अ‍ॅन्ड्रॉईड आणि त्यांचे काही उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स..!!

Submitted by उदयन.. on 8 October, 2011 - 06:54

अ‍ॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अ‍ॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :

super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही.. Happy
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही.. Happy

Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..

sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो

m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..

camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..

flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.

Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.

Battery Doctor - कोणत्या अ‍ॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अ‍ॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.

ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.

Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.

GPS Essentials - GPS Tracking साठी

Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी

Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.

LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]

Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे

PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्‍या करामती...

App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अ‍ॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते

Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अ‍ॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले

पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अ‍ॅप आहे.

fm radio india :- नावाचे एक छान अ‍ॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अ‍ॅप. ट्राय करून पहा

Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अ‍ॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....

TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...

AppLock :- हे लॉक अ‍ॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अ‍ॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अ‍ॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अ‍ॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .

Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अ‍ॅप्लिकेशन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त माहिती. पण हे सापडलं नही म्हणून पुन्हा विचारत आहे.
गाणी किंवा विडियोज डाऊनलोड करायला काही अ‍ॅप आहे का अँड्रॉईडमधे?
शिवाय नोटपॅड सारखं पण ज्यात फोल्डर्स मॅनेज करता येतील असं काही अ‍ॅप्लिकेशन आहे का?

मोबाईल कॉम्प्युटरला जोडला की कॉम्प्युटरचा कीबोर्ड तरी वापरता यायला हवाय, असे करता येते असे ऐकलय, इतकेच नव्हे तर मोबाईल स्क्रिनवरील कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर दिसु लागते. पण त्यासाठी काय वापरायचे माहित नाही.
शिवाय, वायरलेस कीबोर्ड मोबाईल करता वापरता येईल का? शक्य व्हायला हवे ते लॉजिकली, पण खरेच होते का?

मराठी टायपिंग साठी नवीन अ‍ॅप आले आहे.. आयआयटी मध्ये डेव्हलप केलेले आहे...
स्वरचक्र मराठी (swarachakra marathi) असा सर्च करा.. सध्या तरी वापरायला थोडे किचकट वाटते आहे.. पण एकदा सवय झाली की मस्त वाटेल वापरायला.. बहुतेक सगळी अक्षरे कव्हर केली आहेत.. देवनागरी लिपीचा पूर्ण अभ्यास करुन अ‍ॅप डेव्हलप केले आहे...
https://play.google.com/store/apps/details?id=iit.android.swarachakraMar...

हिम्याभाऊ, मिंग्लिश नावाच्या कीबोर्डचा अ‍ॅप मी घेतला आहे त्यात इथे जसे आपण लिहीतो मराठी शब्द इन्ग्रजीमधे स्पेल करत तसेच होते.
माझी अडचण आहे ति अशी की मोबाईल स्क्रिनवर एका बोटाने एकेक अक्षर/कानामात्रा करताचे स्पेल करत इन्ग्रजी अक्षरे धुन्डाळून अचूक त्यावरच बोट ठेवणे व चेपणे हे अत्यंत वेळखाऊ प्रकरण होते आहे. त्या ऐवजी एखादा मोठा कीबोर्ड तात्पुरता मोबाईलला जोडता आला तर किति बहार येईल?
तू सांगितलेले अ‍ॅप वापरुन बघतोच.

ऐवजी एखादा मोठा कीबोर्ड तात्पुरता मोबाईलला जोडता आला तर किति बहार येईल? >>>>>

लिंबुभाउ ....... १००० रुपयात छोटा किबोर्ड येतो ज्यात ब्लुटुथ आणि वायरलेस दोन्ही असतात. तो मोबाईल ला आरामात जोडला जातो... त्यावरुन तुम्ही इथे मायबोलीवर ... जसे कंम्पुटर वरुन टाईपिंग करतात तसेच हुबेहुब टाईप करु शकतात

बाजारात १०००-१५०० च्या आत मिळतो.. चायना मेड सुध्दा आहेत

ऐवजी एखादा मोठा कीबोर्ड तात्पुरता मोबाईलला जोडता आला तर किति बहार येईल? >>>>>
काही मोबाईल OTG compatible असतात.
OTG Cable च्या सहाय्याने किबोर्ड किंवा माऊस मोबाईलला जोडता येतो.

माझ्या प्रश्नाचं उत्तर कुणीतरी दिलं असेल म्हणून आले पण कुणालाच माहित नाही असं दिस्तंय Sad

मला talk (gmail talk) हे app हवेय प्लीज कोणी सांगेल का ह्याबद्दल ?

काही मोबाईल OTG compatible असतात >>>>>माझा मोटो जी आहे Happy त्याला वायरलेस माऊस / किबोर्ड जोडता येतो, पण मी मोबाईलसाठी कधीही टचस्क्रीन किबोर्डच प्रेफर करेन

'10169' हे काय आहे? मला आज शोध लागला आहे की माझ्या फोन मध्ये हे डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात आलं आहे आणि माझ्या सोनी एक्स्पिरिया SD फोनमध्ये त्यापायी भरपूर मोबाईल डेटा आणि वाय-फाय डेटा युसेज होत आहे. अ‍ॅप्समध्ये दिसत नाही. हा व्हायरस आहे का? अ‍ॅव्हास्ट अँटिव्हायरस स्कॅन रन करुन काहीच प्रॉब्लेम दाखवत नाही. इतर कुठलं अँटिव्हायरस टाकावं का?

आत्ता डेटा यूसेजमध्ये नक्की कुठल्या दिवशी ते १०१६९ आलंय ते पाहिलं. नंतर एक अ‍ॅप टेम्पररीली घालून त्यातून त्या दिवशी कुठले अ‍ॅप्स घेतले होते का बघितले. त्यात m-indicator, google keep, flashlight हे अ‍ॅप्स पुतण्याच्या फोनवरुन घेतले होते. ते तीनही अ‍ॅप्स डिलिट केले आणि आता प्ले स्टोअर मधून परत घेतले. आता थोडे दिवस रोज वॉच ठेवते त्याच्या नावावर काही डेटा यूसेज दिसतोय का.

इब्लिस वात्रट Biggrin
अहो ते तसं आकड्याचंच नाव आहे. काल रात्रीपासून अजूनतरी डेटा खाल्ला नाहिये त्याने. गेलं असावं.

पण मी मोबाईलसाठी कधीही टचस्क्रीन किबोर्डच प्रेफर करेन>>>>>> me too.... Happy
माझ्याकडे xolo q700 आहे. मी फक्त pen drive connect करण्यासाठी OTG वापरते.

KanchanKulkarni,

असे सॉफ्टवेर म्हणजे तुम्हाला बेसिकली यूट्यूब डाऊनलोडर हवा आहे.

गूगल प्ले वर यूट्यूबसदृश साईट्सवरील व्हिडिओ ऑडिओ ग्रॅब करणारी काही अ‍ॅप्स उपलब्ध असलीत, तरी गूगल-यूट्यूब यांच्यातील संबंधांमुळे, प्रत्यक्ष यूट्यूबवरून सरळ डाऊनलोड होऊ देईल असे अ‍ॅप प्ले स्टोअरमधे ठेवले जात नाही.

यूट्यूबवरून डालो करण्याची अ‍ॅप्स 'थर्ड पार्टी अ‍ॅप्स' आहेत, व ती त्यात्या डेवलपर्सच्या साईट्सवरून घ्यावी लागतील, एकंदर रिस्की प्रकरण आहे. त्यापेक्षा कॉम्प्युटरवर तुमच्या मालकीची गाणी/व्हिडिओ असतील तेच आपल्या फोनवर कॉपी करा.

download mp3 म्हणून एक अ‍ॅप आहे. त्यांचा हिंदी (ऑडीओ) गाण्यांचा संग्रह चांगला आहे.

एरियल युनिकोड वापरुन बनविलेल्या वर्ड फाईल्स मोबाईलमधे वाचता येत नाहीत. फॉण्ट गार्बेज दिसते. तर एरियल युनिकोड फोनमधे कसा घालावा? स्यामसन्ग ग्र्याण्ड हा फोन आहे.

तसेच, वर्ड/एक्सेल फाइल्स मोबाईलमधे एडिट वगैरे कशाप्रकारे करता येतिल?

@limbutimbu>> वर्ड/एक्सेल फाइल्स मोबाईलमधे एडिट वगैरे कशाप्रकारे करता येतिल?>>> वर्ड/ एक्सेल एडीट करण्यासाठी फाईल क्विक ऑफिसमधे ओपन करा Happy

प्ले-स्टोअरमधे QuizUp म्हणुन ऑनलाईन Quiz-competition खेळण्यासाठी मस्त अ‍ॅप आहे. फेवरेट टॉपिक वर ७ प्रश्न + ऑनलाईन लाईव्ह Opponent बरोबर टाईमपास आणि knowledge gain हे समिकरण मस्त जुळून आलेय. ज्यानां 'KBC' आणि 'अंक-अजुबे' आवडले असेल त्यांनी जरूर ट्राय करा Happy
लिंकः https://play.google.com/store/apps/details?id=com.quizup.core

GO Launcher मधले 1 Launcher 'Firefly GO Launcher' खूप छान आहे. पण apply होतचं नाही. त्यासाठी अजून काही निराकारण apps डाउनलोड करायला लागतायत. Angry

आज गुगल मराठी इन्पुट शोधताना मराठी लिहिण्यासाठी एक अजून छान अॅप सापडलं! Sparsh marathi keyboard (https://play.google.com/store/apps/details?id=com.sparsh.inputmethod.mar...) ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे word predictions आणि dictionary ची सोय आहे ज्यात तुम्ही नवीन शब्दांची भर घालू शकता.

Pages