या लेखात आपण काही मुलभूत जलरंगाच्या वॉशेस आणि तंत्राबद्दल चर्चा करुया
जलरंगात शिकवला जाणारा आणि महत्वाचा वॉश म्हणजे फ्लॅट वॉश , नावाप्रमाणेच रंगात काहीही बदल न करता येकसंध येका रंगाचा वॉश.
आपल्याला हवा तो रंग पॅलेट मधे काढुन त्याच्यात पाणी ब्रशने पाणी अॅड करत जायचे , साधारण पणे पहील्या वॉश साठी २५ ते ३०% रंग आणि बाकीचे पाणी असा रंग तयार करावा. ( रंग , कागद या प्रंमाणे यात फरक पडेल)
आपल्याला जेव्हढा कागद कव्हर करायचाय तेव्ह्ढा किंवा त्याहुन जास्त रंग तयार असावा कारण पॅलेट मधला रंग संपला तर पुन्हा बनवताना तशीच कंसिस्टन्सी राहील असे नाही.
वॉटरकलर करताना आपला पॅड/बोर्ड साधारण १५ ते २० अंशात पकडावा जेणे करुन रंग खालच्या दिशेने वाहिल पण ओघळणार नाही.
मोठा (१२ नं राऊंड्/किंव फ्लॅट ) ब्रश रंगाने पुर्ण लोड करुन आडवा रंगाचा पट्टा कागदावर लावावा
त्याच्या खाली डावी कडून थोडा ओव्हरलॅप करुन दुसरा , तिसरा असे पट्टे मारत हवात्या भागापुरता वॉष पुर्ण करावा. ब्रश मधे कायम रंग असला पाहीजे नाहीतर रंगात वेरीएशन येइल, येका भागत पट्टा पुर्ण झाल तर परत परत तीथे रंग लेपन करु नये
ग्रेडेड वॉश- जर रंगात हळू हळु पाणी वाढवीत नेले तर रंग गडद ते फिका असे ग्रेडेशन मीळते. हा झाला ग्रेडेड वॉश. रंगलेपनाची पद्धत फ्लॅट वॉश प्रमाणेच
रिव्हर्स ग्रेडेड वॉश , यात पाण्या ऐवजी रंगाचे प्रमाण वाढवीत न्यायचे
variegated वॉश यात दोन रंगांची सरमीसळ करावी लागते
पहिल्यांदा कागदावर दोन रंगांचे पट्टे मधे थोडी जागा ठेऊन मारायचे (फ्लॅट वॉश प्रंमाणे) आणि नंतर ब्रश धुउन, साफ ओल्या ब्रशने हे पट्टे येक् मेकात मिसळायचे. हे मिसळताना कागद /बोर्ड आण्खी तिरका /वर्ची बाजू खाली/खालची बा़जू वर असा हालवावा, याने दोन्ही पट्टे व्यवस्थीत येक मेकात मिसळतात
हे वॉशेस मारताना जर पातळ रंग किंवा पाणी पड्ले तर ते वॉशेस खराब होतात , याला कॉलिप्फ्लॉवर इफेक्ट असे म्हणतात. काही चित्रात टेक्चर तयार करायला याचा वापर होतो , मात्र इतरवेळी हे टाळावयास हवे
कलर लिफ्टींग - रंग थोडा ओला असतानाच साफ ब्रश पाण्यात बुडउन स्पंज किंवा कापडाने टीपून घ्यावा. त्या ओल्या ब्रशने आपण हवा तिथला रंग काढू शकतो. रंग खुप ओला असताना कलर लिफ्ट कराय्ला गेल्यास कॉलीप्लॉवर तयार व्हायची शक्यता असते म्हणुन थोडा रंग सुकू द्यावा, मात्र पुर्ण सुकल्यावर रंग लिफ्ट करणे कठीण असते खास करून रंग staining असेल तर.
कलर लिफ्ट करताना कागद खराब हॉनार नाहि इतपतच ब्रशचा भार द्यावा
सॉफ्ट्नींग - रंग लेपन केल्यावर त्याच्या बाहेरील भागाच्या कडा ओळ्या ब्रशने सॉफ्ट करण्याच्या या तंत्राचा बराच वापर होतो.
आता मी येक जादू करणार आहे , सगळ्याना त्यांच्या बालपणात ट्रांस्पोर्ट करणार आहे
आपण सगळयांनी लहानपणी घर, आकाश, डोंगर, रस्ता , पक्षी (४ , ४ आकड्यांचे) असे लँड्स्केप काढले असेल.
तेच लँडस्केप आपण या बेसि़क ट्क्नीक्सनी काढणार आहोत.
प्रथम खालील स्केच साधारण क्वार्टर साईझ हँड्मेड पेपर वर काढुन घ्या
पॅलेट मधे , कोबाल्ट ब्लू, लाल, गँबोज किंवा लेमन यलो, ऑकर यलो असे रंग काढुन घ्या/ हे रंग नसतील तर दुसरे त्याच्याशी मिळते जुळते रंग घ्या
त्यानंतर घर वगळून क्षितिजा पर्यंत कोबाल्ट ब्लू चा फ्लॅट वॉश द्या.( १२ नं ब्रश)
तो वॉश ओला असतानाच gamboge yellow ने पुढचा पट्टा मारा.
पुढे ब्लू आणि gamboge yellow येकत्र करुन तयार होणार्या हिरव्या रंगाचा वॉश कंटीन्य करा .अशाने चित्राचा बहुतेज भाग रंगउन होईल.
आता घराचा भाग (छप्पर सोडुन ) ऑकर यलोने रंगवा , अजुन आपला पहैलाच वॉश असल्याने सगळ्या रंगाची कंसिस्टन्सी ३० टक्के रंग+ ७० % पाणी अशीच ठेवा
आता आकाशाचा निळा रंग सउकला असेल. पॅलेट मधे निळा+ थोडा लाल मिक्स करुन जांभळा रंग १२ नंबर ब्रशनेच डोंगराकडे लाउन घ्या.
रत्यावरचा हिरवा रंग थोडा लिफ्ट करुन घ्या
घराचे छ्प्पर यलो+लाल रंगात रंगवा
पॅलेट मधे तयार हिरव्या रंगात थोडा नीळा अॅड करा, हे थोडे दाट झालेले रंग घेऊन घरा मागे फॉलिएज रंगवा
फॉलिएज / डोंगराचा थोडा खालचा भाग सॉफ्ट करा
हे चित्र सुकु द्या.
त्यानंतर चार नंबर राऊंड ब्रशने लाल,निळा+ हिरवा असे मिश्र्ण करुन लिनिअर ,कॅलिग्राफी स्ट्रोक्स्ने रस्ता , घराचा दरवाजा ,कुंपण इत्यादी काढुन तसेच ४ वाले पक्षि रंगवुन चित्र संपवा. कूठेही चित्रात बारीक काम किंवा कोरत बसु नका.
साधारण तिन टप्प्यत आप्ण हे चित्र केलेय, कुठेही फार डीटेल्स न टाकता वॉटर्कलर्रस च्या प्रॉप्रटीजचा वापर करुन हे चित्र सहज करता येते.
हे चित्र तुमच्या मित्र मैत्रिणीना देऊन त्यानाही त्यांच्या लहानपणात घेउन जायची जादु तुम्ही करु शकता.
या आठवड्यात अशा वॉशेस तसेच सोप्या चित्राचा सराव करा
या आधिचे लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445
लेख दुसरा :रेखांकन http://www.maayboli.com/node/47506
पुढिल लेख
लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.
http://www.maayboli.com/node/47815
अंतरा, मस्त आलंय चित्र
अंतरा, मस्त आलंय चित्र
बस्के, किती फरक पडला बघ. खूप छान आलंय
ए काय मस्त चाललंय सगळं......
ए काय मस्त चाललंय सगळं...... काश मी पण असा पसारा काढून बसू शकले असते..... !!
तुमच्या सगळ्यांची चित्र बघूनच समाधान करुन घेतेय.
सरजी....... फार छान शिकवताय !!
अंतरा, गजानन... मस्तच
अंतरा, गजानन... मस्तच
मी काढलेले चित्र इतका
मी काढलेले चित्र
इतका भयंकर प्रकार मी शाळेत परिक्षेला ही केला नसेल कदाचित
मला मुळात या भानगडीत अजिबात आत्मविश्वास नव्हता, पण् चित्रे पाहुन उगीचच सोप्पी असावित असा भास झाला होता. आता जो काही बचाकुचा आत्मविश्वास होता तो पार रसातळाला जाऊन पोचलाय.... मी कधीच चित्रे काढु शकणार नाही.. .
ब्रशमध्ये पाणी भरपुर राहात होते. ड्राईंङ कागद म्हणुन जो आणलाय त्याला रंग लागताच तो चक्क वळू लागला. ब्रशमध्ये खुप पाणी राहात असल्याने रंग कमी आणि पाणीच जास्त असे होतेय....
साधना! तू हँडमेड पेपर वापरला
साधना! तू हँडमेड पेपर वापरला नाहियेस बहुतेक.. अन जलरंगाच्या शेड्स अजय नी सांगितलेल्या नाही वापरल्यात. त्या दोन्हीमुळे खूप फरक पडतो. पुन्हा एकदा नक्की प्रयत्न कर. नक्की जमेल.
चित्र काढायच्या आधी नुसतेच चौकोन, त्रिकोण हँडमेड पेपरवर रंगवून बघ. म्हणजे तुला जलरंग कसे पसरतात त्याचा अंदाज येईल.
साधनाऽऽऽ ! अज्जिबात
साधनाऽऽऽ ! अज्जिबात कॉन्फिडन्स घालवायचा नाही स्वतःचा. जमेल नक्की अजून चांगलं. माझेही रंग पळत होते कागदावर पाणीदार झाल्यामुळे. ड्रॉइंग पेपर वर नको काढूस. अजयने सांगितलंय तसं हँडमेड पेपर भिजवून सुकवून काढ. बाकी अजय सांगेलच. तुझी निराश पोस्ट वाचून आगाऊपणा करतेय रहावलं नाही म्हणून
ए मी भिजवून सुकवून वगैरे
ए मी भिजवून सुकवून वगैरे प्रकार नाही केला. त्याने फरक पडतो का काही?
तसे केले पाहीजे आता..
हा माझा प्रयत्न. रंग+ पाणी
हा माझा प्रयत्न.
रंग+ पाणी प्रमाणात बराच गोंधळ होतोय माझा. पेपर बराच पातळ असल्याने रंगवायला जरा अवघड गेले. हवी ती रंगछटा तयार करण्यासाठी बरेच शिकायला लागणार असे दिसतेय. एकंदरीत वाचताना, पहाताना जेवढे सोपे दिसते त्याहून बरेच कठीण आहे हे.
Looks ok. My PC is down since
Looks ok. My PC is down since morning. Won't be possible to post /comment for few days.
पहिलाच प्रयत्न आहे. आज वर
पहिलाच प्रयत्न आहे. आज वर कधीही ब्रश हातात घेतला नाहीये. भरपूर चुका आहे.
From Painting
अखी, छान आलंय. अजय सांगेलच
अखी, छान आलंय. अजय सांगेलच काय सुधारणा हव्यात त्या
अखी- पहिल्या प्रयत्नाच्या
अखी- पहिल्या प्रयत्नाच्या मानाने खुपच चांगले आहे. रंगवत रहा.
फायनली आज वेळ मिळाला ही स्टेप
फायनली आज वेळ मिळाला ही स्टेप करायला.
चित्र१
यात रंग थोडे गडद झाले आणि घर मोठे झालेय. अजुन एकदा प्रयत्न करुन बघेन.
चित्र २
ढगांचा भाग हुकला आहे.
हा अजून एक प्रयत्न :
हा अजून एक प्रयत्न :
Pages