रूममध्ये फोन नसल्याने फातिमा रूमच्या बाहेर गेली. तेवढ्यात त्या नर्सने मला जवळ येऊन सांगितलं "आय अ‍ॅम जेनी. देब बासूज गर्लफ्रेंड. आय अ‍ॅम हिअर फॉर यु."

क्रमशः

पुढील भाग - http://www.maayboli.com/node/49170

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा छान वळणावर आली आहे.पण १-२ टेक्नीकल गोष्टी सांगु का? मला वाटतं सौदीमध्ये अबॉर्शन्स होत नाहीत आणी २२ आठवड्यांच्या प्रेगनंसीत पूर्ण डीलीवरीच करावी लागते मुल अ‍ॅबनॉर्मल असेल तर. डीट्टो केस माहीती आहे म्हणुन लिहीते आहे.

अवांतर वाट्ल्यास उडवुन टाकेन.

गेहना, २२ आठवड्याच्या प्रेग्नन्सीमध्ये जवळपास डिलीवरी सारखीच प्रोसिजर करून मूल काढत असले तरी त्याला अ‍ॅबॉर्शन किंवा मेडिकल भाषेत एम टी पी (मेडीकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी) अस्व्च म्हणतात.

सौदीत नसतील करत एम्टीपी पण हॉस्पिटल तर रफिकच्या मालकीचे आहे ना!
आणि भारतात राहून गेलाय तो तर स्वतःच्या स्वार्थासाठी नियम वाकवायला शिकलाच असेल. Wink

बाकी ही नायिका मला वाय झेड वाटायला लागली आहे. Sad

बाकी ही नायिका मला वाय झेड वाटायला लागली आहे.

आता काळजी नको. जेनीरुपी हनुमान आलाय सीतेच्या मदतीला. आता करेल काहीतरी हालचाल ती.

आधुनिक सीता हे नाव देण बन्द कराल का?
कारण रामाची सीता हि व्यभिचार करणारि नव्हती.
ह्या सीतेला झाशीच्या राणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.

हिम्बो -

माफ करा, परंतु ही मी लिहिलेली कथा आहे आणि त्या कथेला काय नाव द्यायचं ते मी ठरवणार, वाचक नाही.

कथानायिकेला व्यभिचारी म्हणण्याचा अधिकार कथेतल्या पात्राशिवाय कोणालाही नाही. कथेतल्या नायिकेने कोणाचा आदर्श डो़ळ्यासमोर ठेवायचा हे कथालेखक ठरवणार वाचक नाही.

तुम्हाला पटत नसेल तर कथा वाचू नकात. आणि अशा प्रकारचे प्रतिसाद इथे नाही दिलेत तर इतर वाचकावर खूप उपकार होतील.

वेल -
तुमच्या लेखातील आधुनिक सीता हि स्त्रि चारित्र्याचे वाभाडे काढणारी आहे. अगदि सहजपणे ती विवष होताना दिसते. एवढ्या सर्व लिखानात मी तिचा याविषयी चा प्रतिकार कुठेहि बघितला नाहि.
म्हणुनच तीला रामायणातल्या सीतेशी जोडने योग्य नाहि.
रामायणातली रामाची सीता सर्वान्चे प्रेरणास्थान आहेच पन त्याचबरोबर सीतेला देवाचे स्थान हि दिलेले आहे.
म्हणुनच तुम्हि या कथेचे नाव बदलावे हि विनती.

Pages