जिवंत

Submitted by अवल on 31 January, 2013 - 23:58

ओली जखम
सुकली, खपलीही धरली
खपली सुकली; पडूनही गेली
व्रण,...तो ही झाला; फिका ... फिका

वाटलं
सारं शांतावलं
झाला त्या
वादळाचा अंत...!

अन एका
ऊबदार क्षणी
सारे भसाभस
ऊतू गेले

किती प्रयत्नांनी
वरून घातलेले
निर्विकारपणाचे खडक
पाझरले, वितळले

खाली तसाच;
तसाच्या तसाच
लाव्हा खदखदत
जिवंत!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली ग Happy

छानच जमलेय.

---------------------------------------------------------------
"उबदार क्षणी" ऐवजी "गाफिल क्षणी" असं वाचून पाहिलं.
वैम. कृगैन.

मस्त..... Happy

हम्म...
मला वाटतं इथे मला हळवं, ते ही जवळच्या
व्यक्तीच्या मायेत अपेक्षित होतं.
ते वाहून जायलाच हवं तरच संपेल. अन निचरा व्हायचा तर सजग पणे, गाफिल राहून नाही असं वाटतय.....
आणि > कृगैन< हे तुमच्या बाबतीत कधीच नाही हो Happy

मस्त!

छान!

छान !