एका लग्नाची (दु:खद) गोष्ट

Submitted by Phoenix२०१४ on 13 March, 2014 - 03:44

लग्न हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा. मायबोलीवर सामाजिक समस्यांवरच्या धाग्यावर लग्नाबद्दल वाचायला मिळाल आणि मग वाटल कि आपला अनुभव इथे का टाकू नये!

मी सध्या ३३ वर्षांचा विवाहित असून पुणेस्थित एका IT कंपनीत काम करतो. मी पुणेकरच ! एका सर्वसामान्य घरातून लहानाचा मोठा झालो. करियरमध्ये सुरुवातीला खूप कष्ट करून बरेच चढउतार होऊन शेवटी आयटी मधे स्थिरवलो आणि लग्नासाठी नाव नोन्दवल्यावर यथावकाश मुलींची स्थळ येऊ लागली. मुलांच्या शाळेत असल्याने आधी शाळा नि नंतर कॉलेज मधे देखील माझया ग्रूप मधे फक्त मुलेच होती. पुढे करियर ची गाडी स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात आपल्याला मुलगी कशी हवी वगैरे विचार कधीच केले नाहीत. पण जसजस चहा पोहे सुरू झले तसा मी सीरीयस झालो आणि एक अनामिक भीतीही वाटू लागली. एक-दोन भेटिंवर संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेण फार जिकीरीच वाटू लागल आणि मी उगाचच अतिसावध आणि पर्यायाने अतिचिकित्सकपणे वागू लागलो. केवळ भीतीपोटी मीअनेक चांगली स्थळ नाकारली आणि काही नकारही पाचवले. त्याजोडीला कधी मुलगी आवडली तरी पत्रिका जुळायची नाही तर कुठे गुण नाहीतर नाड. नंतर बरेच महिने लग्नाचे योग नाहीत म्हणून गेले. अस वर्ष-दीड वर्ष निघून गेल आणि हळूहळू मला frustration येऊ लागल आणि सय्यम सुटू लागला. शेवटी घरातूनही दबाव यायला लागला, मित्रदेखील टिंगल करू लागले. आता मोजून काही ठराविक मुली बघ आणि त्यातून पसंत कर अस जवळचे नातेवाईक म्हणू लागले. अशातच शेवटी मी एक मुलगी पहिली, तिला एकदाच भेटलो आणि काहीश्या घाईनेच पसंती दिली आणि इथेच चुकलो.

लग्न ठरल्यावर जेव्हा आम्ही पहिल्यांदाच बाहेर फिरायला गेलो तेव्हा मुलगी मला जास्त जाड वाटली. मुलगी दाखवायच्या कार्यक्रमाच्या वेळी साडीमुळे मुलगी जाड आहे ते समजल नव्हत आणि नंतरच्या भेटीच्यावेळी माझ्या लक्षत आल नाही. अर्थात तो माझ्यादृष्टीने फार महत्वाचा मुद्दा नव्हता. पण मी जसजसा तिच्याशी बोलत गेलो आणि आमचा संवाद होऊ लगाल तसतस माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. माझ्या लक्षात आल की हिची आणि आपली maturity लेव्हल अजिबात मॅच होत नाही. इतर अनेक लहानसहान गोष्टींमधला तिचं अज्ञान आता मला जाणवत होतो. एक लहानस उदाहरण द्यायचं झाल तर माझ्या होऊ घातलेल्या पत्नीला पु ल देशपांडे यांची पुस्तक सुद्धा माहिती नव्हती. अशा इतर अनेक लहान सहन बाबी पहिल्या 5-6 दिवसातच उअघडकीस आल्या. अशातच एक दिवस मला तिच्या चेहर्यावर आधी लक्षात न आलेले काही डाग दिसले नि मी बाबरून गेलो. मुलीचं दिसणं हा फार महत्वाचा भाग नसला तरी माझ्याही काही कमीतकमी अपेक्षा होत्या. लग्न ठरायच्या वेळचा 1-2 भेटिंमधे बराचसा भासच निर्माण केला गेला होता अस वाटू लगाल. एकूणच मुलीच्या निवडीच्या बाबतीत मी घोड चूक केली होती हे आता माझ्या ध्यानात आल होत. मी हळूहळू डिप्रेशन मधे जाऊ लागलो आणि मला कशातच रस वाटेना. तशातच काही घरगुती अडचणींमुळे लग्न ताबडतोब एका महिन्यात करायाच ठरलं आणि माझ्या काळजात धस्स झाल. इकडे माझ्या घरच्यांना ह्या सगळ्याबद्दल माहिती असण्याचा संबंधच नव्हता कारण त्याच्या मते मी आनंदात होतो. माझी उत्साही बहीण दादाच लग्न म्हणून आनंदात होती तर आई बाबा सुनेच्या स्वागतासाठी सज्ज होते. वय वर्ष ८० असलेली माझी लाडकी आजी डोळे मिटण्याआधी नातसून बघायला मिळणार म्हणून समाधानात होती. जवळच्या नातेवाईकांमधे मी खूप लाडका आणि त्यामुळे त्यांच्याही उत्साहाला उधाण आल होत. पण ह्या सगळ्यात मी मात्र कुठेही नव्हतो...मी फक्त दिसागणिक सग्यासोयर्यांच्या इच्छा अपेक्षानच्या ओझ्याखाली दबला जात होतो. पुढच्या 2 दिवसात बैठक पण झाली आणि मग प्रचंड दडपण आल. अनेक ओळखीचे लाग्नावरून माझी चेष्टा करायचे त्याच्या गुदगुल्या होण सोडाच पण अक्षर्ष: नको नको व्हायच. मला प्रचंड नैराश्य आल.

मला माझया होणार्या बायाकोबरोबर बाहेर फिरायला जाणही नकोस वाटू लगाल. शेवटी न राहवून मी माझ्या एका मित्राला हे सगळ बोललो. त्याने मला हे लग्न मोडण्याचा उचित सल्ला दिला आणि त्यात काहीही गैर नाही हेही समजावलं. पण माझ्यासारख्या conservative कुटुंबात वाढलेल्या मुलासाठी हे खूप अवघड होत. त्या रात्री मी रात्रभर मनाची तयारी केली. मला तो दिवस आजही आठवतोय. दुसर्या दिवशी companytun तब्बेतीच कारण देऊन लवकर घरी परत आलो. घरी आल्यावर सगळ्याना समोर बसवून कसबस माझया मनातल बोललो. घरच्यांना हा अनपेक्षित धक्काच होता. आज्जी डोक धरून बसली आणि आई रडू लागली, वडिलांना office मधून लवकर बोलावून घेतलं. आता घरचेही अवघडले कारण जरी लग्न ठरून फक्त १० दिवसच झाले होते तरी महिन्याभरात लग्न उरकायच असल्याने गोष्टी बर्याच पुढे गेल्या होत्या आणि लग्नाची सर्व बोलणी देखील झाली होती. त्यामुळे सगळ्यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसच मुलीच्या वडिलांना BPचा त्रास आहे तेव्हा त्याना काय धक्का बसेल वगैरे भीती घातली. घरच्यानी ओळखीच्या कोण्या एका महाराजांना फोन करून रडत रडत घडला प्रसंग सांगितला. त्यानी फोनवरून समजूत काढून सर्व काही ठीक होईल काही काळजी करू नका असा सल्ला दिला. आता माझाही सुरुवातीचा जोर आपोआप थोडा कमी झाला सगळा गुंता होऊन मी गप्प बसलो मग घरच्यानी मझीच समजूत काढली आणि तो विषय तिथेच संपला. माझच लग्न मोडण्याचा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न फसला. त्या दिवसानंतर रोज अगदी आजपर्यंत मी स्वतःला त्यासाठी शिव्या शाप देतो. जर मी लावून धरल असत तर तेव्हाच माझ ठरलेलं लग्न मोडून पुढचा अनर्थ टळला असता.

हा प्रसंग घडून गेला आणि मी मात्र आतून जळत राहिलो. कुठेतरी लांब पळून जवस वाटू लागल पण तेवढीहि धमक दाखवू शकलो नाही. टिकटिक करत काटा पुढे सरकत होता आणि पुढच्या १०-१२ दिवसात मी बोहल्यावर चढलो सुद्धा. म्हणता म्हणता माझ लग्नही झाल आणि मग हळूहळू उरलेल्या आशा अपेक्षनचि शकल उडाली. माझया बायकोला साधा हिशेबही चटकन करता येत नाही आणि चार चौघात काय कस बोलाव वागाव तेही काळत नव्हत. ह्या सगळ्या मधे मे पुरता फसलो होतो आणि माझया हाती काहीही पडल नव्हत. 21 व्या शतकात स्वत:च्या मधुचंद्राला रडणारा मी एकमेव पुरूष असेंन. मी बरेचदा स्वताला सावरण्याचा आणि ह्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. त्यातल्या त्यात माझया दैवाने माझी एकाच बाबतीत आब राखली होती ती म्हणजे माझया बायकोचा स्वभाव वाईट नव्हता. पण नुसत्या चांगल्या स्वभावाने संसारात रस कसा निर्माण होईल. प्रत्येक पुरुषाची स्त्रीकडून त्यापलीकडे अपेक्षा असतात नं! सुरुवातीला तर आमच्या आवडी निवडी एकूणच विचार करायची पातळी वेगवेगळी असल्याने संवाद असा व्हायचाच नाही. नव्या लग्नाचे ते पहिले वर्ष तर जीव घेणार होत. आक्ख आयुष्य अस काढायचय ह्या विचारानेच मी डिप्रेस राहू लागलो आणि इतर जोडप्याना पाहून मला प्रचंड न्यूनगंड निर्माण व्हायचा. मी कोणाच्यात सामील होईनसा झालो आणि एकूणच ते नव्या नवलाईचे दिवस 'मोस्ट हेटेड' ठरले. भरीस भर म्हणजे इतारांकडून कधी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे हिणकस शेरेही आईकायला मिळायचे. पण आता इथून मागे फिरण नव्हत कारण आपल्या समाज मान्यतेचा एक भाग म्हणून मला हे लग्न टिकवाव लागणार होत आणि सगळ आलबेल असल्याचा सूर आळवावा लागणार होता. अशाच डिप्रेशन आणि मानसिक त्रासात मी चुका करतच गेलो आणि कदाचित मुल झाल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल आणि आपल्या संसाराला वेगळा अर्थ येईल या विचारने मी संततीबाबत डिसिशन घेतला. मुलगा झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस छान गेले पण हळूहळू परत जुन्या जखमा नवीन होऊन वाहू लागल्या. अर्थात ह्या सगळ्यात माझ्या सारखी माझ्या बरोबर माझी बायको देखील होरपळत होती ते मला पक्क ठाऊक होत. माझ्या एका चुकीच्या निर्णयाने त्या बिचारीच आयुष्याच पण मी नुकसान केल होत. कित्येकदा मी स्वताची समजूत काढायचा प्रयत्न केला पण ह्या संसारात मला पहिल्यापासूनच रस नव्हता आणि लग्नानंतरच हे विस्कटलेल सहजीवन हे त्याचच प्रतीक होत.

आज माझा मुलगादेखील 3 वर्षांचा आहे आणि तोच फक्त आम्हाला जोडणारा दुआ आहे. अजूनही कित्येकदा भूतकाळातील गोष्टींचा पश्चात्ताप होतो, खूप तळमळतो आणि सतत स्वताला दोष देतोआणि हे सगळा सोडून देऊन विभक्त होऊन नव्यान सुरूवात करायची तीव्र इच्छा होते. पण तेव्हढ्यपूरतच....परत एकदा उरलासुरला सदसदविवेक जागा होतो आणि विचारतो की "काय रे कुठल्या कारणासाठी विभक्त होणार तू तुझया बायको मुलापासून ?..काय दोष आहे तिचा आणि काय दोष आहे तुझया मुलाचा !!!" बस्स!! इतक्या 2 प्रश्नांनी मी भानावर येतो आणि मुकाटपणे परत आपल्या निरस संसाराकडे वळतो. मी आणि माझी बायको दोघांनीही आता हे आयुष्य accept केलय. माझया बद्दल बोलायच झाल तर जुन्या खोल जखमंवारती काळाने एक पातळसा पापुद्रा धरलाय! आनंदी प्रेमी युगुल पहिली किंवा उत्साहात फिरणारी नवविवाहित जोडपी पहिली की आपण काहीतरी कायमच गमावल्याची तीव्रतेने जाणीव होते. हे नाजूक क्षण आपल्याला कधीच अनुभवता नाही आले आणि येणारपण नाहीत ह्या विचारने मन सुन्न होत आणि शब्दश: डोळ्यात पाणी येत. लग्न हा माझ्यासाठी किती महत्वाचा आणि नाजूक विषय होता पण मझा प्रचंड भ्रमनिरास झाला आणि मनावर एक खोल जखम झाली ती कायमची...अश्वत्थाम्याच्या त्या कपाळावरच्या जखमेसारखी..सतत भळाभळा वाहणारी.

आज इतक्या वर्षांनी मी हे सगळ लिहितोय त्यामागचा एकाच उद्देश आहे की देव न करो आणि कुणी अशा अनुभवातून जावो पण जर का गेले असतील तर त्यांना हे समजावे कि ते काही एकटे नाहीत आणि जे कोणी लग्नाचे आहेत त्यानी हा critical डिसिशन घेताना अधिक सतर्क रहाव आणि जोडीदाराबद्दल नीट माहिती काढावी. सर्वात महत्वाच म्हणजे घाईघाईत किंवा संयम न दाखवता कुठलाही निर्णय घेऊ नका. होणार्या जोडीदाराला ठरवून ४-५ वेळा भेटा तर कधी सहज unplanned casually भेटा. तुमच्या मनाचा आवाज ऐका. दुर्दैवाने जर कोणी लग्नाआधी माझ्यासारख्या अनुभवातून जात असेल तर व्यवस्थित विचार करून प्रत्यक्ष कृती करताना अजिबात गडबडून जाऊ नका. घरातील मोठ्यांना नीट विश्वासात घेऊन त्यांना तुमच्या अपेक्ष मोकळेपणे सांगा. तुमच्या भावी अयुष्यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा !!
बाकी माझ्याबद्दल बोलायचं झाल तर हा लेख वाचून मला हव तर मला नाव ठेवा, शिव्या शाप द्या, माझी चेष्टा करा पण फक्त शेवटी एकदा 'लढ' म्हणा ..बस बाकी काही नको

टीप: हा लेख सुशिक्षित समाजातील मुले व मुलीं दोघांसाठी आहे. ह्यामागे आपला समाज किंवा लग्नव्यवस्था ह्यातील त्रुटी दाखवायचा अजिबात उद्देश नाही. आज आपल्याच अवतीभवती पारंपारिक मार्गाने लग्न करून संसारात सुखी झालेली अनेक जोडपी आहेत तेव्हा तो प्रश्नच येत नाही. तरीसुद्धा ह्या व्यवस्थेचा एक भाग बनताना कुणाच नुकसान होऊ नये हाच एकमेव सार्थ हेतू आहे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुमोदनाबाबत कौतुक आणी बेफिकीर याना फुल्ल अनुमोदन.:फिदी:

बेफिकीर तुम्ही मायबोलीकरान्ची नस अचूक पकडलीत.:फिदी:

जेव्हा गट्/कम्पु तयार होतात तेव्हा एकमेकाना प्लस दिले जातात. ( मी कोणत्याही गटात नसले तरी प्लस प्लस करतच रहाते.:खोखो:) त्यातुन नावाचे शॉर्टकट केले जातात.

ज्याना स्वतःची मते नसतात, ते दुसर्‍याना सल्ले द्यायला ( आणी आपल्या सह माबोकराना) कायम पुढे असतात. हो ना, बै मी ही अगदी हेच लिहायला इथे आले होते वगैरे( आधी का नाही लिहीले? मुहुर्त पाहिजे होता का?)

जाम हसायला येते कधी कधी असे वाचुन.

जाई.:फिदी: हे खूप वेळा घडले आहे. पण धागाकर्त्याच्या/कर्तीच्या सहनशीलतेला दाद द्यावीच लागेल. इतक्या पोस्टी येऊनही यान्ची एकही प्रतीक्रिया नाही.

मला अस का वाटत आहे कि तुम्ही तुमच्या बायकोला दुसर्‍याच्या बायको सोबत कंपेयर करुन कुढत बसला आहात???

हे चुकीचच आहे... तिला फक्त एकदा समजुन घेण्याचा प्रयत्न करा... आणि मनापासुन तिच्यावर प्रेम करा....
तुम्हाला सुध्धा तुमच्या बायकोतले पॉझीटिव्हा पॉईंट दिसतील....

रिया , अहो(अन्विता, ज्याचं त्याला कळत असतंच .. हे तुमचेच वाक्य आहे ना . ) किती प्रश्न विचारलेत तुम्ही लेखकाला अगदी बायकोच्या आवडी पासून ते त्यांच्या दिसाण्यापर्यंत.

>>>>>
त्याची काळजी तुम्ही का करताय?
मी तुमच्याशी बोलत नाहीच आहे.
तुमच्या बीबी वरच्या गोष्टी तुमच्या बीबीवर ठेवा. किंवा मला उद्देशुन काहीही लिहु नका

नंदिनी +१
रिया +१
नवरा बायकोंच्या आवडी- निवडी सारख्याच असाव्यात असं नाही. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर माझ्या आणि माझ्या नवर्‍याच्या आवडी आजिबात जुळत नाहीत. त्याला ट्रेकिंग, सायकलिंग, क्लासिकल संगीत आवडत तर मला वाचन, फिरायला,नाचायला, जुन्या चित्रपटातील आणि पाश्चात्य संगीत आवडत. त्याला नाटक तर मला चित्रपट आवडतात. लग्नानंतर मी त्याच्या बरोबर ट्रेकला जायला लागले, तर तो माझ्याबरोबर फिरायला यायला लागला. कधी नाटक तर कधी चित्रपट पाहतो. अर्थात आम्ही स्वतःच्या आवडींना बदलेलं नाही आणि हे सर्व करण्यासाठी आम्ही दोघांनी एकमेकांना आग्रहपण नाही केला. बरेचदा आपणच एखादी गोष्ट आपल्याला आवडतं नाही म्हणून बसतो, पण प्रत्येक्षात ती गोष्ट अनुभवल्यावर आवडूही शकते.
चारचौघांदेखत कसं बोलू नये हे तर काही कितीही मोठे झाले तरी त्यांना कळत नाही, मला पण नाही कळतं. माझा नवरा मात्र संभाषण कुशल आहे. मी अतिशय शॉर्ट टेम्पर्ड आहे, राग आला की काहीही बोलते अशा वेळी तो मला समजावून सांगतो, आणि मला माझी चूक आपोआप उमगते.

वाद हे प्रत्येक जोडप्यात होतात, आमच्यात तो पुण्याचा आणि मी कोल्हापूरची असण्यावरून सुद्धा वाद होतात, पण वाद होण्यासाठी पण संवाद असावा लागतो. तुम्ही तुमच्या पत्नीला आणि तुमच्या पत्नीने तुम्हाला मनापासून स्वीकारल तर सगळच जुळून येईल. अर्थात तुम्हाला ईथे व्यक्त होण्याचा हक्क आहेच, फक्त अस राहून दोघांच आयुष्य वाया घालवण्यापेक्षा आहे ती परिस्थिती स्विकारा.

पण वाद होण्यासाठी पण संवाद असावा लागतो. तुम्ही तुमच्या पत्नीला आणि तुमच्या पतीला मनापासून स्वीकारलत तर सगळच जुळून येईल. अर्थात तुम्हाला ईथे व्यक्त होण्याचा हक्क आहेच, फक्त अस राहून दोघांच आयुष्य वाया घालवण्यापेक्षा आहे ती परिस्थिती स्विकारा. >>>>> +१००

चिऊ, कधी कधी प्रस्थापित आयडी आपली ओळख जाहिर न करता प्रॉब्लेम इथे मांडता यावा म्हणून एखादा आयडी काढू शकतातच की. नाही का? Happy त्यात गैर काय आहे?

लेख मला आवडला. लेखकाच्या लग्नाला उणी पुरी ५ वर्ष झाली आहेत त्यांना एक मुलगा आहे आणि तरी देखील जुन्या आठवणी त्यांना सतावत आहेत. लग्न आधीचा मानसिक संघर्ष लेखकाला पूर्ण आठवतोय आणि त्याने तो जशाचा तसा लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. धनवंती नंदिनी बेफिकीर कौतुक दक्षिणा टण्ण्या वगैरे लोकांनी किती positive ani सूचकपणे लिहील आहे. पण बाकी उगाच चिवचिवाट आहे. माफ करा पण रिया आणि maitreyee, तुम्ही फक्त आणि फक्त स्त्रीच्या दृष्टीकोनातून लेखकावर तोंडसुख घेतलं आहे. रिया म्हणतात बायकोला नाचता येत तर तुम्हाला येत का? अरेच्चा ... तर maitreyi लेखकाला girlfriend नव्हती म्हणून तो दिसायला चांगला नसावा आणि काही कारणाने (त्यांनाच माहित) त्याच्याकडे decision making powerनाही इतक बोलून गेल्या. Typical immature नि बालीश comments. अहो ह्या जगात बरेच लोक पुढचा मागचा विचार न करता वागतात (decision घेतात) पण सारासार विचार करून लग्नासारख्या विषयात लगेच तडकाफडकी decision घेत येत नाहीत. त्यात व्यक्ती तितक्या प्रकृती हे पण लक्षत ठेवलं पाहिजे. काहींनी मुलगा कसा झाला बगैरे अकलेचे तारे तोडले आहेत. कमाल झाली खरच. ह्या अशा कॉम्मेंत्स नि अनुमोदन वाचून तर हा serious फोरम सकाळ-मुक्तपीठ च्या वाटेने तर जाणार नाही न अशी भीती वाटायला लागली आहे.

बरेच जणांनी लेखकाला प्रयत्न करून बायकोला समजून घेऊन संसार सुखाचा करण्याचा सल्ला दिलाय. ह्यात असा गृहीत धरल गेल आहे कि लेखकाने तसे प्रयत्न कधीच केले नाहीत. मला असा वाटतंय कि लेखकाला कदाचित सल्ला आणि सहानुभूती दोन्ही हवय आणि त्यात काहीही गैर नाही. लेखक कोणालाच बोलू शकत नसेल आणि म्हणून मन हलक व्हाव्ह ह्या हेतूने त्याने इथे हे पोस्तलय. तुम्हाला तुमचा तुमच्या दृष्टीने निरस असलेला संसारच टिकवायचा आहेच. कारण तुम्हाला तुमच्या मुलाची आणि बायकोची काळजी नक्कीच वाटत आहे ते दिसतंय. पण मग तुमची नाराजी दु:ख यांची छाया त्यांच्यावर अजिबात पडू न देन हेदेखील तूमच कर्तव्य आहे हेही तितकच खर!
तुम्हाला शुभेच्छा !

रिया ,
मी कुठे म्हणते आहे कि तुम्ही माझ्याशी बोलताय म्हणून . उलट लेखकाला एवढे प्रश्न विचारल्याबद्दल लिहिले आहे.
प्रत्येक बीबी प्रमाणे मते बदलतात तुमची असे दिसले .
' त्याची काळजी अजिबात करत नाहीये ' तुमचे मतपरिवर्तन झालेले बघून लिहिले.

मला काल जे माझ्या विरोधी पक्षात होते त्यांच्यातच आज फूट पडल्यासारखे वाटत आहे की कालच ते एकमेकांच्या विरुद्ध होते हेच समजत नाही आहे.

अवान्तरः नाचावरुन आठवले. पण कृपया गैरसमज नको.

वासुची सासु मध्ये दिलिप प्रभावळकर अविनाश खर्शीकरला म्हणतो, माझी बायको सारखी मला व्यायाम करायला सान्गते, का तर माझी बॉडी धर्मेन्द्र सारखी व्हावी. पण मी कधी तरी तिला म्हणतो का की मी धर्मेन्द्र सारखा व्हावा अशी तुझी अपेक्षा आहे तर तू हेमामालिनी सारखी मला नाचुन दाखव.:फिदी: इथे व्हाईस वर्सा समजायला हरकत नाही.

धागाकर्ते बाफाचे रुपान्तर समरान्गणात करुन मि. इन्डिया झाले.:फिदी:

अन्विता, मुळात फरक हा आहे की -
तुम्ही दुसर्‍यांना काय सल्ले देऊ हा प्रश्न विचारला होतात त्यावरचं उत्तर "ज्याचं त्याला कळतं " असं होतं
आणि यांनी मला लढ म्हणा सांगितलंय .तुम्हाला दोन्हीतला फरक कळत असेल असं वाटतय Happy
आणितुमची समस्या हीच होती का जी त्यांनी मांडलीये? Uhoh
आय मीन विषय वेगळा असला की मत वेगळंच असणार की Uhoh प्रत्येक बीबी नुसार ते बदलणारच की.
उद्या कोणी मला विचारलं मी आत्महात्या करू का त्यावर मी नको म्हणलं तर तुम्ही म्हणालं ज्याचं त्याला कळतं अ‍ॅण्ड ऑल!
आपण काय बोलतोय ते कळून बोललात तर बरं होईल Happy

अवांतर : बाकी रसा, तुम्ही हकलपट्टी असा आयडी का घेत नाही? किंवा "मी नाही बुवा परतणार माबोवर" असा आयडी घ्या! तुम्हाला शोभुन दिसेल Happy (हे ज्याचं त्याला कळतं माहीत असुनही फुस Happy )

रिया तोंड सांभाळून बोललिस तर बरं होईल. उगिच देवानं दिलंय म्हणून बरळत सुटू नकोस.
आणि कोण 'कोण' आहे हा नुसताच अंदाज असेल तर तिथे तर थोबाड उचकटूच नये आपण.
स्वतःच्या मर्यादेत राहिलीस तर बरं होईल.

Pages