लेख तिसरा- बेसिक वॉशेस

Submitted by पाटील on 9 February, 2014 - 06:13

या लेखात आपण काही मुलभूत जलरंगाच्या वॉशेस आणि तंत्राबद्दल चर्चा करुया
जलरंगात शिकवला जाणारा आणि महत्वाचा वॉश म्हणजे फ्लॅट वॉश , नावाप्रमाणेच रंगात काहीही बदल न करता येकसंध येका रंगाचा वॉश.
आपल्याला हवा तो रंग पॅलेट मधे काढुन त्याच्यात पाणी ब्रशने पाणी अ‍ॅड करत जायचे , साधारण पणे पहील्या वॉश साठी २५ ते ३०% रंग आणि बाकीचे पाणी असा रंग तयार करावा. ( रंग , कागद या प्रंमाणे यात फरक पडेल)
आपल्याला जेव्हढा कागद कव्हर करायचाय तेव्ह्ढा किंवा त्याहुन जास्त रंग तयार असावा कारण पॅलेट मधला रंग संपला तर पुन्हा बनवताना तशीच कंसिस्टन्सी राहील असे नाही.
वॉटरकलर करताना आपला पॅड/बोर्ड साधारण १५ ते २० अंशात पकडावा जेणे करुन रंग खालच्या दिशेने वाहिल पण ओघळणार नाही.
मोठा (१२ नं राऊंड्/किंव फ्लॅट ) ब्रश रंगाने पुर्ण लोड करुन आडवा रंगाचा पट्टा कागदावर लावावा
त्याच्या खाली डावी कडून थोडा ओव्हरलॅप करुन दुसरा , तिसरा असे पट्टे मारत हवात्या भागापुरता वॉष पुर्ण करावा. ब्रश मधे कायम रंग असला पाहीजे नाहीतर रंगात वेरीएशन येइल, येका भागत पट्टा पुर्ण झाल तर परत परत तीथे रंग लेपन करु नये
flat.jpgflat1.jpg

ग्रेडेड वॉश- जर रंगात हळू हळु पाणी वाढवीत नेले तर रंग गडद ते फिका असे ग्रेडेशन मीळते. हा झाला ग्रेडेड वॉश. रंगलेपनाची पद्धत फ्लॅट वॉश प्रमाणेच
graded wash.jpg
रिव्हर्स ग्रेडेड वॉश , यात पाण्या ऐवजी रंगाचे प्रमाण वाढवीत न्यायचे
reverse graded wash.jpg

variegated वॉश यात दोन रंगांची सरमीसळ करावी लागते
पहिल्यांदा कागदावर दोन रंगांचे पट्टे मधे थोडी जागा ठेऊन मारायचे (फ्लॅट वॉश प्रंमाणे) आणि नंतर ब्रश धुउन, साफ ओल्या ब्रशने हे पट्टे येक् मेकात मिसळायचे. हे मिसळताना कागद /बोर्ड आण्खी तिरका /वर्ची बाजू खाली/खालची बा़जू वर असा हालवावा, याने दोन्ही पट्टे व्यवस्थीत येक मेकात मिसळतात
verig.jpgverig2.jpg

हे वॉशेस मारताना जर पातळ रंग किंवा पाणी पड्ले तर ते वॉशेस खराब होतात , याला कॉलिप्फ्लॉवर इफेक्ट असे म्हणतात. काही चित्रात टेक्चर तयार करायला याचा वापर होतो , मात्र इतरवेळी हे टाळावयास हवे

cauliflwr.jpg

कलर लिफ्टींग - रंग थोडा ओला असतानाच साफ ब्रश पाण्यात बुडउन स्पंज किंवा कापडाने टीपून घ्यावा. त्या ओल्या ब्रशने आपण हवा तिथला रंग काढू शकतो. रंग खुप ओला असताना कलर लिफ्ट कराय्ला गेल्यास कॉलीप्लॉवर तयार व्हायची शक्यता असते म्हणुन थोडा रंग सुकू द्यावा, मात्र पुर्ण सुकल्यावर रंग लिफ्ट करणे कठीण असते खास करून रंग staining असेल तर.
कलर लिफ्ट करताना कागद खराब हॉनार नाहि इतपतच ब्रशचा भार द्यावाlifting.jpg

सॉफ्ट्नींग - रंग लेपन केल्यावर त्याच्या बाहेरील भागाच्या कडा ओळ्या ब्रशने सॉफ्ट करण्याच्या या तंत्राचा बराच वापर होतो.
soft.jpg

आता मी येक जादू करणार आहे , सगळ्याना त्यांच्या बालपणात ट्रांस्पोर्ट करणार आहे
आपण सगळयांनी लहानपणी घर, आकाश, डोंगर, रस्ता , पक्षी (४ , ४ आकड्यांचे) असे लँड्स्केप काढले असेल.
तेच लँडस्केप आपण या बेसि़क ट्क्नीक्सनी काढणार आहोत.

प्रथम खालील स्केच साधारण क्वार्टर साईझ हँड्मेड पेपर वर काढुन घ्या
s1.jpg
पॅलेट मधे , कोबाल्ट ब्लू, लाल, गँबोज किंवा लेमन यलो, ऑकर यलो असे रंग काढुन घ्या/ हे रंग नसतील तर दुसरे त्याच्याशी मिळते जुळते रंग घ्या

त्यानंतर घर वगळून क्षितिजा पर्यंत कोबाल्ट ब्लू चा फ्लॅट वॉश द्या.( १२ नं ब्रश)
1_3.jpg
तो वॉश ओला असतानाच gamboge yellow ने पुढचा पट्टा मारा.
पुढे ब्लू आणि gamboge yellow येकत्र करुन तयार होणार्‍या हिरव्या रंगाचा वॉश कंटीन्य करा .अशाने चित्राचा बहुतेज भाग रंगउन होईल.
2_3.jpg

आता घराचा भाग (छप्पर सोडुन ) ऑकर यलोने रंगवा , अजुन आपला पहैलाच वॉश असल्याने सगळ्या रंगाची कंसिस्टन्सी ३० टक्के रंग+ ७० % पाणी अशीच ठेवा
3_0.jpg
आता आकाशाचा निळा रंग सउकला असेल. पॅलेट मधे निळा+ थोडा लाल मिक्स करुन जांभळा रंग १२ नंबर ब्रशनेच डोंगराकडे लाउन घ्या.
रत्यावरचा हिरवा रंग थोडा लिफ्ट करुन घ्या
घराचे छ्प्पर यलो+लाल रंगात रंगवा
पॅलेट मधे तयार हिरव्या रंगात थोडा नीळा अ‍ॅड करा, हे थोडे दाट झालेले रंग घेऊन घरा मागे फॉलिएज रंगवा
फॉलिएज / डोंगराचा थोडा खालचा भाग सॉफ्ट करा
हे चित्र सुकु द्या.
त्यानंतर चार नंबर राऊंड ब्रशने लाल,निळा+ हिरवा असे मिश्र्ण करुन लिनिअर ,कॅलिग्राफी स्ट्रोक्स्ने रस्ता , घराचा दरवाजा ,कुंपण इत्यादी काढुन तसेच ४ वाले पक्षि रंगवुन चित्र संपवा. कूठेही चित्रात बारीक काम किंवा कोरत बसु नका.
final.jpg
साधारण तिन टप्प्यत आप्ण हे चित्र केलेय, कुठेही फार डीटेल्स न टाकता वॉटर्कलर्रस च्या प्रॉप्रटीजचा वापर करुन हे चित्र सहज करता येते.
हे चित्र तुमच्या मित्र मैत्रिणीना देऊन त्यानाही त्यांच्या लहानपणात घेउन जायची जादु तुम्ही करु शकता.

या आठवड्यात अशा वॉशेस तसेच सोप्या चित्राचा सराव करा
या आधिचे लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445
लेख दुसरा :रेखांकन http://www.maayboli.com/node/47506
पुढिल लेख
लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.
http://www.maayboli.com/node/47815

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर, तिनहि लेख वाचले. डेमो छान.खूप खूप धन्यवाद. काही चित्रे करून पाहिली. फोटो कसे पाठवू ते कळल नाही

अंतरा - झाडाचे स्ट्रोक्स उतम आलेत, वॉश सुद्धा ठिक.
गवत थोडे कमी अधीक उंच करुन थोडे वेरियेशन आले असते.
चंद्रकोरीला आउट्लाईन केलेली दिसते त्या ऐवजी भोवताली अधीक गडद रंगानी चंद्रकोर उठावदार करता आली असती.

धन्यवाद पाटील. तुमच्या सूचनां लक्षात ठेवून हे चित्र पुन्हा काढून बघेन.
कॅलिग्राफी स्ट्रोक्स म्हणजे काय ?

छान उपक्रम आहे. मला अश्विनीने कालच सांगीतला. माझ्या लेकीला ही हे ऑनलाईन वर्क्शॉप आवडलं, तिने ही चक्क हे संपूर्ण वाचून काढल , कॅलिग्राफी स्ट्रोक्स म्हणजे काय ?>>> हा प्रश्ण तिलाही पडला आहे. ह्याबद्दल अधिक माहिती कळू शकेल का ? हा तिने केलेला प्रयत्न DSC03443_2.JPG (4.26 KB)
अपलोडकरताना काहीतरी गंडतय
DSC03443_2.JPG (4.26 KB)

चंद्रकोरीला आउट्लाईन केलेली दिसते त्या ऐवजी भोवताली अधीक गडद रंगानी चंद्रकोर उठावदार करता आली असती. >> भोवतालचे आकाश लाईट असताना असे केले तरी चालेल ? कि चंद्रकोरीच्या आसपास थोडा डार्क कलर वापरायला हवा होता ?

अंतरा/स्मितागद्रे - कॅलिग्राफी स्टोक्स बद्दल मी थोडे मागे लिहले होते. कॅलिग्राफी करताना किंवा flourishing हस्ताक्षरात लिहताना आपण सहजपणे एका दमात रेषा खेचतो , तसेच झाडाचे खोडं किंवा काही लाईन्स पेंट करताना अगदी थांबत थांबत न काढता येका स्ट्रोक मधे करायचे
स्मितागद्रे- ते चित्र खुप लहान दिसतेय
असामी - आकाश थोडे ग्रेडेड वॉष मधे म्हणजे चंद्रापर्यंत थोडे डार्क आणि नंतर लाइट होतं गेले असते तर चंद्र ऊठुन दिसला असता. आपण कलर आणि टोनल व्ह्यॅल्यु बद्दल कलर थिअरी मधे बोलुया.

धन्यवाद गजानन.
सर झाडे ,फॉलिएज रंगवायला नाही जमत अजून. प्रयत्न केला पण ..ते कसे रंगवायचे ते सांगा.
eimg.jpg

अपलोड फेल का येत असाव? आज दिवसभरात कितिदा प्रयत्न केला. कन्टाळलेय आता. कोणी कारण सा.गू शकेल का?

नमस्कार अजय, आज पहिले चित्र ट्राय केले.

साइझ: ६ बाय ८

bldg.jpg

हवेलीची सावली थोडी गंडलेली वाट्ते. स्ट्रोक व्यवस्तित आले नाहीत.

सन्कुल - सावली अजुन चांगली येउ शकते पण प्रयत्न चांगला आहे. बहुदा शेवटच्या लेखा पर्यंत तुमचा हात बराच तयार होईल , अर्थात प्रॅक्टीस हविच
वॉश देताना ब्रश मधे भरपूर रंग हवा ,ब्रश मधला रंग संपतोय असे वाटत असेल तेव्हा लगेचच ब्रश रंगात बूडुउन वॉश कंटीन्यु व्हायला हवा म्हणजे वॉश चांगला येईल , ब्रश खुप पेपर वर दाबुन रंग मारु नये (त्यामुळे रंग घासल्यासारखा/पुसुन काढलया सारखा इफेक्ट येइल).

01 22022014 - Copy.jpg

हा माझा प्रयत्न.. सहज जमेल असे वाटलेले पण करेपर्यंत अगदी हाश्शहुश्श झाले..
पण बरेच वर्षांनी ब्रश हातात धरुन मात्र भारी मस्त वाटले .. उद्या होमवर्क करणार..
अजय, खूप धन्यवाद हा उपक्रम चालू केल्याबद्दल. Happy

CAM01102.jpg

हा माझा प्रयत्न. तुमचा पुढ्चा लेख आल्यावर टाकत आहे. खूप वर्षांनी ब्रश हातात घेतला. खूप मस्त वाट्लं. पण मनासारखं नाही जमलं. खूप सराव हवा आहे हे कळलं.

हे चित्र पण मस्त...इतकी सुंदर चित्र बघून आपण काढलेली चित्रे इथे पोस्ट करावे की नाही असा विचार मनात येतो आहे.

हे असे वरुन खाली दिसणारे स्ट्रोक्स का आले असावेत? मी अगदी आडवे पट्टे रंगवले होते. रंगवताना पेपर थोडा तिरपा (३० डिग्री कोनात) ठेवला म्हणून असं झालं असेल का? आणि मास्किंग टेप वापरली नव्हती.. बाकी कसं वाटतंय?

नताशा, मी ल्हितच होते, हा असा पावसासारखा ईफेक्ट काय मस्त आलाय म्हणून. Happy तेवढ्यात खालची कमेंट वाचली. (रच्याकने, तुझा एक पक्षी उलटा उडतोय)

नीलु, हिम्सकूल दोघेही एकदम मास्टर दिसताहेत. बाकीच्या सर्वांनी सुंदर काढले आहे. कीप इट अप!!!!!

Pages