प्रकाशचित्र बदलले तरी जुनेच का दिसते?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:05

"माझे सदस्यत्व" किंवा "विचारपूस" मध्ये वापरलेले प्रकाशचित्र बदलले तरी जुनेच प्रकाशचित्र दिसण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे तुमच्या स्वतःच्या Browsers मधे जुन्या प्रकाशचित्राची साठवली गेलेली प्रत. तुम्ही तुमच्या Broswer ची History (cache) काढून टाकली आणि पान ताजेतवाने केले तर हा प्रश्न सुटेल. किंवा खात्री करण्यासाठी दुसर्‍या कुणालाही विचारले तर बदल झाला आहे हे समजेल.

नमस्कार. माझे ओळखचित्र बदलून २ दिवस झाले. History स्वच्छ करून झाली, न्याहाळक(IE) बंद करून परत सुरू करून बघितलं, log out होऊन परत log in होऊन बघितलं, तरी जुनंच ओळखचित्र दिसतंय. कृपया काही मदत करता का?

  • *** Intaxication: Euphoria after getting an income tax refund, which lasts until you realize that it was your money in the first place. ***

एकदा लावलेले चित्र बदलता येत नाही हा प्रॉब्लेम सर्वांनाच आहे. अजून सुटलेला नाही.
(सुटला नाही तर स्वतःचे फोटो ज्यांनी लावलेत ते कायम तसेच (चिरतरुण) दिसतील. ) Light 1
पण सध्याचे चित्र नको असेल तर काढून टाकता येते आहे.

ओक्के मदत_समिती, तुमच्या लक्षात आलेला हे ना तो प्रॉब्लेम्! मग झाल तर!
असेल काही तरी लोचा कोड मधे झालेला, तेवढा काढला की सुधारेल! Happy
आपल्याला काय घाई गडबड नाही, अन त्यावाचून महत्वाचे अडत नाही!

आता नविन टाकलेला फोटो दिसायला लागला हे!
धन्यवाद! Happy

नमस्कार. गेले २ दिवस प्रकाशचित्र बदलायचा प्रयत्न चालु आहे पण बदलतच नाहिय. History स्वच्छ करून झाली, न्याहाळक(IE) बंद करून परत सुरू करून बघितलं, log out होऊन परत log in होऊन बघितलं, तरी जुनंच ओळखचित्र दिसतंय. कृपया काही मदत करता का?

सिग्नेचर अर्थात सिग्नेचर मधे वापरलेल्या प्रोफाईल पिक्चरचे रिपोर्ट्स

...;
आपला, लिम्बुटिम्बु
.
< img src= "/files/imagecache/userpic_thumb/files/pictures/picture-69.gif" />


.
< img src =" /files/imagecache/userpic_large/files/pictures/picture-69.jpg" />

.
ओह ओह, userpic_large व userpic_thumb यात घोळ होतोय बहुतेक! दोन्/तीन आठवड्यापुर्वी लोड केलाय गणपती तो युजरपिक_लार्ज मधे दिस्तोय, तर मागे कधी तरी लोड केलेला बन्दुकवाला युजरपिक्_थम्ब मधे दिस्तोय!

आणि आता हा नविनच यच्टिएमेल ऍड्रेस दिसायला लागला की! (२१/०८/२००८)
ह्या नव्याने टाकलेल्या चित्राची साई़झ लहान होत नाहीसे वाट्टे Sad
< img src = " /files/pictures/picture-69.jpg" />

अस का बर व्हाव???

हेलो. गेले ४ दिवस प्रकाशचित्र बदलायचा प्रयत्न चालु आहे पण बदलतच नाहिय. History स्वच्छ करून झाली, IE बंद करून परत सुरू करून बघितलं, log out होऊन परत log in होऊन बघितलं, तरी जुनंच ओळखचित्र दिसतंय. प्लीज हेल्प

वर्षू, चित्र बदलायला वेळ लागतो कधी कधी.
आधीचं चित्र काढून टाका. मग एकदा ते गेले की नवीन टाकून बघा. १ दिवसात व्हायला पाहिजे.

>>>>> आधीचं चित्र काढून टाका. मग एकदा ते गेले की नवीन टाकून बघा. १ दिवसात व्हायला पाहिजे.
कॉप्म्युटरद्वारे अ‍ॅटोमॅटिक ऐवजी मॅन्युअली करतात का???? मग बरच लौकर होत म्हणायच! Wink

अरे बाबा, ते सगळ करुन बघत नाही अस वाटल का तुला? हे सगळे उपाय करुन बघितले! Happy
आत्ता देखिल माझ्या म्हशिन्चे चित्र जाऊन पैशाचे चित्र नाही ते नाहीच आले! Sad

बराच प्रयत्न करून देखिल नविन छायाचित्र टाकता येत नाहि आहे.

The selected file could not be uploaded. The image is too large; the maximum dimensions are 300X400 pixels.

छायाचित्र 200x200 च आहे. उपाय सा.न्गावा

माझ्या एका व्यंगचित्राबाबत असंच होत होतं. मूळ चित्रात मी केलेला बदल न दाखवता मुळ चित्रच दाखवलं जात होतं. बदललेल्या चित्राला मग नवीन फाईल नाव देऊन मी ते " खाजगी जागे"त अपलोड केलं; मुळ चित्र डिलीट करून तिथे नवीन चित्र "सेंड तू टेक्स्ट एरिया" म्हणून पोस्ट केलं. "खाजगी जागे"तून बदलेलं चित्र पोस्ट करण्यासाठी हा उपाय करून पहावा.

मी माझ्या प्रोफाईलचे ओळखचित्र बदलण्याचा कधीचा प्रयत्न करतेय. का बरे चित्र बदलले जात नाहीये?
नवीन चित्र ब्राऊज करण्यापूर्वी आधीचे चित्र डीलीटणे आवश्यक आहे का? डीलीट करून आणि डीलीट न करता अशा दोन्ही प्रकारे नवे चित्र लावण्याचा प्रयत्न करून झाला, पण व्यर्थ! Sad

I took below steps:
१) माझे सदस्य्त्व मध्ये जाऊन संपादन टॅब वर क्लिक केले. माझे सदस्यत्वाचे डीटेल्स एडीटेबल मोड मध्ये दिसू लागले.
२) Picture Frame मध्ये Delete picture (Check this box to delete your current picture.) चेक बॉक्स वर क्लिक केले आणि पेजच्या खालच्या "save" बटनावर क्लिक केले. "नुकताच केलेला बदल साठवला आहे." असा मेसेज आला व माझे सदस्यत्वाचे डीटेल्स एडीटेबल मोड मध्येच दिसले. Picture Frame मधून आधीचे चित्र गायब झाल्याचे दिसले.
३) Picture Frame मध्ये upload picture area मध्ये डेस्कटॉप वरील हवे ते चित्र ब्राऊज केले (साईज = 39.8 KB, आकार = ५७६ x ४८२ पिक्सेल्स) आणि पेजच्या खालच्या "save" बटनावर क्लिक केले.
"The image was resized to fit within the maximum allowed dimensions of 300x400 pixels.
नुकताच केलेला बदल साठवला आहे." असा मेसेज आला. व माझे सदस्यत्वाचे डीटेल्स एडीटेबल मोड मध्येच दिसले. पण Picture Frame मध्ये नव्या चित्राऐवजी जुनेच चित्र दिसत होते. Uhoh असे कसे??????

History स्वच्छ करून झाली, IE बंद करून परत सुरू करून बघितलं, log out होऊन परत log in होऊन बघितलं, तरी सेम प्रॉब्लेम. Uhoh प्लीज मदत करा.

वर भाऊ नमसकर यांनी दिलेली पद्धत बहुदा सदस्यत्वाचे ओळखचित्र बदलण्यासाठी नसून एखाद्या बीबी वरचे प्रचि बदलण्यासाठी आहे असे वाटतेय.

मला तुझे बदललेले चित्र दिसते आहे. >>>
हो का? Uhoh

निंबुडा, मागल्यावेळेप्रमाणे कॅश/कुकीज उडवल्यास काय? >>> हो! आता मशीन पण रीस्टार्ट करून बघू का? Uhoh

निंबुडा, मागल्यावेळेप्रमाणे कॅश/कुकीज उडवल्यास काय? >>>
परत एक्दा करून पाहिले हे. पण जैसे थे च Uhoh Sad

हे बघा. अजूनही हाच जुना फोटो दिसतोय.

juna photo.JPG

शिवाय अजूनही एक प्रॉब्लेम आहे जो बर्‍याच दिवसांपासून होतोय.
नंद्या, तुम्हाला आठव्त असेल की ८ सप्टें ला मायबोली जवळपास दिवस भर बंद होती. तेव्हा मला मायबोलीचे होम पेज अ‍ॅक्सेस करायला गेल्यास खालील मेसेज दिसत होता.

"Maayboli.com is down due to technical difficulties. We are working on to restore it back to normal.

Sept 08, 2010 08:40 am EDT"

नंतर ९ सप्टें पासून मायबोली चा अ‍ॅक्सेस सगळ्यांना मिळत होता तरीही मला वरचाच मेसेज दिसत होता. (९ सप्टें असूनही मेसेज मध्ये तारीख मात्र ८ सप्टें दिसत होती.)
मग मी अ‍ॅडमिन यांच्या विपूत लिहिल्या प्रमाणे टेढी उंगली (;-) ) चा कन्सेप्ट वापरून मायबोलीवरच्या एका लिखाणाच्या नोडची url टाय केली तर ते पेज ओपन झाले. त्या पेज वर लॉगिन करून मग मला मायबोलीवर विहरता येऊ लागले. त्या दिवसाप्पसून आजतागायत मायबोलीवर लॉगिन करायला हीच पद्धत अमलात आणावी लागत आहे. खालील स्क्रीनशॉट पहाणे. अजूनही http://www.maayboli.com/ असे अ‍ॅड्रेस बार मध्ये टाईप केल्यास तोच सेम ८ सप्टें वाला एरर मेसेज दिसतो. Sad

maayboli_0.JPG

९ सप्टे. पासूनच मी तुमच्या आणि अ‍ॅडमिन यांच्या विपूत नमूद केल्याप्रमाणे पोस्टी टाकताना येत असलेला प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. त्यावर तुम्ही दिलेली ब्राऊजर च्या डीफॉल्ट सेटींग्स सेट करण्याची मात्रा बरोबर लागू पडली. त्यामुळे आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय . पण हा ओळखचित्राचा आणि होम पेज वरच्या एररचा प्रॉब्लेम आहे तसाच आहे. Sad

नंद्या, तुम्हाला माझ्या प्रोफाईल वर कोणते चित्र दिसतेय त्याचा स्क्रीनशॉट देणार काय? प्लीज?

एक सुचवणूक अशी की इंटरनेट एक्स्प्लोररच्या सर्व खिडक्या बंद करा. मग ईंटरनेट एक्स्प्लोररचे जे 'e' असे आयकॉन असते डेस्कटॉपवर, त्यावर राईट-क्लीक करा व प्रॉपर्टिज मेन्यू मधून कॅश आणि कूकीज पूर्णपणे उडवा.
मग परत इंटरनेट एक्स्प्लोर सुरू करून मायबोलीत प्रवेश करा.

याने नाही जमले तर तुम्हाला तुमच्या हेल्प डेस्कला विचारायला हवे.

मला आताच एक साक्षात्कार झालाय.

मी आपली maayboli असा वर्ड बाऊजर च्या अ‍ॅड्रेस बार मध्ये लिहून ctrl + enter असं करत होत्ये. तर http://www.maayboli.com/ अशी यूआरएल हिट होत होती. आणि वरील एरर मेसेज येत होता. आता मी http://maayboli.com/ ही यूआरएल टाय केली तर होम पेज येतंय व्यवस्थित. कमाल आहे. यूआरएल मधला www हटवलाय का आता?? Uhoh

तुमची वरील सूचवणुक पुन्हा टाय केली. no use Sad

याने नाही जमले तर तुम्हाला तुमच्या हेल्प डेस्कला विचारायला हवे. >>> बाप्रे. नको. Sad
मायबोलीचा अ‍ॅक्सेस हिरावून घेतील. Sad

जुना फोटो निघाला, नवा अपलोड होत नाहीए, काय करु?

फोटो अपलोड करा.. १-२ दिवस जाऊ देत. मग चेक करा. फ्गोटो अपलोड झालेला दिसेल.

तुमच्या प्रोफाईलमधले चित्र मला नेहमीपेक्षा निराळे दिसतेय. बहुतेक बदलले गेलेले आहे. ब्राऊजर रीफ्रेश करून पहा.

Pages