दिल्लीतील सत्तापालट म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात?
अपेक्षेप्रमाणे दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होऊन अरविंद केजरीवालांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्याचबरोबर विधानसभेच्या त्रिशंकू स्थितीमुळे दिल्लीत नव्याने निवडणुका होण्याची शक्यता काही काळापुरती का होईना पण संपल्याचे संकेत मिळत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगले संकेत मानायला हवे. बदलती राजकीय स्थिती आणि प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव यामुळे देशात वारंवार त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणे आता यापुढे नित्याचेच ठरणार आहे. त्यावर वारंवार निवडणुका हा काही पर्याय असू शकत नाही. विभिन्न विचाराचे आणि प्रचंड राजकीय वैचारिक विरोधाभास असला तरी काही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे, हाच यावर एकमेव इलाज आहे. अशा बिकट प्रसंगी जर अपरिहार्यतेने विरोधाभासी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत असेल तर याला संधीसाधूपणा म्हणता येणार नाही.
केजरीवाल मुख्यमंत्री झाल्याने आता त्यांना जनतेला दिलेले महागाई व कांद्याचे भाव वगळता अन्य अभिवचन पूर्ण करणे फारसे कठीण नाही, कदाचित शंभर टक्के यश मिळणार नाही पण एक पारदर्शक आणि "लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य" असे म्हणण्याइतपत चांगले सरकार ते नक्कीच देऊ शकतात. त्यामुळे लोकाभिमुख राज्यकारभाराचा एक अत्यंत चांगला पायंडा पडण्यास सुरुवात होण्याची नक्कीच शक्यता आहे.
मला अरविंद केजरीवालांच्या वागण्याच्या पद्धतीत, बोलण्यातील ढबीत आणि पेहरावाच्या स्टाइलमध्ये एक "महात्मा" दिसत होता. ही त्यांची नौटंकी की निसर्गदत्त गुणविषेशता हे काळाच्या ओघात स्पष्ट होईलच. पण सध्यातरी माझा भ्रमनिरासच झाला आहे कारण सत्तेच्या माध्यमातून लोकनेता होणे आजवर कुणालाच शक्य झाले नाही. केजरीवालांना शक्य होईल, हेही शक्य वाटत नाही त्यामुळे आता ’महात्मा’ व ’युगपुरुष’ होण्याची त्यांनी संधी गमावलीच आहे. मात्र त्यांना चांगला ’राजकारणी’ होता आले तर ती भारतीय लोकशाहीला कलाटणी देण्याची लोकाभिमुख सुरुवात ठरेल.
केजरीवाल उत्साही आहे, मेहनती आहे आणि विषय समजून घेण्यासाठी अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे. सोबत साधी राहणी आणि निर्धोकपणा या त्यांच्या जमेच्या बाजू आहे. देश घडवण्यासाठी लागणारी कळकळ आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी परिणामास सामोरे जाण्याची तयारी आहे. मात्र त्यांचा धूर्तपणा यात सर्वात मोठा अडसर ठरेल असे मला वाटते. दिनांक १७/१२/२०१३ च्या फेसबुकवरील एका पोस्टमध्ये मी असे म्हटले होते की, "कोणाचा पाठिंबा घेणार नाही, कोणाला पाठिंबा देणार नाही" या डावपेचामागे भाजपाला सत्तेपासून अडवणे आणि विधानसभेच्या त्रिशंकू अवस्थेचे सर्व सूत्र संचलन आपल्या हातात घेणे, हा उद्देश केजरीवालांचा आहे, आणि नेमके तेच आज ते खरे झाले आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर
’आप’ला २८ जागा मिळाल्याने देशातील जनतेच्या आशा पालवल्या होत्या. अरविंद केजरीवालांच्या रूपाने एक प्रामाणिक नेता देशाला मिळाल्याची भावना व्यक्त व्हायला लागली होती. दिल्लीतून सुसाट निघालेला अश्वमेघाचा घोडा आता भारताच्या खेड्यापाड्यापर्यंत घोडदौड करून भारतीय राजकारणाला एक खंबीर आणि स्वच्छ पर्याय उपलब्ध करून देईल, अशी शक्यता निर्माण व्हायला लागली होती. मात्र त्रिशंकू विधानसभेतून सत्तेचा मार्ग शोधण्यात केजरीवालांनी धूर्तपणाच्या ज्या तिरक्या चाली खेळल्यात, त्या चाली आणि कॉग्रेस व भाजपाच्या मुत्सद्देगिरीच्या तुलनेत धूर्तपणाच्या होत्या, यात मुत्सद्देगिरी खचितच नव्हती. त्रिशंकू विधानसभेत "आप" निर्णायक स्थितीत असताना आणि सरकार स्थापनेचे भवितव्य ’आप’च्या हातात एकवटले असताना ’आप’ची ही भूमिका लोकशाहीला पोषक नव्हती. आपची ही भूमिका प्रामाणिकपणाची नव्हती तर भाजपला रोखून स्वतःचे सरकार स्थापन करण्यायोग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी खेळलेली ’आप’मतलबी व धूर्तपणाची खेळी होती, असे माझे स्पष्ट मत आहे.
निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वात जास्त जागा जिंकून दिल्ली विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला होता. प्रचलित व्याख्येनुसार जनादेश भाजपला मिळालेला होता. भाजपने सरकार स्थापन करणे व इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा देणे, हा सरळसोपा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग होता. मात्र कॉग्रेसच्या मुत्सद्देगिरीने आणि केजरीवालांच्या धूर्तपणाने हा डाव उधळला गेला. याच कारणाने माझ्या नजरेत केजरीवालांचा प्रामाणिकपणा संशयाच्या भोवर्यात आला आहे. पण एवढ्याशा कारणाने त्यांच्या डोक्यावरील गांधीटोपीला गालबोट लागले, असे काही म्हणता येणार नाही. त्यांच्या डोक्यावर गांधीटोपी काँग्रेसवाल्यांच्या डोक्यावरील टोपीपेक्षा जास्त उठावून दिसते, हे सुद्धा तेवढेच खरे आहे.
केजरीवालांना आणि भारतीय शोषित जनतेला अपेक्षित असलेले व्यवस्था परिवर्तन सत्ताप्राप्तीतून साध्य होण्याची शक्यता नाही. तरीही केजरीवाल सत्तेच्या मैदानात उतरले. आता सत्तेतूनही व्यवस्था परिवर्तन साध्य होऊ शकते हे सिद्ध करण्याची जबाबदारी केजरीवालांची आहे. नाहीतर भारतीय जनतेचा परिवर्तनवादी चळवळीवरीलच विश्वास डळमळीत होईल.
सध्या देशात भ्रष्टाचारविरोधी वातावरण तापवण्यात केजरीवालांना आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला आल्यामुळे देशासमोरील एकमेव समस्या म्हणजे भ्रष्टाचार असे चित्र निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. या गदारोळात शेतमालाच्या भावाचा प्रश्न पार मागे ढकलला गेला आहे. तरीपण सध्यातरी देशात केजरीवाल वगळता राष्ट्रीय पातळीवर दुसरा कोणताही अन्य आशेचा किरण उपलब्ध नाही, त्यामुळे परिवर्तनवादी घटकांनी अरविंद केजरीवालांना सक्रिय समर्थन देण्याची सक्त गरज निर्माण झाली आहे. ही ऐतिहासिक संधी आपण गमावता कामा नये.
महाराष्ट्रात आम आदमी पक्ष, शेतकरी संघटना, विदर्भ संयुक्त कृती समिती, काही रिपब्लिकन पक्ष व आणखी काही संघटना एकत्र आल्यास राज्यात एक ताकदवान दबावगट निर्माण होऊन व्यवस्था-परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकले जाऊ शकते, एवढी मला नक्कीच खात्री आहे.
- गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------------
मुळात लेखकु या आयडीकडून
मुळात लेखकु या आयडीकडून कुणाच्याच अपेक्षा नाहीत.
एकीकडे आंदोलनाचे फॉरवर्ड्स पाठवायचे आणि एकीकडे लबाडी करायची..
जसं काही आमचं फार मोठं भांडण आहे.
तुम्हाला जर असं काही वाटत असेल कि ही साईट तुमची आहे आणि तुम्हाला हवं तसंच इथं लिहीलं गेलं पाहीजे तर सांगा स्पष्ट.
तुम्ही जितक्या रोखठोक लिहाल तितकंच आंम्हीही लिहू.
आम्हाला बंदी असल्यास कळवणे.
दोन व्यक्तीतलं भांडण हा एक
दोन व्यक्तीतलं भांडण हा एक किरकोळ भाग आहे. माझ्यासाठी लेखकु वगैरे लोक फार महत्वाचे नाहीत.
पण ढोंग घेऊन कुणी नेतेगिरी करून समाजाला शेंड्या लावायचा प्रयत्न करतंय का हा गंभीर प्रश्न आहे.
तुम्ही जेव्हां सार्वजनिक जीवनात उतरता तेव्हां मुखवटे फेकून द्या. एव्हढंच.
(No subject)
काळजी करू नका. मागच्या
काळजी करू नका.
मागच्या आंदोलनाच्या वेळच्या लिंका सापडल्या कि इथं ओतून जाईन.
मला या प्रश्नांची उत्तरं हवी
मला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत.
१. सामाजिक कारणासाठी आंदोलन करत असताना केजरीवाल आणि अण्णा यांच्यात मतभेद का व्हावेत ?
२. जनलोकपालच्या श्रेयावरून दोघांमधे कलगीतुरे का झडावेत ?
३. केजरीवाल आजारी असताना दिल्लीत सर्वत्र टीव्हीवर दिसले तशा बातम्याही आल्या, मग राळेगणसिद्धीला जाणार असं जाहीर करून का गेले नाहीत ?
४. केजरीवालांनी सांगितलं कि सरकारने पास केलेलं बिल हे जोकपाल आहे, यात उंदीर पण अडकणार नाही तर अण्णा म्हणाले कि यात उंदीरच काय सिंह सुद्धा अडकेल.
५. जेव्हां अण्णांचं आंदोलन चालू होतं तेव्हां याच मसुद्यावरून मतभेद होते , याचसाठी देशाला आणि संसदेला वेठीस धरलं होतं, तर मग त्याच बिलाला अण्णांनी का मान्यता दिली ?
६. केजरीवाल म्हणाले कि कुणीतरी अण्णांचे कान भरतंय - अण्णांचे कान भरणं शक्य आहे हे त्यांना कसं काय माहीत ?
मंदार जोशी उर्फ ठो उर्फ
मंदार जोशी उर्फ ठो उर्फ गप्पीष्ट किंवा अन्य कुठल्या नावाने आपण कार्यरत असाल तर...
आपला फोन आणि मेसेज आले त्यावेळी औंधात ट्रॅफिकशी झगडत होतो. असाही वेळ असता तरी घेण्याबाबत विचार केला असता. सध्या तरी आपला संदर्भ माबोवरील एक आयडी (अनेक रुपात असलात तरी एकच :)) एवढाच असून वैयक्तिकरित्या कसलाही संवाद करण्याची इच्छा नाही. कर्टसी तर त्याहून नाही. त्यामुळे यापुढील सर्व संवादांना असेच फाट्यावर मारण्यात येईल. सुशिक्षित आणि सुसंस्कृत नाही म्हणवून घेतलो गेलो तरी चालेल पण आहोत हे असेच आहोत. तुमच्याप्रमाणेच आम्हीही बदलण्याची सुतराम शक्यता नाही.
तेव्हा आमचे कळकळचे शब्द आपल्यापर्यंत पोचले असावेत अशी आशा आहे.
(ता.क)
हे वैयक्तिकरित्या देखील कळवता येऊ शकले असते असा पुन्हा मेसेज आल्यास त्याला उत्तर
हो येऊ शकले असते पण मुद्दामच केले नाही. सगळ्या गोष्टी झाकून ठेवण्याची आपली इच्छा अशी खुलेआम उधळून लावताना आसुरी आनंद होतो आम्हास...पुढे...:)
रच्याकने, ही पोस्ट डिलीट करणे आपणास शक्य नाही, त्यामुळे अॅडमिनकडे गार्हाणे घालून तेवढे करावे ही नम्र विनंती...
(तसे कराल अशी खात्री आहे...कृपया अपेक्षेस खरे उतरावे)
बाप रे!
बाप रे!
हेलो कसल युद्ध चालू आहे इकडे
हेलो कसल युद्ध चालू आहे इकडे ??
बेफ़िकीर | 30 December, 2013
बेफ़िकीर | 30 December, 2013 - 20:59
बाप रे!
<<
~स्मित~
नका घाबरू हो! जे चाल्लंय, त्याला नॅचरल कोर्स ऑफ इव्हेंट्स असे म्हणतात.
म हा न गमती दिसताहेत सध्या माबोवर.
सुसंस्कृत आणि साजूक तुपातल्या
सुसंस्कृत आणि साजूक तुपातल्या आयडींसारखं बोलताय अगदी इब्लीस ! अभिमान वाटतोय.
देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे
देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे हे ही खरं आहे. म्हणून आपच्या निमित्ताने त्याला चाप बसत असेल तर त्यांना या सर्व गोष्टी नजरेआड करून मदतच करू. पण भ्रष्टाचाराच्या मोहीमेत खालील गोष्टींचाही समावेश असला पाहीजे.
१. पक्षांना होणारे फंडींग आणि ज्यांच्याकडून फंडींग होते त्यांना मिळालेली सरकारी कामे आणि ठेके, भूखंड, सवलती इ.
२. पक्षांकडून राबवले जाणारे महागडे कार्यक्रम आणि त्यासाठी येणारा निधी.
३. पक्षांचा महागडा प्रचार कार्यक्रम
४. खाजगी वाहीन्यांवर निवडकच पक्षाच्या लोकांना दिल्या जाणा-या प्रसिद्धीचा खर्च. ( इतर पक्षांनी मात्र निवडणूक आयोगाला दूरदर्शनवर आम्हाला वेळ द्या म्हणून रडत बसायचं ).
लोकशाही असली तर अशी असावी. हमारा हाथ भी आपके साथ !
माळ्याची मका आणि कोल्ह्याची
माळ्याची मका आणि कोल्ह्याची भांडणं...............::हहगलो:
धागा काढताना मुहूर्त चुकला
धागा काढताना मुहूर्त चुकला बहुतेक.
(नव्या कायद्याचा दुष्परिणाम)
हिंदू महासभेचे संस्थापक पं.
हिंदू महासभेचे संस्थापक पं. मदन मोहन मालवीय होते. पण त्यांना काँग्रेसच्या अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी मदत केली. हिंदू महासभा आणि कोंग्रेस यांचे संबंध सकृतदर्शनी ताणलेले दिसतात. पण मग काँग्रेसच्या नेत्यांचं काय ?
वेगाने वाढणा-या मुस्लीम लीगला चाप लावण्यासाठी आणि काँग्रेसचं सेक्युलर रुपडं शाबूत ठेवण्यासाठी ही खेळी असावी. पुढे मुस्लीम लीगच्या हिंदू महासभा - काँग्रेस संबंधाबद्दलच्या टीकेने महासभेने काँग्रेसचं सभासद असल्यास ते हिंदू महासभेचं सदस्यत्व कायम ठेवण्यासाठी अडचणीचं ठरेल अशा अर्थाचा ठराव केला. या सगळ्यातून काय अर्थ निघतो ?
काँग्रेसमधे राहून उत्तर भारतीयांवर कारवाई करता येत नसल्याने शिवसेनेला काँग्रेस नेतृत्वाने मदत केल्याचे अनेक आरोप झालेले आहेत.
https://www.google.co.in/search?output=search&sclient=psy-ab&q=congress+...
http://navshakti.co.in/closed/election/1968election/36197/
काही गोष्टी बोलायच्या नाहीत, पृष्ठभागावर येऊ द्यायच्या नाहीत असं कितीही म्हटलं तरी त्या घटनांचं विश्लेषण करताना दोन्हीकडे असलेले समान धागे जे काही सांगायचं ते सांगुन जातात. आमच्यासारखे लोक थेट शब्दात याचं हे अपत्य असं बोलून जातात. हुषार लोकं तेच पण आडून आडून सांगतात..
दिलीप जोशी, १. >> आमच्यासारखे
दिलीप जोशी,
१.
>> आमच्यासारखे लोक थेट शब्दात याचं हे अपत्य असं बोलून जातात. हुषार लोकं तेच पण आडून
>> आडून सांगतात..
याच न्यायाने शंकरलष्कर पक्ष जमावपक्षाचं अपत्य आहे असं म्हणावं का? निदान सुरवातीच्या काळात तरी असा आरोप होत असे. त्यास (वसंतदादा पाटलांची याअर्थी) वसंतसेना असं म्हणंत.
२.
>> घटनांचं विश्लेषण करताना दोन्हीकडे असलेले समान धागे जे काही सांगायचं ते सांगुन जातात.
हाच न्याय तत्त्वज्ञानांच्या बाबतीत लावला तर बौद्ध धर्म हा वैदिक (=हिंदू) धर्माचे अपत्य असल्याचं निष्पन्न होईल. अर्थात, घटनांचं विश्लेषण करण्याऐवजी तत्त्वांचं विश्लेषण करावं लागेल.
आ.न.,
-गा.पै.
निवेदन : २०१४ च्या
निवेदन :
२०१४ च्या निवडणुकीमधे त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल. नीतीश / मोदी / केजरीवाल / मुलायम / मायावती / ममता/ जयललिता / शरद पवार पैकी कुणी पीएम झाले तर काही नाही होणार. पण जर लालूप्रसाद यादव पीएम झाले तर मी त्यांच्याकडे जाऊन माझी कैफियत मांडणार.
हे महान लालूजी,
माझा मुलगा कामातून गेला आहे. लहानपणापासून आतल्या गाठीचा आणि पाताळयंत्री होताच तेव्हाच मी त्याला आवरायला पाहीजे होतं. पण मलाच चावेल असं वाटलं नाही. मला शेंडी लावून तो एका साईटवर गेला. तिथं विजय आंग्रे, भारतीय, गांधीलमाशी, ठो, कोकणस्थ, झोटिंग, वेताळ, माणुस, अजय सावरकर, असा अशा नावाने वावरू लागला. इथेही त्याची कपटनीती लक्षात आल्याने अनेकांनी त्याला हाकलून दिले. मग त्याला साईटवरून ब्लॉअ केले. तेव्हां त्याने भीष्मप्रतिज्ञा केली कि मी कधीच इथे येणार नाही. पण सवय जात नसल्याने लगेचच दुस-या दिवशी दुस-या नावाने हजर झाला. याने अण्णांच्या आंदोलनात अण्णांच्या विरोधात गेलेल्यांना अनेक आयडी काढून शिव्याशाप दिले होते. तर आता मोदींच्या विरोधात गेलेल्यांना शिव्या देत फिरतोय.
तेव्हां माझ्या या मुलाला अनेक आयडींमधून शोधून काढून त्याच्यावर इलाज करून माझ्या ताब्यात द्यावे ही विनंती. याने त्याच्यावर विश्वास ठेवलेल्या काही मित्रांचाही घात केलेला आहे आणि आता स्वभावाप्रमाणे उल्टाप्रचार करतो आहे. ते मित्र आता त्याचे कारनामे उघड करणार आहेत. कसाही वेडावाकडा असला तरी माझाच मुलगा असल्याने मी घबरलो आहे.
त्याला त्याच्या गुन्ह्यांची सजा देऊन येणा-या संकटापासून वाचवण्यासाठी आपण मदत करावी.
मंदार जोशी उर्फ ठो उर्फ
मंदार जोशी उर्फ ठो उर्फ गप्पीष्ट
आता मात्र हद्द झाली...मला वाटलं होतं की एवढे लिहील्यानंतर तुझा एकही मेल मला येणार नाही. पण नाहीच...तुझ्या सवयी जामच चिकट आहेत.
तुझ्या माहीतीसाठी मला माबोवर कुणीही शत्रु नाहीत आणि असलेच तर मी त्यांची फिकीर करत नाही कारण मला माबोव्यतिरिक्तपण विश्व आहे. उद्या वाटले तर मी माबो बंद करून खुशाल राहू शकतो. तुझ्यासारखे माझा आयडी सुरु करा अशी अॅडमिनकडे भीक मागणार नाही किंवा दुसरे आयडी तयार करून येणार नाही.
त्यामुळे मला घंटा फरक पडत नाही माबोवर कोण कुणाला काय म्हणते...
तुला जर एवढीच चिंता असेल तर मग तुझे तु बघ....मला काय घेणे देणे नाय...
आणि हो आधी टाकणार नव्हतो पण हे
I am writing this fully knowing that you will probably not only mention this email but also my identity fully on Maayboli
वाचल्यानंतर मी ठरवले की आता हे टाकायचेच...
तु आणि तुझे मित्र आणि शत्रु सुखाने रहा....
मला या दोन्हीमध्येही गणना करू नकोस ही नम्र विनंती
गंगाधर मुटेजी तुमचा धागा
गंगाधर मुटेजी
तुमचा धागा हायजॅक केल्याबदद्ल मनापासून माफी...पण मला एकदा न एकदा या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा होता. म्हणून...
तुम्हाला वाटले तर सगळे उडवून लावेन...
इतर गोष्टीत मला फारसा
इतर गोष्टीत मला फारसा इंटरेस्ट नाही आणि पोकळ धमक्यांमधेही. या धाग्यावर विषयावर चर्चा करत असताना तिथे वैयक्तिक टिप्पणी यासाठी केली गेली कि त्याला उत्तर दिले जाव. पण त्याला उत्तर न दिल्यावरही हाच प्रकार चालू राहीला. कारण आयडी ब्लॉक करायचं निमित्त हवं होतं. असल्या कारवाईला काही अर्थ नाही. पण इथे विनाकारण जी काही बडबड केली गेली त्यासाठी एक स्क्रीनशॉट डकवण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज करणार आहे. कुणाचे काय धंदे आहेत ते स्पष्ट होईल त्यानंतर.
आता या पोस्टनंतर कदाचित आयडी बॅन झालेला असेल.
हा धागा गाजवल्या आणि
हा धागा गाजवल्या आणि वाजवल्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.
----------------------------------------------------
आज केजरीवालांनी राजीनामा दिल्याने एका सत्तायुगाचा अंत झालेला आहे.
"केजरीवालांना आणि भारतीय शोषित जनतेला अपेक्षित असलेले व्यवस्था परिवर्तन सत्ताप्राप्तीतून साध्य होण्याची शक्यता नाही. तरीही केजरीवाल सत्तेच्या मैदानात उतरले. आता सत्तेतूनही व्यवस्था परिवर्तन साध्य होऊ शकते हे सिद्ध करण्याची जबाबदारी केजरीवालांची आहे." असे मी वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
केजरीवालांना सत्तेच्या मर्यादा कळल्यानेच त्यांनी राजीनामा दिला, असे मला वाटते. आता त्यांनी सत्तेचा नेता होण्याऐवजी लोकनेता होण्याच्या दृष्टीने पावले टाकावीत. तोलामोलाचा लोकनेता होण्याची पात्रता त्यांच्यात नक्कीच आहे.
What? केजरीवालांनी राजीनामा
What?
केजरीवालांनी राजीनामा दिला ही माझ्यासाठी बातमी आहे. जस्ट फ्री झालो. बातम्या बघतो आता टीव्हीवर.
जितके प्रतिसाद आले तितके दिवस
जितके प्रतिसाद आले तितके दिवस पण चालवले नाही सरकार
गंगाधर ही शक्तीमान है .... यह
गंगाधर ही शक्तीमान है .... यह तो वही हुआ ना कि .......
शक्तीमान ही गंगाधर है !
हा धागा शेती आणी शेतकरी या
हा धागा शेती आणी शेतकरी या ग्रुप मधे उघडायचे कारण नाही कळले?
गंगाधर = शक्तीमान, पीटर
गंगाधर = शक्तीमान, पीटर पार्कर = स्पायडरमॅन, क्लार्क केण्ट = सुपरमॅन , आम आदमी पार्टी = भाजपा
यकीन नही आता तो गोविंदाचार्यजी से पूछो..
शेती करताना ठराविक अंतराने हंगामी पीकं घ्यावी लागतात. प्रत्येकवेळी जमिनीची मशागत करावी लागते. चाणाक्ष शेतकरी टायमिंग आणि माती पाहून कुठलं पीक या वेळी जोमाने येईल याचा अंदाज बांधतो. राजकारण तसंच आहे. आता काँग्रेसचं पीक उखडून त्याच्या जागी आंब्याचं (आम) पीक घ्यायचं आणि मधल्या जागेत कमळाची शेती करायची असे ठरले आहे.
असीम भागवत, हे असे म्हणायचेय
असीम भागवत, हे असे म्हणायचेय का तुला?
मला कळवळा शेतीचा
शेतकर्याच्या प्रितीचा
असो कमळ की 'आम'
'मुटे' बांधील मातीचा.
(No subject)
आपचा शटलकॉक होणार दिसतय
आपचा शटलकॉक होणार दिसतय पुढच्या निवडणुकीत. काँग्रेस बी टिम का भाजपा बी टिम

चला नाटकाचा एक अंक संपला.
असीम भागवत fakir
असीम भागवत
fakir
Pages