Submitted by dr.sunil_ahirrao on 21 February, 2014 - 03:38
'पालखी'
कुणी मोल केले, कुणी मापले
भल्या भाविकाने तुला कापले
घडावीत रांगेतुनी दर्शने
जरी चोरट्याने खिसे नापले
उठे ही सुखाची तुझी पालखी
उरे भर्जरी दुःख आपापले
तुझी आसवे लागली सार्थकी
तुझे त्याग नोटांवरी छापले
नसे आज चिंता तुझी जीवना
पहा दुःख हे छानसे रापले !
डॉँ.सुनील अहिरराव
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुझी आसवे लागली सार्थकी तुझे
तुझी आसवे लागली सार्थकी
तुझे त्याग नोटांवरी छापले<<<
वा
@बेफिकीर, धन्यवाद !
@बेफिकीर, धन्यवाद !
वाह!
वाह!
उठे ही सुखाची तुझी पालखी उरे
उठे ही सुखाची तुझी पालखी
उरे भर्जरी दुःख आपापले
>>
व्वा!!!
धन्यवाद
गझल आवडली. मत्ल्यावरून माझा
गझल आवडली.
मत्ल्यावरून माझा एक शेर आठवला.
सोय देव ठरवून आपली पोळी शेका
पिढ्यापिढ्यांची परंपरा राखाल तुम्हीही
धन्यवाद.
आवडली
आवडली
मस्तच!!
मस्तच!!
@वैभव वसंतराव, जयदीप, समीर
@वैभव वसंतराव, जयदीप, समीर चव्हाण, अरविंद चौधरी शाम, खूप खूप आभार !
सुर्रेखच ....
सुर्रेखच ....
धन्यवाद, पुरंदरे शशांक !
धन्यवाद, पुरंदरे शशांक !