डायनिंग टेबल मॅट्स

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 31 March, 2014 - 02:01

ह्या क्रॉसस्टीच ने भरलेल्या डायनिंग टेबल मॅट्स !! आधी क्रोशाने बॉर्डर करुन घेतली आणि मग डिझाईन केलं.

IMG_5224.JPGIMG_5225.JPGIMG_5229.JPGIMG_5230.JPGIMG_5205.JPGIMG_5211.JPGIMG_5217.JPGIMG_5200.JPGIMG_5213-001.JPGIMG_5220.JPGIMG_5222.JPGIMG_5195.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच..

मस्तं!

धन्यु Happy

मनीमोहोर......नाही कापड क्रॉसस्टीच चं नाहीये. केसमेंटच आहे पण थोडं विसविशीत. त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला.

वॉव!! काय सुंदर केलंय!! ते बटरफ्लाय डिझाईन अंगचंच आहे का?
रंगसंगती आणि सुबकता दोन्ही अफलातून!! __/\__

शांकली....हो ती फुलपाखरं अंगचीच आहेत Happy

के अंजली...... हो हो अगदी....:)

मनापासून धन्यवाद दोस्तांनो Happy

Khup sundar

मी जेवण मांडताना आठवणीने टेबल मॅट्स काढून घेईन Happy इतक्या सुंदर आहेत, याच्यावर काही पडलं ,लवंडलं तर चाल्णार न्हाई Wink

वर्षू.... Happy

मस्तच.

मी जेवण मांडताना आठवणीने टेबल मॅट्स काढून घेईन स्मित इतक्या सुंदर आहेत, याच्यावर काही पडलं ,लवंडलं तर चाल्णार न्हाई >>>>>>>>>>>.. + १००००

सुंदर.....
माझे दोन प्रश्न तयार मॅटस आहेत का
क्राॅसटीच कापड नाहीये तर भरलं कसं काय

मस्तच.

मी जेवण मांडताना आठवणीने टेबल मॅट्स काढून घेईन स्मित इतक्या सुंदर आहेत, याच्यावर काही पडलं ,लवंडलं तर चाल्णार न्हाई >+१००
मस्त आहे. मला ह्या जन्मात शक्य नाहीये अस काही करता येण. Happy

तहे दिल से शुक्रिया यारो Happy

मंजू......... अगं हा कपडा असा चौकोनी डिझाईनचाच होता. तो बघून माझं विचारचक्र गरगरलं आणि मग त्याचे चौकोन कापून मॅट्स होऊ शकतील अशी कल्पना वळवळली Wink चौकोन कापून त्याला क्रोशाने बॉर्डर करुन घेतली आणि नंतर त्यावर भरतकाम केलं.

क्रॉसस्टीच चा कपडा नाहीये पण केसमेंट असल्यामुळे दोन दोन धागे मोजून क्रॉसस्टीच केलं. अर्थात त्यामुळे जरा जास्त वेळ लागला आणि डोळेफोड झाली पण रिझल्ट बघून कष्टाचं चीज झालं Wink

सई......... इथे मी लाजलेय Wink

लाजू नको, ६४ पैकी ६८ कला येतात तुला! किती आनंद घेत, मन लावून करतेस आणि फायनल प्रॉडक्ट निव्वळ देखणं, सुबक असतं.. मग ती पाककृती असो, एखादा स्टोल असो, ही वरची मॅट्स असोत, पेंटिंग असो, गाणे गाणं असो, कविता असो की तिला चाल लावणं! दिसणं, हसणं, बोलणं, प्रतिसाद देणं, सगळंच आवडतं मला तुझं.. जिवंत असतं सगळं. वरचं वाक्य केवळ तुला खुश करण्यासाठी लिहिलेलं नाही हे कळलं असेल आता तुला Happy

Pages