लग्न हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा. मायबोलीवर सामाजिक समस्यांवरच्या धाग्यावर लग्नाबद्दल वाचायला मिळाल आणि मग वाटल कि आपला अनुभव इथे का टाकू नये!
मी सध्या ३३ वर्षांचा विवाहित असून पुणेस्थित एका IT कंपनीत काम करतो. मी पुणेकरच ! एका सर्वसामान्य घरातून लहानाचा मोठा झालो. करियरमध्ये सुरुवातीला खूप कष्ट करून बरेच चढउतार होऊन शेवटी आयटी मधे स्थिरवलो आणि लग्नासाठी नाव नोन्दवल्यावर यथावकाश मुलींची स्थळ येऊ लागली. मुलांच्या शाळेत असल्याने आधी शाळा नि नंतर कॉलेज मधे देखील माझया ग्रूप मधे फक्त मुलेच होती. पुढे करियर ची गाडी स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात आपल्याला मुलगी कशी हवी वगैरे विचार कधीच केले नाहीत. पण जसजस चहा पोहे सुरू झले तसा मी सीरीयस झालो आणि एक अनामिक भीतीही वाटू लागली. एक-दोन भेटिंवर संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेण फार जिकीरीच वाटू लागल आणि मी उगाचच अतिसावध आणि पर्यायाने अतिचिकित्सकपणे वागू लागलो. केवळ भीतीपोटी मीअनेक चांगली स्थळ नाकारली आणि काही नकारही पाचवले. त्याजोडीला कधी मुलगी आवडली तरी पत्रिका जुळायची नाही तर कुठे गुण नाहीतर नाड. नंतर बरेच महिने लग्नाचे योग नाहीत म्हणून गेले. अस वर्ष-दीड वर्ष निघून गेल आणि हळूहळू मला frustration येऊ लागल आणि सय्यम सुटू लागला. शेवटी घरातूनही दबाव यायला लागला, मित्रदेखील टिंगल करू लागले. आता मोजून काही ठराविक मुली बघ आणि त्यातून पसंत कर अस जवळचे नातेवाईक म्हणू लागले. अशातच शेवटी मी एक मुलगी पहिली, तिला एकदाच भेटलो आणि काहीश्या घाईनेच पसंती दिली आणि इथेच चुकलो.
लग्न ठरल्यावर जेव्हा आम्ही पहिल्यांदाच बाहेर फिरायला गेलो तेव्हा मुलगी मला जास्त जाड वाटली. मुलगी दाखवायच्या कार्यक्रमाच्या वेळी साडीमुळे मुलगी जाड आहे ते समजल नव्हत आणि नंतरच्या भेटीच्यावेळी माझ्या लक्षत आल नाही. अर्थात तो माझ्यादृष्टीने फार महत्वाचा मुद्दा नव्हता. पण मी जसजसा तिच्याशी बोलत गेलो आणि आमचा संवाद होऊ लगाल तसतस माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. माझ्या लक्षात आल की हिची आणि आपली maturity लेव्हल अजिबात मॅच होत नाही. इतर अनेक लहानसहान गोष्टींमधला तिचं अज्ञान आता मला जाणवत होतो. एक लहानस उदाहरण द्यायचं झाल तर माझ्या होऊ घातलेल्या पत्नीला पु ल देशपांडे यांची पुस्तक सुद्धा माहिती नव्हती. अशा इतर अनेक लहान सहन बाबी पहिल्या 5-6 दिवसातच उअघडकीस आल्या. अशातच एक दिवस मला तिच्या चेहर्यावर आधी लक्षात न आलेले काही डाग दिसले नि मी बाबरून गेलो. मुलीचं दिसणं हा फार महत्वाचा भाग नसला तरी माझ्याही काही कमीतकमी अपेक्षा होत्या. लग्न ठरायच्या वेळचा 1-2 भेटिंमधे बराचसा भासच निर्माण केला गेला होता अस वाटू लगाल. एकूणच मुलीच्या निवडीच्या बाबतीत मी घोड चूक केली होती हे आता माझ्या ध्यानात आल होत. मी हळूहळू डिप्रेशन मधे जाऊ लागलो आणि मला कशातच रस वाटेना. तशातच काही घरगुती अडचणींमुळे लग्न ताबडतोब एका महिन्यात करायाच ठरलं आणि माझ्या काळजात धस्स झाल. इकडे माझ्या घरच्यांना ह्या सगळ्याबद्दल माहिती असण्याचा संबंधच नव्हता कारण त्याच्या मते मी आनंदात होतो. माझी उत्साही बहीण दादाच लग्न म्हणून आनंदात होती तर आई बाबा सुनेच्या स्वागतासाठी सज्ज होते. वय वर्ष ८० असलेली माझी लाडकी आजी डोळे मिटण्याआधी नातसून बघायला मिळणार म्हणून समाधानात होती. जवळच्या नातेवाईकांमधे मी खूप लाडका आणि त्यामुळे त्यांच्याही उत्साहाला उधाण आल होत. पण ह्या सगळ्यात मी मात्र कुठेही नव्हतो...मी फक्त दिसागणिक सग्यासोयर्यांच्या इच्छा अपेक्षानच्या ओझ्याखाली दबला जात होतो. पुढच्या 2 दिवसात बैठक पण झाली आणि मग प्रचंड दडपण आल. अनेक ओळखीचे लाग्नावरून माझी चेष्टा करायचे त्याच्या गुदगुल्या होण सोडाच पण अक्षर्ष: नको नको व्हायच. मला प्रचंड नैराश्य आल.
मला माझया होणार्या बायाकोबरोबर बाहेर फिरायला जाणही नकोस वाटू लगाल. शेवटी न राहवून मी माझ्या एका मित्राला हे सगळ बोललो. त्याने मला हे लग्न मोडण्याचा उचित सल्ला दिला आणि त्यात काहीही गैर नाही हेही समजावलं. पण माझ्यासारख्या conservative कुटुंबात वाढलेल्या मुलासाठी हे खूप अवघड होत. त्या रात्री मी रात्रभर मनाची तयारी केली. मला तो दिवस आजही आठवतोय. दुसर्या दिवशी companytun तब्बेतीच कारण देऊन लवकर घरी परत आलो. घरी आल्यावर सगळ्याना समोर बसवून कसबस माझया मनातल बोललो. घरच्यांना हा अनपेक्षित धक्काच होता. आज्जी डोक धरून बसली आणि आई रडू लागली, वडिलांना office मधून लवकर बोलावून घेतलं. आता घरचेही अवघडले कारण जरी लग्न ठरून फक्त १० दिवसच झाले होते तरी महिन्याभरात लग्न उरकायच असल्याने गोष्टी बर्याच पुढे गेल्या होत्या आणि लग्नाची सर्व बोलणी देखील झाली होती. त्यामुळे सगळ्यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसच मुलीच्या वडिलांना BPचा त्रास आहे तेव्हा त्याना काय धक्का बसेल वगैरे भीती घातली. घरच्यानी ओळखीच्या कोण्या एका महाराजांना फोन करून रडत रडत घडला प्रसंग सांगितला. त्यानी फोनवरून समजूत काढून सर्व काही ठीक होईल काही काळजी करू नका असा सल्ला दिला. आता माझाही सुरुवातीचा जोर आपोआप थोडा कमी झाला सगळा गुंता होऊन मी गप्प बसलो मग घरच्यानी मझीच समजूत काढली आणि तो विषय तिथेच संपला. माझच लग्न मोडण्याचा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न फसला. त्या दिवसानंतर रोज अगदी आजपर्यंत मी स्वतःला त्यासाठी शिव्या शाप देतो. जर मी लावून धरल असत तर तेव्हाच माझ ठरलेलं लग्न मोडून पुढचा अनर्थ टळला असता.
हा प्रसंग घडून गेला आणि मी मात्र आतून जळत राहिलो. कुठेतरी लांब पळून जवस वाटू लागल पण तेवढीहि धमक दाखवू शकलो नाही. टिकटिक करत काटा पुढे सरकत होता आणि पुढच्या १०-१२ दिवसात मी बोहल्यावर चढलो सुद्धा. म्हणता म्हणता माझ लग्नही झाल आणि मग हळूहळू उरलेल्या आशा अपेक्षनचि शकल उडाली. माझया बायकोला साधा हिशेबही चटकन करता येत नाही आणि चार चौघात काय कस बोलाव वागाव तेही काळत नव्हत. ह्या सगळ्या मधे मे पुरता फसलो होतो आणि माझया हाती काहीही पडल नव्हत. 21 व्या शतकात स्वत:च्या मधुचंद्राला रडणारा मी एकमेव पुरूष असेंन. मी बरेचदा स्वताला सावरण्याचा आणि ह्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. त्यातल्या त्यात माझया दैवाने माझी एकाच बाबतीत आब राखली होती ती म्हणजे माझया बायकोचा स्वभाव वाईट नव्हता. पण नुसत्या चांगल्या स्वभावाने संसारात रस कसा निर्माण होईल. प्रत्येक पुरुषाची स्त्रीकडून त्यापलीकडे अपेक्षा असतात नं! सुरुवातीला तर आमच्या आवडी निवडी एकूणच विचार करायची पातळी वेगवेगळी असल्याने संवाद असा व्हायचाच नाही. नव्या लग्नाचे ते पहिले वर्ष तर जीव घेणार होत. आक्ख आयुष्य अस काढायचय ह्या विचारानेच मी डिप्रेस राहू लागलो आणि इतर जोडप्याना पाहून मला प्रचंड न्यूनगंड निर्माण व्हायचा. मी कोणाच्यात सामील होईनसा झालो आणि एकूणच ते नव्या नवलाईचे दिवस 'मोस्ट हेटेड' ठरले. भरीस भर म्हणजे इतारांकडून कधी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे हिणकस शेरेही आईकायला मिळायचे. पण आता इथून मागे फिरण नव्हत कारण आपल्या समाज मान्यतेचा एक भाग म्हणून मला हे लग्न टिकवाव लागणार होत आणि सगळ आलबेल असल्याचा सूर आळवावा लागणार होता. अशाच डिप्रेशन आणि मानसिक त्रासात मी चुका करतच गेलो आणि कदाचित मुल झाल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल आणि आपल्या संसाराला वेगळा अर्थ येईल या विचारने मी संततीबाबत डिसिशन घेतला. मुलगा झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस छान गेले पण हळूहळू परत जुन्या जखमा नवीन होऊन वाहू लागल्या. अर्थात ह्या सगळ्यात माझ्या सारखी माझ्या बरोबर माझी बायको देखील होरपळत होती ते मला पक्क ठाऊक होत. माझ्या एका चुकीच्या निर्णयाने त्या बिचारीच आयुष्याच पण मी नुकसान केल होत. कित्येकदा मी स्वताची समजूत काढायचा प्रयत्न केला पण ह्या संसारात मला पहिल्यापासूनच रस नव्हता आणि लग्नानंतरच हे विस्कटलेल सहजीवन हे त्याचच प्रतीक होत.
आज माझा मुलगादेखील 3 वर्षांचा आहे आणि तोच फक्त आम्हाला जोडणारा दुआ आहे. अजूनही कित्येकदा भूतकाळातील गोष्टींचा पश्चात्ताप होतो, खूप तळमळतो आणि सतत स्वताला दोष देतोआणि हे सगळा सोडून देऊन विभक्त होऊन नव्यान सुरूवात करायची तीव्र इच्छा होते. पण तेव्हढ्यपूरतच....परत एकदा उरलासुरला सदसदविवेक जागा होतो आणि विचारतो की "काय रे कुठल्या कारणासाठी विभक्त होणार तू तुझया बायको मुलापासून ?..काय दोष आहे तिचा आणि काय दोष आहे तुझया मुलाचा !!!" बस्स!! इतक्या 2 प्रश्नांनी मी भानावर येतो आणि मुकाटपणे परत आपल्या निरस संसाराकडे वळतो. मी आणि माझी बायको दोघांनीही आता हे आयुष्य accept केलय. माझया बद्दल बोलायच झाल तर जुन्या खोल जखमंवारती काळाने एक पातळसा पापुद्रा धरलाय! आनंदी प्रेमी युगुल पहिली किंवा उत्साहात फिरणारी नवविवाहित जोडपी पहिली की आपण काहीतरी कायमच गमावल्याची तीव्रतेने जाणीव होते. हे नाजूक क्षण आपल्याला कधीच अनुभवता नाही आले आणि येणारपण नाहीत ह्या विचारने मन सुन्न होत आणि शब्दश: डोळ्यात पाणी येत. लग्न हा माझ्यासाठी किती महत्वाचा आणि नाजूक विषय होता पण मझा प्रचंड भ्रमनिरास झाला आणि मनावर एक खोल जखम झाली ती कायमची...अश्वत्थाम्याच्या त्या कपाळावरच्या जखमेसारखी..सतत भळाभळा वाहणारी.
आज इतक्या वर्षांनी मी हे सगळ लिहितोय त्यामागचा एकाच उद्देश आहे की देव न करो आणि कुणी अशा अनुभवातून जावो पण जर का गेले असतील तर त्यांना हे समजावे कि ते काही एकटे नाहीत आणि जे कोणी लग्नाचे आहेत त्यानी हा critical डिसिशन घेताना अधिक सतर्क रहाव आणि जोडीदाराबद्दल नीट माहिती काढावी. सर्वात महत्वाच म्हणजे घाईघाईत किंवा संयम न दाखवता कुठलाही निर्णय घेऊ नका. होणार्या जोडीदाराला ठरवून ४-५ वेळा भेटा तर कधी सहज unplanned casually भेटा. तुमच्या मनाचा आवाज ऐका. दुर्दैवाने जर कोणी लग्नाआधी माझ्यासारख्या अनुभवातून जात असेल तर व्यवस्थित विचार करून प्रत्यक्ष कृती करताना अजिबात गडबडून जाऊ नका. घरातील मोठ्यांना नीट विश्वासात घेऊन त्यांना तुमच्या अपेक्ष मोकळेपणे सांगा. तुमच्या भावी अयुष्यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा !!
बाकी माझ्याबद्दल बोलायचं झाल तर हा लेख वाचून मला हव तर मला नाव ठेवा, शिव्या शाप द्या, माझी चेष्टा करा पण फक्त शेवटी एकदा 'लढ' म्हणा ..बस बाकी काही नको
टीप: हा लेख सुशिक्षित समाजातील मुले व मुलीं दोघांसाठी आहे. ह्यामागे आपला समाज किंवा लग्नव्यवस्था ह्यातील त्रुटी दाखवायचा अजिबात उद्देश नाही. आज आपल्याच अवतीभवती पारंपारिक मार्गाने लग्न करून संसारात सुखी झालेली अनेक जोडपी आहेत तेव्हा तो प्रश्नच येत नाही. तरीसुद्धा ह्या व्यवस्थेचा एक भाग बनताना कुणाच नुकसान होऊ नये हाच एकमेव सार्थ हेतू आहे
बायकोला लग्न मोडायचे होते हेच
बायकोला लग्न मोडायचे होते हेच गृहीत तुम्ही आधी कुठून काढलेत?
>> माझे वाक्य "योग्यवेळी लेखकाने लग्न मोडले गेले नाही म्ह्णून बायकोच्या वाटयाला आलेला मानसिक त्रासाची काहीच किंमत नाही का "नीट वाचा.
लेखकाने ठरलेले लग्न मोडण्याचा निर्णय योग्यवेळी म्हणजे लग्न होण्याआधीच घेतला असता तर .... असे आहे ते. कृपया भानावर तुम्हीच राहून प्रतिसाद वाचा व लिहा
रिया + १००+१००
रिया + १००+१००
रिया तुझ्या अख्ख्या
रिया तुझ्या अख्ख्या प्रतिसादाला अनुमोदन...
माझे वाक्य "योग्यवेळी लेखकाने
माझे वाक्य "योग्यवेळी लेखकाने लग्न मोडले गेले नाही म्ह्णून बायकोच्या वाटयाला आलेला मानसिक त्रासाची काहीच किंमत नाही का "नीट वाचा.
लेखकाने ठरलेले लग्न मोडण्याचा निर्णय योग्यवेळी म्हणजे लग्न होण्याआधीच घेतला असता तर <<<
अहो तुम्ही आधी लेख तरी नीट वाचा?
१. लेखकाची इच्छा होती की त्याने स्वतः त्याचे लग्न वेळच्यावेळी मोडायला हवे होते (म्हणजे लग्न व्हायच्या आधीच)
२. ते त्याला शक्य झाले नाही (कारणे काय आहेत हा एक वेगळाच भाग आहे)
३. त्यामुळे त्याने लग्न केले व आता त्यांना एक तीन वर्षांचा मुलगा आहे.
४. तरीही लेखकाचे म्हणणे असे आहे की इतरांवर अशी वेळ (अशी वेळ म्हणजे कोणती? तर सांगितले गेल्यापेक्षा किंवा वाटले होते त्यापेक्षा भलत्याच कॅलिबरचा पार्टनर प्रत्यक्षात नशीबी येणे - लक्षात घ्या, हे लेखकाचे वैयक्तीक मत आहे व ते सापेक्ष आहे पण येथे लेखक निरपेक्षपणे काही म्हणू इच्छितच नाही आहे) येण्याआधी त्यांनी दडपण झुगारून योग्य वाटतो तो निर्णय घ्यावा.
आता जरा सांगता का?
की लेखकाने वेळीच लग्न मोडले नाही ह्याचा त्याच्या पत्नीला मानसिक त्रास झाला आहे हे गृहीतक तुम्ही कुठून काढलेत?
तिला माहीतही नसेल की तो निराश आहे वगैरे! तिला हे लग्नही हवेसे असेल आणि लेखक जसा आहे तसाही हवासा असेल. पण लेखकाला ती नको असेल.
पत्नीला मानसिक त्रास झाल्याचा मूळ लेखात उल्लेख नाही, मात्र तो झाल्याचे तुम्हाला जाणवले कारण काय तर म्हणे तुम्ही तो लेख स्त्रीच्या दृष्टिकोनातून वाचलात.
बकर्याच्या दृष्टिकोनातून त्याला मानसिक व शारीरिक त्रास होतो म्हणून माणसे मटन खाणे सोडतात का? तेव्हा बरा स्वतःच्या जिभेचाच दृष्टिकोन ठेवावासा वाटतो?
रियाचा प्रतिसाद तुम्ही वाचा
रियाचा प्रतिसाद तुम्ही वाचा बेफिकीर. तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्यात मिळून जातील.
बेफी +१
बेफी +१
रियाचा प्रतिसाद तुम्ही वाचा
रियाचा प्रतिसाद तुम्ही वाचा बेफिकीर. तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्यात मिळून जातील.<<<
जाऊद्याहो! तुम्ही अश्या लिहिताय जसे काही मला अनंत प्रश्न पडले आहेत आणि कोणतीच उत्तरे समजत नाही आहेत म्हणून आता रियाचा प्रतिसाद वाचा!
पहिल्यांदा कोणी ह्या प्रश्नाचे उत्तर देईल का?
की एका पुरुषाने पब्लिक फोरमवर आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत काही नकारात्मक लिहिले तर त्याच्या म्हणण्यात तथ्य असेलही, खरंच त्याच्या बायकोचे काही प्रॉब्लेम्स असतील हे पटायला इथे लोकांना इतकं जड का जातं?
बायकोच सोसतीय, तिचीच कीव यायला पाहिजे हे अँगल्सच का दिले जातात ह्या सगळ्याला?
नंदिनी चा प्रतिसाद पण पटतोय..
नंदिनी चा प्रतिसाद पण पटतोय..
रिया आणि चैत्रगंधा, प्रचंड
रिया आणि चैत्रगंधा, प्रचंड अनुमोदन!
"अर्थात ह्या सगळ्यात माझ्या सारखी माझ्या बरोबर माझी बायको देखील होरपळत होती ते मला पक्क ठाऊक होत."
"मी आणि माझी बायको दोघांनीही आता हे आयुष्य accept केलय. " लेखातल्या या २ वाक्यांमधुन स्पष्ट होतचय की लेखकाच्या चुकीची शिक्षा त्याच्या बायकोला भोगायला लागतीये!
फिनिक्स नन्दिनीने लिहीलेले
फिनिक्स नन्दिनीने लिहीलेले वाचा नीट.
माझ्या पहाण्यात अशी एक व्यक्ती आहे की बायको दहावी पास होती लग्नाच्या वेळी, स्वतः ग्रॅज्युएट. मात्र लग्नानन्तर बायकोला ऑफिसमधुन आल्यावर २ तास इन्ग्लिश ( लिखाण+ वाचन+ सम्भाषण तिन्ही) शिकवत असे. तसेच इतरही विषयावर तिच्याशी चर्चा करीत असे. आज ती बायको स्वतःच्या पायावर उभी आहे, ते ही परदेशात. बायकोला तेलगु व्यतीरिक्त इतर भाषा अजीबात येतही नव्हती आणी समजतही नव्हती. तरी त्या व्यक्तीने कसला राग धरला नाही, अथवा बायकोलाही दुषणे दिली नाही.
तुम्ही पण तुमच्या बायकोमधले इतर चान्गले गुण पारखुन बघा. तुमच्या घरातील इतर सदस्यान्शी तिचे वागणे, तिचे तुमच्याप्रती प्रेम, विश्वास हे जरा नीट बघा.
तिच्यातील सुप्त गुणाना वाव दिला तर तिचेही व्यक्तीमत्व झळाळुन उठेल, जे तुम्हाला अपेक्षीत आहे. पण तुमच्याही अन्तरन्गात एकदा बघा, कदाचीत तुमच्यात तिच्यापेक्षा जास्त कमतरता असु शकते.
तिच्या ईच्छा, अपेक्षा असतीलच ना तुमच्याकडुन? प्रेम, विश्वास, आनन्दी सहजीवन वगैरे? पूर्ण केल्यात कधी त्या? आधी एकमेकान्शी मोकळेपणाने सम्वाद साधा. जिथे सम्वाद नसेल तिथे जीवन नीरसच असते.
बेस्ट लक.
हो. तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत
हो. तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही मान्य केले ही पहिली पायरी झाली. ते प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवायचे आहेत की, मला कित्ती अडचणी आहेत आणि मी कसं सहन करतो आहे यामधे रहायचे आहे? सोडवायचे म्हणजे बायकोबरोबर सुखाने संसार करणे, आणि to grow old together through ups and downs. उत्तर हो असेल तर पुढे वाचा.
बायकोबरोबर तुमचे वागणे कसे आहे? तिला सन्मानाने वागवता का? तुमच्यात काही संवाद होतो का? ही उत्तरे स्वतःला द्या. संवाद नसेल तर आधी तो चालू करा. मुलाची कशी प्रगती आहे, तो काय खातो, काय खेळतो, कुठली शाळा चांगली, आज घरात भाजी काय करायची इथून चालू करू शकता. सिनेमे मिलून बघणे आणि त्यावर नंतर चर्चा करणे. सुरुवातील 'छान होता / वाईट होता' यापेक्षा जास्त कदाचित होणार नाही. तुमच्या बायकोला काय आवडते माहीत आहे का? नसेल तर माहीत करून घ्या. असेल तर तुम्हाला आवडत नसूनही त्यात भाग घ्या. तुमची बायको तुमची कशी काळजी घेते यावर विचार करा. तिच्या परीने तिला जे योग्य वाटेल ते. यावर छोटीशी तरी compliment द्या.
बर्याच घरात मुलीने लग्नानंतर फक्त चूल-मूल करावे असेच शिकवले जाते. तिथे बाकी गोष्टींना प्रोत्साहन मिळत नाही. तेव्हा वाचन, चर्चा याची सवय असेलच असे नाही. तिला personal development मधे असे काही अडथळे होते का, हे समजून घेतले आहे का? तिला प्रोत्साहन द्या. तुम्हाला तिच्याकडून काय अपेक्षित आहे ते सांगा. तिला काय अपेक्षित आहे हे बघा.
वैवाहिक समुपदेशकाला नक्की भेटा. तुमची बायको तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही पण तुम्हीपण असालच असेही नाही. तेव्हा पुढे जायचे असेल तर तडजोडीला पर्याय नाही. तुम्हाला शुभेच्छा.
नंदिनी ह्यांचा प्रतिसाद मलाही
नंदिनी ह्यांचा प्रतिसाद मलाही आवडला . अगदी योग्य सल्ला दिला आहे.
Baaykola samajun ghenyacha
Baaykola samajun ghenyacha prayatna kelay ka kadhi?
Tichyatalya tumachya drushtine apoorna goshti tila.janawun dyaycha prayatna kelay ka? Nantar doghani milun tyawar kahi upaayyojana keli ahe ka? Sudharanela waaw asunahi prayanta na karne ha tumacha dosh aahe asa nahi watat ka?
Navin sun mhanun gharaT alyawar jashya gharatil chaliriti samajawun sangitalya tashya chaar wyawaharik goshti sangitalya astat tar dukh karayachi wel ali nasti.
Madhuchandrachya ratri kay charchaughat wagayacha hota, wyawahar karayacha hota ki ekdam radu wagaire Ale!!
Daag lapawala fasWanuk zali asa watala hota tar lagn n karanyacha dhairya dakhwata alanpahije hota tumhala..te tumhala jyanchya gharat janmala.alat , wadhalat tithe jamala nahee..mag khari kamatarataa kunat aahe ?
Ata bhutkaalababat paschaatap karat basayacha ka tyatun bhawishya ghadawayacha he tumhi tharwa...
Radat radat jagayacha ka gaane mhanat??
Bayko la shikawane tumhi pHilech purush nahi...
Tumhi bayako mula la "sodayacha " nirnay ghetal tari tyancha tumachyawachun KAHIHI adanar nahi...karan tasa sthaan ch tumhi swatah ch nirman kelel disat nahiye.. wichar kara yawar..
Dukhh zala, raag ala..tech kiti diwas ugalnar aahat?
Baher pada, chanda joapasa n baayako mulawar nirapekaha prem kara...aayushyakade baghanyacha drushtikon badala..
Aahe he asa ahe, je chalu honyapoorvi badalaychi dhamak navhati, mag ata sudharana tari kara...
प्रतिसाद काढून टाकला .
प्रतिसाद काढून टाकला .
I understand mr. phoenix2014.
I understand mr. phoenix2014. but kadhi-kadhi paristhiti swikarawi lagate karan yahun wegale kahi ghadale asate or apan ghadawu shakalo asato he joparyant apalyala manya asate toparyant apan fakt he ka ghadale ani apan ka ghadu dile itkach vichar karat basato , pan hya sagalyat apalya ayushyatala far mahatwacha ani najuk kal apan fakt vichar kanyat waya ghalun deto jo punha kadhihi bharun nighat nasato. ani anakhi kahi warshanni apan jewha mage walun baghto tewha apan punha ekada haralelo asato karan jar paristhiti badalanar nasate kinwa apan badalawanyacha prayatnach karanar nasato tar tya weli swikarlel dipresion tyacha aplyawar ani apalya manasanwar zalela parinam,dukkha ya sagalyacha punha apalyalach tras hoto . so now don't get any tension ,cheers man, chhodo kal ki bate.... aaj apane family ke sath naye geet gawo....best of luck........
५)उशिरा लग्न झाल्यावर गुजराती
५)उशिरा लग्न झाल्यावर गुजराती म्हण (चमचमीत बुफे जेवण झाल्यावर) "एनो कोई आपतो नथी तेने कोई लेतो नथी नो सगपण"=याला कोणी मुलगी देत नव्हतं आणी हिला कोणी घेत नव्हतं .>>>
( सटवाईला नव्हता नवरा आणी म्हसोबाला नव्हती बायको:- मराठी म्हण)
६)घरातले प्रश्न चार भिंतीत सुटतात चौकात नाही -बंगाली म्हण .:स्मित:
फिनिक्स विचार करा, तुमची बायको आज माबोची मेम्बर असती तर तिला हे सर्व वाचुन काय वाटले असते?
चार दिवसावर धुळवड आली, आणी तुम्ही रन्ग आधीच उधळुन दिले. साम्भाळा.
बऱ्याच दिवसात माबो थंड पडलेली
बऱ्याच दिवसात माबो थंड पडलेली होती.
बरं झालं हा धागा काढला.
थान्क्यु बेफि!
some relationships just dont
some relationships just dont work. may be your happiness is with someone else somewhere else. Get a quick divorce based on irreconsilable difference. and set her free. She does not deserve to be saddled in a relationship not going anywhere. life is too short.
mostly you are really not adding any value as a parent either.
End this fast. sharp. no loose ends. and Move on.
प्रतिसाद काढून टाकला .
प्रतिसाद काढून टाकला .
गाडगीळ अहो मला त्या म्हणी
गाडगीळ अहो मला त्या म्हणी आवडल्या म्हणून मी मराठीचे उदाहरण दिले, रागवु नका.
आणी हो लोक काय पायी पण चालू देत नाहीत आणी गाढवावर पण बसु देत नाहीत.( आपल्याला गाढव समजतात ते वेगळे)
बर्यापैकी उशिरा लग्न ठरून
बर्यापैकी उशिरा लग्न ठरून सुद्धा तुम्ही त्या वयात ठामपणे आपलं मत मांडू शकला नाहीत याबद्दल आश्चर्य वाटलं. स्थळं मॅच होत नव्हती त्यामूळे तुम्हाला आपण अविवाहीत राहू की काय अशी भिती वाटली असावी कदाचित. पण आपलं शिक्षण आणि एक्पोजर पैसे मिळवण्यासोबतच या गोष्टींशी डिल करायलाही वापरलं पाहिजे. वेळच्या वेळेला ज्या त्या गोष्टी योग्य पद्धतीने समजून घेण्याकडे तुमचा कल दिसला नाही याचं ही आश्चर्य वाटलं. बायकोच्या चेहर्यावरचे डाग किंवा तिची जाडी याने जर फरक पडत नव्ह्ता तर त्या गोष्टी लेखात यायला नको होत्या. त्याने फरक पडत नाही अशी तुम्ही स्वतःची समजूत घालून घेतलीत. अॅक्चूली त्याने तुम्हाला फरक पडला होता/पडतोय. वेळच्या वेळी जेव्हा लग्न मोडावे वाटत होते तेव्हा मोडले नाहीत, आणि आजतागायत ती कटूता मनात बाळगून आहात. तुम्ही कदाचित तोंडावर काही दाखवत नसाल्/बायकोशी बोलत नसाल पण तिच्यापर्यंत हे पोचत असणार नक्की. पण तुम्हाला असं वाटतंय, ते का वाटतंय हे शोधण्याचा प्रयत्न कधी केलात का? आहे त्यात सुख मानण्याचे प्रकार नविन नाहीत आपल्या संस्कृतीत.
माझ्या मते अजूनही वेळ गेलेली नाही. दोन मार्ग असू शकतात या प्रॉब्लेम मध्ये.
मन मारून न जगता अजूनही बायकोशी मनमोकळेपणाने बोलून मार्ग वेगळे करणं. पण जबाबदारी पाळून.
दुसरा मार्ग जर याच पत्नीसोबत रहायचं असेल तर ही कटूता मनातून काढून टाकण्याचा योग्य तो मार्ग चोखाळा. विवाह समुपदेशन घ्या. बायकोला चार चौघात वावरता येईल किंवा तिचा आत्मविश्वास वाढेल यासाठी स्वतः प्रयत्न करा. आहे असंच राहिलात तर अपत्य मोठं झाल्यावर तुमच्यातली कटूता त्याच्यापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही. नकळतपणे त्याच्यावर परिणाम होऊ शकतात. बायकोला आपल्या मुलांसमोर घालून पाडून बोलू नका त्याने मूलांनाही आपली आई यूसलेस आहे असे वाटू लागेल, त्याने तुमच्या बायकोचा आत्मविश्वास अजून खाली जाऊन, ती तुमच्या मनातून अजून उतरेल.
पदरी पडलं पवित्र झालं म्हणण्यापेक्षा सॉर्टिंग करून जे कमी आहे ते कमी, जे योग्य आहे ते गोड करून घेतलंत तर तुमचं आणि तुमच्या पत्नीचं आणि पर्यायाने मुलांचं आयुष्य ही सुकर होईल.
तुम्हाला शुभेच्छा!
बायकोचं मरण होत असेल....तीची
बायकोचं मरण होत असेल....तीची बिचारीची काय चुक हो???
दक्षिणा, खूप उत्तमप्रकारे
दक्षिणा, खूप उत्तमप्रकारे लिहिलेस.
दक्शिणा: मस्त लिहिल आहे..
दक्शिणा: मस्त लिहिल आहे..
दक्षिणा : पोस्ट पटली, पण
दक्षिणा : पोस्ट पटली, पण पहिला मार्ग नाही. कारण यात मुलाचं जास्त नुकसान होणार आहे. त्यापेक्षा तू सुचवलेला दुसरा मार्ग पटतोय. कदाचित लेखकाला अशा प्रकारच्या मार्गदर्शनाचीच आवश्यकता आहे.
घरच्यांसमोर या गोष्टी बोलायला (आत्ता, लग्नाआधी नाही), त्याला कठिण जात असेल, म्हणून त्याने इथे मायबोलीवर 'कोतबो' चा पर्याय स्विकारला असेल, otherwise 'माकाचु' मध्ये लिखाण केलं असतं.
दक्षिणा अप्रतीम पोस्ट.
दक्षिणा अप्रतीम पोस्ट.:स्मित:
दबावाला बळी पडून लग्न केले वर
दबावाला बळी पडून लग्न केले वर मुल झाले तर परीस्थिती सुधारेल असा विचार करुन तुम्ही संततीचा विचार केलात हे चुकले. मुल म्हणजे काही जादूची काठी नव्हे. मुलाचा आणि पत्नीचा यात काही दोष नाही हे तुम्हीच लिहिले आहे. लौकिकार्थाने जरी हे लग्न टिकलेले दिसले तरी तुमच्या निरस संसाराची झळ तुम्ही, तुमची पत्नी आणि निष्पाप मुल सगळ्यांनाच त्रासदायक आहे/असेल. तेव्हा हे लग्न टिकवायचे ठरवले आहे तर शक्य तितक्या लवकर मॅरेज काउंसिलरकडे जा. पालक झालाच आहात तर मुलाला चांगले हसते खेळते कुटुंब देणे हे तुमचे कर्तव्य आहे. उगाच अपेक्षाभंगाचे दु:ख उगाळत बसून काहीच साध्य होणार नाही. असे सो कॉल्ड हौतात्म्य मिरवण्यापेक्षा मुलाची आणि पत्नीची आर्थिक जबाबदारी घेऊन विभक्त झालेले केव्हाही चांगले. निदान मुलाशी चांगले नाते तरी जोडता येइल. तुम्हाला आणि तुमच्या पत्नीलाही नव्याने आयुष्य सुरु करता येइल.
स्वाती२ इसी लिए हम आपके फॅन
स्वाती२

इसी लिए हम आपके फॅन है!
अरूण पहिला मार्ग नसू शकतो कसं
अरूण पहिला मार्ग नसू शकतो कसं काय? कधी कधी त्यानेच मुलांचं नुकसान कमी होतं. एकदा वास्तवाशी हातमिळवणी केली की आपापलं कल्याण शोधायला रिकामं. जे करू, शिकू ते आपल्या जबाबदारीवर. नाही का? एकत्र आईबाप धुसफुसून जे प्रेम देतील त्या पेक्षा वेगळं राहून देऊ शकतात. (हेमावैम)
स्वाती२ _/\_ अचूक शब्दात
स्वाती२ _/\_
अचूक शब्दात नेमक मांडल आहे
उत्तम पोस्ट
तुमच्या पोस्टि नेहमीच वाचनिय असतात
Pages