उरळी-कांचन निसर्गोपचार केंद्र

Submitted by शर्मिला फडके on 5 April, 2014 - 05:00

उरळी-कांचन निसर्गोपचार केंद्रात राहून आलेले आहेत का कोणी इथे? ऐकीव किंवा वैयक्तिक अनुभव वाचायला आवडतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ६-७ वर्षांपासुन वर्षातुन एकदा दहा दिवस राहून येते. दहा दिवसात ३-४ किलो वजन कमी होते पण त्याहीपेक्षा मला माझा फिटनेस वाढल्याचा जाणवतो, फ्रेश वाटत. टचवूड मी माझ्या मिनिमम बीपीच्या गोळीशिवाय इतर कुठलीही औषधं घेतली नाही. छोट मोठ काहीतरी होत असतं पण औषध घेणं टाळते. मुख्य प्रश्न येतो तो जेवणाचा - मला तो काही जाणवतं नाही. टेन्शनफ्री १० दिवसाचा चेंज आवडतो , आपणच आपल्याला लाडावून घेणं ! Happy

धन्यवाद मंजू. अजून सविस्तर लिहाल का? तिथली दिनचर्या, रहाण्याची, जेवण्याची व्यवस्था कशी असते, स्वच्छता, चार्जेस वगैरेबद्दल वाचायला आवडेल. त्यांच्या साईटवरुन माहिती मिळाली ती पुरेशी वाटत नाही.

दिनचर्या - सकाळी योगासनं वेगवेगळ्या थेरपीज - मड थेरपी, कटी स्नान, बाष्प स्नान, इनिमा, मसाज दुपारी सौम्य योगासनाचे प्रकार , निर्स्गोपचारावर लेक्चर्स, रोगाप्रमाणे काही उपचार पध्दती अक्युप्रेशर, अ‍ॅक्युपंचर.. हे सकाळीपण असू शकतात. संध्याकाळी प्रार्थना
रहाण्याची व्यवस्था ५० रु डोर्मेटरीपासून ते वातानुकुलित बंगलेवजा रुम्स आहेत. रिकाम्या असतीलतर निवडता येतात पण ही शक्यता कमी काही रुम्स जुन्या पध्दतीच्या आहेत पण स्वच्छ आहेत स्वच्चता खूप आहे रुम्स झाडल्या पुसल्या जातात नियमीत चाद री बदलतात
जेवण - सकाळी काढा दहा वाजेपर्यंत विविध रस , काढे अकरावाजल्यापासून जेवण १२३० पर्यंत. जेवणात मीठ घातल न घात ल्या सारखं डॉच्या सल्ल्यानुसार जेवण
चार्जेस - तुमच्या रुम चर्जेसमध्ये काही उपचार पध्दतीचे चर्जेस समाविष्ट आहेत.मसाज तुमच्या वजनाप्रमाणेकिमान ५० रु जेवणाच रसाचे, वेगळे पैसे

शर्मिला माझी एक मैत्रिण काही वर्षांपूर्वी तिथे २० दिवस राहून आली होती. दिनचर्या मंजूनं सांगितली आहेच. या मैत्रिणीचे वजनही खूप कमी झालं होतं आणि केस, त्वचा एकदम चकचकीत दिसत होती.

मंजू मी आत्ता त्यांना कॉल केला होता, दोन महिन्यांनंतरची तारीख त्यांनी बुकिंग करता सांगीतली. जुलै म्हणजे ऐन पावसाळा. तेव्हा वॉक वगैरे जमतो का तिथे? एकंदरीत छान वाटतय.

मामी, अगं हो. मी सुद्धा काही आश्चर्यकारक बदल पाहीले आहेत तिथे जाऊन येणार्‍यांमधे. दर वर्षी ठरवते पण वेळ काढता येत नाही तेव्हढा. यावर्षी जाणारच आहे नक्की. मला फ्रोझन शोल्डरचा खूपच त्रास झाला गेले दोन महिने. तिथे जाऊन यावसं वाटतय.

शर्मिला, मी जाऊन आलेली आहे. २००५ मधे. आठवडाभर राहिले होते. मिश्र अनुभव आहेत. अर्थातच चांगले जास्त. आत्ता जरा गडबडीत आहे. तुझे प्रश्न कायकाय आहेत, ते लिहीशील का?

मी असे ऐकले की दिवसाला १००० रुपयांपर्यंत खर्च येतो, तरीही चांगलेच म्हणा.. हॉस्पिटल मधे तर तासाला ही तेवढा येऊ शकतो आणि आपण फिरायला गेल्यावर नाही का सढळ हाताने खर्च करत?

तिथे जाण्याच्या आधी आपण आपलं पूर्ण मेडिकल चेकप करून, ते रिपोर्ट्स घेऊन जा. टार्गेट एरियाज कळतील आणि त्यानुसार उपचार घेता येतील. शक्य असल्यास ग्रूपबरोबर जा, प्रचंड एकटेपणा जाणवू शकतो. लाईफस्टाईल अडचणी नक्कीच बर्‍या होतात, बरीच मदत होते. खरं आव्हान आहे ते घरी परत आल्यावर रूटीन तसेच ठेवणे निदान खाणे-पिणे आणि चालणे अथवा योगा. अडचणीत जाणवण्याइतका फरक पडायला निदान पंधरा दिवस राहायला हवे, सात दिवसांत बेसिक टोनिंग होते आणि उपचारांची दिशा कळते. स्वतःची पुस्तकं आणि इतर वेळ काढायच्या गोष्टींचा भरपूर साठा बरोबर ठेवा. बर्‍यापैकी खर्च होतो पण प्रकृतीत पण त्यापेक्षा खूपच जास्त चांगला बद्ल होतो. त्यांनी दिलेल्या मच्छरदाण्या स्वच्छ नसतात. बाकी इतर स्वच्छता चांगली असते. कपडे धुवायचा साबण, पावडर, बाथसोप, खोबरेल तेल अश्या दैनंदिन गरजेच्या वस्तू जाताना बरोबर ठेवा. आधीच अंदाज घेऊन, कॅश बरोबर ठेवा.

आमच्या शेजारचे एक काका तिथे जाउन १० दिवस राहिले होते. त्यान्ची रक्त शर्करा खुप आटोक्यात आली होती. जायच्या आधी त्याना रोज इन्सुलिन चे इन्जेक्शन घ्यावे लागे, परत आल्यावर एकदम कमी मात्रेच्या गोळ्या सुरु केल्या. ते खुप खुश होते तिथल्या एकुण अनुभवावर.

पhone: +91 20-2692-6298, +91-20-2692-6230
(Press extension numbers 314,315 for booking else press 9 to talk to the operator.)
Enquiries: +91-96-0709-5588
Online admission: +91-96-0706-4466