एका लग्नाची (दु:खद) गोष्ट

Submitted by Phoenix२०१४ on 13 March, 2014 - 03:44

लग्न हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा. मायबोलीवर सामाजिक समस्यांवरच्या धाग्यावर लग्नाबद्दल वाचायला मिळाल आणि मग वाटल कि आपला अनुभव इथे का टाकू नये!

मी सध्या ३३ वर्षांचा विवाहित असून पुणेस्थित एका IT कंपनीत काम करतो. मी पुणेकरच ! एका सर्वसामान्य घरातून लहानाचा मोठा झालो. करियरमध्ये सुरुवातीला खूप कष्ट करून बरेच चढउतार होऊन शेवटी आयटी मधे स्थिरवलो आणि लग्नासाठी नाव नोन्दवल्यावर यथावकाश मुलींची स्थळ येऊ लागली. मुलांच्या शाळेत असल्याने आधी शाळा नि नंतर कॉलेज मधे देखील माझया ग्रूप मधे फक्त मुलेच होती. पुढे करियर ची गाडी स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात आपल्याला मुलगी कशी हवी वगैरे विचार कधीच केले नाहीत. पण जसजस चहा पोहे सुरू झले तसा मी सीरीयस झालो आणि एक अनामिक भीतीही वाटू लागली. एक-दोन भेटिंवर संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेण फार जिकीरीच वाटू लागल आणि मी उगाचच अतिसावध आणि पर्यायाने अतिचिकित्सकपणे वागू लागलो. केवळ भीतीपोटी मीअनेक चांगली स्थळ नाकारली आणि काही नकारही पाचवले. त्याजोडीला कधी मुलगी आवडली तरी पत्रिका जुळायची नाही तर कुठे गुण नाहीतर नाड. नंतर बरेच महिने लग्नाचे योग नाहीत म्हणून गेले. अस वर्ष-दीड वर्ष निघून गेल आणि हळूहळू मला frustration येऊ लागल आणि सय्यम सुटू लागला. शेवटी घरातूनही दबाव यायला लागला, मित्रदेखील टिंगल करू लागले. आता मोजून काही ठराविक मुली बघ आणि त्यातून पसंत कर अस जवळचे नातेवाईक म्हणू लागले. अशातच शेवटी मी एक मुलगी पहिली, तिला एकदाच भेटलो आणि काहीश्या घाईनेच पसंती दिली आणि इथेच चुकलो.

लग्न ठरल्यावर जेव्हा आम्ही पहिल्यांदाच बाहेर फिरायला गेलो तेव्हा मुलगी मला जास्त जाड वाटली. मुलगी दाखवायच्या कार्यक्रमाच्या वेळी साडीमुळे मुलगी जाड आहे ते समजल नव्हत आणि नंतरच्या भेटीच्यावेळी माझ्या लक्षत आल नाही. अर्थात तो माझ्यादृष्टीने फार महत्वाचा मुद्दा नव्हता. पण मी जसजसा तिच्याशी बोलत गेलो आणि आमचा संवाद होऊ लगाल तसतस माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. माझ्या लक्षात आल की हिची आणि आपली maturity लेव्हल अजिबात मॅच होत नाही. इतर अनेक लहानसहान गोष्टींमधला तिचं अज्ञान आता मला जाणवत होतो. एक लहानस उदाहरण द्यायचं झाल तर माझ्या होऊ घातलेल्या पत्नीला पु ल देशपांडे यांची पुस्तक सुद्धा माहिती नव्हती. अशा इतर अनेक लहान सहन बाबी पहिल्या 5-6 दिवसातच उअघडकीस आल्या. अशातच एक दिवस मला तिच्या चेहर्यावर आधी लक्षात न आलेले काही डाग दिसले नि मी बाबरून गेलो. मुलीचं दिसणं हा फार महत्वाचा भाग नसला तरी माझ्याही काही कमीतकमी अपेक्षा होत्या. लग्न ठरायच्या वेळचा 1-2 भेटिंमधे बराचसा भासच निर्माण केला गेला होता अस वाटू लगाल. एकूणच मुलीच्या निवडीच्या बाबतीत मी घोड चूक केली होती हे आता माझ्या ध्यानात आल होत. मी हळूहळू डिप्रेशन मधे जाऊ लागलो आणि मला कशातच रस वाटेना. तशातच काही घरगुती अडचणींमुळे लग्न ताबडतोब एका महिन्यात करायाच ठरलं आणि माझ्या काळजात धस्स झाल. इकडे माझ्या घरच्यांना ह्या सगळ्याबद्दल माहिती असण्याचा संबंधच नव्हता कारण त्याच्या मते मी आनंदात होतो. माझी उत्साही बहीण दादाच लग्न म्हणून आनंदात होती तर आई बाबा सुनेच्या स्वागतासाठी सज्ज होते. वय वर्ष ८० असलेली माझी लाडकी आजी डोळे मिटण्याआधी नातसून बघायला मिळणार म्हणून समाधानात होती. जवळच्या नातेवाईकांमधे मी खूप लाडका आणि त्यामुळे त्यांच्याही उत्साहाला उधाण आल होत. पण ह्या सगळ्यात मी मात्र कुठेही नव्हतो...मी फक्त दिसागणिक सग्यासोयर्यांच्या इच्छा अपेक्षानच्या ओझ्याखाली दबला जात होतो. पुढच्या 2 दिवसात बैठक पण झाली आणि मग प्रचंड दडपण आल. अनेक ओळखीचे लाग्नावरून माझी चेष्टा करायचे त्याच्या गुदगुल्या होण सोडाच पण अक्षर्ष: नको नको व्हायच. मला प्रचंड नैराश्य आल.

मला माझया होणार्या बायाकोबरोबर बाहेर फिरायला जाणही नकोस वाटू लगाल. शेवटी न राहवून मी माझ्या एका मित्राला हे सगळ बोललो. त्याने मला हे लग्न मोडण्याचा उचित सल्ला दिला आणि त्यात काहीही गैर नाही हेही समजावलं. पण माझ्यासारख्या conservative कुटुंबात वाढलेल्या मुलासाठी हे खूप अवघड होत. त्या रात्री मी रात्रभर मनाची तयारी केली. मला तो दिवस आजही आठवतोय. दुसर्या दिवशी companytun तब्बेतीच कारण देऊन लवकर घरी परत आलो. घरी आल्यावर सगळ्याना समोर बसवून कसबस माझया मनातल बोललो. घरच्यांना हा अनपेक्षित धक्काच होता. आज्जी डोक धरून बसली आणि आई रडू लागली, वडिलांना office मधून लवकर बोलावून घेतलं. आता घरचेही अवघडले कारण जरी लग्न ठरून फक्त १० दिवसच झाले होते तरी महिन्याभरात लग्न उरकायच असल्याने गोष्टी बर्याच पुढे गेल्या होत्या आणि लग्नाची सर्व बोलणी देखील झाली होती. त्यामुळे सगळ्यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसच मुलीच्या वडिलांना BPचा त्रास आहे तेव्हा त्याना काय धक्का बसेल वगैरे भीती घातली. घरच्यानी ओळखीच्या कोण्या एका महाराजांना फोन करून रडत रडत घडला प्रसंग सांगितला. त्यानी फोनवरून समजूत काढून सर्व काही ठीक होईल काही काळजी करू नका असा सल्ला दिला. आता माझाही सुरुवातीचा जोर आपोआप थोडा कमी झाला सगळा गुंता होऊन मी गप्प बसलो मग घरच्यानी मझीच समजूत काढली आणि तो विषय तिथेच संपला. माझच लग्न मोडण्याचा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न फसला. त्या दिवसानंतर रोज अगदी आजपर्यंत मी स्वतःला त्यासाठी शिव्या शाप देतो. जर मी लावून धरल असत तर तेव्हाच माझ ठरलेलं लग्न मोडून पुढचा अनर्थ टळला असता.

हा प्रसंग घडून गेला आणि मी मात्र आतून जळत राहिलो. कुठेतरी लांब पळून जवस वाटू लागल पण तेवढीहि धमक दाखवू शकलो नाही. टिकटिक करत काटा पुढे सरकत होता आणि पुढच्या १०-१२ दिवसात मी बोहल्यावर चढलो सुद्धा. म्हणता म्हणता माझ लग्नही झाल आणि मग हळूहळू उरलेल्या आशा अपेक्षनचि शकल उडाली. माझया बायकोला साधा हिशेबही चटकन करता येत नाही आणि चार चौघात काय कस बोलाव वागाव तेही काळत नव्हत. ह्या सगळ्या मधे मे पुरता फसलो होतो आणि माझया हाती काहीही पडल नव्हत. 21 व्या शतकात स्वत:च्या मधुचंद्राला रडणारा मी एकमेव पुरूष असेंन. मी बरेचदा स्वताला सावरण्याचा आणि ह्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. त्यातल्या त्यात माझया दैवाने माझी एकाच बाबतीत आब राखली होती ती म्हणजे माझया बायकोचा स्वभाव वाईट नव्हता. पण नुसत्या चांगल्या स्वभावाने संसारात रस कसा निर्माण होईल. प्रत्येक पुरुषाची स्त्रीकडून त्यापलीकडे अपेक्षा असतात नं! सुरुवातीला तर आमच्या आवडी निवडी एकूणच विचार करायची पातळी वेगवेगळी असल्याने संवाद असा व्हायचाच नाही. नव्या लग्नाचे ते पहिले वर्ष तर जीव घेणार होत. आक्ख आयुष्य अस काढायचय ह्या विचारानेच मी डिप्रेस राहू लागलो आणि इतर जोडप्याना पाहून मला प्रचंड न्यूनगंड निर्माण व्हायचा. मी कोणाच्यात सामील होईनसा झालो आणि एकूणच ते नव्या नवलाईचे दिवस 'मोस्ट हेटेड' ठरले. भरीस भर म्हणजे इतारांकडून कधी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे हिणकस शेरेही आईकायला मिळायचे. पण आता इथून मागे फिरण नव्हत कारण आपल्या समाज मान्यतेचा एक भाग म्हणून मला हे लग्न टिकवाव लागणार होत आणि सगळ आलबेल असल्याचा सूर आळवावा लागणार होता. अशाच डिप्रेशन आणि मानसिक त्रासात मी चुका करतच गेलो आणि कदाचित मुल झाल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल आणि आपल्या संसाराला वेगळा अर्थ येईल या विचारने मी संततीबाबत डिसिशन घेतला. मुलगा झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस छान गेले पण हळूहळू परत जुन्या जखमा नवीन होऊन वाहू लागल्या. अर्थात ह्या सगळ्यात माझ्या सारखी माझ्या बरोबर माझी बायको देखील होरपळत होती ते मला पक्क ठाऊक होत. माझ्या एका चुकीच्या निर्णयाने त्या बिचारीच आयुष्याच पण मी नुकसान केल होत. कित्येकदा मी स्वताची समजूत काढायचा प्रयत्न केला पण ह्या संसारात मला पहिल्यापासूनच रस नव्हता आणि लग्नानंतरच हे विस्कटलेल सहजीवन हे त्याचच प्रतीक होत.

आज माझा मुलगादेखील 3 वर्षांचा आहे आणि तोच फक्त आम्हाला जोडणारा दुआ आहे. अजूनही कित्येकदा भूतकाळातील गोष्टींचा पश्चात्ताप होतो, खूप तळमळतो आणि सतत स्वताला दोष देतोआणि हे सगळा सोडून देऊन विभक्त होऊन नव्यान सुरूवात करायची तीव्र इच्छा होते. पण तेव्हढ्यपूरतच....परत एकदा उरलासुरला सदसदविवेक जागा होतो आणि विचारतो की "काय रे कुठल्या कारणासाठी विभक्त होणार तू तुझया बायको मुलापासून ?..काय दोष आहे तिचा आणि काय दोष आहे तुझया मुलाचा !!!" बस्स!! इतक्या 2 प्रश्नांनी मी भानावर येतो आणि मुकाटपणे परत आपल्या निरस संसाराकडे वळतो. मी आणि माझी बायको दोघांनीही आता हे आयुष्य accept केलय. माझया बद्दल बोलायच झाल तर जुन्या खोल जखमंवारती काळाने एक पातळसा पापुद्रा धरलाय! आनंदी प्रेमी युगुल पहिली किंवा उत्साहात फिरणारी नवविवाहित जोडपी पहिली की आपण काहीतरी कायमच गमावल्याची तीव्रतेने जाणीव होते. हे नाजूक क्षण आपल्याला कधीच अनुभवता नाही आले आणि येणारपण नाहीत ह्या विचारने मन सुन्न होत आणि शब्दश: डोळ्यात पाणी येत. लग्न हा माझ्यासाठी किती महत्वाचा आणि नाजूक विषय होता पण मझा प्रचंड भ्रमनिरास झाला आणि मनावर एक खोल जखम झाली ती कायमची...अश्वत्थाम्याच्या त्या कपाळावरच्या जखमेसारखी..सतत भळाभळा वाहणारी.

आज इतक्या वर्षांनी मी हे सगळ लिहितोय त्यामागचा एकाच उद्देश आहे की देव न करो आणि कुणी अशा अनुभवातून जावो पण जर का गेले असतील तर त्यांना हे समजावे कि ते काही एकटे नाहीत आणि जे कोणी लग्नाचे आहेत त्यानी हा critical डिसिशन घेताना अधिक सतर्क रहाव आणि जोडीदाराबद्दल नीट माहिती काढावी. सर्वात महत्वाच म्हणजे घाईघाईत किंवा संयम न दाखवता कुठलाही निर्णय घेऊ नका. होणार्या जोडीदाराला ठरवून ४-५ वेळा भेटा तर कधी सहज unplanned casually भेटा. तुमच्या मनाचा आवाज ऐका. दुर्दैवाने जर कोणी लग्नाआधी माझ्यासारख्या अनुभवातून जात असेल तर व्यवस्थित विचार करून प्रत्यक्ष कृती करताना अजिबात गडबडून जाऊ नका. घरातील मोठ्यांना नीट विश्वासात घेऊन त्यांना तुमच्या अपेक्ष मोकळेपणे सांगा. तुमच्या भावी अयुष्यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा !!
बाकी माझ्याबद्दल बोलायचं झाल तर हा लेख वाचून मला हव तर मला नाव ठेवा, शिव्या शाप द्या, माझी चेष्टा करा पण फक्त शेवटी एकदा 'लढ' म्हणा ..बस बाकी काही नको

टीप: हा लेख सुशिक्षित समाजातील मुले व मुलीं दोघांसाठी आहे. ह्यामागे आपला समाज किंवा लग्नव्यवस्था ह्यातील त्रुटी दाखवायचा अजिबात उद्देश नाही. आज आपल्याच अवतीभवती पारंपारिक मार्गाने लग्न करून संसारात सुखी झालेली अनेक जोडपी आहेत तेव्हा तो प्रश्नच येत नाही. तरीसुद्धा ह्या व्यवस्थेचा एक भाग बनताना कुणाच नुकसान होऊ नये हाच एकमेव सार्थ हेतू आहे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय राव. चार भिंतींच्या आतला विषय इथे मांडण्यात काय अर्थ आहे.

तुम्ही तुमच्या बायकोलाच बोलते करा. तिच्याशी शांतपणे चर्चा करा आणि तिला बहिर्मुखी कसे करता येईल ते बघा.

तुमच्या कडून एकतर्फी तिलाच दोष देत बसू नका. या लेखाचा सूर तरी तसाच आहे..

जरा तरी प्रॅक्टिकल व्हा..

जुन्या मायबोलीवर "कोणाशी तरी बोलायचंय "" वरती असे चिक्कार धागे होते. भसाभस पोस्टी पडायच्या त्यावेळी. आज काल " कोणाशी तरी बोलायचं" बंदच पडलाय एकुणात. बर्याच दिवसांनी हा गुप अक्तीव्ह झालाय Happy

निलीमा | 13 March, 2014 - 01:50
nivaal phaltupana aahe ha
nusatya cheharyavaril dagane lagna modale , mulagi pahilyavar dekhil kahi divsani nakar deta aalaa asata.

timepass vatato
>>>

वरील पोस्ट माझी नाही. एक सेकंद घाबरले की कोणाला पासवर्ड मिळाला की काय Happy

फिनिक्स,
एकूणात मूळ समस्या अशी दिसतेय की तुम्हाला बायकोच्या लुक्सचा प्रॉब्लेम नाही हे तुम्ही स्वतःलाच कदाचित समजावत आहात ( because you know that's the right way to think?!!) पण पोस्टीवरून वाटतेय की नेमकी तीच गोष्ट तुम्हाला सर्वप्रथम हिरमुसले करून गेलीय.आताही तीच तुम्हाला बॉदर करत आहे.तुमच्या न्यूनगंडाचेही तेच कारण वाटतेय.
तुमचा समज दिसत आहे की " you could have done better!" ते नेमके का, ते जस्टिफाइड आहे का, हा विचार केलायत का ?
कशामुळे तुम्हाला असं वाटतंय? तुम्हीच दिलेल्या फॅक्ट्स पाह्ता:
१. तुम्हाला कधी मैत्रिणी नव्हत्या, गर्लफ्रेन्ड्स तर नाहीच नाही
२. अरेन्ज्ड मॅरेज पण जमले नाही. नकार पचवावे लागले
३. तुमची वर्षानुवर्षाची " indecisive" असण्याची हिस्टरी स्पष्ट दिसतेय.तुम्हाला आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेता आले नाहियेत, जे घेतले तेव्हा कुठले क्रायटेरिया न वापरता घाईत घेतले. लग्न, मूल सगळेच अर्तक्य निर्णय.
यावरून मला तरी हे दिसतेय की - माफ करा पण असे मानायला जागा आहे की लुक्स हा तुमचाही स्ट्राँग पॉइन्ट नसावा! निर्णयक्षमता नसणे हाही तुमचा मोठा वीक पॉइन्ट आहे.
म्हणजे बायकोला आकडेमोड करता येत नसेल तर तुम्हालाही निर्णय घेता येत नाहीत ! ती दिसायला सुंदर नसली तरी तुम्ही किती सुंदर आहात असा विचार करून पाहिलाय का? मेबी मुळात तुम्ही इतक्या अपेक्षा कराव्यात इतकी तुमची पण परिस्थिती नसेल !! मेबी धिस इज व्हॉट यू रियली डिजर्व्ड, अँड मेबी इट्स नॉट सो बॅड आफ्टरऑल !!
सांगण्याचा मुद्दा हा की जर लहान मूल म्हणून आणि एकूणात बायकोची तशी काहीच चूक नाहिये असा नेक विचार करून तुम्ही सेपरेशन / डिवोर्सचा ऑप्शन कन्सिडर करत नाही आहात, "लढ म्हणा" म्हणताय, तर व्हाय नॉट टेक अ पॉझिटिव्ह अप्रोच !! तिच्या चांगल्या गोष्टी पहायला शिका, दोघात काय कॉमन आहे ते शोधा, आधीच्या निराशा सोडून फ्रेश स्टार्ट करा.
गुड लक!!

बाकी बेफींची मार्च १३, ६:११ ची पोस्ट वाचून हसू आलं. आणि इथे त्यांची इतकी पोस्ट्स पाहून फिनिक्स हा त्यांचाच प्रायोगिक डुआय आसावा अशीही शंका मनात आली Wink

This is usual practice on maayboli to put symapathtic post or story in this section..also observe that once story posted owner of thred don't look back to it and don't bother to come and reply..

Anyways he don't want anyones opinion or advise as he clearly mentions following
हा लेख सुशिक्षित समाजातील मुले व मुलीं दोघांसाठी आहे. ह्यामागे आपला समाज किंवा लग्नव्यवस्था ह्यातील त्रुटी दाखवायचा अजिबात उद्देश नाही. आज आपल्याच अवतीभवती पारंपारिक मार्गाने लग्न करून संसारात सुखी झालेली अनेक जोडपी आहेत तेव्हा तो प्रश्नच येत नाही. तरीसुद्धा ह्या व्यवस्थेचा एक भाग बनताना कुणाच नुकसान होऊ नये हाच एकमेव सार्थ हेतू आहे

टेक अ पॉझिटिव्ह अप्रोच !! तिच्या चांगल्या गोष्टी पहायला शिका, दोघात काय कॉमन आहे ते शोधा, आधीच्या निराशा सोडून फ्रेश स्टार्ट करा.
गुड लक!!

>>>>>>>>>>+१००१

फार उशीर केलात तर त्यालाही पस्तवावे लागेल्....लवकर स्वताहाचा approach बदला....

बर्‍याच दिवसांनी माबोवर आलो आणि हा लेख पाहीला. गंमत वाटली. लेखाची नाही. ओझरत्या पाहीलेल्या प्रतिसादांची.
मुळात लेखाचा हेतू वेगळा आहे. वेळच्यावेळी योग्य निर्णय घेण्याचं धाडस करा वगैरे सल्ला दिला आहे आणि त्या सल्ल्याची पार्श्वभुमी म्हणून स्वानुभव लिहीला आहे.
स्वतःसाठी कोणताही सल्ला लेखकाने मागितलेला दिसला नाही. पण प्रतिसादात बहुतेकानी लेखकाला "काय करावं किंवा करू नये" यासोबत इतरही सल्ले दिले आहेत. त्यामागे त्यांचा 'एकमेका सहाय्य करू' हा मानवी दृष्टीकोन दिसतो म्हणा, जे साहजिकच आहे.
पण प्रतिसादातील गंमत जास्त भावली. म्हणजे अनुमोदन देण्याची. एकाने लिहीलं की दुसर्‍याचं अनुमोदन. अधिकची चिन्हे वगैरे. हा टायपायचा कंटाळा की यापेक्षा वेगळं आपल्याला सुचत नाही ?
त्याही पुढची गंमत म्हणजे बेफींच्या मुद्यांपैकी काही मुद्दे इतरांच्या प्रतिसादात आले आहेत. रियाचे मुद्दे ही असेच पुन्हा डोकावतात. दक्षिणाने एक वेगळीच पोस्ट लिहीली आहे आणि त्यापेक्षा वेगळं असं स्वाती२ च्या पोस्ट मधे नाही. पण स्वाती२ ला अनुमोदन देणार्‍यांनी दक्षिणाच्या पोस्टचा सरळ सरळ अनुल्लेख केला आहे.
म्हणजे प्रतिसादात नुसते 'घरचे मतभेद जाहीर करणार्‍या लेखकाला' फटके नाही तर प्रतिसादकांनी आपापले मतभेद पण जाहीर केले आहेत.
मला असं पटकन वाटून गेलं की निदान लेखकाने घडल्या प्रकाराची जबाबदारी स्वतःवर घेण्याचं धाडसं तरी दाखवलं. पण प्रतिसादक मात्र ज्याच्याशी आपलं पटत नाही त्याचं मत कितीही योग्य आणि अचूक असलं तरी ते स्वीकारायचं धाडसं दाखवू शकतं नाही. Rofl

स्वाती२ ची पोस्ट अधिक स्पष्टपणे पटली म्हणून त्या पोस्टीला अनुमोदन दिले आहे

दुसर कोणीही दुश्मन नाहीये इथे अनुल्लेख करायला
आणि दक्षिणा तर नाहीच नाही

लेखकाने प्रामाणिकपणे आपले मत मांडले आहे. लग्न ठरण्याच्या वेळी झालेली घालमेल दाखवलेली आहे आणि दबाव इत्यादीमध्ये निर्णय घ्यावा लागला असेही लिहिले आहे. मुख्य म्हणजे कुठेच सल्ला मागितलेला नाही, इतकेच लिहिले आहे की इतरांनी ह्यातून जर काही शिकता आले तर शिकावे. असे असताना लेखकावर उगाचच टिका होत आहे असे मला वाटते.

मुळात आपल्या इथे ज्या पद्धतीने लग्ने होतात, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सोपा नसणे वगैरे अनेक बाबी इथे ठळकपणे दिसून येतात.

दोन्-तीन ठिकाणी लेखकाने घटस्फोट का घेत नाही हे सुचित केलेले आहे त्यात मुख्यत्वेकरून बायको व मुलाचे लेखकावर अवलंबून असणे नमूद केले आहे. त्यांनी वर्णन केल्यावरून असे लक्षात येते की त्यांची बायको नोकरी करणारी नाहिये तसेच घटस्फोट वगैरे दिल्यास तीस अधिक धक्का/आर्थिक झळ/सामाजिक झळ बसेल असे बहुदा लेखकाला दिसत असल्याने त्या विचारानेही घटस्फोट दिला जात नाहिये. ((( परत एकदा उरलासुरला सदसदविवेक जागा होतो आणि विचारतो की "काय रे कुठल्या कारणासाठी विभक्त होणार तू तुझया बायको मुलापासून ?..काय दोष आहे तिचा आणि काय दोष आहे तुझया मुलाचा !!!" बस्स!! इतक्या 2 प्रश्नांनी मी भानावर येतो आणि मुकाटपणे परत आपल्या निरस संसाराकडे वळतो. )))

चुका होत गेल्या हे लेखकाने नमूद केले आहे. मूल होऊ देणे हा चुकिचा निर्णय होता असे लेखकाला प्रतित होत आहे, किमान मला तरी असे वाटते. ((( मानसिक त्रासात मी चुका करतच गेलो आणि कदाचित मुल झाल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल आणि आपल्या संसाराला वेगळा अर्थ येईल या विचारने मी संततीबाबत डिसिशन घेतला. मुलगा झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस छान गेले पण हळूहळू परत जुन्या जखमा नवीन होऊन वाहू लागल्या. अर्थात ह्या सगळ्यात माझ्या सारखी माझ्या बरोबर माझी बायको देखील होरपळत होती ते मला पक्क ठाऊक होत. माझ्या एका चुकीच्या निर्णयाने त्या बिचारीच आयुष्याच पण मी नुकसान केल होत.)))

जाड असणे, दिसण्यास चांगली नसणे हे मुद्दे आपल्या (भारतीय) पद्धतीच्या लग्नात येत राहणारच. ही पद्धतच अशी आहे. युरोपमधल्या माझ्या अनुभवात मी कुरुप/जाड्या बायका व पुरुष हे बरेचदा एकटे, जोडीदार न मिळालेले राहतात हे मी बघितले आहे. माझी एक चांगली मैत्रिण वयाच्या चाळीशीत मेली, ती ज्या डिप्रेशनमधून जात होती त्याचे कारण ती एकटे असणे व कुरुप्-जाड असल्याने बॉयफ्रेंड न मिळणे हे दोन मोठे मुद्दे होते. सौंदर्य हे गृहितकतरी असावे का हा नक्कीच वादाचा मुद्दा आहे (आणि तर्काच्या आधारावर उत्तर साफ आहे). पण ते बघितले जाते हे सत्य आहे.

वेळेअभावी थांबतो पण जाताना माझ्या मताची पिंक टाकून जातो. घटस्फोटांचे बर्‍यापैकी प्रमाण असणे हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे. सर्व लग्ने टिकण्याची शक्यता (प्रोबॅबिलीटी) नक्कीच कमी आहे. ज्या समाजात सहजी वेगळे होता येते (नवरा व बायको किंवा नवरा-नवरा/बायको-बायको दोघांनाही तितक्याच सहजतेने हे महत्त्वाचे) तो समाज अधिक समान असतो.

मला कधी वाटले नव्हते की टण्यांच्या प्रतिसादातील एखाद्या पॅराला मी अनुमोदन देऊ इच्छित असेन!

Proud

पण ह्या प्रतिसादातील पहिल्या व शेवटच्या अश्या दोन पॅरांना अनुमोदन!

<<मला असं पटकन वाटून गेलं की निदान लेखकाने घडल्या प्रकाराची जबाबदारी स्वतःवर घेण्याचं धाडसं तरी दाखवलं. पण प्रतिसादक मात्र ज्याच्याशी आपलं पटत नाही त्याचं मत कितीही योग्य आणि अचूक असलं तरी ते स्वीकारायचं धाडसं दाखवू शकतं नाही>>
मला वाटत ज्याच्याशी आपल पटत नाही अस नसाव. पण ज्याला तुम्ही भेटला आहात निदान एकदा गटग मध्ये किव्वा इतर वेळी त्यांनाच अनुमोदन दिल जात.. पण ज्यांना तुम्ही कधीच भेटला नाही आहात . कधी पाहिलं नाही त्याचा अनुल्लेख होतो मग त्याने कितीही अचूक मत व्यक्त केल तरी असा माझा अनुभव किव्वा मत Happy

पण ज्याला तुम्ही भेटला आहात निदान एकदा गटग मध्ये किव्वा इतर वेळी त्यांनाच अनुमोदन दिल जात.. पण ज्यांना तुम्ही कधीच भेटला नाही आहात . कधी पाहिलं नाही त्याचा अनुल्लेख होतो मग त्याने कितीही अचूक मत व्यक्त केल तरी असा माझा अनुभव किव्वा मत<<<

खरंच सुदैव की (मायबोलीवरील असंख्या चर्चांपैकी निदान ही तरी) चर्चा ह्या वळणावर आली.

१. अनुमोदने देण्यामागे कंफर्ट लेव्हल असते. उद्या ह्याच व्यक्तीबरोबर गप्पा मारण्यात मला येथे वेळ घालवायचा आहे की कालवर ह्याच व्यक्तीबरोबर भरपूर गप्पा मारलेल्या आहेत ह्या गरजेतूनही अनुमोदने जन्म घेतात.

२. प्लस साईननंतरचे आकडे वाढवत नेले की अनुमोदनाची तीव्रता सम प्रमाणात वाढते हे एक विचित्र व जालीयदृष्ट्या असह्य गृहीतक आहे.

३. पर्सनल रिलेशन्स, जसे मैत्री, भावंडे असणे वगैरेतूनही अनुमोदने जन्म घेतात व ती अगतिक अनुमोदनेही असू शकतात.

४. सहसा ज्यांना अनुमोदने दिल्याचे पाहिले जाते त्यांनाच अनुमोदने दिली की आपणही पुढेमागे 'अनुमोदनीय' ठरू असा एक दृढ आणि यडचाप विचार त्यामागे असू शकतो.

५. मला कोठेतरी काहीतरी भडास काढायची आहे पण प्रत्यक्षात विरोध करायचा नाही आहे (व वाईट ठरायचे नाही आहे) अश्यावेळी कोणालातरी अनुमोदन दिले की त्याच्या विरोधकांवर भडास काढण्याचा एक आसूरी व काल्पनिक आनंद मिळतो.

Proud

टण्या , उत्तम प्रतिसाद.

एक मूल झाले आहेच तेव्हा घटस्फोट घेणे अशक्यच असेल तर अजून कमीत कमी ६-७ मूले होऊ द्या. म्हण्जे बाळंतपण आणि लहान मुलांचे संगोपन या सगळ्या व्यापात बायकोचा विचार करणे सोडाच , तिच्याकडे बघायलादेखिल तुम्हाला वेळ मिळणार नाही. तुम्ही सुखी अहात की दु:खी असा विचार मनात आणायला देखिल वेळ मिळणार नाही. बायकोचेही आयुष्य मुलाबाळांचे करण्यात पार गुंतुन जाईल. आणि तिचा तुमच्या आयुष्यातल्या हस्तक्षेप बंद होऊन, तुम्हाला तिचा काही त्रास होत असल्यास तो ही आपोआप बंद होईल.

मुलांचा पर्याय पसंत नसेल ( किन्वा बायकोची तयारी नसेल ) तर छंद जोपासा. छंदात बुडालात की आयुष्य सुंदर होऊ शकेल.

नाहीतर अहो सगळ्यात बेस्ट उपाय आहे की तुमच्याकडे , आपल्या मा.बो. च्या विबास तज्ञांचे मार्गदर्शन घ्या आणि फक्कड विबास सुरू करा पाहू. मग बघा आयुष्य कसे मखमली होऊन जाईल ते.

बायको इतकी असह्य होत असूनही एक मूल होऊ दिले आहेत
>>>

कशावरुन बायकोला नको असताना मूल होऊन दिले ह्याची खात्री आहे? बायकोलाही जर तेव्हा वाटत असेल की मूल झाले की बरे दिवस येतील व तिने पुढाकार घेऊन मूल होऊन दिले असेल तर?

कशावरुन बायकोला नको असताना मूल होऊन दिले ह्याची खात्री आहे? >> बायकोला मूल नको असताना असे नाही , बायकोच नवर्‍याला नको असताना

हायला! कुठलेही सल्ले नको असताना लोकं आपली देतायेत सल्ले,
तुम्ही असं करा, तसं करा, ह्यांव त्यांव....

काही तर जुनीच थेरपी आळवतायेत.... लहान मुलगा आहे तर लग्न चालवूनच घ्या.....
फक्त पेट थेरपी (आयडीने) ह्यांनी वेगळा सल्ला दिला काळानुसार,. बहुधा, त्यांचे(पेट थेरपी आयडीचे, माझे नाही) म्हणणे असे 'असु' शकेल की त्यांचा सल्ला उत्तम आहे. मग लेखक एक छानसं कुत्र्याचं पिल्लू आणून त्याच्याबरोबर उरलेले जीवन आंनदात घालवु शकतो व खरोखरीच पेट थेरपी वर्क्स असे इथे येवून सांगो शकतो.(अश्या सल्ल्याने ते आपली 'थेरपी' चे मार्केटींग करताहेत अशी शक्यता नाकारता येत नाही. असो.)
Proud

(अमा, ह. घ्या.)

(लेखक बिचारा झोपला असेल... 'डोक्या का दही बना डाला मायबोलीवाल्यांनी' म्हणत असेल अश्या अवस्थेत .)

डेलिया , अहो तुम्ही चक्क सल्ला (अगदी उपहासात्मक असला तरी .. सल्लाच )देताय त्यांना (त्यांनी मागितला नसताना ) ५-६ मुले वगेरे होण्याबद्दल . मुले होणे हा खाजगी प्रश्न नाही का वाटत तुम्हाला ? तुमचे ह्याबद्दल चे विचार तुम्ही वेगळ्या धाग्यावर लिहिले होतेच म्हणून विचारले .

///ते हे की आपल्याला कीतीही योग्य वाटत असला आणि आपला हेतू आपल्यामते चांगला असला तरी दुसर्‍याने स्वतःहुन मागितल्याशिवाय त्याला सल्ला द्यायला जाऊ नये. दुसर्‍याच्या ईच्छा नसताना त्याच्या खाजगी बाबतीत डोकावून उपदेश करणार्‍यांना मग लोक भोचक म्हणतात ( in other words ' mind your own buisness/////

रिया , अहो(अन्विता, ज्याचं त्याला कळत असतंच .. हे तुमचेच वाक्य आहे ना . ) किती प्रश्न विचारलेत तुम्ही लेखकाला अगदी बायकोच्या आवडी पासून ते त्यांच्या दिसाण्यापर्यंत.

इथे दुसर्या धाग्यावरचे प्रतिसादांचा संदर्भ दिला कारण काही आयडी आपली मते / प्रतिसाद सोयीनुसार बदलत असतात .

इथे इतकी चर्चा होऊन परत हा लेख खरेच कोणी स्वानुभवातून लिहिला आहे का उगीच मायबोलीकरांच्या प्रतिसादातून करमणूक ह्या उद्देशाने लिहिला आहे . ह्या बाबत शंका आहेच .

good job अन्विता!! माबो अभ्यास चांगलाच झालाय तुमचा Happy
आणि हो, बरोब्बर हा लेख खोटा असण्याची शक्यता आहेच Happy

डेलिया,

मला समुपदेशनासाठी ग्राहक मिळवून देण्यासाठी तुम्ही करत असलेले कार्य वादातीत महत्वाचे आहे. स्वतःची सत्प्रवृत्ती निर्जंतुक ठेवून दुसर्‍यांचे किंचित बाधा झालेले संसार पूर्णपणे बरबाद व्हावेत ह्या ध्येयाने प्रेरीत होऊन तुम्ही जी एकाकी व सातत्यपूर्ण झुंज देत आहात तिचे वर्णन करण्यास शब्द नाहीत.

रि या.......१११११११
बेफ़िकीर.....१११११११

फिनिक्स.....०००००००००

Pages