गुगल प्लस वर मायबोलीचे ५०,०००+ चाहते

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

गुगल + या सोशल नेटवर्कवर ५०,००० + मायबोलीचे चाहते.

50kfans.jpg

मायबोलीवर लिहणार्‍या मायबोलीकरांना हा आणखी एक वाचकवर्ग उपलब्ध आहे. गेले काही महिने मायबोलीवरचे निवडक लेखन (लेखनाच्या पानाची लिंक) आपण मायबोलीच्या अधिकृत फेसबुक आणि गुगल प्लस अशा दोन्ही पानांवर पुनःप्रकाशीत करतो. काही वेळेस असे लेखन मुद्दामच एकाच नेटवर्कवर प्रकाशीत केले जाते. त्यामुळे दोन्ही कडच्या चाहत्यांना थोडी Exclusivity ही मिळते.

ज्या वेगाने ही चाहत्यांची संख्या वाढली तो लक्षणीय आहे

मार्च ८,२०१४ : १००० + चाहते
मार्च २५, २०१४ : २५,०००+ चाहते
एप्रिल २३,२०१४ : ५०,०००+ चाहते

तुलनेसाठी फेसबुकवर काय होतंय?

जानेवारी ३१, २०१२ : १००० + चाहते
मार्च १२, २०१२ : १०,००० + चाहते
सप्टेंबर १५, २०१२ : २५,००० + चाहते
एप्रिल २५, २०१३ : ५१,००० + चाहते
नोव्हेंबर ११, २०१३ : ७५,००० + चाहते
एप्रिल २०१४: ९०,००० + चाहते

यूट्यूबवर नुकतीच सुरुवात होते आहे
एप्रिल २२,२०१४ : १००+ चाहते

विषय: 
प्रकार: 

एक सदस्या आणी वाचक म्हणून मला मायबोली चा नेहमी अभिमान वाटत आलाय.

माबो च्या लोकप्रियतेचा उच्चांक उत्तरोत्तर असाच वाढत राहील Happy

अ‍ॅडमिन टीम चे मनापासून अभिनंदन!!!

मायबोलीचे संस्थापक, प्रशासक, प्रशासन समिती, सदस्य, वाचक व चाहते ह्या सर्वांचे अभिनंदन व अभिष्टचिंतन!

मायबोलीने घेतलेल्या अनेक अलिखित भूमिकांपैकी खालील भूमिका मायबोलीची व्याप्ती वाढवतात असे मला आतून वाटते, खरे खोटे किंवा योग्य अयोग्य माहीत नाही.

१. लेखनस्वातंत्र्य व अभिप्राय स्वातंत्र्य (एका सुयोग्य मर्यादेत)

२. मर्यादीत प्रमाणात 'हासण्या-खेळण्यात व मजा करण्यात वेळ जावा ह्यासाठी निर्माण केलेला वाव'

३. इतर स्थळांच्या तुलनेत फारच यूझर फ्रेंडली असणे व प्रशासनाच्या हस्तक्षेपाचा अतिरेक नसणे

४. सर्व स्तरातील व वयातील सदस्यांना कोठे ना कोठे भाग घेता येईल असे अनेक उपक्रम

चु भु द्या घ्या

मायबोलीला ह्याहून सोनेरी दिवस येत राहोत अशी सदिच्छा!

अभिनंदन.... लोकप्रियता उत्तरोत्तर अशीच वाढत राहील.

अ‍ॅडमिन टीम चे विशेष अभिनंदन !!!

<<<एक सदस्या आणी वाचक म्हणून मला मायबोली चा नेहमी अभिमान वाटत आलाय.

माबो च्या लोकप्रियतेचा उच्चांक उत्तरोत्तर असाच वाढत राहील स्मित

अ‍ॅडमिन टीम चे मनापासून अभिनंदन!!!

मायबोलीला ह्याहून सोनेरी दिवस येत राहोत अशी सदिच्छा!>>>>> =+१