Submitted by बेफ़िकीर on 5 May, 2014 - 07:28
झुळूक येता उडून जावे तरी स्मरावे असे लिहा
समुद्रकाठावरील रेतीवरी लिहावे तसे लिहा
उघड उघड वैर घेत होते अशांवरी तर लिहाच पण
लपत छपत धीर देत त्यांची पराक्रमी साहसे लिहा
बुजू नका ... हे अशक्य नाही ... नवीन रस्ता निघेलही
लिहून गेलेत आजवर जे पुसून त्यांचे ठसे लिहा
नशीब आहे ... कधी कुणावर रुसेल ... समजायचे कसे
रडू नका ... हासवा जगाला ... करून अपुले हसे लिहा
रिपोर्ट मागायला कधी जर वडील आले तुम्हाकडे
मला असो रोग कोणताही, निदान 'नॉर्मल' असे लिहा
-'बेफिकीर'!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतला आणी वडील लय आवड्या
मतला आणी वडील लय आवड्या
झुळूक येता उडून जावे तरी
झुळूक येता उडून जावे तरी स्मरावे असे लिहा
समुद्रकाठावरील रेतीवरी लिहावे तसे लिहा
वा, गझल आवडली
>> झुळूक येता उडून जावे तरी
>>
झुळूक येता उडून जावे तरी स्मरावे असे लिहा
समुद्रकाठावरील रेतीवरी लिहावे तसे लिहा
<<
वा!
मतला अजरामर होईल हा ! ठसे
मतला अजरामर होईल हा !
ठसे झ्क्कास !
निदान जबरदस्त !!
धन्यवाद !!
सहीच ! मतला जबरदस्त. एकूणच
सहीच ! मतला जबरदस्त. एकूणच खूप आवडली (Y)
सुप्रियातै +१
सुप्रियातै +१
झुळूक येता उडून जावे तरी
झुळूक येता उडून जावे तरी स्मरावे असे लिहा
समुद्रकाठावरील रेतीवरी लिहावे तसे लिहा
व्वा.
मतला जबरदस्त आहेच पण मन फिरून
मतला जबरदस्त आहेच पण मन फिरून शेवटच्या शेराबद्दल विचार करते आहे.
मतला आणि शेवटचा शेर सर्वात
मतला आणि शेवटचा शेर सर्वात जास्त आवडले सर
गझल आवडली
गझल आवडली
व्वा...
व्वा...
झुळूक येता उडून जावे तरी
झुळूक येता उडून जावे तरी स्मरावे असे लिहा
समुद्रकाठावरील रेतीवरी लिहावे तसे लिहा
नशीब आहे ... कधी कुणावर रुसेल ... समजायचे कसे
रडू नका ... हासवा जगाला ... करून अपुले हसे लिहा >>>> हे दोन सर्वात छान वाटले.
शेवटच्या शेरातला खयाल वेगळा आणि छान.
मला आशय आवडला.
मला आशय आवडला.
मस्तच ....आगळीवेगळी ....
मस्तच ....आगळीवेगळी ....
आवडली
आवडली
झुळूक येता उडून जावे तरी
झुळूक येता उडून जावे तरी स्मरावे असे लिहा
समुद्रकाठावरील रेतीवरी लिहावे तसे लिहा
व्वा !!
गझल आवडली. झुळूक येता उडून
गझल आवडली.
झुळूक येता उडून जावे तरी स्मरावे असे लिहा
समुद्रकाठावरील रेतीवरी लिहावे तसे लिहा
मस्तच...
मस्तच...
सर्वच शेर अप्रतिम. रिपोर्ट
सर्वच शेर अप्रतिम.
रिपोर्ट मागायला कधी जर वडील आले तुम्हाकडे
मला असो रोग कोणताही, निदान 'नॉर्मल' असे लिहा
हा अफाटच.