झी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा

Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02

झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!

यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री

परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.

दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"

पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल खरंतर जगदाळेला बाहेरचा रस्ता दाखवतील असं वाटत होतं मला.

जगदाळे आणि कौशिक देशपांडे पेक्षा रसिका गानू बरीच चांगली गाते.>>> केव्हाही.

रसिका गानू Sad

लागा चुनरी मे दाग..
साहिर, रोशन आणि मन्ना डे यांच्या आत्म्याला किती क्लेश झाले असतील याची कल्पनाच करवत नाही Sad

केसरिया बालम- हे राजस्थानी लोकगीत आहे.
ते नव्याने डोर सिनेमात आलं (बहुतेक आधी कुठल्यातरी जुन्या सिनेमातहीहोतं, नक्की आठवत नाही)>>> डोर सिनेमातलं गाणं आहे त्याचे शब्द वेगळे आहेत. रेश्माने गायलेलं गाणं 'लेकिन' सिनेमातलं होतं.

प्रल्हाद जाधव आणि जयंत पानसरेला मुद्दाम फ्लॅट गायला सांगितलं होतं की काय न कळे.

आडो, संज्योतीबरोबर गणेश मेस्त्रीचा पण नंबर लावावा.

जुईली एवढी काय रडली? मेकप जाईल म्हणावं... Proud

कालचा रिझल्ट अगदीच काहीतरी नव्हता... तिघेही मार्क दिल्यावर प प वरच होते.. गानूचा आवाज बसला होता ते दिसतच होते.. एखादा तरी स्पर्धक आवाज बसल्यामुळे बाहेर जाण्याचे प्रकार दरवेळेस घडतोच..

<<केसरिया बालम- हे राजस्थानी लोकगीत आहे.
ते नव्याने डोर सिनेमात आलं (बहुतेक आधी कुठल्यातरी जुन्या सिनेमातहीहोतं, नक्की आठवत नाही)>>> डोर सिनेमातलं गाणं आहे त्याचे शब्द वेगळे आहेत. रेश्माने गायलेलं गाणं 'लेकिन' सिनेमातलं होतं.
>>

रेश्मा? लता मंगेशकर!

याला "मांड" म्हणतात. मुखडा तसाच ठेवून अंतरे वेगवेगळे गात राजस्थानाच्या लोकांचे, जीवनाचे, खाण्याचे, कपड्यांचे, शूर्-वीरतेचे वर्णन करतात.

लता मंगेशकर, उ अमन अली, बडे फतेह अली, मेहदी हसन, अजय चक्रवर्ती, हिदायत खान, महंमद वकील यांचे 'केसरीया बालम' ऐकणे आणि मग मत बनवणे.

सुलू,
मांड हा राग आहे (अर्थात, राजस्थानी लोकगीतातूनच तयार झालेला)
मराठी नाट्यगीत- नरवर कृष्णासमान हेही याच रागातलं आहे.
राजस्थानी लोकसंगीतातून शास्त्रीय संगीतात हा राग आला तोच "केसरिया बालम" मुळे असे ऐकले आहे.
त्यामुळे शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या अनेकांनी "केसरिया बालम" गायिले आहे.

वर मंजूडी म्हणतायत ते फक्त "लेकिन" सिनेमातल्या गाण्याबद्दल. आणि डोर सिनेमातले गाणे आणि लेकिनमधले गाणे याच्या शब्दांत फरक आहे. (त्याबद्दल तुम्ही सांगितल्यानुसार, मुखडा तोच आणि अंतरा वेगवेगळा गाण्याची प्रथा राजस्थानी लोकगीतांत दिसते). इतरांनीही हे गाणं गायलंय याबद्दल त्यांचा आक्षेप नाहिये.
इतरांनी तेच गाणं गायलेलं असलं तरीही रेश्माने म्हटलेलं गाणंही तितकंच अप्रतिम आहे.

चैतन्य....

एरव्ही वेळेअभावी "सारेगमप" कार्यक्रम पाहता येत नाही...पण तुमच्या प्रतिसाद वाचनानंतर फार उत्सुकतेने आणि नेटच्या साहाय्याने रश्मी कुलकर्णी यानी सादर केलेले "केसरिया बालम" ऐकले आणि प्रभावित झालो त्या मुलीची लोकसंगीतातील तयारी ऐकून....[घरातील अन्यांनी सांगितले की याच मुलीला आठवड्यातील सर्वोत्कृष्ट गायिकाचा मान दिला गेला....तो योग्यच होता असे म्हणावे लागेल...]

"मांड" रागाविषयी तुम्ही लिहिले आहेच जो राजस्थानी लोकसंगीताची देणगी आहे. शुद्ध स्वरासह तो संपूर्ण शिवाय राजस्थानने पंजाब गुजराथ बंगाल प्रांतांना दिलेली ती भेट मानली जाते. या अन्य राज्यात तेथील परंपरेनुसार सादरीकरणात आवश्यक ते बदल केले जातात....अर्थात लोकसंगीताची मांडणी करताना.

तुम्ही "नरवर कृष्णासमान" चा उल्लेख केला आहेच....हिंदीतील "तू चंदा मै चांदनी...." लताचे 'रेश्मा और शेरा" या चित्रपटातील जयदेव यांची रचना केसरिया बालमाच्या जातकुळीतीलच होय.

थेट प्रेम नव्हे तर एखाद्याच्या प्रेमाची ओढ....आस... लागल्याची तगमग व भावना प्रकट करणारा हा राग.

<<सुलू,
मांड हा राग आहे (अर्थात, राजस्थानी लोकगीतातूनच तयार झालेला)...>>

चैतन्य,
मांड ही गायकी आहे , सर्वमत-राग नाही असेच ऐकून वाचून होतो. म्हणून मांड म्हटले, मांड रागात आहे असे म्हटले नाही.

संदर्भ विकी -

http://en.wikipedia.org/wiki/Mand_(singing_styl)

लेकिन चित्रपटात लता जींचे केसरिया ऐकलेले आठवतेय. रेश्मा जींचे नाही.

मंजूडी, मला क्षमा करा, तुम्हाला उद्देशून नव्हते. जे कोण 'कट्यार' कुलकर्णी च्या केसरीयावर खूष झालेत त्यानी एकदा वर सांगितलेल्यांचे मांड ऐकावेत आणि मग मत बनवावीत हा उद्देश सांगण्यामागे. नाहीतर, अश्वत्थाम्याच्या दुधासारखे व्हायचे. जे आपण आता ऐकतोय तेच सर्वोत्तम वाटायला लागते.

लता मंगेशकर, उ अमन अली, बडे फतेह अली, मेहदी हसन, अजय चक्रवर्ती, हिदायत खान, महंमद वकील यांचे 'केसरीया बालम' ऐकणे आणि मग मत बनवणे.>>>>> Sulu, अहो, या कार्यक्रमातील नवोदित गायकांची तुलना त्यांच्या बरोबर करुन कसं चालेल?

कार्यक्रमाच्या त्या आठवड्याच्या थीमनुसार गाणी ठरवताना खरंतर कंटेस्टंटना गाणं निवडायची संधी मिळयला हवी..... इथे थीम ठरते आणि कोण कुठलं गाणं गाणार हेही संयोजकच ठरवतात.... ती संधी जर गायकाला दिली तर कदाचित चांगले गायक गायिका आपल्याला जास्त चांगलं जमणारं त्यथीमेममधलं गाणं गाऊ शकतील.....

बाकी आपल्याला फारच एडिट होऊन परिक्षकांचे प्रतिसाद दिसतात प्रत्यक्षात दोघेही परिक्षाक प्रत्येक गायकाला इन डिटेल काय चुकलं काय आवडलं काय असायला हवं होतं हेनीत्ट समजवतात.... एडिट्मध्ये मात्र नेमक्या सुमार त्याच त्याच "तोडलंस फोडलेस" सारख्या प्रतिक्रिया दाखवल्याने फक्त टीव्हीवर पाहणार्‍या श्रोत्यांचा गैरसमज होणंह्की हे नक्की काय चाललय परिक्षकांचे असं वाटणं स्वाभाविक आहे..... पण परिक्षक खूपच डिटेल्ड परिक्षण करतात प्रत्यक्षात.

बहुतेक कार्यक्रम स्क्रीप्टेडच असतात भुंग्या... क्वचितच एखादा कार्यक्रम.. पूर्वी होऊन गेलेलेल्या पैकी स्क्रीप्टेड नसेल.. त्यामुळे प्रत्यक्षात परिक्षकांनी दिलेल्या कमेंट्स कधीच दाखवल्या जाणार नाहीत.. आणि त्या दाखवल्या तर जाहिरातींसाठी कुठे वेळ मिळायला..

हो तसेच असतं.... पण तरीही स्क्रिप्टेड प्रोग्राम मधे गायकांना थीमप्रमाणे त्यांच्या आवडीचे गाणं सिलेक्ट करायला देणं हरकत नाही..... कारण बर्‍याचदा असं होतं की परफॉर्म करून बाहेर पडताना गायक / गायिका जे गाणं गातात ते
आधीच्या त्यांनी गायलेल्या थीम साँगपेक्षा चांगलं असतं.... Wink

झी चॅनलने राहण्याची व्यवस्था चोख केलीये एकदम..... १४जण्णांना ४ रूम्स...मुलंलगे मुली वेगळे ... २ सेपरेट अटेंडंट कायम तिथेच रहतात... घर जवळ असलं तरी अटेंडंटना तिथेअच रहावं लागतं.... अगदी बूटापासून पिनेपर्यंत सगळे कपडे प्रसाधनं सर्व चॅनल पुरवतं.... कॉस्च्युम डिझाइइनर हजर असतात लास्ट मुमेंट चेंजेस सुद्ध्हा निट केले जातात..... ऑल इन ऑल झी तर्फे उत्तम व्यवस्था आहे सर्वांची.....

त्याच हॉटेलमधे इंडियन आयडॉल / बुगी वुगी तत्सम प्रोग्रामचे स्पर्धकही असतात....

आता कोणी बाहेर पडल्यावर बाकीचे रडतात कारण खरेच ते लोक लाइक फॅमिली राहतायत एकत्र..... कोणाचा आवज बसलाय, कोणाला ताप आलाय... अश्यात सगळे एकमेकांना सांभाळून रियाझ करतात.....

बर्याच जणांचे पालक मुंबईबाहेर अस्तात, नातेवाइइकही नसतात प्रत्येकवेळी शूटिंग वीकडेला असल्याने..... सो कोणाचेही नातेवाईक आलं की सगळी मुले जमतात एकत्र सगळ्यांना छान आनंद होतो,,,, आपल्यालाही त्यांना भेटताना खूपच छान वाटतं......

सेटवर आणि हॉटेलवर खूपच छान सोय केलेली आहे चॅनलने.......

बाकी इतके सारे असूनही या पर्वात मजा येत नाही त्याचे कारण तगडे गायक गायिका नाहीत कोणी हेच खरं,,,,,,, जे कोणी जिंकेल ते वासरात लंगडी गाय शहाणी असाच प्रकार होणारे......

पुढच्यावेळी भडमकमकर - रानडेंनी जरा जास्त उत्ताम निवड करावी ही विनंती....

राहण्याची सोय चांगली करतातच.. ते माहिती आहे मला.. प्रत्यक्ष कधी गेलो नाहीये.. पण वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धकांचे अनुभव आहेतच..

शुगोल,
<>

तुमचं म्हणणं बरोबरच आहे पण मी स्पर्धकांची तुलना करतच नव्हतो. मी ऐकणार्यांची तुलना करत होतो. Happy
खरं सांगायचं तर, "तुलना, स्पर्धा करू नये, स्वतःशीच करावी" हा नियम असामान्य कलाकारापुरताच खरा असतो. आपल्या सारख्या सामान्यांनी सतत असामान्य लोकांशी तुलना करत आपापली क्षेत्रं उंचावत राहिलं पाहिजे.- माझे मत. मग ते गाणारे असोत किंवा ऐकणारे!

मुळात मला ही मुलं तितकीशी talented वाटत नाहियेत. चांगली आहेत, वाद नाही पण अजून उत्तम मिळू शकली असती. निवड नक्कीच चुकलीये. त्यातून त्यांची गाणी इतक्या आठवड्यांनंतरही मनावर ठसत नाहीत म्हणजे मेहेनतही कमी पडतेय. अर्थात मी एक श्रोता म्हणून स्पष्ट मत लिहितोय.

केसरीया बालम म्हणताना फक्त सूरांत गाऊन चालणार नाही. ती राजस्थानी उन्हाची धग सोसलेली, रापलेली , अपार कष्ट जरी असले तरी, आधी मनात आणि म्हणून गळ्यात अतिथ्य बाळगणारी राजपूत स्त्री बनता आले पाहिजे.
रखरखीत वाळवंटात स्वतः उघड्या पायानी उभं राहून तुमच्या डोक्यावर छत्र धरणारा सच्चा राजपूत काय मूल्यांवर जगतो ते जाणून घेतले पाहिजे.
'पधारो म्हारे देस' हे वाक्य ऐकताना अंगावर काटा उभा राहिला हवा.. दुर्दैवाने तसे झाले नाही.. म्हणून लेखनालाप!

Pages