राँग नंबरच्या गमतीजमती

Submitted by साधना on 20 March, 2011 - 07:15

हल्ली मोबाईलवरही राँगनंबर भरपुर येतात. कधी आपण मोबाईलमधला साठवुन ठेवलेला नंबर लावला तरी तो चुकून भलतीकडेच जातो, तर कोणी आपल्याला फोन करतो आणि आपण हॅलो म्हटले की, 'अमित को फोन दिजीये' अशी ऑर्डर सोडतो Happy

हा धागा तुम्ही अनुभवलेल्या राँग नंबरच्या गंमतीजंमती मायबोलीकरांना सांगुन पुन:प्रत्ययाचा आनंद घ्यावा यासाठी खास.... Happy

सुरवात माझ्यापासुन...
१. माझ्या मुलीला निवासी शाळेत ठेवल्यानंतरच्या काही महिन्यात घडलेला हा प्रसंग. मी शनिवारच्या दुपारी ऑफिसातुन परतत होते. ट्रेनमध्ये फारशी गर्दी नव्हती. मी मुलीच्या विचारात गढलेले. शाळेतुन फोन करायला परवानगी नव्हती. ती पत्रे पाठवायची. एका पत्रात 'मी मजेत आहे, काळजी नको' तर दुस-या पत्रात 'मला आताच्या आता येऊन घेऊन जा' असे लिहायची. अतिशय कठिण दिवस होते ते. अचानक मोबाईल वाजला. मी न पाहताच कानाला लावला. 'आई, कधी येतेयस तु? मी कधीची वाट पाहतेय.' एका लहान मुलीचा आवाज. मी चक्रावले. 'कोण बोलतंय?' मी विचारले. 'अगं मी ऐशू....' माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. ऐशू घरी कशी आली? कोणाबरोबर आली? ती बरी तर आहे ना? कितीतरी प्रश्न डोक्यात एका क्षणात येऊन गेले. घाईघाईत मोबाईलवरचा नंबर पाहिला. लँडलाईन होता पण माझ्या घरचा नव्हता. क्षणात स्वतःला सावरुन मी विचारले, 'बाळा, तुझ्या आईचे नाव काय?' फोन लगेच कट! मी दोन मिनिटे स्तंभितच झाले. मला आधी वाटले माझ्या डोक्यात मुलीचेच विचार असल्याने मला बहुतेक फोन आल्याचा भास झाला. पण मोबाईलवर नंबर होता. आता हा किस्सा आठवला की खुप हसायला येते. पण तेव्हा मात्र ती भेटेपर्यंत धाकधुक वाटत होती.

२. माझ्या चुलत भावाचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव करताना मी चुकून ९७ च्या जागी ९६ अशी सुरवात करुन सेव केलेला. गंमत म्हणजे नंबरमध्ये एका आकड्याचा फरक असतानाही त्याने फोन केला तर मोबाईल मला त्याचेच नाव दाखवायचा. त्यामुळे मला मी चुकीचा नंबर सेव केला हे दोन तिन महिने लक्षात आलेच नाही. हा भाऊ माझ्याघरीच राहात असल्याने मी सहसा त्याला फोन करत नसे. पण मी दोनतिनदा त्याला फोन केलेला तेव्हा नेमका त्याला झापायचाच प्रसंग माझ्यावर आलेला. आणि दरवेळी त्या पलिकडच्या माणसाने मुकाट्याने माझ्या शिव्या ऐकल्या. एकदा तर मी कहरच केला. मी जिममध्ये निघाले असताना भाऊ घरी आला. त्याला जीमला यायचा खुप कंटाळा. तो म्हणाला तु पुढे जा मी येतो फ्रेश होऊन लगेच जीममध्ये. मी गेले. तासाभराने माझ्या लक्षात आले की हा येणार होता पण अजुन आला नाही. मी लगेच मोबाईल काढुन त्याचा नंबर लावला. त्याने हॅलो करताच रागाने त्याला विचारले 'काय करतोयस?' तो म्हणाला 'समोसा खातोय'. माझ्या नव-याला संध्याकाळी असले काही चटरफटर आणायची सवय आहे. मला वाटले जीममध्ये यायचे सोडुन त्याने आणलेले समोसेच हा खात बसलाय. मी रागाने त्याला फोनवर खुप ओरडले. तो बिचारा मध्येमध्ये बोलायचा प्रयत्न करत होता. मग फोन ठेऊन घरी गेले. भाऊ टिवीसमोर पसरलेला. मला म्हणाला, अरे तु आलीस? मी म्हटले आताच एवढ्या शिव्या खाल्ल्यास तरी परत गोड बोलत विचारतोस? तो म्हणाला, तु कधी शिव्या दिल्यास? मी मोबाईल दाखवला. त्याने नंबर पाहिला आणि म्हणाला, हा माझा नंबर नाही. तु कोणा दुस-यालाच शिव्या दिल्या... Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचा लँडलाईन फोन नवीनच असताना म्हणजे फार आधी जेव्हा काय त्या फोनचे कौतुक असल्याने मीच उचलायचो तेव्हा दिवसाला एक राँग नंबर पक्काच असायचा. तेव्हा माझे एक परवलीचे वाक्यच होते, "हा चलो राँग नंबर है.." ते देखील क्विक, आणि समोरच्याच्या डोक्यात शिरायच्या आधी फोन कट.

तेव्हा नको नको ते त्रास देणारे फोनही खूप यायचे. मग अश्यांना एक मिनिट थांबायला सांगून फोन टिव्हीच्या जवळ जो आमच्याकडे चोवीस तास चालूच असतो, त्याच्या स्पीकरच्या अगदी जवळ ठेवायचो आणि विसरून जायचो. पुढे मग तो फोन काय कधी कट व्हायचा कोण जाणे. टिव्हीवर आवडीचे गाणे चालू असल्यास कदाचित पुर्ण ऐकलेही जात असावे. Happy

@ अनिश्का __ आपला किस्सा खरेच भारी आहे. कथा सिनेमांमध्ये आढळणारा योगायोगच म्हणा ना ..

>>मग अश्यांना एक मिनिट थांबायला सांगून फोन टिव्हीच्या जवळ जो आमच्याकडे चोवीस तास चालूच असतो, त्याच्या स्पीकरच्या अगदी जवळ ठेवायचो आणि विसरून जायचो. पुढे मग तो फोन काय कधी कट व्हायचा कोण जाणे. टिव्हीवर आवडीचे गाणे चालू असल्यास कदाचित पुर्ण ऐकलेही जात असावे.
Rofl

@ अनिश्का __ आपला किस्सा खरेच भारी आहे. कथा सिनेमांमध्ये आढळणारा योगायोगच म्हणा ना ..>>>>>>>>>. हो आहे खरा पण तेव्हा माझी फाटलेली......

Rofl राँग नंबर Rofl
बऱ्याच दा मला येणारे फोन हे देशावरून येत असतात, त्यात ठरलेलं टिपीकल वाक्य भावोजी ह्यांना फोन द्या ना किवां गोडाऊन मधल्य मालची चोकशी करणारे

माझं ठरलेलं उत्तर झोपलाय, लाथ घालून उठवू कांय Proud

एकदा तर एक बाई म्हणत होती कशाला भावोजी मस्करी करून राहिलाय द्या की ह्याना फोन Lol

कॅलिडोस्कोप या धाग्यावर टाकलेले हे राँग नंबरचे किस्से!! Happy

ऑफीसात एकतर वर्कलोडमुळे फोन घ्यायचा कंटाळा येतो... आणि त्यातून राँग नंबर म्हणजे...

एकदा असाच एका बाईने कॉल केला.. जयश्री?
मी म्हटलं राँग नंबर...
पुन्हा त्या बाईच्या (बहुतेक) मुलीने कॉल केला.. जयश्री? हेलो, जयश्री?

मी पुन्हा म्हटलं राँग नंबर... खरी मज्जा ऐका... तर ती शहाणी म्हणते....,"तो फिर जयश्री का नंबर दे दो ना..."

अस्सं सणकलं होतं ना...
असो होतात चुका माणसांकडून....

आणखी १ मजा... एका बाईने एकदा मला कॉल केला आणि तावातावाने बडबडायलाच लागली...
कोन गं तू? आधी छोटूला फोन दे...
मी म्हणाले कोण छोटू?
तर म्हणे त्याचा फोन तुझ्याकडं कसा गं...
त्या छोटूने काय पराक्रम करून ठेवलेला देवाला माहीत...

२-३ वेळा असं झाल्यावर मी नंबरच बदलून टाकला...

आमच्या घरी येणारे राँग नंबर बहुतेक दुपारचेच येतात. तेही गाढ झोपलेले असताना.

असाच एकदा दुपारचा फोन आला. पलीकडून "शेषनाग को फोन दो."
मी : "कोन शेषनाग? राँग नंबर!" म्हणून फोन ठेवला.
परत फोन वाजला आणि परत तोच माणूस "शेषनाग को फोन दो."
मी त्याला सागितले "इथे कोणी शेषनाग नाही राहत. पुन्हा फोन करु नका."

तरीही त्याने पुन्हा २ मिनीटांनी फोन केलाच. मग मात्र मी सुनावले. "हम पृथ्वीलोक मे रहते है. ये नागलोक नही है. फिरसे फोन करोगे तो मै कालियानाग को फोन करके तुम्हारी कंप्लेंट करुंगा."

झाले तो फोन पुन्हा आलाच नाही.

संध्याकाळी आई घरी आल्यावर तिने विचारले की "अरे, ते शेजारी नवीन भाडोत्री आलेत राहायला. सकाळीच आपला नंबर घेऊन गेलेत. त्यांना फोन येणार होता कोणाचा तरी. आलेला का त्यांचा फोन?"

मी सांगितले "२-३ फोन आले होते. भलतेच नाव होते त्यांचे. मी राँग नंबर म्हणून ठेवून दिला तरीही परत परत फोन येत होते."

आई: "काय? शेषनाग साठी विचारले होते का?"

मी : हो!

आई: गधड्या! त्या नवीन भाडोत्र्याचे नाव शेषनाग आहे.

मग मी तिला सगळा प्रकार सांगितला. तिने शेजार्‍यांना काहीबाही सांगुन प्रसंग निभावून नेला.

हम पृथ्वीलोक मे रहते है. ये नागलोक नही है. फिरसे फोन करोगे तो मै कालियानाग को फोन करके तुम्हारी कंप्लेंट करुंगा.">>>:D Lol Lol

मला काही दिवसांपूर्वी एका बयोचा फोन आला. तिने कोणाचंतरी नाव घेतलं. मी रॉन्ग नंबर म्हटल्यावर मला म्हणते 'आम मुझे आपका नाम बता सकती है?'. मी 'नही' म्हणून ठेवून दिला. माझं नाव घेऊन काय करणार होती देवाला ठाऊक.

फोन करुन आपल्यालाच 'कौन बोल रहा है' असं विचारणार्‍या लोकांना भरचौकात चाबकाने फोडलं पाहिजे. त्रास!

फोन करुन आपल्यालाच 'कौन बोल रहा है' असं विचारणार्‍या लोकांना भरचौकात चाबकाने फोडलं पाहिजे.>> स्वप्ना अगदी अगदी Lol

फोन करुन आपल्यालाच 'कौन बोल रहा है' असं विचारणार्‍या लोकांना भरचौकात चाबकाने फोडलं पाहिजे. त्रास!

>>> absolutely. कधी प्रोग्राम ठरवलास तर मला पण बोलाव.

फोन करुन आपल्यालाच 'कौन बोल रहा है' असं विचारणार्‍या लोकांना भरचौकात चाबकाने फोडलं पाहिजे. त्रास!
>>>
+१११ Rofl

अरे वाहून गेलेत का किस्से?? अनिष्का चा कुठला किस्सा??? वाहती पानं का करता रे?? नंतर वाचणार्‍यांना त्रास Sad

स्वप्ना_राज,

>> फोन करुन आपल्यालाच 'कौन बोल रहा है' असं विचारणार्‍या लोकांना भरचौकात चाबकाने फोडलं पाहिजे. त्रास!

काहो? त्यातंच तर खरी मजा असते. मी मोहनदास म्हणून नाव सांगतो.

कदाचित तुम्हा बायकांना त्रास होत असावा.

आ.न.,
-गा.पै.

आमच्या गावाकडे असले प्रकार लै चालतात.

एकदा मला फोन आला. बाई होत्या.

बाई: हॅलो, कोन बोल्ताय तुमी?

तुम्ही कोण बोलताय? कोणाशी बोलायचंय?

बाई: आवो तुमी कोन हायसा?

तुमास्नी कोन पायजे? तुम्ही फोन केलात.. कोण हवंय?

मी नाव सांगत नाही हे बघून त्यांनी प्रश्न बदलला...

बाई: बरं. तुमी कुटनं बोलताय?

अहो, तुम्ही कुठे फोन लावलाय...
मग स्वतःशीच .... ह्म्म्म्म राँग नंबर हाय वाटतं... असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. Lol

मागे एकदा मा बो वर कुठेतरी टाकलेला हा किस्सा!

माझ्या मावशी कडे अचानक एका राँग नंबर यायला लागला. फोनवर बरेचदा एक अमुक-अमुक बाई आहेत का अशी विचारणा व्हायची. मावशी बिचारी हातातली कामं सोडून फोन वाजला म्हणून घ्यायला जावं तर, या बाईंच्या नावाची विचारणा - याने कंटाळून गेली होती...

एकदा दुपारची सर्व कामं आटपून, दमून ती जरा आडवी झाली, मस्त पेपर वाचावा म्हणत...तर फोनची रिंग...चरफडत तिने उठून फोन घेतला तर पलिकडे एक बाई - हा...अगं, अमुक-तमुक - अगं तू सांगितलेल्या कृतीने ते हे (काय तो पदार्थ, त्याचं नाव घेतलं पण पाक इतका पातळ झाला की २ तास झाले तरी आटेना....का य करू आता? असं सगळं झ टपट एका दमात बोलून मोकळी - हिला बोलण्याची उसंत न देता...
एकदाचे मावशीने सांगितलं की अहो - ती मी नव्हेच... फोन ठेवला. परत रिंग! परत त्याच बाई. अहो, हा माझा नंबर आहे, त्या तु मच्या कोण बाई त्यांचा नाही हे मावशीने परत निक्षून सांगितल्यावर त्या पलिकडल्या बाई फारच अजिजीला आल्या - म्हणे अहो, काय सांगता - आता कुठे तिला शोधू? असं करा ना - तुम्हीच सांगा ना आता तो पदार्थ कसा करू? - मावशी सर्द!

आधीच दुपारच्या विश्रांतीवर आलेली गदा... त्या पदार्थाचं नाव कधी ऐकलेलं नाही....आणि ती बया खनपटीस बसलेली - काय करू सांगाच....शेवटी मा वशीने उत्तर दिले - हे बघा असं करा - शांतपणे गॅस बंद करा.... तो पाक फेकून द्या - बाजारात जाऊन काय तो पदार्थ विकत आणा - तुमचीही सुटका नी माझीही! Proud

अगदी राँग नंबर नाही, पण जरा वेगळा किस्सा,
आमच्या ओळखीचा एकजण एका बिल्डरच्या ऑफिसमधे कारकून म्हणुन नुकताच नोकरीला लागला होता.
एकदा दुपारी हा एकटाच होता ऑफिसमधे. आणि एक फोन आला ऑफिसच्या नंबरवर.
पलिकडचा म्हणाला "हेलो मी गटागट बोलतोय", तर हा म्हणाला "का ? सावकाश बोला ना."
तर पलिकडून जाम त्रासिक आणी तिरसट आवाजातले उत्तर,
"सावकाश काय बोला ? गटागट आडनाव आहे माझे" Lol

रायगड..सही!

मला एका भैयाचा फोन आला होता. ट्रंककॉलची बेल वाजते तशी बेल वाजली.फोन उचलला तोच 'संतोषकी मां किधर है?बुलाव उसे.' सांगितले त्याला की बाबा इथे कोणी संतोषकी मां रहात नाही .पण पठठ्या ऐकायलाच तयार नाही.संतोषकी मां कुठे गेली होती तीच जाणे.पण हा बाबा म्हणतोय का मुझे मालूम है वो आपके पास आयी हुई है.दोघांचेही आवाज चढायला लागले होते.पण नवरा-बायकोत गैरसमज नको म्हणून मस्करी टाळली होती. ५-६ वेळा फोन झाले होते.शेवटी माझा नवरा आल्यावर त्याच्याकडे फोन दिला आणि मी सुटले.

लोकहो,

संतोषकी मावरून मला एक किस्सा सुचला आहे. हिंदी सिनेमात दाखवता येईल. हिरो चुकीच्या आकड्यास फोन लावतो आणि असंच काहीतरी भांडण करतो. तेव्हढ्यात पार्श्वभूमीवर संतोषी माचं भजन लागतं. तर त्यावरून त्याला आपला वेगळाला भाऊ सापडतो, इत्यादि.

आ.न.,
-गा.पै.

सगळे किस्से भारी आहेत Rofl
फोन करुन आपल्यालाच 'कौन बोल रहा है' असं विचारणार्‍या लोकांना भरचौकात चाबकाने फोडलं पाहिजे. >> अगदी अगदी!