अ‍ॅन्ड्रॉईड आणि त्यांचे काही उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स..!!

Submitted by उदयन.. on 8 October, 2011 - 06:54

अ‍ॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अ‍ॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :

super security beta 1.23 ;- हा अँटीवायरस प्रोग्राम आहे... स्कॅन करतो..मेलवेअर, हायरिस्क app. कोणती आहेत हे सुध्दा सांगतो..तसेच त्यात एक स्ट्राँगबॉक्स म्हणुन आहे त्यात आपन पासवर्ड वापरुन आपले फोटो विडिओ एसएमएस साठवु शकतो..मुख्य म्हणजे जे काही आपण यात टाकले ते बाहेर गॅलरीत दिसत नाही.. Happy
आणि जो पासवर्ड असतो तो आपल्या इमेल वर मेल म्हणुन येतो..म्हणजे विसरलात तरी प्रोब्लेम नाही.. Happy

Android assistant :- app. अनइन्स्टोल करणे.. फोन मेमरी मोकळी करणे. cache cleaner Volume control इत्यादी यात सहज पणे करता येते file manager सुध्दा यात आहे जो आपल्याला फोन मधे उपलब्ध नसतो..

sms blocker :- हा अत्यंत उपयोगी app. आहे... आपल्याला नको असलेले नंबरांवरुन जे मेसेज येतात त्यांचा नंबर यात टाकला की आपल्याला त्यावरुन मेसेज येतच नाहीत हा app. ते ब्लॉक करुन टाकतो

m-indicator :- आपल्याला लोकल्स ट्रेन किती वाजता ची आहे हे कळण्यासाठी उपयोगी आहे..त्याच बरोबर यात बस चे नंबर सुध्दा आहे त्याचे रस्ते सुध्दा कळतात.. मेगा ब्लॉक्स ची माहीती मेसेज वरुन आपल्याला कळते..

camscanner :- कागद पत्रांचे पीडीफ मधे रुपांतर यात करु शकतात... जर आपल्या कडे स्कॅनर नाही तर आपण कागद समोर ठेउन त्याच्या या app. ने फोटो काढायचा आणि तो मस्त पैकी साफसुफ करुन हा पीडीफ स्वरुपात आपल्या समोर ठेवतो.. अतिशय स्पष्ट लिहिलेले दिसते यातुन..

flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.

Net Counter - नेट वापरताना किती डेटा वापर होतो याची नोंद मिळते.

Battery Doctor - कोणत्या अ‍ॅप साठी बॅटरी जास्त वापरली जाते हे कळते. त्यानुसार ते अ‍ॅप बंद करता येतात. पर्यायाने बॅटरी लाईफ वाढवता येते.

ES File Explorer - file/folder management साठी उत्तम.

Go Launcher - सुंदर UI Themes. ह्याच्या स्वतःच्या Themes छान आहेत. एक iPhone सारखी Theme पण आहे.

GPS Essentials - GPS Tracking साठी

Indian Rail - Online inquiry / train timings / seat availability साठी

Offline Dictionary - ह्यात Dictionary बरोबर language translation पण आहे - ते सुद्धा offline. पण मोठ्या-मोठ्या database files एकदा(च) download कराव्या लागतात.

LBE Privacy Guard - हा firewall चे काम करतो. [पण ह्यासाठी root access हवा.]

Photo Tools by hcpl: विविध छायाचित्रणासंबंधी गणकयंत्रे

PhotoFunia: छायाचित्रणासाठी व नंतर प्रोसेसिंग साठी लागणार्‍या करामती...

App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अ‍ॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते

Photo Art - Color Effects = मस्त आहे हे.....अ‍ॅप्लिकेशन...एक विशिष्ट रंग कायम ठेवुन बाकीचे रंग रंगविरहित करता येतात फोटो मधले

पॉवरलाईन : २ (चकटफू व्हर्जन) किंवा अधिक (१.५ $ला) गोष्टी आडवी रेघ वापरून दाखवते. जसे की बॅटरी, सीपीयू वर्कलोड वगैरे. साधे, अवाजवी जागा न व्यापणारे असे अ‍ॅप आहे.

fm radio india :- नावाचे एक छान अ‍ॅप आहे ऑनलाइन रेडिओ ऐकण्यासाठी. भरपूर चॅनेल्स आहेत रेडिओची त्यावर. एक मराठी गाण्यांचेही चॅनेल आहे. मला आवडलं अ‍ॅप. ट्राय करून पहा

Stuck on Earth :- भटक्यांसाठी बेस्ट अ‍ॅप....यात तूम्हि तूमची ट्रीप प्लॅन करु शकतात....तिठल्या ठिकाणांचे लोकांनी काढलेले फोटो पाहू शकतात आणि बरच काही....

TripAdvisor :-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फ्लईट्स, Things to do in city...

AppLock :- हे लॉक अ‍ॅप्लिकेशन आहे......यात तुम्ही हवे ते अ‍ॅप्लिकेशन, मेस्सेज, जीमेल व्हॉट्सप्प आणि इतर अ‍ॅप्लिकेशन लॉक करु शकतात... यात पासवर्ड ची सुविधा आहे..... अ‍ॅप्लिकेशन ओपन करताना पासवर्ड ची गरज लागते .

Distance calculator:- आपण किती चाललो याचा हिशोब ठेवणारे अ‍ॅप्लिकेशन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे साऊंड रेकॉर्डर म्हणून फोनबरोबरच आलेले अ‍ॅप आहे आणि कार्बनचा टायटॅनियम एस ५ फोन आहे. ह्यावर काहीही रेकॉर्ड केले की ती फाईल नंबर म्हणून आपोआप सेव्ह होते. नंतर ऑडियो लिस्टमध्ये जाऊन किंवा म्युझिकमध्ये जाऊन ती गाणी ऐकता येतात.
प्रश्न असा आहे की ती नंबर फाईल आपल्याला हव्या त्या नावाने परत सेव्ह कशी करायची ?

पूर्वी रेकॉर्ड केलेली दोन गाणी आहेत जी मी हवे ते शीर्षक देऊन सेव्ह केलेली आहेत पण त्यावेळीही पद्धत अगदी लगेच सापडेल अशी नव्हती हे आठवत आहे. त्यावेळी ती पद्धत कुठेतरी नोट न करुन ठेवल्याचा आता पश्चाताप होत आहे Sad

रश्न असा आहे की ती नंबर फाईल आपल्याला हव्या त्या नावाने परत सेव्ह कशी करायची ? >>

तो फोन लॅपटॉपला कनेक्ट कर. मग तिथे एक नविन डिस्क दिसेल. त्यावरून एक्सप्लोरर सारखे एडीट, कट, पेस्ट इत्यादी इत्यादी करता येईल. साऊंड नावाचे किंवा म्युझिक नावाचे फोल्डर बघ. किंवा ज्या नावाने सध्या आहे त्या नावाने सर्च कर. तिथे फाईल मिळेल.

प्रश्न असा आहे की ती नंबर फाईल आपल्याला हव्या त्या नावाने परत सेव्ह कशी करायची ?
<<
माय फाईल्स मधे जा.
किंवा या नावासारख्या कोणत्याही फाइल ब्राऊजर मधे.
त्यात ती फाईल शोधून काढा. तिच्या नावावर जरावेळ बोट धरून ठेवा. (लाँग क्लिक) याने एक कॉण्तेक्स्ट मेन्यु ओपन होईल
ऑप्शन्स मधे बहुदा रीनेम असा ऑप्शन येईल.
रिनेम करा.

अर्रे इब्लिस, धन्यवाद !!! गेल्या वेळी हेच केले होते आणि आज आठवत नव्हते. file browser मध्ये जाऊन लगेच सेव्ह केली फाईल. audio list मध्ये फक्त डिलिट करायचा आणि music मध्ये गेल्यास डिलीट, रिंगटोन सेट करणे इत्यादी पर्याय मिळतात पण रिनेमचा फक्त फाईल ब्राऊझर मध्येच आहे.

Shopular - डिल्स अ‍ॅप... जीपीस लोकेशन वरुन जवळपासच्या दूकानांच्या डिल्स सांगतो.... मॉल मध्ये गेल्यास त्या मॉल मधल्या डिल्स पॉप अप होतात...मला स्वताला ३-४ वेळा फायदा झालाय... भारतात चालेल का नाही हे माहीत नाही !!

Galaxy S वर मराठी फॉन्ट कसे इन्स्टॉल करायचे ? ओपेरा शिवाय.. मराठी दिसत नाही एसेमेस चौकोन दिसतात. कुणी सांगू शकेल का ?

सेटींग्ज मधे जाऊन शेवटच्या ऑप्शनमधे शोधा. अँड्रॉईड व्हर्जन कोणती आहे @ डॅफोडिल्स.
त्यानंतर मदत करण्याचा प्रयत्न करतो.
हाच आहे का?

खुशखबर!

https://play.google.com/store/apps/details?id=com.sygic.aura_mmi

सिजिक व मॅप माय इंडिया यांनी कोलॅबोरेशनमधे लाँच केलेले हे अ‍ॅप, सध्या फक्त भारतात व भारताच्या नकाशांपुरते, फु क ट उपलब्ध आहे.
पूर्वी याला ३०० रुपये लागत, भविष्यात पुन्हा पेड करतील. टॉमटॉमने त्यांचे अ‍ॅप २,०५० ला उपलब्ध केलेले आहे, त्याच्या काँपिटिशनला हे मार्केट प्रेझेन्स एस्टॅब्लिश करणे सुरू आहे.
सिजिक या प्रकारच्या अ‍ॅप्स मधली जागतिक स्तरावरची जानीमानी कंपनी आहे.
छोट्या गावातही माझा या अ‍ॅपचा अनुभव चांगला आहे.

अरे हो!
ये है क्या चीज? ते सांगायचे राहिलेच.
तर हे ऑफलाईन नॅव्हिगेशन अ‍ॅप आहे. पूर्ण भारताचे नकाशे डाऊनलोड केलेत तर सुमारे दीड जीबी डेटा होईल. यात शुद्ध मराठीतही नॅव्हिगेशन इन्स्ट्रक्शन मिळतात. ऑफलाईन असल्याने डेटा कनेक्शन (फोनवरची इंटरनेट) नसली तरीही व्यवस्थीत चालते. जीपीएस मोड ऑन असला की झाले.

इब्लिस +१. माझ्या बर्‍याच मित्रांनी वापरलं हे. खुप आवडलं सगळ्यांना. फक्त एकदा मॅप डाऊनलोड केला की झालं.

आम्ही ऑफिसमध्ये असताना घरात काय चालले आहे ते पहाण्यासाठी एक अँड्रॉइड फोन व एक आयपॅड (अथवा दोन अँड्रॉइड फोन) व लॅपटॉप वापरून काही करणे शक्य आहे का? घरात एका अगदी वृद्ध व्यक्तीसोबत एक केअरटेकर ठेउन जायचे आहे.

दोन अँड्रॉईड फोन वापरून करता येते.

दोन्ही ठिकाणी इंटरनेटचे शक्यतो वायफाय कनेक्शन असणे गरजेचे आहे. एकादा जुना अँड्रॉईड फोन (बेसिक २.२ ऑनवर्ड्स) प्लस कॉम्प्युटर वा अँड्रॉईड टॅब वापरून जमेल.

आयपीकॅम नावाचे सॉफ्टवेअर असते. त्याचे अल्टरनेटिव्ह व कसे करायचे इ. डिटेल्स थोडा वेळ मिळाला की लिहितो.
(ता.क. : विसरलो तर विपुमध्ये रिमाईंड करणे. धन्यवाद.)

ओके.

हे घ्या:

https://play.google.com/store/apps/details?id=com.warden.cam

दोन अँड्रॉईड फोन्स वर हे इन्स्टॉल करा. एकाच जीमेल अकाउंटवर दोन्ही डिव्हाईसवर लॉगिन करा, एकास कॅमेरा व दुसर्‍यास व्ह्यूअर म्हणून सिलेक्ट करा.

तात्काळ व कोणत्याही झिगझिगीविना सुरू होईल. मात्र यात फक्त टोटल २४ तास पहाण्याची सोय आहे. त्यानंतर ते अ‍ॅप विकत घ्यावे लागेल. सुमारे ३६५ रुपये. (डेव्हलपर याला एका कॉफीची किम्मत म्हणतो. फॉरेनला कॉफी इतकी महाग असते? Sad )

***

पैसे खर्चायचे नसतील, तर https://play.google.com/store/apps/details?id=com.pas.webcam हे वापरा
सेम वायफाय कँपस असेल, उदा तुमच्याच घरात दुसर्‍या खोलीत काय चालले आहे ते पहाण्यासाठी, तर हे सोपे आहे. हापिसातून घरात पहाण्यासाठी स्टॅटिक आयपी जनरेशन व पोर्ट फॉर्वर्डिंग नामक प्रकरणाचा अभ्यास शक्यतो कुणा नेटवर्क सॅव्ही माणसाच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली करावा.

-Android
-more than 8mp camera
-1 GB RAM
-branded
असा घ्यायचा विचार / मनसुबा आहे....सजेशन्स आहेत का काही?

सविस्तर प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद इब्लिस. मी आजच करुन पहाते. डेवलपरने केलेल्या कामासाठी मोबदला म्हणून पैसे चार्ज करणे ठीकच आहे की. Happy

PhotFluent: छायाचित्रणासाठी नवनव्या कल्पना आणि मार्गदर्शन देणारी माहीती.>>>>

मी हे अ‍ॅप शोधायचा प्रयत्न केला पण मला ते सापडत नाही. मला कोणी दुवा देउ शकेल काय ?
माझ्याकडे picsart आहे.फोटोज प्रोसेसिंगला मस्त आहे.

गुगल ट्रान्स्लेट च अ‍ॅप पण मस्त आहे. कोणत्याही ईंग्रजी शब्दाला स्थानिक भाषेतला शब्द आणि त्याचा उच्चार दाखवते. मला उठ्सुठ देशाच्या कानाकोपर्‍यात फिरताना उपयोगी पडते. एखादे अखंड वाक्य टाकले तरी त्याचे भाषांतर करुन मिळते. त्यात स्कॅनर पण आहे. समोर असलेला पेपर किंवा फोटो स्कॅन करुन त्याचाही अर्थ सांगते.

मराठी ग्रंथालय Marathi books पण छान आहे. ऑफलाईन पण वापरता येते. अभंग, स्तोत्रे आणि संत साहित्य विभाग तर अतिशय सुंदर आहे.

शिवाय मला मराठी, ईंग्रजी बातम्या साठी एखादे अ‍ॅप हवे आहे. सकाळचे अ‍ॅप आहे, पण ते फार विस्कळीत आहे. मी काल डाउनलोड केले पण त्यात पार १६ डिसेंबरच्या बातम्या दाखवत आहे. कोणाला असे अ‍ॅप माहित आहे का ज्यात मला मराठी आणि ईंग्रजी बातम्या वाचता येतील. एकत्र किंवा वेगवेगळे कसे ही चालेल.

flashlight :- आपल्या मोबाइल चा टोर्च म्हणुन उपयोग करण्यासाठी हा app. वापरात येतो.. लाइट कमी जास्त करन्याची सुध्दा सोय आहे यात.>>>>>>>>

App 2 SD (move app to SD);- आपले फोन मधले अ‍ॅप्लिकेशन्स मेमरी कार्ड मधे जमा करते त्या मुळे फोन मेमरी फ्री राहते आणि जास्त जागा मोकळी राहाते>>>>>>>

माझ्या फोन मधे (samsung gaalxy core) हे दोन्ही functions inbuilt आहेत. सॅमसंगच्या बाकी मॉडेल्स मधे नाहीतेय का?

ईब्लिसजी, धन्यवाद Proud

अख्खं श्रीगुरुचरित्र पण आहे :-P. मी केलंय डाऊनलोड. मस्त मोठा फाँट आहे त्यामुळे हलत्या ट्रेनमध्ये उभ्याउभ्यापण वाचता येतात अध्याय Happy

उदयन, मी टाइम्स ऑफ ईंडिया चे करणार होतो पण त्यात रिव्ह्युज मधे एकाने लिहिले आहे कि त्या अ‍ॅप्स मधे स्पेलिंग च्या चुका खुप आहेत. आणि मला मुख्यतः शब्दसंग्रह वाढवायलाच ते अ‍ॅप हवं आहे, म्हणून नाहि केले. महत्वाच्या आणि खळबळजनक बातम्या माबो वर समजतातच.
तुम्ही वापरले आहे का ? कसे आहे?

जाई धन्यवाद द हिंदू चे रिव्ह्युज वाचुन पहातो

Pages