तुमचे नाव मतदार यादीत शोधा

Submitted by नितीनचंद्र on 15 April, 2014 - 23:08

खरोखरी आपले सरकारे धन्य आहेत. जेव्हढा प्रचार मतदान करा हा प्रचार करण्यासाठी करतात त्याच्या १ टक्का सुध्दा प्रचार तुमचे नाव मतदार यादीत कसे शोधा यावर केला जात नाही.

किती जणांना माहित आहे आपले नाव मतदार यादीत कसे शोधायचे ?

महाराष्ट्रात तरी ही सुवीधा देणार्‍या लिंक घ्या.

https://ceo.maharashtra.gov.in/

ह्या मुख्य पानावर गेल्यानंतर Search your Name in Final Electoral Roll 2014 New यावर क्लिक करा आणि एक तर आपल्या आयडेंटीटी कार्ड नुसारच्या नंबरा नुसार किंवा नावा नुसार आपले नाव शोधण्याचा पर्याय उपलब्ध्द आहे.

आपण या सर्च इंजिनवर सरळ जाऊ शकता http://103.23.150.139/marathi/

कृपया लक्षात ठेवा आपल्याला किमान खालील गोष्टी माहित असल्याशिवाय इथे जाण्याचा काही फायदा नाही.

१) आपला जिल्हा'

२) आपले व्होटर आयडेंटीटीवरील आपला युनीक नंबर ( विधानसभा मतदार संघ माहीत नसल्यास )

३) आपला विधानसभा मतदार संघ ( आपले व्होटर आयडेंटीटी कार्ड त्या क्षणी उपलब्ध नसल्यास )

लक्षात ठेवा की मागल्या वेळी इथे मतदान झाले अस समजुन जर आपण नाव शोधायला गेलात तर बर्‍याच वेळा तिथे नाव शोधायला खुप उशार लागतो. कधी कधी मतदान केंद्र तेच राहिलेले नसते. त्यात बदल झालेला असतो आणि आता शासनाने नेमणुक करुनही मतदानाच्या स्लीप देणारे कर्मचारी तुमच्या पर्यंत पोहोचलेले नसतात.

हा मनस्ताप टाळुन आपल्या पसंतीचे सरकार स्थापन करण्याचा अधिकार मिळवा.

ही माहिती कॉपी पेस्ट करुन इतरांना कळवा आणि मतदानासाठी उद्युक्त करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आर्या,

ममाझं व्होटर कार्डच आलं नाहीये. गेल्या निवडणुकीत सगळे फॉर्म सबमीट केले होते.
त्याचा पुरावा असल्यास जवळ ठेवा. नसल्यास दुसर कोणतही फोटो आयकार्ड जवळ ठेउन आपण मतदान करु शकता. पण त्याआधी मतदार यादीतल आपल नाव शोधा.

माझे नाव नाहीय यादीत.

घरी दोनदोनदा आलेल्या बाईला फोटो बिटो देऊन झालेले तरीही आता नाव नाहीय Sad

यादीत नाव असेल आणि स्लिप / कार्ड नसेल तरी आयकार्ड - आधार , पॅनकार्ड, पासपोर्ट दाखवून मतदान करता येईल का ?

हो

हो प्राजक्ता शिरिन. फक्त यादित नाव असायला हवं. मग कोणतंही आयडेंटिटी कार्ड चालतं. (शक्यतो पारपत्र, अधार कार्ड)

मागच्या निवडणूकीनंतर मी यादित नाव सामिल करण्यासाठी सर्व पुरावे (फोटो, पत्त्याचा पुरावा इ.) देऊन अर्ज केला होता. त्याची रिसिट आहे माझ्याकडे. नंतर व्होटर्सकार्ड शोधायला गेले असता ते मला सापडले नाही. शिवाय ऑनलाईनही शोधण्याचा प्रयत्न केला पण तिथे बहुतेक नाहिये.
मी आयुष्यात कधीच मतदान केलेलं नाही. काय करावं? मतदान केंद्रावर ती रिसिट घेऊन गेलं तर कुणी मला एन्टरटेन करेल का? Uhoh
भांडूनही काही फायदा होइल असं वाटत नाही कारण चूक सरकारची आहे. मतदान केंद्रावरच्या व्हॉलेंटियर्सना किती अधिकार असतील?

>>>> मी आयुष्यात कधीच मतदान केलेलं नाही. काय करावं? <<<<<< अरे रे
आता काही उपयोग नाही, मागच्या वेळचे राहिलेले मतदान आत्ता करायची सोय नाहीये Wink
अन मतदार यादीन नाव नै ना आलेल? म्हणजे सरकारी पातळीवर अजुन तू लहानच आहेस अस समज की!

दक्षिणा... नाव मतदार नोंदणीचा फॉर्म भरुन दिल्यावर जी पोच पावती मिळते.. ती पावती आणि आयडी कार्ड दाखवून मतदान करता येईल.

नितीनचंद्र.. वरिल दोन्ही साईट क्रोम मधे उघडत नव्हत्या.. आई मधे उघडल्यावर नावाने शोधले असता फॉर्म ६ भरा असा संदेश आला. मात्र मतदार यादीच्या पिडिफ मधे नाव सापडलं.

लिंब्या मागच्या पानावरिल शेवटच्या प्रतिसादाला अनुमोदन

सही...
माझे स्वताचे नाव झळकल्याचे बघून कसला आनंद झाला..
यावेळी कंपनीने फुल पगारी फुल्ल डे रजा दिलीय, म्हणजे आरामात दुपारी बारा वाजता उठून यंदा मतदान नक्की !

यादीतील नावाची पडताळणी, मतदानाचे वेळापत्रक आणि पोलिंग बुथ इ. माहिती मिळवण्यासाठी मतदाराने आपला मतदान क्रमांक ९२१२७ १२३४५ या क्रंमाकावर एसएमएस करावा.

एकदम भारी गम्मत आहे.. आमच्याकडच्या सगळ्यांची नावे बर्‍यापैकी पाठोपाठ असतात आणि नेहमीच मतदान करतो.. पण यंदा त्यातली दोन नावे गायबच आहेत.. ना सर्च करुन मिळाली ना पीडीएफ मधे मिळाली... मतदारांचे वय ८३ आणि ५७.. म्हणजे गेली काही वर्षे नियमित मतदान करणारे मतदार..

अशी अचानक नावे गायब कशी काय होतात हा एक वादाचा मुद्दाच आहे..

हिम्सकुलजी,

आपण सगळे ( माझ्ह्या सह ) असले प्रश्न खुप आधी विचारायला पाहिजेत. अस जेव्हा घडेल तर मतदार यादीवर जे नियंत्रण पक्षांच किंवा ठराविक उमेदवारांचे असते ते संपेल.

मतदानाच्या दुसर्‍या दिवशी अनेक मतदार यादीत नावे नसल्याने मतदानापासुन वंचीत ही बातमी सुध्दा ऐकायला/वाचय ला मिळनार नाही.

नाव मतदार नोंदणीचा फॉर्म भरुन दिल्यावर जी पोच पावती मिळते.. ती पावती आणि आयडी कार्ड दाखवून मतदान करता येईल. >>> उद्या पावती घेऊन धडकणार आहे. बघू काय होते !

आम्ही काही महिन्यांपूर्वी मुदतीच्या आत नोंदणी फॉर्म भरले. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला जवळच्या शाळेत नवीन मतदारांची कार्ड्स आली आहेत असं कळलं. एकदा गेलो तर तोबा गर्दी, कशाचा कशाला पत्ता नाही त्यामुळे तसेच परतलो. मार्चएंडला उरलेली कार्ड्स ठेवलेली आहेत. आपली आपण निवडून घ्यायची असे कळले म्हणून परत गेलो. ह्यावेळी हजार एक कार्ड्स तिथे अशीच टेबलावर पडलेली होती. तीन-चार लोकं एकाच वेळी शोधत होती. परत परत तीच कार्ड्स समोर येत होती कारण ट्रॅक ठेवणे शक्य होत नव्हते. तरी माझ्या शुभहस्ते नवर्‍याचे कार्ड सापडले !!!! माझे सापडले नाही म्हणून घरी आलो. काही लोकांची घरी आणून देण्यात आली त्यात माझे आले नाही.
गेल्या आठवड्यात मतदारयादीत नाव शोधले तर माझे नाव मिळाले नाही Angry

असे नाव मिळाले नाही तर पाठपुरावा कुणाकडे करायचा असतो ? मुळात मला मत द्यायचेच आहे हे खरे पण व्यवस्थित वेळेत फॉर्म भरुन त्याची पावती जवळ असताना इतका खटाटोप का करायला लागावा ?

इथे अप्रस्तुत, पण आधारकार्डाच्या वेळीही हाच अनुभव आला. मध्ये जवळच्या सरकारी शाळेत आधार कार्डाचे फॉर्म्स भरुन द्यायचे काम होते आहे हे कळले पण रोज पन्नास का पंच्याहत्तर एंट्रीजच घेणार म्हणे ! एकदोनदा रांग लावायचा अयशस्वी प्रयत्न केला आणि नाद सोडला. रांग लावायची अगदीच तयारी आहे पण दोन-तीन तास लायनीत उभे राहून 'आजची लिमिट संपली' असे ऐकायला मिळणार असेल किंवा कामकाजाची वेळ संपल्यास निदान तो अर्ज अमूक एका वेटलिस्टवर घेतलाय इतके तरी होणार नसेल तर ते संतापजनक आहे !

वरदा +१.

नक्की कधी ते आठवत नाही पण गेल्या दोन-तीन महिन्यांत मतदारयाद्यांमधली आपली नावे तपासण्यासाठी, नावे नसल्यास नोंदविण्यासाठी, दुरुस्त्यांसाठी निवडणूक आयोगाने काही रविवारी शिबिरे भरवली होती. त्यासाठी वृत्तपत्रांतून जाहिरातीही दिल्या गेल्या होत्या. तसेच वृत्तपत्रविक्रेत्यांद्वारे घरोघर माहितीपत्रके leaflets वाटली गेली होती.

मयेकर, आमच्या भागात नवीन मतदारांसाठी असे काही झाल्याचे आम्हाला तरी आढळले नाही. घरी पत्रक नक्कीच आलेले नाही, असे काही असेल तर कॉमनफ्लोअरवरुन कळवण्यात येते किंवा सोसायटीत नोटीस लागते. तसेही झालेले पाहिले नाही.
मुळात कार्ड्स आलीच गेल्या महिन्यात !

वर लेखात दिलेली << आपण या सर्च इंजिनवर सरळ जाऊ शकता http://103.23.150.139/marathi/ >> ही लिंक आता ओपन होत नाहीये. क्रोम, फाफॉ, एक्स्प्लोरर सर्व ब्राऊझर्स मध्ये चेक करून पाहिली.

अनेकांच्या बाबतीत फॉर्म क्र ६ भरून दिल्यावरही मतदार यादीत नाव नाही असे प्रकार झाले आहेत. माझ्या ओळखीतल्यांच्या हाऊसिंग सोसायटीतल्या बहुतांशी लोकांची नावे त्यांनी सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण करूनही मतदार यादीत नाहीत.

अगो सेम टू सेम. मी टू इन द सेम बोट. मी ही उद्या ती पावती घेऊन धडकणार आहे. पावती शोधावी लागेल फक्त Sad

मतदान करून आले, त्या साईटचा उपयोग झाला, केंद्रावर नंबर दाखवून वोटर्स स्लिप पदरात पाडून घेतली.

>>>>> लिंब्या मागच्या पानावरिल शेवटच्या प्रतिसादाला अनुमोदन <<<<<<
इन्द्रा, आवर्जुन आवडल्याचे सान्गितल्याबद्दल धन्यवाद. (नावडली असे सान्गितले असतेस तरी धन्यवादच Happy ).

कारण इतका जीव तोडून एकेक शब्द शब्द जुळवित (त्यालाच फेसबुकवरील काही जण "कुन्थुन कुन्थुन लिहीणे" असे म्हणतात Lol फेबुवरल्यान्चे सगळेच और आहे!) पोलिटिकली अन लिगली करेक्ट पोस्ट लिहील्यावर ती कुणाकडून वाचली गेली आहे असे कळलेच नाही तर लिहिण्याचा काय उपयोग असा निराशावादी विचार येतो. अर्थात मला शिष्ठ वाडकर्‍यान्च्या अनुल्लेखाचा गेल्या ९ वर्षांचा अनुभव असल्याने मी प्रयत्नपुर्वक निराशेवर मात करतोच करतो, पण असे कुणी आवर्जुन सांगितले की बरे वाटते, लिहिल्या मजकुराचे चीज झाले असे वाटते. Happy असो. विषयांतर नको.

मला लिन्कचा कालच उपयोग झाला, कालच नाव बघुन तपशील छापुन घेतले, व आज सकाळी मतदान करुन आलो.
इथे वेळेत धागा उघडुन लिन्क दिल्याबद्दल धन्यवाद Happy

इतक करुनही पुण्यात राडा व्हायचा होता तो झालाच. एक दिवस पुणे लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवारांने उपोषण करुन हजारो मतदारांना मतदानापासुन वंचीत करण्यात आले त्यावर निवडणुक आयोगाने निर्णय घेतला नाही.

पुण्याच्या एक वकील मिताली सावळेकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात त्यांनी पुण्यात मतदानापासुन वंचित झालेल्या मतदारांना ९४२०३२१५९८ फोन नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

मला एक गोष्ट सांगायची आहे की बरेच लोक मतदान कशाला करायचे ठराविक नेतेच निवडून येतात आम्ही नाही जात मतदानाला या विचारायचे आहेत .

सर्वात मुख्य गोष्ट आपले नाव एका राष्ट्रीय यादीत असणे महत्त्वाचे आहे.

मागच्या वर्षीच २०१३ मेपासूनच निवडणूक आयोगाची कार्यालये कामाला लागली आहेत .आमच्या डोंबिवली (प) मधल्या भावे सभागृहात मी जून २०१३ मध्येच याद्या(२०११च्या)पाहून नावे पाहून मग वेबसाईटवर पाहिले तिथे नावे नव्हती .त्यांनी नवीन फोटो घेऊन यादीत चिकटवले .(जुने फोटो धुरकट होते म्हणून साईटवर नाव नव्हते .पुण्याच्या मतदारांनी अगोदर खात्री केली होती का ?
) .नोव्हेँबर २०१३ त कच्च्या २०१४ याद्या आल्या त्यात चांगले फोटो आले .

सरकारी दरवाजे उघडे असतात तेव्हा सुईच्या नेढ्यातूनही उंट जातो ,बंद असले की वारापण जात नाही .

मी वेळोवेळी डोंबिवली बाफवर सुचना टाकल्या होत्या .इथे माबोवर मागच्या वर्षी नेपाळ सहलीत प्रवेशासाठी फक्त व्होटिंग कार्डच चालते इतर पुरावे घेत नाहीत हे वाचून मी आमची नवीन कार्डे(जुनी आहेत) मिळवलीच .नेपाळबाफ कर्त्याला धन्यवाद .

Pages