धापुडा..

Submitted by सुलेखा on 26 February, 2011 - 03:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप जाड रवा..
१ १/२ कप ताक..(आंबट असल्यास उत्तम}
१ कप पानकोबी किसुन, गाजर लहान तुकडे ,हिरवे मटार दाणे/हरभरा दाणे/शेंगदाणे (हे सगळे मिळुन कपभर}
१ /२ हिरवी मिरची बारीक चिरलेली..
१ टी स्पुन मीठ
फोडणी साठी २ चमचे तेल व जिरे-मोहोरी..
हिरवी चटणी..
चिंचेची चटणी..
१ कप गोडसर दही--साखर-मीठ घालुन फेटलेले..
चाट-मसाला..
जिरेपुड..तिखट..मीठ चवीनुसार..
हिरवी कोथिंबीर चिरलेली..
तिखट शेव..लागेल तशी..
फ्रुट सॉल्ट / इनो..१/२ चमचा(अर्धा पाउच)

क्रमवार पाककृती: 

ताका मधे रवा कालवुन घ्या..१० मिनिटे तसाच ठेवा..
त्यात कोबी,गाजर्,मटर चवीसाठी मीठ ,हिरवी मिरची घालुन मिश्रण एकत्र करा..
मिश्रण फार घट्ट वाटल्यास थोडेसे पाणी घाला.(.सरभरीत असावे)
फ्रुट सोल्ट घालुन चमच्याने एका च दिशेने फेटावे..
त्या आधी दुसरीकडे कढई त तेल गरम करावे..त्यात मोहोरी-जिरे टाकावे..
मोहोरी तड्तडली कि लगेच च रव्याचे मिश्रण घालावे..
गॅस मंद ठेवावा..झाकण ठेवावे..
२ मिनिटाने झाकण काढुन उलटवावे,.आता .दुसरी बाजु भाजुन घ्या..इडली सारखा मोठा गोल तयार होइल..
एका बाउल मधे ठेवा..त्यावर दही.हिरवी चटणी.चिंच चटणी.चाट मसाला,तिखट्,मीठ्,जिरेपुड,कोथिंबीर
सगळ्यात वर तिखट शेव घालुन चवीने खा..
धापुडा बनविण्याची दुसरी पद्धतः---
upada.JPG
इडली रवा ३ वाटी ,१ वाटी उडिद डाळ वेगवेगळे भिजवावे. उडदाची डाळ वाटताना त्यात हिरवी मिरची घालावी.डाळ वाटुन झाली कि भिजवलेला इडली रवा घालुन मिक्सर एकदा फिरवावे.४ ते५ तास मिश्रण झाकुन ठेवावे.
आता चवीप्रमाणे मीठ,वालपापडीचे व तूरीच्या शेंगांचे दाणे,बारीक चिरलेले गाजर/सिमला मिरची ,कोथिंबीर हे सर्व साधारण अर्धी वाटी एकत्र करावे.
लहान कढई/ खोलगट पॅन मधे १ चमचा तेल ,त्यात चिमुटभर जिरे घालावे.लगेचच त्यात वरील मिश्रण घालुन झाकण ठेवुन मंद आचेवर शिजु द्यावे. २ मिनिटानी उलथन्याने त्याची बाजु बदलावी व झाकण न ठेवता पुन्हा १ मिनिट शिजवावे. या प्रमाणात ४ ते ५ धापुडा करता येतील.हा धापुडा पिझ्झ्यासारखा सुरीने चिरुन खायला द्यावा. खोबरे चटणी ,सॉस, लोणच्याचा खार बरोबर मस्त लागतो.

वाढणी/प्रमाण: 
काय सांगु...
अधिक टिपा: 

मुळ रेसिपीत खाण्याचा सोडा घालतात..पुर्वी खाण्याचा सोडा (लहान गावात} घराघरात असायचाच (फ्रुट साल्ट नसायचे).सोडा ने घशाला खवखवते.. म्हणुन मी फ्रुट सॉल्ट वापरते..
मातीच्या तव्या वर एका बाजुने छान ,खर्पुस भाजल्याची चव येते..
पानकोबी,गाजर न घालता केले तरी चालते..
जेवणाला पर्याय आहे..

माहितीचा स्रोत: 
माळवा खासियत
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी_आर्या ..हे धिरडे नाहीये..मोठ्ठी इडली आहे..थोडी मऊसर..एकाबाजुने खर्पुस..
एक मोठी करुन त्याचे दोन भाग करुन प्लेट मधे वाढावेत..
फोटो ,सोय नसल्याने देता येत नाहीत..पण बिनधास्त करा..

भिजवलेला रवा सरभरीत दिसला पाहिजे..म्हणजे तो शिजल्यावर त्याची मऊसर इडली/केक सारखी तयार होइल..
कढई ऐवजी खोलगट फ्राय पॅन वापरले तरी चालेल....
व्हेरीएशन ----मुग-मसुर डाळ भिजवुन वाटलेली,बेसन ,तांदुळ पिठ्,तयार भात (उरलेला चालेल्),ओट्स-क्रॅकर्/कोणतेही,सोया वडी चा चुरा- गरम पाण्यात १५-२० मिनिटे भिजवुन घ्या..मुठभर भिजवलेले जाड पोहे..
होलव्हीट नूडल्स( मिकसर मधे एकदा फिरवुन त्याचे लहान-लहान तुकडे करुन ते नेहमी प्रमाणॅ गरम पाण्यात थोडा वेळ ऊ़कळवुन अर्धवट शिजवलेले ) असे काहीही सम प्रमाणात जाड रव्याबरोबर घेता येइल..

सुलेखा, नेकी और सुझ बुझ .... मी केला हा प्रकार आज! रव्याऐवजी दलिया,भाज्या घालुन केला. नंतर नॉनस्टिक पॅन मधे फोडणी टाकुन भाजले व ढोकळ्यासारखे कापले. छान झाले होते पुढच्यावेळी दही,चिंचेची चटणी शेव ई घालुन करीन..तुमच्या रेसीपी छान असतात !!! धन्यवाद!!

वाव सुलेखा काकू सहीये एकदम.. हांडवो सारखं दिसतोय ..कधी तरी मुलांसाठी काय करू कळत नाही आता हे करून बघेल.. त्यांना इडली, ढोकळे प्रकार खूप आवडतात..

असेच इडलीच्या पीठाचे पण करता येईल. त्यात भाज्या न घालता नुसती फोडणी घालून, खालून वरून निखार्‍यावर मंद आचेवर खरपूस भाजून एक प्रकार करतात आंध्रा / कर्नाटकात. मस्त लागतो .

सुलेखातै... सारी छे रेसिपी.
ते हांडवो ची रेसिपि पण टाक ना बेन!! Happy

Pages