श्रीज्ञानेश्वरी गौरव
प्रसन्न निर्मल | समई देव्हारी | तैसी ज्ञानेश्वरी | तेवतसे || १ ||
स्निग्ध प्रकाशात | उजळल्या ज्योती | अनुपम दिप्ती | शांतरुप || २ ||
दावी अंतरंग | गीता माऊलीचे | शब्द अमृताचे | करुनिया || ३ ||
भाव श्रीहरिचे | तैसेच पार्थाचे | प्रगटले साचे | मूर्तिमंत || ४ ||
शब्द रुप घेती | देव-भक्त गुज | ह्रदयींचे निज | वर्णियेले || ५ ||
ब्रह्म शब्दातीत | झळके यथार्थ | अफाट सामर्थ्य | ओवी ओवी || ६ ||
उपमा दृष्टांत | शोभे मनोहर | पुष्प परिवार | परिमळे || ७ ||
शांतरस थोर | वर्षतो अपार | निववी अंतर | भाविकांचे || ८ ||
भाषा मराठीसी | चैतन्याचे देणे | सात्विकाचे लेणे | लेवविले || ९ ||
चित्त अनायासे | लाभे विश्रामता | ऐकिता वाचिता | एक ओवी || १० ||
वसू दे वाणीत | नित्य ज्ञानदेवी | हेचि कृपा व्हावी | माऊलीची || ११ ||
वा वा शशांकजी, केवढे रसाळ,
वा वा शशांकजी, केवढे रसाळ, ओघवते आणि समर्पक वर्णन. नवऱ्याला पण आवडली आणि विशेष म्हणजे मुलगा जवळच होता म्हणून त्यालापण ऐकवली.
छान, आत्ता मध्यरात्री अगदी प्रसन्न वाटलं.
वसू दे वाणीत | नित्य
वसू दे वाणीत | नित्य ज्ञानदेवी | हेचि कृपा व्हावी | माऊलीची || ११ ||
हेच मागणे पुनःपुन्हा ,,
धन्यवाद ह्या
धन्यवाद ह्या रचनेसाठी
आणि
___/\___
फार सुरेख
फार सुरेख
खुप सुंदर !
खुप सुंदर !
माफ करा. इथे दुसरेच लिहिले
माफ करा. इथे दुसरेच लिहिले गेले.
वा, केवळ अप्रतिम अतिशय सुलभ
वा, केवळ अप्रतिम अतिशय सुलभ आणि अर्थाने ओतप्रोत!
वसू दे वाणीत | नित्य
वसू दे वाणीत | नित्य ज्ञानदेवी | हेचि कृपा व्हावी | माऊलीची || ११ ||
अप्रतिम
कविता वाचून नामदेवांच्या
कविता वाचून नामदेवांच्या ज्ञानदेवीवरच्या प्रसिध्द ओवीचे स्मरण झाले.
सर्वांचे मनापासून आभार ....
सर्वांचे मनापासून आभार ....
कार्तिक वद्य एकादशी - श्रीक्षेत्र आळंदी - संजीवन समाधी सोहळा ....
माऊलींचरणी प्रेमपूर्वक, आदरपूर्वक दंडवत ....
खूपच रसाळ ,मधुर आणि अर्थपूर्ण
खूपच रसाळ ,मधुर आणि अर्थपूर्ण ! आहाहा !!
सुंदर...
सुंदर...
अप्रतिम रचना.....खुप आवडली
अप्रतिम रचना.....खुप आवडली
पसायदान लिहीणारया माऊलींचे
पसायदान लिहीणारया माऊलींचे ऋण कुठल्या जन्मी तरी फिटेल काय?शशांकजी तुमच्या शब्दांतही सात्विक गंध भरलाय.
मोगरा फुलला...मोगरा फुलला.
सुंदर
सुंदर