प्रचिती म्हणींची (नियम) - मराठी भाषा दिवस २०१४

Submitted by संयोजक on 12 February, 2014 - 05:21

आजकाल इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे या म्हणी विस्मॄतीत गेलेल्या असल्या तरी काही वर्षापुर्वी बोलण्यात अश्या म्हणींचा सर्रास वापर होत असे. कमीत कमी शब्दांत नेमकी परिस्थिती मांडणार्‍या या म्हणींच्या उत्पत्तीला एखादी घटना/ कथा कारणीभूत असते. आपल्या आयुष्यातही अश्या घटना घडत असतात जिथे एखादी म्हण अगदी चपखल बसते.

'मराठी भाषा दिवस २०१४'च्या निमित्ताने 'प्रचिती म्हणींची' मध्ये मायबोलीकरांना लिहायचाय कुठल्याही म्हणीवर स्वानुभव किंवा एखादी लघुकथा.

लेखन पाठवण्यासाठी सूचना आणि नियम:

नियम :

१. ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस २०१४' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
२. एक आयडी जास्तीत जास्त ३ कथा / अनुभव लिहू शकतो.
३. लिखाण स्वलिखित आणि संपूर्णपणे अप्रकाशित असावे.

या उपक्रमांतर्गत अनुभव / कथा लिहिण्यासाठी धागा कसा उघडावा याबद्दल काही सूचना :

१. या उपक्रमातील धागे २६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या तीन दिवसांतच काढावेत.

२. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मराठी भाषा दिवस २०१४' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर "सामील व्हा" या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मराठी भाषा दिवस २०१४' या ग्रूपचे सभासद झाला आहात.

३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे "नवीन लेखनाचा धागा" या शब्दांवर टिचकी मारा.

४. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
प्रचिती म्हणींची - मराठी भाषा दिवस २०१४ - स्वतःचा मायबोली आयडी

५. जर एकाच आयडीला एकापेक्षा जास्त अनुभव / कथा लिहायच्या असतील तर विषयात
प्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - स्वतःचा मायबोली आयडी
प्रचिती म्हणींची (२) - मराठी भाषा दिवस २०१४ - स्वतःचा मायबोली आयडी
असे क्रमांक द्यावेत.

६. विषय या बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन मेन्यूमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.

७.. शब्दखुणा या बॉक्समध्ये 'प्रचिती म्हणींची - मराठी भाषा दिवस २०१४' हे शब्द लिहा.

८. मजकूरात आपली प्रवेशिका लिहावी / कॉपी-पेस्ट करावी.

९. नविन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लीक करा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.

१०. Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.

११. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळा धागा उघडण्याइतका मोठा किस्सा नाही आहे म्हणून इथेच लिहीतेय.

गेल्या आठवड्यात लेकीला बरं नव्हतं म्हणून सुट्टी घेऊन घरी होते. दुर्दैवाने आईंना एक छोटासा अपघात झाला.

त्यांना प्रथमोपचार वगैरे करुन झाले. लेक पटकन आजीला म्हणाली "आईची अवस्था दुष्काळात तेरावा महीना" अशी झाली आता.

आजी म्हणे अगं "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" म्हणायचय का तुला?

तर म्हणे "नाही, दुष्काळात तेरावा महीनाच म्हणायचय. मी आजारी म्हणून आईला माझं करावं लागतय आणि आता तू ही पडलीस म्हणून ती म्हण".

"म्हणी" म्हणजे काय ते क्रमिक पुस्तकात अभ्यासाला आल्यामुळे म्हणींची तोंडओळख व्हायला सुरुवात झालेय त्याचा वापर असा चालू असतो घरात अधून मधून.

संयोजक, मस्तच आहे ही कल्पना.

माझी एक सूचना: म्हणींवर आधारीत लेखाच्या नावात म्हण दिली तर वाटते तो लेख जास्त लोक वाचतील असे वाटते

(म्हणजे
प्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - स्वतःचा मायबोली आयडी

अशा शीर्षकापेक्षा
'ये धावत अन् पड फाश्यात' - मायबोली आयडी

असे शीर्षक वाचकाला तो धागा क्लिक करायला भाग पाडेल. Happy )

Pages