Submitted by अवल on 31 January, 2013 - 23:58
ओली जखम
सुकली, खपलीही धरली
खपली सुकली; पडूनही गेली
व्रण,...तो ही झाला; फिका ... फिका
वाटलं
सारं शांतावलं
झाला त्या
वादळाचा अंत...!
अन एका
ऊबदार क्षणी
सारे भसाभस
ऊतू गेले
किती प्रयत्नांनी
वरून घातलेले
निर्विकारपणाचे खडक
पाझरले, वितळले
खाली तसाच;
तसाच्या तसाच
लाव्हा खदखदत
जिवंत!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम अभिव्यक्ति .....
अप्रतिम अभिव्यक्ति .....
धन्यवाद शशांक. मला नेहमी
धन्यवाद शशांक. मला नेहमी सारखी भिती वाटत होती. फार अगम्य झाली की काय
आवडली ग
आवडली ग
छानच
छानच जमलेय.
---------------------------------------------------------------
"उबदार क्षणी" ऐवजी "गाफिल क्षणी" असं वाचून पाहिलं.
वैम. कृगैन.
मस्त.....
मस्त.....
हम्म... मला वाटतं इथे मला
हम्म...
मला वाटतं इथे मला हळवं, ते ही जवळच्या
व्यक्तीच्या मायेत अपेक्षित होतं.
ते वाहून जायलाच हवं तरच संपेल. अन निचरा व्हायचा तर सजग पणे, गाफिल राहून नाही असं वाटतय.....
आणि > कृगैन< हे तुमच्या बाबतीत कधीच नाही हो
अवल, छान. भावना पोचल्या.
अवल, छान. भावना पोचल्या.
मस्त!
मस्त!
छान!
छान!
छान !
छान !
निर्विकारपणाचे खडक<<< व्वा,
निर्विकारपणाचे खडक<<< व्वा, सुंदर कल्पना!