ठाण्यातील नर्सिंग ब्युरो

Submitted by स्वाती२ on 13 April, 2014 - 10:25

नमस्कार,
माझे आई-बाबा ठाण्याला एकटेच रहातात. दोन दिवसांपूर्वी बाबा अचानक आजारी पडले. सोसायटीमधील लोकांनी खूप मदत केली. मात्र या सगळ्यात नर्सिंग ब्युरोतून कुणी दादा/ताई मदतीला मिळाल्यास बरे पडेल असे जाणवले. कृपया मला ठाण्यातील चांगले नर्सिंग ब्युरो सुचवाल का? माझे आईबाबा वसंत विहारच्या जवळ रहातात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुग्ण सेवा म्हणुन एक ब्युरोमधुन आम्ही सर्विस घेतली होती.
नंबर - ७२०८३४३०४०

पण प्लिज नोट यातल्या आया / दादा अगदीच न शिकलेले असतात. औषध देणे वगैरे साठी यांच्यावर अवलंबुन रहाता येत नाही. बहुतेक जणांना वाचताही येत नाही.
या सर्विस बद्दल अजुन एक म्हणजे जरी त्यांनी वेळेवर / चांगली सर्विस दिली तरी ती चालवणारा माणुस रिक्षा ड्रायवर होता. कोणीच नसताना वेळी अवेळी येऊन पैसे देणे घेणे व्यवहार जरा रिस्की वाटले होते त्यामुळे किमान आमच्यापैकी एकजण असतानाच त्याला घरी यायला परवानगी दिली होती. (रिक्षा ड्रायवर म्हणुन रिस्की नव्हे हां, जनरलच मला वाटले होते. त्यात त्या काम करणार्‍या बायकांच्या सेफ्टीसाठी सुद्धा वाटले होते. )

शिवाय या बायकांना दिवसभर खरच फारसे काम नसले की त्या फार इकडच्या तिकडच्या गप्पा करुन घरातली माहिती काढत बसतात ज्याने घरातली शांतता नाहीशी होऊ शकते Proud शिवाय पैशाच्या व्यवहाराबद्दल बाहेरच्यांना कळु शकते. त्यामुळे त्यांना फारशी माहिती न देणे उत्तम हे आईला सांगुन ठेव.

अजुन काही नंबर असतील तर शोधुन बघते आणि सांगते तुला.

आणि अजुन काही मदत हवी असल्यास संपर्कातुन नक्की इमेल कर.

1) Maharashtra nursing bureau
Room No 4, Indra Colony, Behind New 6 No, K Villa Bridge, Thane West, Thane – 400601

+(91)-22-61631449

2) Parvarish aya bureau
B1/6 Gautam Arcade Kopri Clny, Nr Daulat Ngr Soc, Kopri Colony-Thane East, Thane – 400603
+(91)-22-25321824, +(91)-9820584352

3) shri ganesh health care
Wagle Estate, Dnyaneshwar Nagar, Near Renuka Mata Mandir, Thane West, Thane – 400601

+(91)-22-71040760

पण प्लिज नोट यातल्या आया / दादा अगदीच न शिकलेले असतात.>>> गरज असेल तर शिक्षित नर्स/ ब्रदर पण मिळतात. त्यांचे दर अर्थातच जास्त असतात.

शिवाय या बायकांना दिवसभर खरच फारसे काम नसले की त्या फार इकडच्या तिकडच्या गप्पा करुन घरातली माहिती काढत बसतात>>> हे घरी काम करायला येणार्‍या बायका, ड्रायव्हर, माळी इत्यादींसाठीही लागू होतं. त्यामुळे बाहेरचं कोणीही माणूस घरात जास्त वेळ असलं की हे असं होणारच हे गृहीत धरूनच ही सेवा घ्यायची असते.

अजून एक संपर्क - एंजल्स नर्सिंग ब्युरो

आधी काय मदतीची अपेक्षा आहे ते नक्की केलंत तर योग्य माणूस (बाई) शोधणे सोपे जाते. ह्या हेल्परना आपापला दुपारचा जेवायचा डबा नक्की आणायला सांगा. घरांत आजारपण सुरु असताना इतर कशीबशी स्वतःची, घरातल्यांची सोय बघत असतात त्यात हेल्परच्या जेवणाची सोय पण बघावी लागायला नको. असा अनुभव इथे बँगलोरमधे आलेला आहे म्हणून. तेच मुंबईत (दादरला) एका नातेवाईकांना खूप मदत झाली आया-सर्व्हिसची. सकाळी आठ - रात्री आठ कामाची वेळ, सकाळचे चहा-खाणे, दुपारचा आणि रात्रीचा स्वयंपाक, आजींना आंघोळ, वेणी-फणी, आजी-आजोबांना औषध, फिरायला सोबत अशी. आजी-आजोबा दोघेही एकाच वेळेस आजारी होते.

धन्यवाद मंजूडी, राजसी आणि मुग्धानंद.
आईकडे स्वयंपाकाला विश्वासू मावशी येतात. धुणी-भांडी, साफसफाईसाठी अजून एक बाई येतात. आजारी माणसाची देखभाल, गरज पडल्यास हॉस्पिटलमधे सोबत रहाणे यासाठी मदत शोधत आहे. यावेळी मिळालेला वेकअप कॉल लक्षात घेता नजिकच्या काळात अशी गरज वारंवार भासणार हे नक्की. त्यात मी परदेशात असल्याने सगळे अजूनच गुंतागुंतीचे आहे.

वर मुग्धानंदने दिलेला आजीकेअर चांगला आहे. त्यांचे लोक साक्षर असतात आणि इंजेक्शन देणे, बीपीची नोंद ठेवणे अशी सोपी वैद्यकीय कामे करू शकतात. दर अर्थातच जास्त आहेत.

वर म्हटल्या प्रमाणे वैद्यकीय मदतीची गरज नसेल तर बाकीचे ब्युरो स्वस्त पडतात.

कुठलाही ब्युरो हा त्रासदायकच असतो. एखादी चांगले काम करणारी मावशी मिळाली की तिलाच धरून ठेवा. ब्युरोकडून नवीन मावशी येणार असेल तर प्रचंड मनस्ताप असतो. एकतर ती किती विश्वासू असेल हा घोर असतो, वर त्यांना आपल्या पेशंटचे सगळे काम शिकवावे लागते आणि 'नवी मावशी नवे नखरे' हा नियम प्रत्येक मावशीला लागू होतो. एकच मावशी असेल तर जीवन थोssडे सुसह्य होते.

वरच्या लिस्टमध्ये अजून एक भरः शरद बोरकरः ९३२४६३९११६

आणि हो ब्युरो ठाण्यातीलच हवा अशी अट नका ठेवू. बहुतेक ब्युरोचालकांचे ऑफीस वगैरे नसते. आणि मुंबई / ठाणे परीसरात काम करणार्‍या ८०% मावशी ह्या उल्हासनगरच्या आसपासच्या भागातूनच येतात.

धन्यवाद माधव.
आज आईशी बोलणे झाले. तिला सगळे फोन नंबर्स दिले. तिच्यातर्फे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार. सध्या शॉर्ट टर्म सोल्युशन म्हणून ब्युरोची मदत घेत एकीकडे वृद्धाश्रमांचा शोध असे करायचे ठरत आहे. बघायचे सगळे कसे काय पार पडते ते.

काही लक्षात आल्या त्या गोष्टी, प्रिकॉशन म्हणून भविष्यात बर्‍या पडतील :
१. सोसायटी / कॉम्पेक्स मध्ये एखादा डॉक्टर असल्यास त्याला परिस्थितीची कल्पना देऊन, हाऊस-विजिट फी देण्याची तयारी सांगून वेळी-अवेळी बोलावले तर चालेल अशी सोय करून ठेवा.
२. आजकाल सर्वच डॉक्टर, नामवंत सुद्धा हाऊस-विजिट करतात, साधारण त्यांची रात्रीचे प्रॅक्टीस अवर्स संपले की. तुमच्या डॉक्टरांना हाऊस-विजिट करणार ते विचारून ठेवा. रेग्युलर चेकप/ फॉलो-अप विजिट साठी रुग्णाला जीवाचे हाल करून, गाडी-घोडा करून नेणे-आणणे, वेटिंग-रूममद्ये बसणे पेक्षा सोयिस्कर पडू शकते. दहा वर्षांपूर्वी रु. ५००/- होती, ठाण्यात हाऊस-विजिट फी (साधारण कल्प्ना येण्यासाठी)
३. जवळचे २४ तास सेवा देणारे हॉस्पिटल आणि अ‍ॅम्ब्युलन्स (२-४) ह्यांचे नंबर मोबाईल व्यतिरिक्त कॅलेंडर / घराच्या मेनडोरच्या आतल्या बाजूला चिकटवून ठेवा.

होप इट हेल्प्स. तुमच्या बाबांना गेट वेल सून.

एकीकडे वृद्धाश्रमांचा शोध असे करायचे ठरत आहे>>> पुण्याच्या अथश्री फ्लॅट मिळतोय का ते बघा. आमच्या ओळखीत एक आजी २-एक वर्षांपूर्वी शिफ्ट झालेल्या आहेत. त्यांना तिथे खूप आवडलय असं साबांनी सांगितले.

आजकाल सर्वच डॉक्टर, नामवंत सुद्धा हाऊस-विजिट करतात >>> राजसी, माझा अनुभव अगदी विरुद्ध आहे. साधे BHMS / BAMS डॉक्टर्सही होम विजीट करत नाहीत हल्ली.

होम व्हिजीट करणारे चांगले MD डॉक्टर माहीत असतील तर प्लीज मला कळवाल का?

माधव + १००.
घरच्या इतक्या इमर्जन्सीमध्ये डॉक्टर एकदाही होम व्हिजिटसाठी आले नाहीत. प्रत्येकवेळी तुम्ही 'अमूक हॉस्पिटलामध्ये ताबडतोब घेऊन या, मी तिथे कळवून ठेवतो' हेच उत्तर मिळाले.

पुण्याच्या अथश्री फ्लॅट मिळतोय का ते बघा.>>> अथश्रीसाठी किमान ५ वर्ष तरी वेटींग लिस्ट आहे.

नाही येत डॉक्टर्स हल्ली होम व्हिजिटसाठी Sad सुश्रुषेसाठी ठेवलेल्या बायांचा आपल्या डोक्यावर सतत बारीकसा ताण जाणवत असतो कारण आपण आपलं घर आणि आपलं माणूस त्यांच्यावर सोडत असतो.

स्वाती, अथश्रीचा पर्याय चांगला आहे. आईवर ताण कमी येईल. बावधनला सुद्धा परांजप्यांची स्किम आहे सिनियर सिटिझन्ससाठी...तिथेही पहा.

राजसी, धन्यवाद.
आईबाबांच्या अगदी जवळच्या, विश्वासाच्या डॉक्टर सोसायटीत रहातात. डॉक्टर बाईंच्या मुलांसाठी अडीअडचणीला माझे आईबाबा हक्काचे आजी आजोबा आहेत. डेकेअरची अडचण असेल तेव्हा, इतर इमर्जन्सीला मुले माझ्या आईबाबांकडे असतात. डॉक्टर बाईंचे सतत लक्ष असते. या प्रसंगी देखिल दिवसातून ४ वेळा त्यांच्या फेर्‍या झाल्या. तसेच त्यांचे नेहमीचे डॉक्टर होम विजिट करतात. जवळ बेथनी हॉस्पिटल आहे. सेक्रेटरींकडे नंबर देऊन ठेवलेत. पोलीस स्टेशनला एकटे रहाणार वृद्ध म्हणून नांव नोंदवले आहे. त्यांचे ऑफिसर चौकशी करुन जातात. मात्र आता तसे ते दोघेही थकलेत. मध्यंतरी ते एका वृद्धाश्रमात काही दिवस ट्राय करायचा म्हणून राहून आले. मात्र तिथे आजारी पडल्यास ठेवत नाहित. आम्ही शेवटपर्यंत सांभाळ करतील अशा वृद्धाश्रमाच्या शोधात आहोत.

खर तर वृद्धाश्रमाचा पर्याय शेवटचा असावा . तरी पार्ल्याला टिळक मंदिर मध्ये वृद्धाश्रमाची लिस्ट मिळते . एक- दोन दिवसात चौकशी करून संपर्कातून कळवते तुला

माझ्या आईच्या डोळ्याच्या डॉक्टर.... डॉ. आफळे -- बहुतेक मीनाताई ठाकरे चौकात कुठेतरी त्या़ंचे हॉस्पिटल होते. आर्थोपेडिक डॉक्टर ...डॉ. ....(? नांव - आता नक्की लक्षात नाही, Sister also doesn't remember it, now.) आणि एक मानसोपचार तज्ञ --- ? (आजारपणामुळे आलेल्या नैराश्यासाठी). यापैकी डॉ. आफळे यांनी आईचे डोळ्याचे ऑपरेशन केले होते, त्यांनीच इतर डॉक्टर सुचवले होते.

बाकी स्वाती यांना इन-हाऊस डॉक्टरांची अड्चण नाहीये हे एक चांगले.

बावधनला सुद्धा परांजप्यांची स्किम आहे सिनियर सिटिझन्ससाठी...तिथेही पहा>>> बावधन आणि हडपसर दोन्ही स्किमची नांव अथश्री च आहे.

सुजा, स्वातीकडे जर नीट आणि खात्रीची व्यवस्था नाही होऊ शकली तर तिला वृद्धाश्रमाशिवाय पर्याय रहाणार नाही. परांजप्यांच्या त्या सिसि स्किम्स वृद्धाश्रम आणि स्वतःचे घर ह्यातला सुवर्णमध्य आहे.

हो गं सुजा. आम्ही आत्तापर्यंत शक्य तितके लांबवले. स्वयंपाकाच्या मावशी आणि त्यांचे कुटुंबीय बरीच मदत करतात. सोसायटीतली इतर मंडळीही काळजी घेतात. गरज पडल्या माझी मोठी चुलत बहिण येते मदतीला. पण तिचेही वय झाले आहे. तसे ते दोघे हिंडते फिरते आहेत. पण आता बाबा ८१ आणि आई ७५ होइल. आत्ता नीट सेटल झाले तर बरे होईल. निदान आपल्यामागे जोडीदाराचे कसे होइल ही त्यांना असलेली काळजीतरी कमी होइल. दूर रहात असल्याने मला देखील सतत काळजी रहाते. मी तिथे येऊन रहाणे हा पर्याय उपलब्ध नाही. फार वाईट वाटते. पण इतर काही पर्यायही नाहिये. Sad

आम्ही शेवटपर्यंत सांभाळ करतील अशा वृद्धाश्रमाच्या शोधात आहोत. >>> थोड्याशा आजारी माणसांना बहुतेक सर्वच वृद्धाश्रमात प्रवेश मिळतो. पण बेड रीडन वृद्धांना प्रवेश मिळत नाही बहुतेक. आणि त्यांना ठेऊ पण नये. आपल्या माघारी तिथला (बहुतेक) स्टाफ त्यांना कशी वागणूक देतो हे बघितले तर अंगावर काटा येतो.

त्यापेक्षा adult home हा उत्तम पर्याय आहे.

>>त्यापेक्षा adult home हा उत्तम पर्याय आहे.>> मला कळले नाही. प्लीज जरा विस्तारुन सांगाल का? वृद्धाश्रम अणि अ‍ॅडल्ट होम हे वेगवेगळे असतात का?

adult home म्हणजे आपले (भाड्याचे) घरच. पण त्या काँप्लेक्स मध्ये वृद्धांना लागणार्‍या अनेक सुविधा (जसे की डॉक्टर, औषधांचे दुकान इ.) असतात. तीच मॅनेजमेंट तुम्हाला गरज पडली तर आया, जेवणाचा डबा, घरकामासाठी बाई अशा सुविधा पण देते. ह्यात त्यांचे स्वातंत्र्य टिकून रहाते कारण त्यांच्यावर कसलेच बंधन नसते. ती मॅनेजमेंट फक्त वृद्धांना लागणार्‍या बहुतेक सर्व सुविधा पुरवते.

साबांनी माहिती दिली की अथश्री मधे भाड्याने पण फ्लॅट मिळतात. एकदा तिथे भाड्याने राहिला गेले की सेकन्ड हॅन्ड फ्लॅट विकत घेता येऊ शकतो. त्यांच्या अजून एका मैत्रिणीने नुकताच तिथे सेकन्ड हॅन्ड फ्लॅट ३२-३३ लाखाला विकत घेतला. सोसायटी काहीतरी ५ लाखाच्या आसपास एकरकमी ठेव घेते अडचणीच्या वेळेस हॉस्पिटलायझेशन ए. साठी. आधी भाड्याने राहून पहाणे चांगले यासाठी की आपल्याला ठरवता येते की अथश्री ची सोय आपल्याला पटते का ते. अथश्री बद्दल अजून काही माहिती मिळाली तर इथे टाकत राहीन.

सगळी परिस्थिती बघता वृद्धाश्रम हा पर्यायाच चांगला दिसतोय . पण आई- बाबांना चालणार आहे का ? ते काय म्हणताहेत ? त्यांना वृधाश्रामाबद्दल सुचवून बघितलस का ?
आणि माधव adult home आणि वृद्धाश्रमात काय फरक आहे . प्लीज सांगणार का ?

एखादी गरजू बाई चोवीस तास रहाणारी मिळेल तर उत्तम होईल.अर्थात हे लिहिण्याएवढे सोपे नाही मान्य. पण
वृद्धाश्रमात आताच रहायला जाण्यापेक्षा बरे.
माझी आई, (वय वर्षे ८१) एकटी पुण्याजवळ रहाते. तिने सांगितले आहे की मला इथे रहाण्यापासून अडवू नकोस.अगदीच जमले नाही,तर मग पाहू.पण मी दोन पेईंग गेस्ट्स हट्टाने ठेवल्या आहेत.कारण बैठे घर आहे. म्हातारी एकटीच आहे म्हणून अनवस्था प्रसंग नको.

माझे आईबाबा १ bhk त रहातात. आई एकटी वेळ आल्यास राहू शकेल पण बाबांना शक्य होणार नाही. गावात मावशी-काका आहेत. याआधीचा अनुभव असा आहे की आई आजारी पडली तर बाबांना काळजी घेणे कठीण जाते. मावशी-काका, चुलत बहिण- दाजी सगळे बरीच मदत करतात. पण आता सगळ्यांची वयं झालेत. तरुण मंडळी सकाळी घर सोडतात ती रात्री लवकरात लवकर साडेआठला घरी येतात. स्वतःच्या मुलांच्या संगोपनासाठी तिच या
वृद्धांवर अवलंबून अशी परीस्थिती. आईचे शेजारीही वृद्ध आहेत. आज शेजारच्या काकूंची तब्येत बिघडली तर आईनेच सेक्रेटरींना फोन वगैरे धावपळ केली. त्यांना हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट केल्याचा निरोप मी आईशी फोनवर बोलत असताना आला. २४ तास रहायला बाई बघितली तरी त्यांच्या कामावर लक्ष ठेवायला कुणी नाही. त्यामुळे वृद्धाश्रमाचा पर्याय त्यातल्या त्यात सेफ वाटतो. दोघे एकत्र राहू शकतील. थोडे हिंडू फिरु शकतात त्यामुळे रुळायलाही बरे पडेल असे वाटते. आईबाबांशी याआधी बोलणे झालेय. ८-१० दिवस राहून ट्राय करुन झाले आहे. माझ्याकडे खरे तर फारसे पर्याय नाहित. Sad

..

Pages