नातेवाईकांकडून भेट आणि इन्कम टॅक्स

Submitted by स्वाती२ on 2 April, 2014 - 07:24

भेट / गिफ्ट म्हणून मिळालेली रक्कम ५०,००० रुपये पेक्षा अधिक असेल/ वस्तूची किंमत ५०,००० रुपये पेक्षा अधिक असेल तर भेटीवर इन्कम टॅक्स भरावा लागतो. पण भेट नातेवाईकांकडून असेल तर असा इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. यात नातेवाईक म्हणजे कोण क्वालीफाय होते त्याबद्दल माहिती हवी होती. जालावर शोधले पण गोंधळ उडाला. जाणकार मायबोलीकरांनी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.jagoinvestor.com/2013/03/income-tax-on-gifts-received.html

बघा उपयोगी पडतय का? खरंच भेट / गिफ्ट असेल तर ठिक आहे पण इतर कोणत्याही कारणासाठी मिळणारी रक्क्म कृपया भेट / गिफ्ट म्हणून रॅप करू नका. ईन-हाऊस / तज्ञ टॅक्स कन्सल्टन्ट आपल्याकडे नाही आहे असे वरील प्रश्नावरून वाटल म्हणून ह्या आगाऊ सल्ल्याचा प्रपंच.

वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळे आहे ...

रक्ताच्या नात्यांवर टॅक्स नाही आहे परंतु लांबचे नाते असेल तर त्यावर टॅक्स कमी अधिक प्रमाणात लागतो..

आई बाबा भाउ बहिन मुलगा असे रक्ताचे नाते असेल तर त्यावर नाही लागत

परंतु मामा मामे बहिन .. असे लांबचे असल्यास त्यावर टॅक्स लागतो

बहुदा आडनाव समान असेल आणि नात्यातले असेल तर त्यावर टॅक्स नाही लागत

राजसी, धन्यवाद. तुम्ही दिलेली लिंक मी बघितली होती. पण त्यातली माहिती, टॅक्स कंन्सल्टंटनी दिलेली माहिती यात बरीच तफावत होती. त्यामुळे अजूनच गोंधळ उडाला. गिफ्टची देवाण घेवाण होण्याआधी माहीती मिळवावी म्हणून इथे प्रश्न विचारला. विविध क्षेत्रातील मायबोलीकर आस्थेने मदत करतात म्हणून इथे विचारायचे धाडस केले.

नातेवाईक म्हणजे कोण क्वालीफाय होते>>> रक्ताचे नातेवाईक.
आई, वडील, सख्खा भाऊ/ बहिण, सख्खा काका, काकू, सख्खी आत्या, आत्याचे यजमान, सख्खी मावशी, मावशीचे यजमान, सख्खा मामा, मामी, आईचे आई-वडील आणि वडिलांचे आई-वडील.
आई वडिलांचे वरीलप्रमाणे रक्ताचे नातेवाईक.
लग्न झालेले असेल तर मॅरेज सर्टीफिकेटवाला जोडीदार.
त्या जोडीदाराचे वरीलप्रमाणे रक्ताचे नातेवाईक.

इन्कम टॅक्स इंडियाच्या वेबसाईटवर गिफ्ट टॅक्स अ‍ॅक्ट वाचा.

धन्यवाद उदयन...
मला एका सोर्स कडून कळले की नणंदेला भेट देता येते. एक सोर्स म्हणे नाही. तिच गोष्ट चुलत भावंडांच्या बाबतीत. त्यामुळे फार गोंधळ उडालाय.

धन्यवाद मंजूडी.

अजून एक - मला ठाण्यातील चांगले टॅक्स कन्सल्टंट सुचवाल का? मी ज्यांना कन्सल्ट केले त्यांनी दिलेली माहिती फार गोंधळात टाकणारी आहे असे माझ्या लक्षात येत आहे.

स्वाती,

मी कंपनी सेक्रेटरी आणि करसल्लगार म्हणून व्यवसाय करतो. काही मदत हवी असल्यास मला फोन करः ८८०५१५२९५१ किंवा मेल कर scpcs2011@gmail.com

जुजबी माहिती

म्हणशील तर गिफ्ट टॅक्स अ‍ॅक्ट १९९८ साली रद्द करण्यात आला.

जवळ जवळ सर्व पहिल्या आणि दुसर्‍या वर्तुळातील नातेवाइकांकडून मिळालेली कितीही पैशांची गिफ्ट कुठल्याही वेळी प्राप्तिकरमुक्त आहे. नातेवाईकांमध्ये खाली व्यक्ती मोडतातः--

अ. पती किंवा पत्नी
ब. भाऊ किंवा बहिण
क. पतीचा किंवा पत्नीचा भाऊ किंवा बहिण
ड. आईचा किंवा वडिलांचा भाऊ, आईची किंवा वडिलांची बहिण,
ड. स्वतःचे - आई किंवा वडिल, आजोबा किंवा आजी, पणजोबा किंवा पणजी, खापर पणजोबा किंवा खापरपणजी
ई. पतीचे किंवा पत्नीचे - आई किंवा वडिल, आजोबा किंवा आजी, पणजोबा किंवा पणजी, खापर पणजोबा किंवा खापरपणजी
फ. मुले, नातवंडे, पणतू किंवा पणती, खापरपणतू किंवा खापरपणती
ग. वरील सर्वांचे पती किंवा पत्नी.

इतरांकडून स्वतःच्या लग्नाच्या वेळेस मिळालेली कितीही पैशांची गिफ्ट प्राप्तिकरमुक्त आहे. अन्य वेळी एका आर्थिक वर्षात एका व्यक्तीकडून मिळालेली रु. ५०,००० /- पर्यंत गिफ्ट प्राप्तिकरमुक्त आहे.

धन्यवाद मंजूडी आणि शरद.
मंजूडी, माबो संपर्कातून मेल पाठवल्यास मला मिळत नाही.