रिपोर्ट मागायला कधी जर वडील आले तुम्हाकडे

रिपोर्ट मागायला कधी जर वडील आले तुम्हाकडे

Submitted by बेफ़िकीर on 5 May, 2014 - 07:28

झुळूक येता उडून जावे तरी स्मरावे असे लिहा
समुद्रकाठावरील रेतीवरी लिहावे तसे लिहा

उघड उघड वैर घेत होते अशांवरी तर लिहाच पण
लपत छपत धीर देत त्यांची पराक्रमी साहसे लिहा

बुजू नका ... हे अशक्य नाही ... नवीन रस्ता निघेलही
लिहून गेलेत आजवर जे पुसून त्यांचे ठसे लिहा

नशीब आहे ... कधी कुणावर रुसेल ... समजायचे कसे
रडू नका ... हासवा जगाला ... करून अपुले हसे लिहा

रिपोर्ट मागायला कधी जर वडील आले तुम्हाकडे
मला असो रोग कोणताही, निदान 'नॉर्मल' असे लिहा

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - रिपोर्ट मागायला कधी जर वडील आले तुम्हाकडे