किडनी साफ करण्याचे हर्बल औषध

Submitted by प्रमोद् ताम्बे on 27 March, 2014 - 12:17

एक मूठभर धुवून स्वच्छ केलेली कोथिंबीरीची पाने घ्या. ती बारीक चिरून एका स्टीलच्या पातेल्यात घालून त्यात स्वच्छ पाणी मिसळा व १० मिनिटे चांगले उकळवून घ्या व थंड झाल्यावर गाळून घ्या व ते पाणी एका बाटलीत भरून फ्रीज मध्ये ठेवा.रोज सकाळी झोपून उठल्यावर एक भांडे हे पाणी पित जा. एक आठवड्यातच तुमचा तुम्हाला फरक जाणवेल.किडनीत साचून राहीलेले अनावश्यक क्षार व इतर विषद्रव्ये लघवीवाटे निघून जाऊन तुमची किडनी स्वच्छ होईल व जोमाने कार्य करू लागेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रमोदजी,
किडनीत साचून राहीलेले अनावश्यक क्षार व इतर विषद्रव्ये लघवीवाटे निघून जाऊन तुमची किडनी स्वच्छ होईल व जोमाने कार्य करू लागेल.>>> याला काही आधार आहे का? कुणी संशोधन करुन निष्कर्ष काढला आहे का? असे नसेल तर इथे छाती ठोक पणे लिहणे बरोबर आहे का?

यावर प्लिज "याने नुकसानतर काहि होत नाहि ना" असा प्रतिसाद देउ नका.

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो. Sad

रोजच्या जेवणात--वरण, भाजी, आमटी यामधे कोथिंबीर असतेच/असावी आणि रोज भरपूर पाणी प्यावे मग वरील उपाय करायची गरज पडणार नाही. Happy

धणे घालून उकळलेलं पाणी पितात उन्हाळ्यांवर हे ऐकलं होतं आजीकडून. उन्हाळे म्हणजे १ नंबरला कमी होणे आणि जळजळणे.

बाकी रोज भरपूर पाणी प्यावेच सिस्टिम व्यवस्थित फ्लश होण्यासाठी. सकाळी उठल्या उठल्याही चहा ढोसायच्या आधी १ ग्लास कोमट पाणी प्यावे. कोमट म्हणजे साधारण बॉडी टेम्परेचरला मॅच करेल इतकं.

ती बारीक चिरून एका स्टीलच्या पातेल्यात घालून त्यात स्वच्छ पाणी मिसळा व १० मिनिटे चांगले उकळवून घ्या व थंड झाल्यावर गाळून घ्या व ते पाणी एका बाटलीत भरून फ्रीज मध्ये ठेवा.रोज सकाळी झोपून उठल्यावर एक भांडे हे पाणी पित जा.

हे कोथिंबीरीच पाणि ठेवायला प्लास्टिकची बॉटल चालेल का, ग्लासचीच घ्यावी ? कारण प्लास्टिकच्या बॉट्ल
मध्ये हानीकारक केमिकल्स असतात,

गोक्षुरादि क्वाथ (=काढा) हे मूत्रल औषध आहेच .सूज आल्यास पुननर्वादि काढा खात्रीशीर आहे .
काही रोग नसेल तर पाणी भरपूर पिणे हे योग्यच .थंडावा हवा असेल तर वाळवलेली सुगंधि गुलाबकळी टाकून चहा करावा .डाळींब साल ,संत्रे साल वाळवून ठेवावी .यांचाही चहा करावा (चहापत्ती ऐवजी हे जिन्नस वापरावेत ) .तुळस ,सबजा बी टाकलेली सरबते आहेत .लहान मुलांसाठी अरविंदासव (कमळाचे औषध) आहे .या महिन्यांत पिकलेली बेलफळे मिळतात त्याच्या बिया काढून गर तीन दिवसांत वाळतो तो साठवून ठेवा .चांगला टिकतो .याचे नंतर सरबत ,चहा छान होतो .तापात चांगला .मनुका उकळून पाणी पिणे .

किडनी साफ ठेवण्याचे सर्वात उत्तम स्वस्त आणि मस्त औषध म्हणजे रोज ३ लिटर पाणी पिणे.
आपली मोरी साफ ठेवण्यासाठी आपण जितके पाणी ओताल तितकी ती स्वच्छ राहील.हे इतके साधे आणि सरळ आहे.
मुतखड्यासाठी कोथीम्बिरीचे पाणी पिउन येणारे भरपूर रुग्ण मी पाहीले आहेत. त्याचा कुणालाही फारसा फायदा झालेला आढळला नाही.
आपण भरपूर पाणी प्याल तर रक्तात पाणी जास्त होते ते बाहेर टाकण्य्साठी मूत्रपिंडा चा रक्त पुरवठा वाढतो आणि त्यातून गाळले जाणारे पाणी पण वाढते पर्यायाने मुत्राची मात्रा वाढते अशा दुहेरी परिणामांनी मूत्रपिंड स्वच्छ राहते.
वि सू-- पन्नाशीच्या पुढच्या लोकांनी पाणी रात्री सात पूर्वी प्यावे ( रात्री वारंवार लघवीला जायला लागते त्यासाठी)

तांबेकाका, तुम्ही सुरेश नगर्सेकर यांची पुस्तके वाचून पाहा. त्यात अतिशय उत्तम माहिती दिलेली आहे.

ईब्लिससर, किडनी म्हणजे मोरी नाही,
एकवेळ ब्लॅडर म्हणजे मोरी.

डॉ खरे, तुमचा सगळा प्रतिसाद हा 'किडनीचे /हार्टचे विकार नसलेल्या नॉर्मल लोकांसाठी आहे' अशी फूटनोट अ‍ॅड करा.
नाहीतर काही अतिउत्साही सिकेडी चे पेशंट कुठेतरी असे पाणी पिण्याबद्दल वाचून फ्लुईड ओवरलोड, हायपोनॅट्रेमिया इ होऊन येत असतात.

@इब्लीस
किडनी चा मोरीशी तसा संबंध नाही. हे फक्त स्वच्छते साठी भरपूर पाण्याचा उपयोग हे ठसविण्यासाठी होते.
@साती ताई,
मला वाटते कि ज्यांची मूत्रपिंडे खराब झाली आहेत त्यांनी किंवा ज्यांना हृदय विकार आहेत त्यांनी असे जालावर वाचून/ अनाहूत सल्ल्याने काहीच करू नये. कोणतीही गोष्ट आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावी.
जालावरील सर्व साधारण सल्ला हा कोणत्याही व्यक्तीला पूर्ण लागू पडणारच नाही. आणि हा सल्ला साधारण १५ ते ५५ वयाच्या निरोगी माणसालाच असतो हे गृहीत धरून चालावे.
@बेफिकीर
सेकंडच का अजून चार "ओपिनियन" घ्या. पण एक लक्षात ठेवा. TWO DOCTORS AND TWO WATCHES NEVER AGREE. शेवटी आपल्याला कोणत्यातरी एका डॉक्टर वरच विश्वास ठेवावा लागेल. कोणत्याच डॉक्टर वर धड विश्वास नसलेले IUCD (INTERNET USER CONFUSED DESI) सर्वत्र भरपूर दिसतात. अंतरजाला वर समस्यांचे समाधान होण्या ऐवजी त्यांच्या गोंधळात भरच पडतो.

इब्लिसडॉक्टरांची आयडिया पूर्णतः व्यवहारिक आहे, असे नोंदवतो.

इंटरनेट वर शोध करुन मग डॉक्टरकडून सल्ला किंवा प्रिस्क्रिप्शन मागणारे महाभाग बघितले आहेत.

हा विषय निघाला आहे म्हणूनः

१. मध्यंतरी मिररमध्ये की कुठेतरी चक्क एक मोठे आर्टिकल आले होते ज्यात इंटरनेटवर वाचन करून डॉक्टरांशी हुज्जत घालणार्‍या स्वयंघोषित रुग्णांचे वाढलेले प्रमाण ही अनेक डॉक्टरांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे ह्यावर विस्तृत लिहिलेले होते.

२. माझे वरील दोन प्रतिसाद हे निव्वळ गंमत म्हणून लिहिलेले होते, तेथे द्यायचा राहिलेला दिवा येथे देत आहे.

Light 1

.

हे एकदा करुन पाहिलेलं.. कोथिंबीरीचं.. इफेक्टिव्ह डाययुरेटिक वाटलेलं तेव्हा.. नंतर विचार केल्यावर कळेना की कोथिंबीरीमुळे की एकदम तांब्याभर पाणी प्यायल्याने असं होतय म्हणुन.. परत कधी ट्राय केलं नाही

माफ करा, (विशेषतः मायबोलीवरील सन्माननीय डॉक्टरांची माफी)

विषयांतर करतोय.

सुशिक्षित पण अज्ञानी पेशंटचा व त्याच्या असहायतेचा गैरफायदा घेणारे डॉक्टर सर्वत्र नाही का दिसत. मग कुणी आधी अभ्यास करून डॉक्टरकडे गेल तर चुकल कुठे.

नाहीतरी सेकंड, थर्ड, फोर्थ ओपिनियन घ्या अस डॉक्टरच म्हणत असतात. Happy

मला रॉस रिव्हर फीवर झाला होता. एकतर हा आजार आपल्याकडे कॉमन नाही. डॉक्टरांचे म्हणणे याला औषध नाही. शेवटी मला इंटरनेट वरच सोपा उपाय सापडला. पेन्स कमी (झीरो) करण्यासाठी सी व्हिटॅमिनच्या गोळ्या. Happy

असो.

प्रमोद तांबे दिसले नाहीत ब-याच दिवसात माबोवर. कोणी संपर्कात असेल त्यांच्या तर चौकशी करा प्लिज.

>>TWO DOCTORS AND TWO WATCHES NEVER AGREE. <<
इफ टु वॉचेस डोंट अ‍ॅग्री, वन (ऑर बोथ) ऑफ देम गॉट टु बी राँग. सेम अ‍ॅनलजी अ‍ॅप्ल्यास टु डॉक्टर्स??? Happy

रक्तातील creatinine ची मात्रा नियंत्रित ठेवण्यासाठी औषधांव्यतिरीक्त घरगुती इलाज आहेत का?

रोज तीन लिटर बियर नक्की चालेल. किडनी साफ राहतील पण लिव्हर खराब झाले तर काही सांगता येणार नाही आणि दारूचे व्यसन लागले तर ती वेगळीच काळजी.

Pages