प्रचिती म्हणींची (नियम) - मराठी भाषा दिवस २०१४

Submitted by संयोजक on 12 February, 2014 - 05:21

आजकाल इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे या म्हणी विस्मॄतीत गेलेल्या असल्या तरी काही वर्षापुर्वी बोलण्यात अश्या म्हणींचा सर्रास वापर होत असे. कमीत कमी शब्दांत नेमकी परिस्थिती मांडणार्‍या या म्हणींच्या उत्पत्तीला एखादी घटना/ कथा कारणीभूत असते. आपल्या आयुष्यातही अश्या घटना घडत असतात जिथे एखादी म्हण अगदी चपखल बसते.

'मराठी भाषा दिवस २०१४'च्या निमित्ताने 'प्रचिती म्हणींची' मध्ये मायबोलीकरांना लिहायचाय कुठल्याही म्हणीवर स्वानुभव किंवा एखादी लघुकथा.

लेखन पाठवण्यासाठी सूचना आणि नियम:

नियम :

१. ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस २०१४' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
२. एक आयडी जास्तीत जास्त ३ कथा / अनुभव लिहू शकतो.
३. लिखाण स्वलिखित आणि संपूर्णपणे अप्रकाशित असावे.

या उपक्रमांतर्गत अनुभव / कथा लिहिण्यासाठी धागा कसा उघडावा याबद्दल काही सूचना :

१. या उपक्रमातील धागे २६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या तीन दिवसांतच काढावेत.

२. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मराठी भाषा दिवस २०१४' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर "सामील व्हा" या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मराठी भाषा दिवस २०१४' या ग्रूपचे सभासद झाला आहात.

३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे "नवीन लेखनाचा धागा" या शब्दांवर टिचकी मारा.

४. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
प्रचिती म्हणींची - मराठी भाषा दिवस २०१४ - स्वतःचा मायबोली आयडी

५. जर एकाच आयडीला एकापेक्षा जास्त अनुभव / कथा लिहायच्या असतील तर विषयात
प्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - स्वतःचा मायबोली आयडी
प्रचिती म्हणींची (२) - मराठी भाषा दिवस २०१४ - स्वतःचा मायबोली आयडी
असे क्रमांक द्यावेत.

६. विषय या बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन मेन्यूमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.

७.. शब्दखुणा या बॉक्समध्ये 'प्रचिती म्हणींची - मराठी भाषा दिवस २०१४' हे शब्द लिहा.

८. मजकूरात आपली प्रवेशिका लिहावी / कॉपी-पेस्ट करावी.

९. नविन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लीक करा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.

१०. Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.

११. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

हाही उपक्रम मस्त.

< नविन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लीक करा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल>

डिटेलिंगला सलाम.

प्रचीती हवे का?
काही वर्षापुर्वी : वर्षांपूर्वी

प्रचिती ऐवजी प्रचीती असत न, तर मी तर बै कित्ती कित्ती छान लिहल असत सांगू!
('नाचता येईना अंगण वाकडे')

हि एवढी पिल्लूशी एन्ट्री चालते का? Wink Happy

सिमन्तिनी Proud

मस्त आहे हा उपक्रम.. मायबोलीवर म्हणींविषयीचा कार्यक्रम हमखास लोकप्रिय होतो.

सिमन्तिनी | 13 February, 2014 - 09:56 नवीन

प्रचिती ऐवजी प्रचीती असत न, तर मी तर बै कित्ती कित्ती छान लिहल असत सांगू!
('नाचता येईना अंगण वाकडे') <<<

हा प्रतिसाद अनावश्यक वाटला.

दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत!

पूर्वी हे करू, ते करू अशी इच्छा असायची पण नोकरी, मुले यामुळे जमत नव्हते.
आता मुले आपापल्या घरी गेली, नोकरी संपली, पण प्रकृति अशी की काही करू म्हंटले तर उत्साह, शक्ति कमी पडते.

लघुकथा म्हणजे नक्की किती मोठी (किंवा लहान!) अपेक्षित आहे?>>>> मी पुर्वी एका म्हणीवर कथा लिहिली होती. ती पुर्वप्रकाशित असल्याने नियमात बसणार नाही म्हणून इथे देत आहे. कदाचित असे काही अपेक्षित असावे.

बोलू ना बोलू
बोलू तो माँ मार खाये
ना बोलू तो बाप कुत्ता खाये|

ह्या वरच्या म्हणीचा सारांश असा की नवरा एक बोकड आणुन देतो आणि मी परत येईस्तोवर करुन ठेवण्याची आज्ञा करतो. जरा कामाच्या नादात बायको त्याला बांधुन ठेवायचीच विसरते आणि तो पळून जातो. हे तिच्या लक्षात येते तेव्हा खूप शोधाशोध करुन ही तिला तो बोकड काही सापडत नाही. आता प्रश्न की नवर्‍याला काय सांगायचे? तो काहीच ऐकुन घेणार नाही. आपल्याला जिवे मारु शकतो. मग तिला एक कुत्र्याचे पिल्लु दिसते आणि ती त्याचेच जेवण बनवते. हे सगळे मुलाने पाहिलेले असते पण बिचार्‍याची स्थिती अशी असते की सांगू ही शकत नाही आणि गप्प ही बसवत नाही.

बोलू ना बोलू
बोलू तो माँ मार खाये
ना बोलू तो बाप कुत्ता खाये|

.

नलिनी,

आपण इथे म्हणीची उगमकथा लिहिली आहे. पण या उपक्रमात म्हणीवर आधारित कथा अथवा स्वानुभवाची अपेक्षा आहे.

येथे म्हण आपणच निवडायची आहे. आणि त्यावर कथा लिहायची आहे. येथे शब्द्संख्येची मर्यादा नाही.

धन्यवाद.

जर लिखाण आधी ओळखीच्या व्यक्तींना इमेल केले असेल तर ते प्रकाशित मानायचे की अप्रकाशित?

जिज्ञासा, जर मायबोलीवर सार्वजनिक रित्या प्रकाशित केले नसेल तर ते लिखाण अप्रकाशित मानायला हरकत नाही.

सेव केले कि सगळ्यांना दिसायला लागेल ना..

मला एका वेळेस बसुन लिहिता येणार नाही. दिवसभर इतर कामे करताना जसे सुचेल तसे लिहिणार आहे पण मग लिहिलेले वर्ड मध्ये कॉपी पेस्ट करुन सेव करावे लागेल.

(कधीतरी आधी आपण लिहिलेले अर्धवट सेव करुन ठेवायची सोय होती इथे, नंतर अपग्रेडमध्ये बंद झाली, चालु करा ना परत....)

ऑफिसात बरहा व. नाहीय त्यामुळे मराठी लिहिण्यासाठी मी माबोच वापरते, फक्त सेव न करण्याची काळजी घेते. Happy

Pages