आरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी मी बनवलेलं अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप

Submitted by विश्वा on 29 April, 2014 - 08:32

नमस्कार मंडळी.

सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप तय्यार केले आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी एकदम सोप्पे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे अ‍ॅप निशुल्क वापरण्यासाठी उपलब्ध आहे.

कित्त्येक वेळा आरत्या म्हणताना चुकतात किंवा आपल्याला शब्द आठवत नाहीत. अश्यावेळी, "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅप जरूर उपयोगी पडेल अशी प्रामाणिक अपेक्षा आहे.

Google Play वर आपण हे अ‍ॅप या लिंक वर डाउनलोड करू शकता http://bit.ly/1hOrUnZ

या अ‍ॅपची ओळख करून देणारी एक चित्रफीत YouTube वर उपलब्ध आहे. http://bit.ly/R0DEOh जरूर पहा आणि प्रतिक्रिया नोंदवा.

मी आणि माझे या उपक्रमातील साथीदार आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना एैकण्यास उत्सुक आहोत.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हे अ‍ॅप डाऊनलोड केले. फाँट खूप छान आहे आणि आरती संग्रहपण छान आहे. रामाची आरती मिसिंग आहे.. काही अ‍ॅप्समध्ये ऐकण्याची देखील सोय आहे, तशी सोय असली असती तर खूपच छान झालं असतं...

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार राजू७६. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल धन्यवाद... आणि अप्लिकेशन डाउनलोड केल्याबद्दलही. Happy

१. पुढील आवृत्तीत श्री रामाच्या आरतीचा नक्की समावेश करू
२. आरती एैकण्याची सोय असावी की नसावी या विषयी आम्हा सहकार्यांत थोडेसे दुमत आहे. तुमचे निरीक्षण बरोबर आहे - इतर अप्लिकेशन्स एैकण्याची सोय उपलब्ध करून देतात. पण तशी सोय असल्यास आरती स्वतः म्हणणे होत नाही आणि त्यामुळे त्या आरत्या पाठही होत नाहीत. तुम्हाला आठवत असेल, गल्लीतल्या मंडळाच्या किंवा घरच्या गणपतीसमोर सर्वांसोबत स्वतः आरती म्हणताना किती बरं वाटतं. तोच आनंद सर्वांना मिळावा अशी आम्हा काही सहकार्यांची इच्छा आहे.

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांचा विचार करून तशी सोय उपलब्ध करण्याविषयी नक्की विचार करू.

चांगला उपक्रम.
अशाच प्रकारे लोकांच्या नेहमीच्या आयुष्याला स्पर्शणारी विविध ॲप्स बनवून चतुरफोन्सच्या विश्वात मराठीचा झेंडा डौलाने फडकवा Happy

@बोबडे बोल
धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया आणि समीक्षा Google Play वर नक्की नोंदवा. त्यामुळे हे ॲप इतर मराठी मंडळींपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत होईल. आपल्या सोयीसाठी Google Play ची लिंक इथे पुन्हा लिहीत आहे. http://bit.ly/1hOrUnZ

नमस्कार राजू७६ - मागे मान्य केल्यानुसार "आरती संग्रह (मराठी)" ॲपच्या नविन आव्रुत्तीत श्री रामाच्या आरतीचा समावेश केला आहे.

मंडळी,
या नविन आव्रुत्तीत (क्र. ५) आता तुम्ही हे ॲप इतरांशी WhatsApp, Bluetooth, Email, इत्यादी द्वारे सहज "शेअर" करू शकता. जरूर डाउनलोड करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

Google Play वर आपण या अ‍ॅपची नविन आव्रुत्ती या लिंक वर डाउनलोड करू शकता http://bit.ly/1hOrUnZ

मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की दिवसेंदिवस "आरती संग्रह (मराठी)" अॅपला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका महिन्यात जगभरातून ५०० हून अधिक लोकांनी अॅप डाउनलोड केले. आपल्याकडून खूप छान प्रतिसाद आणि कौतुकाचे संदेश येत आहेत.

आपल्यातल्याच काही वापरकर्त्यांच्या विनंतीवरुन आम्ही अॅपमध्ये आणखी बर्‍याच नवीन श्लोक आणि आरत्यांचा समावेश केला आहे. उदाहरणार्थ, अॅपच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या सातव्या आवृत्तीमध्ये आठवड्यातल्या वाराप्रमाणे म्हणायच्या "बारा स्तोत्रांचा" समावेश केला आहे. यात शुभंकरोति, रामस्तुती, रामरक्षा, रविवारी म्हणायची सूर्यस्तुती आणि नवग्रहस्तोत्र, सोमवारी म्हणायची शिवस्तुती, मंगळवारी म्हणायची महालक्ष्मीस्तुती आणि लक्ष्मीस्तोत्र, बुधवारी म्हणायचे विष्णोषोडशनामस्तोत्र, गुरुवारी म्हणायचे दत्तात्रेय स्तोत्र आणि गुरूपादुकाष्टक, शुक्रवारी म्हणायचे दुर्गास्तोत्र, आणि शनिवारी म्हणायचे शनिस्तोत्र, मारुती स्तोत्र व हनुमानचालिसा यांचा समावेश आहे. यावरून तुम्हाला लहानपणी आपले आई-बाबा किंवा आजोबा देवापुढे स्तोत्रे म्हणायला लावायचे त्या दिवसांची नक्कीच आठवण होईल.

आपण नवीन आवृत्ती जरूर डाउनलोड करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. या अॅपची माहिती आपल्या मित्रांना जरूर कळवा. त्या साठी अॅपमध्ये संदेश पाठवण्याची सोय आहे. डाउनलोड लिंक http://goo.gl/sMIpk7

उत्तरोत्तर या उपक्रमास आपले असेच सहकार्य लाभेल अशी मनीषा आहे.

विश्वा

मित्रहो,
कळविण्यास अत्यन्त आनन्द होतोय की आज (४ एप्रिल २०१५) "आरती संग्रह (मराठी)" अॅपच्या १३,४०० हून अधिक आव्रुत्या डाउनलोड झाल्या. ५,००० हून अधिक वाचक नित्यनियमाने अॅपचा वापर करताहेत. आजतागाहेत संग्रहात ४० हून अधिक आरत्यान्चा समवेश झाला आहे. अॅपच्या आत्तापर्यन्तच्या प्रवसात अनेक वापरकरत्याण्णी प्रोत्साहन दिल.. उत्साह वाढविला.. नविन कल्पना सुचविल्या. काही वाचकान्च्या प्रतीक्रिया इथे नमुद करव्याश्या वाटतात.

"खुप छान घराचे नेहमी म्हणतात सेल फ़ोन का पाहिजे; आरतीचे पुस्तक दाखीविले तर खुश झाले सगळे :)"

"चतुरफोन्सच्या विश्वात मराठीचा झेंडा डौलाने फडकवा.. चांगला उपक्रम. अशाच प्रकारे लोकांच्या नेहमीच्या आयुष्याला स्पर्शणारी विविध ॲप्स बनवून चतुरफोन्सच्या विश्वात मराठीचा झेंडा डौलाने फडकवा"

Loved it Very nice app - clean font, simple interface and covers all of the popular aartis and stotras..Great to have these handy on my phone now!

सप्रेम नमस्कार... मी तुमच्या आरती संग्रह या मराठी अॅपचा रोजच उपयोग करतो... मारुती स्तोत्र हनुमान चालीसा रामरक्षा अथर्वशीर्ष तसेच आरत्या अगदी बस ट्रेन मधे कुठेही हवी तेन्व्हा वाचता येतात. तसेच घरी वा बाहेर गावी गेल्यावर जास्त उपयोग होतो... त्या बद्दल तुमचे खुप आभार आहेत.

आपल्याही प्रतिक्रिया आणि सुचना जरूर कळवा. लिन्क इथे आहे.